Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अॅश मोहोर
अॅश
मोहोरी मी तर सरळ मिक्सरमध्ये फिरवते. आवळा लोणच्यात ज्या पाण्यात आवळे उकडतो त्याच पाण्यात व मिरची लोणच्यात लिम्बू रस व मोहोरी मिक्सरमधून काढणे. मोहोरी छान फेसली गेली की सरळ नाकात जाते.( अर्थातच मोहोरीचा झणझणीत फ्लेवर)
गव्हाच्या
गव्हाच्या लाह्या कशा करतात ?
धन्यवाद
धन्यवाद दिनेश आणि mmm, आता कळाले.. दिनेश, तुमच्या रंगिबेरंगीवरही पाहते..
*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...
मोठ्या
मोठ्या प्रमाणात केलेला गुळांबा टिकवायला ( मुंबईच्या हवेत ) काय प्रिझर्वेटिव्हज घालायचे ?
तसे पहायला
तसे पहायला गेले तर गूळाचे प्रमाण हेच प्रिसर्वेटीव म्हणून काम करते. पाणी तर टाकायचे नसतेच तेव्हा टिकतो. मुंबईत असताना आई काहीच टाकायची नाही. फक्त आम्हां मुलांना हात लावायला द्यायची नाही(आम्ही ओला,उष्टा चमचा टाकू असे तीला वाटायचे), ती स्वतः त्या स्पेशल टाईपच्या बरण्यातून काढून द्यायची.
कैरीचे
कैरीचे उकडुन पन्हे कसे करतात.. अगदी स्टेप बाय स्टेप सांगा, साखर्/गुळ किती वैगरे..चार कैर्यांचं करायचय.. मला स्वतःला कधीच पन्ह आवडलं नाही म्हणुन आई काय, कसे करते इकडे कधी लक्ष दिलं नाही..
अल्पना,
अल्पना, लिहिलंय..
---------------------
*ससुराल गेंदा फूल*
सुरभी,
सुरभी, पाण्याचा हात लावायचा नाही हेच महत्वाचे. त्यात ज्या लवंगा घातलेल्या असतात त्याने मुंग्या दूर राहतात. एरवी काहि खास घालायची गरज नाही.
अल्पना,
चार कैर्या उकडून घ्यायच्या.
त्याचा कुस्करुन गर काढायचा.
साली फार पिळायच्या नाहीत. नाहितर तुरटपणा वाढतो.
गर किती निघेल आणि तो किती आंबट आहे यावर साखर गुळाचे प्रमाण अवलंबून असते.
गर मोजुन त्याच्या अर्धी वा पाउण साखर वा गूळ घालायचा आणि ढवळायचे. हे सगळे अगदी थंडगार करायचे. मग तेवढेच बर्फाचे पाणी घालायचे. वेलची वा केशर आवडीप्रमाणे. यात चिमुटभर मीठही घालतात, पण तेही आवडीनुसार. गोडी कमी वाटली तर आणखी साखर घालता येते.
यात गराचे छोटे छोटे गोळे आले तर ते काहिजणाना आवडतात. ( काहि जणाना नाही ) म्हणून हवे असेल तर साखर घातल्यावर सगळे मिश्रण मिक्सरमधुन काढायचे.
जर जास्त प्रमाणात करायचे असेल तर साखर वा गूळ घालुन मिश्रण जरा आटवायचे.
पेये या सदरात हे असणार. हे पोस्ट फक्त क्विक रेफरन्स साठीच.
धन्यवाद
धन्यवाद पूनम, दिनेश..
धन्यवाद
धन्यवाद मनुस्विनी, दिनेश, पण गुळाच्या पाकात पाणी असतच ना...... (ते चालतच असणार ...)
मनच्याव
मनच्याव सुप ची रेसिपी कोणी सांगेल का?
गुळाचा पाक
गुळाचा पाक पाण्याशिवाय होतो. पण हा पाक करताना जे पाणी घालतात ते उकळल्यामूळे अगदी कमी होते.
तसेच हा गुळांबा अगदी थंड झाल्यावरच बाटलीत भरायचा. नाहीतर वाफेचे पाणी त्यात पडते.
माझ्याकडे
माझ्याकडे बरीच ग्रॅनी स्मिथ अॅपल्स उरलीत. आंबटपणामुळे संपत नाहीयेत आणि फ्रूट सॅलडमधे अगदीच वाईट्ट लागतील. काय करता येईल त्यांचे? कैरीच्या लोणच्यासारखे काही करता येईल का?
--------------------------------------------------------------------------------
फूलोंसे कांटे अच्छे होते है,
जो दामन थाम लेते है.
दोस्त से दुश्मन अच्छे होते है
जो जलकर नाम लेते है.
लालुचं
लालुचं अॅपल रेलिश बघितलस का ? मागे एकदा मिनोतीने फ्रुट क्रिस्पची रेसिपी दिली होती त्यात पण खपतील
सुमॉ
सुमॉ त्याचा अगदी आपल्या पद्धतीच्या कैरीच्या लोणच्यासारखा प्रकार करता येतो. पन्हे पण करता येते.
