Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
डाळि.न्ब
डाळि.न्ब आणि द्राक्षा ऐवजी ग्लेस चेरीजचे (केक मधे वगैरे घालतात त्या...लाल चुटूक र.न्गाच्या)छोटे तुकडे घालुन बघा. चा.न्गल लागत.....
पीआरआर-
पीआरआर- उडदाच्या डाळीचे दहीवडे आणि मेदूवडे दोन्हीच कृती या लिंकवर आहे, पूर्ण पान वाचून काढा-
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/79981.html?1195237113
धन्स
धन्स पीएसजी पण ती लिंक बघुनच मी विचारलेय. ती भाषा नाही समजत आहे.
नव्याने
नव्याने लिहिलीय आता नव्या माबोवर
भारतात
भारतात कणिक, साखर इ सामान देउन बेकरीतुन कुकीच्या आकाराची बिस्किट्स करुन मिळतात. त्याची कृती कुणाला सांगता येइल का ? फार किचकट/वेळखाउ असेल तर नाही सांगितली तरी चालेल
धन्यवाद
धन्यवाद दिनेशजी!
लाल
लाल भोपळ्याच्या गोड पुर्या/घारगे करताना त्यात गव्हाचे पीठ घालायचे की तान्दळाचे?
खरे तर
खरे तर तांदूळाचे घालतात पण थोडेसे गव्हाचे घातले तरी छान चव येते. २ वाटी तांदूळाचे पिठ असेल तर १/२ वाटी गव्हाचे घालू शकतेस.
Namaskar Gavhache vade
Namaskar
Gavhache vade navacha jalgav la kela janara padarth konala mahit ahe ka. kanket pani ghalun mag pasta shape madhe plasticchya kagdavar valavatat. nantar te bhijvun mag kanda dane ani fodani ghalun tyachi bhaji karatat. indian pasta mhanta yeil hyala ..farach healthy asnar...
पापलेट आणी
पापलेट आणी सुरमई यांपैकी कोणता मासा चांगला लागतो??
२ आठवद्यांपुर्वी एका नातेवाईकांकडे मासे खाल्ले....तेव्हा पासुन लेकिचे (४ वर्ष) नुसते टुमणे चालु आहे ....मासे कर्..मासे कर.
मला फ्राय मासे करायचे आहेत. ....
कोणते मासे आणू? काय मसाला लावू? (मी कधिच मासे केलेले नाहीत !)
**************************
काढ सखे, गळ्यातील तुझे चांदण्याचे हात
क्षितीजाच्या पलिकडे उभे दिवसाचे दूत
Rasgulle banavanyachya anek
Rasgulle banavanyachya anek kruti pahilya ani baryach try pan kelya tarihi aajvar bajarsarakhe rasgulle jamale nahit. mb grp madhe koni bajarsarakhe rasgulle ghari karatat ka..asalyas tyachi achuk recipe milel ka.
मनु दोन्ही
मनु
दोन्ही मासे मस्तच लागतात. दोन्हींमधे काटे तसे कमीच त्यामुळे नवीन खाणार्यांना सोपे.
जो कुठला मासा ताजा असेल तो आणून पहा. सुरुवातीला एखादा पापलेट किंवा सुरमईचे ४-६ तुकडे आणून पहा.
करायची पद्धत इथे नाही तर जुन्या मायबोलीवर असणार नक्की.
सिंड्रेला!
सिंड्रेला! या लिंकवर मी ५ वर्षापुर्वि मिन्ग्लिश मधे लिहलेली क्रुति आहे.. बघ ट्राय करुन..(हितगुजवर लिहलेय म्हणजे तेव्हा नक्किच जमलि असणार
)
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/56631.html?1152913287
प्राजक्ता,
प्राजक्ता, धन्यवाद. करुन बघते एकदा
थॅन्क्स
थॅन्क्स मनु, तान्दळाचे पीठ घालुन लाटताच येइना, सो हाताने थापुन टाकावे लागले. तसेच करतात का?
