पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बर्‍याच दिवसांपासून एक शंका विचारायची आहे.

साऊथ इंडियन लोकं सांबारात दुधी घालतात का कोहळा(ज्याला ते व्हाईट गोर्ड म्हणतात).

सांबारात मी 'एमटीआर' चा मसाला वापरते त्यानेही चांगली चव येते. पण रेस्टॉरंट्स मधलं सांबार हे चवीला वेगळंच असतं त्यातला मसाला काय असतो कुणाला माहित आहे का?

ते लोक कोहळा घालतात. तसेच मग्गे नावाची एक सांबार काकडी मिळते ती वापरतात. पिवळसर चॉकलेटी सालीची आणि जरा मोठी असते हि काकडी.
रेस्टॉरंट्मधे ताजा मसाला करुन वापरतात. त्याचे प्रमाण मी मागे लिहिले होते. त्या मसाल्याने छान चव येते. तयार मसाले मला तिखटजाळ वाटतात.

दिनेश, लिंक द्याल का त्या कृतीची? सांबाराचा ताजा मसाला मी ही केला आहे. त्याचीही एक वेगळी, आपली अशी चव असते. पण मला खास रेस्टॉरंटची चव हवीये, फॉर अ चेंज.
उदाहरणच द्याय्चं झालं तर इथलं डोसा हाऊस, वोल्गा, सर्वणा भवनचं सांबार माझं आवडतं आहे.

सायो, परत लिहिलाय इथे
http://www.maayboli.com/node/6398

मला तरी हा आमच्या माटूंग्याच्या मणिस मधल्या सांबाराची आठवण करुन देतो. मिरच्यांचे प्रमाण कमी जास्त केले तर चालेल.

दिनेश, 'तिकडे' उत्तर टाकलंय पण परत एकदा थॅन्क्स.

थँक्स दिनेशदा. उद्या मक्याचे पीठ आणि जोंधळा , प्रयोग करेन . [:)]

बाजारात जे कुरकुरे मिळतात ते घरच्याघरी आरोग्यपुर्ण रितीने कसे बनवता येतील, अगदी त्या चवीसकट??

साधना.

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

लंबुळक्या पांढर्‍या वांग्यांची भाजी कशी करतात. भरुन करण्यासारखी नाहीयेत वांगी.

ओव्याच्या पानांची भजी सोडुन अजुन काय करता येईल ?

साधना ते सगळे प्रकार, मशीनने केलेले असतात, त्यात तपमान खूप नियंत्रीत करावे लागते, घरी ते शक्य होत नाही.
त्या पांढर्‍या वांग्याचे उभे दोन तूकडे करायचे. त्याला अगदी अलगद चिर पाडायची. त्यात तिखट, मीठ, धणे जिरे पूड, वगैरे मसाला भरायचा. आणि शॅलो फ्राय करायची. आवडत असेल तर मुरवताना व्हीनीगर लावायचे. त्याचा भाजी आमटीत पण उपयोग करता येतो.

जी ओव्याची पाने आपण म्हणतो, ती खरे तर ओव्याची पाने नसतात. ओवा धणे जिरे कूळातला असल्याने त्याची पाने तशीच असतात. या पानाचा भजीशिवाय आणखी काहि उपयोग नाही. ( आफ्रिकेत ती पाने मटणाच्या सूपमधे घालतात ) जर नुसती ती पाने उग्र चवीची वाटत असतील, तर त्यात बाकिची पाने मिसळून, जसे मूळा, पालक, मेथी वगैरे, अशी मिश्र पाल्याची भजी करता येतील. या भजीच्या पिठात थोडे ताक आणि तांदळाचे पिठ पण मिसळायचे.

लेमन चिकनची रेसेपी आहे का? आत्ताच मोठ्या दिरांनी रात्रीसाठी फर्माइश केलिये. मला नेटवर रेसेपी शोधायचे काम साम्गितलय.