धन्स
धन्स सिंडी, दिनेश.
अॅपल रेलीश आलं होतं डोक्यात, पण फारच आंबट आहेत ग
-------------------------------------------------------------------------
फूलोंसे कांटे अच्छे होते है,
जो दामन थाम लेते है.
दोस्त से दुश्मन अच्छे होते है
जो जलकर नाम लेते है.
बेकिंग
बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा यात काय फरक आहे? केक किंवा कुकीज करताना कोणते वापरावे?
http://vadanikavalgheta.blogs
http://vadanikavalgheta.blogspot.com/2007/04/blog-post_05.html
http://vadanikavalgheta.blogspot.com/2008/04/blog-post_10.html
http://the-cooker.blogspot.com/2008/06/methamba-using-apples.html
हे घ्या ग्रीन अॅपलसाठी/
सुमॉ,
सुमॉ, अॅपल पाय(pie) बनवू शकतो. हीच अॅपल उलट मस्त असतात अॅपल पाय साठी. मुलांना पण आवडतात असे बघितलेय.
नाहीतर अॅपल सॉस बनव्.(रेलीशचे कसिन) त्यात नाही लागत एवढे आंबट.
नाहीतर अॅपल बटर. (बारीक किसून वाटायची, जायफल्,दालचीनी,जराशीच बॉउन सुगर घालून १२५ फॅ वर १.५ तास बेक करायची. मधेच काढून मध टाकून ढवळून पुन्हा बेक करायचे). मस्त लागतो कुठल्याही ब्रेड वर.
नाहीतर अॅपल शीरा हा पण छान लागतो. (साखरेने आंबट नाही लागत).
मेथांबा
मेथांबा युझिंग अॅपल्स
मी इथे लिहिणार होते की मेथॅपल करुन बघ पण कशाला तारे तोडा म्हणुन नाही लिहिले 
हीरव्या
हीरव्या टोमेटोची भाजीचे प्रकार शोधतेय..जुन्या हीतगुज वरील फोन्ट नीट दीसत नाहीए. क्रुपया कुणी इथे क्रुती देउ शकाल का?
हिरव्या
हिरव्या टोमॅटोची बाकर भरून भाजी अतीशय चवदार होते.
जुन्या हितगुजवर आहे का बघावं लागेल.
बेकिंग
बेकिंग सोडा मधे स्टार्च वगैरे मिसळून बेकिंग पावडर करतात. सोड्याची प्रक्रिया कमी तपमानाला व इतर घटकांची जास्त तपमानाला होते. केक बेक करताना नंतरही हि प्रक्रिया व्हावी म्हणून हे घटक मिसळलेले असतात.
बेकिंग पावडरपेक्षा, सोडा कमी पुरतो. केक साठी बेकिंग पावडर वापरणे चांगले, आणि ते तसेच सुचवलेले असते.
भाजीच्या
भाजीच्या एवजी एक चटणी सांगते, टोमॅटो, हि. मिरची तेलात पाणी न टाकता वाफऊन घ्यायचं मग त्यात गुळ, जीरे, लसुण, कोथिंबीर, मीठ घालुन मिक्सरमधुन फिरवुन घ्यावे आणि वरुन हिंग, कडिपत्त्याची खमंग फोडणी द्यायची.
हिरव्या
हिरव्या टोमॅटोची चटणी - http://vadanikavalgheta.blogspot.com/2008/04/blog-post.html
दाणे लावुन भाजी - http://vadanikavalgheta.blogspot.com/2008/04/blog-post_03.html
अजुन एक प्रकारची हिरव्या टोमॅटोची भाजी - http://evolvingtastes.blogspot.com/2008/04/green-tomato-rassa.html
मस्तच!!
मस्तच!! चटणी आणी भाजी दोघेही प्रकार आवड्ले. धन्यवाद!
थॅन्क्यु
थॅन्क्यु दिनेशदादा!
इडली-डोशाच्या पीठात मी चिमुट्भर सोडा घालते, त्यातही बेकिंग पावडर घालता येते का?
इडली
इडली डोश्याच्या पिठात सोडा, बेकिंग पावडर घालण्यापेक्षा, असल्यास ड्राय यीस्ट घालणे चांगले. एकंदर जे पदार्थ आपण आंबवतो त्यात यीस्ट घालणे योग्य. जीवनसत्वाचाही फायदा होतो, शिवाय पिठ नीट आंबते. हौसेने आणलेली ड्राय यीस्ट उपयोगाला पण येते.
माला कोनि
माला कोनि सागेल का कि कोनता brand cha garam masala चागला आहे.
us मधे कन्दा
us मधे कन्दा लसुन मसाला भेटेल का.सब्जा ला english मधे काय म्हनतात.
Pages