कोणाला
कोणाला मश्रुम करी ची रेसिपी माहीत आहे का?....मला हवी आहे.
न्याती, अग
न्याती,
अग ते थापूनच करतात, अॅटलीस्ट मी तरी. पिठ ज्यास्त पातळ नाही करायचे.
मश्रुम करी
मश्रुम करी गेव्हीवाली कि कोरडी हवीय ?
मश्रुम करी
मश्रुम करी म्हण्जेच ग्रेव्हीवाली हवी आहे.
..
..
खरे तर करी
खरे तर करी हा गोलमाल शब्द आहे. आपल्याकडे आमटी, कढी, कालवण, लिप्तं, खडखडलं, सुकं, रोंबाट, दबदबीत, अश्या अनेक नावाने ओळखले जाणारे खास पदार्थ, आंग्लभाषेत या एकाच शब्दाने ओळखले जातात.
करी हा शब्द, तद्दन आशियाइ पदार्थांसाठी योजला जातो. त्यात श्रीलंकन संबल पासून आपल्या कढी पर्यंत सगळेच येते. संबळ हा अगदी तिखट पण जवळजवळ कोरडा पदार्थ असतो तर आपली कढी पातळ असते. असो. एक खास करी लिहित आहे.
धन्यवाद
धन्यवाद दिनेश!!!
मी पांढरा
मी पांढरा कोहोळा आणला आहे जो वापरुन पेठा बनवतात तो. त्या पासुन आणखिन काय काय करता येईल? कोणाला काही रेसीपीज माहिती असतील तर सांगा.
त्याचे
त्याचे कोफ्ते आणि हलवा मस्त होतो.
थालपीठं पण
थालपीठं पण छान होतात, किसुन घेऊन पीठात मळायचा. उकडुन घेउन मॅश करुन कणकेत घातला तर मऊ मऊ पराठे होतात. दोन्हीत हिरवी मिरची, कोथींबीर वाटुन आणि चिमुटभर ओवा घालायचा.
मृण्मयी,
मृण्मयी, thanks लगेच उत्तर दिल्याबद्द्ल! कोफ्ता करी, दुधीची बनवतात साधारण तशीच करायची का ? हलवा पण दुधी हलव्यासारखाच करतात का? जर वेगळी पद्ध्त असेल तर रेसीपी मिळेल का दोन्हीची?
हो आरती.
हो आरती. दोन्हीच्या कृती अगदी तश्याच. बरेचदा दुधी मिळाला नाही म्हणून मिळतील त्या भोपळ्याचे किंवा पानकोबीचे कोफ्ते केले. चांगले लागले चक्क.
सिंडे, पराठे केले नव्हते कधी. आता करून पाहीन.
१.बारीक
१.बारीक फोडी करुन, मुगाची डाळ घालुन भाजी
२.मोठ्या फोडी घालुन सांबार
३.किसुन खिर
४.थालीपिठ
५.खंमग वडे (किसुन तांदुळाचे पीठ, तिखट, मीठ, लसुन जीरे, हळद, जीरे पुड घालुन)
६.दुधीचे गोळे (फोडणीत मोठ्या फोडी टाकुन पाणी टाकणे उकळी आल्यावर मोहन, तिखट-मीठ घालुन जरा घट्ट भिजविलेल्या कणकेचे गोळे टाकुन मस्त शिजवुन घ्यायचे आणि वरतुन लसणाची फोडणी घेवुन, शेंगदाण्याच्या चटणी सोबत खायचे)
७.वाफवुन कोशिंबीर
सध्या एवढच आठवतय
मी टायपे
मी टायपे पर्यंत किती पोस्टी...
मी पण पराठे ट्राय केले नाहीत, करीन आता..
आणि हो कोफ्ते विसरलेच की.
बाय द वे, आज
बाय द वे, आज चिलीजला जाणं कॅन्सल झाल्यामुळे फलाफल मिक्स, कांदा, थोडी कणीक, मिरची, कोथिंबीर, धणेपूड आणि तिखट मीठ घालून थालिपीठं लावली. चक्क चांगली लागली.
Pages