ओव्याच्या पानांची तांबळ्ळी म्हणून कच्ची आमटी करतात
ओव्याची पानं चिरुन थोड्या तेलात किंवा तुपात जराशी परतून घ्यायची. त्यातच पाहिजे तर एखादी हिरवी मिरची परतून घालायची. मग हे , एखादा आल्याचा छोटा तुकडा, अन ओलं खोबरं अगदी बारीक वाटायचं. वाटताना शेवटी एक चिंचेची पाकळी घालायची .
चवी प्रमाणे मीठ घालून आमटी सारखं पात़ळ करावं.
गरम गरम भाताबरोबर हाणावं .
मिरची नाहीच घातली तरी चालते. ओव्याच्या पानांचा मस्त स्वाद येतो अगदी.

ती तांबळी, आंब्याच्या पानाची, पेरुच्या पानाची आणि विड्याच्या पानाची करतात हे माहित होते. ओव्याच्या पानाची पण करतात का ? करायला हवी. यात थोडी मिरी पण घालतात ना ?

अल्पना, पांढर्‍या वांग्याचा रस्सा खुप छान होतो. रेसीपी हवी असेल तर सांग. लिहीन.

लिही ना प्लिज. उद्या रात्री करेन मी.

दिनेश Sad

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

धन्यवाद दिनेश, शोनु.

साधना, त्याच्या जवळपास जाणारा एक प्रकार, तांदळाचे सांडगे मी वाळवण विभागात लिहिला होता. आता मुंबईत हवा गरम आहे. करता येतील. नाहीच सापडला तर ......

धन्यवाद दिनेश... मी जाऊन पाहते तिथे.. अर्थात काही मदत लागल्यास विचारेनच... Happy

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

माझ्या कडे गुलाबजाम चा पाक खुप उरलेला आहे त्याचे काय करता येईल .

गुलाबजाम चा पाक उरला असेल तर त्यात लिंबु(आयडी नव्हे) पिळुन सुधारस करता येईल.
सुधारसामधे व्हेरीयेशन हव असेल तर त्यामधे केळ्याचे, अननसाचे काप घालता येतील.

शंकरपाळी किंवा गोडाच्या पुर्‍या करता येतील.

मी नुकतेच हेल्थ फुड - लो कॅलरी स्नॅक्स ह्या लेबलाखाली नाचणीचे चिप्स खाल्ले. पाकिटावर ingredients मध्ये नाचणी, तेल, मीठ मसाले, अ‍ॅडेड फ्लेवर एवढेच लिहिले होते. तळल्यासारखे अजिबात दिसत नाहीत, पण चवीला खुप कुरकुरीत आहेत. खातानाही तळल्यासारखे वाटत नाहीत. कसे बनवले असतील?? दिसायला पातळ रिबनसारखे दिसतात. कृती कळाली तर असेच बाकीच्या पिठांचेही करता येतील...

साधना

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

असे बरेच पदार्थ उपलब्ध आहेत बाजारात. ते तळलेले नसतात तर भाजलेले असतात. खास कमी तपमानात ते भाजतात. तेल कमी घालून खाकरा करता येतो. त्याची कृति आहे इथे.

ओ हो, म्हणजे घरी करता येण्याजोगे नाही???

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

दुकानात फ्रोजन सेक्शन मधे मिळणारे स्प्रिंगरोल रॅपर्स वापरून स्प्रिंगरोल्स व्यतिरीक्त काही करता येइल का? हे रॅपर्स तळण्या ऐवजी बेक केले तर??? कुणाला काही अनुभव???

इथे हॉटेल मधे ' यलो/पिली दाल' म्हणुन मुगाची डाळ वापरुन दाल फ्राय असते . थोडी स्पाईसी असते. त्यात काय मसाला घालतात? मी गरम मसाला घालुन पाहीला पण तशी चव आली नाही. कोणाला माहीत आहे का ही दाल कशी करतात ते?

कांदा, लसुण, भरपुर अद्रक, टोमॅटो, धण्याची पावडर व गरम मसाला... पण मसाला खुप वेळ परतलेला असतो.

Pages