पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ट्युना फिश करी कशी बनवायची?

-प्रिन्सेस...

टिनमधला फिश वापरणार ना ? तो आधीच शिजवलेला असतो. इथल्या कुठल्याही पाककृतिमधे ( माश्याच्या ) तो चालेल. मी पण एक दोन लिहिल्या आहेत.

दिनेशदा टिनमधला नाही, फ्रेश आणलाय. तो कसा बनवायचा?

-प्रिन्सेस...

तुला ग्रिल करायचा असेल तर ग्रिल करु शकतेस बाकी फिश सारखाच. करी मध्ये इतका चांगला नाही लागला मला तरी.

रसगुल्ल्याचा टिनमधला पाक उरला आहे. ब्रेड किंवा गव्हाचे पिठ वापरून काही बनवता येईल का?

प्रिन्सेस इथे आहे करी. या माश्याला कुठलीहि करी चालेल्, ( वर लिहिल्याप्रमाणे ) पण या माश्याला आपले मसाले सोसत नाहीत.
सोनु अबोली.
ब्रेड का मिठा बनवता येईल. मालपुवे बनवता येतील,

प्रिंसेस, ताजा ट्युना असेल तर त्याला दहा पंधरा मिनिटं सोया सॉस, तिळाचं तेल ( चिनी दुकानातलं ) अन आवडत असल्यास एक चिमुट वसाबी पावडर मधे बुडवून ठेव. मग एकेका बाजून फक्त तीन मिनिटे ग्रिल कर. कडा शिजल्या पाहिजेत अन आतून कच्चं असावं. ग्रिल वरुन काढून लगेच तसेच खाऊ शकता. किंवा स्लाइसेस करुन कोवळ्या सॅलड मिक्स वर घालून पण खाऊ शकता. सॅलड केलंच तर लिंबाचा रस १/२ चमचा, ऑलिव्ह ऑइल २-३ टेस्पून , मिरपूड, बारीक चिरुन ठेचलेली लसणाची पाकळी हे एकत्र करून ड्रेसिंग.

ताज्या ट्युना ला आपल्या पद्धतीचे मसाले सोसत नाहीत ..

धन्यवाद दिनेशदा , शोनु आणि मनस्विनी.

हा मासा पहिल्यांदाच आणलेला... खुप नाजुक असतो ना...

फ्राय / ग्रिल नवरा फारसे खात नाही. म्हणुन करीच केली. मला माहिती नव्हते की आपल्या पद्धतीचे मसाले सोसत नाही Sad शिवाय मासे बनवण्यात मी खुप कच्ची आहे त्यामुळे जे काय मी ट्युना करी म्हणुन नवर्‍यापुढे जे काय वाढले ते त्याने गुमान खाल्ले. (चांगली झालीय असे म्हणाला ... पण मला ठीकठाक्च वाटली चव.)

फ्रीज मध्ये अजुनही थोडा आहे तो ग्रिल करुन बघेन.

-प्रिन्सेस...

धन्यवाद दिनेशदा.

होल मिल्क पासुन घरी दही/ताक कसे करायचे? विकतच्या दह्याचे विरजण लावुन होइल का? त्यासाठी दुध आधी तापवायला हवे का? मी एकदा असे करुन पाहिले, दही होण्याआधीच खराब होउन गेले. फ्रीझमध्ये ठेवले तर आम्बणार नाही ना म्हणुन बाहेरच ठेवले होते. सान्गा बरे कोणितरी, म्हणजे ताकातले आम्बट वरण करता येइल मला Happy

दूध विरजण्यासंबंधी इथे विस्तृत चर्चा झाली होती. ती जरुर वाचावी. इथे नेमक्या प्रश्नाना उत्तरे देतो.
दूध आधी तापवणे गरजेचे आहे. वर आले कि पोकळ झाकण ठेवून कोमट करावे. साय बाजूला करुन, दह्याचे विरजण लावावे. विकतचे दही चालेल. त्यात कवड्या असतील तर त्या मोडून घ्याव्यात. हवामाना प्रमाणे चार ते सहा तासात दही लागते. ते गोड असते. बाहेर ठेवले तर आंबट होत जाते. म्हणुन पुर्ण लागले कि फ्रीजमधे ठेवावे.

न्यति
इथे भारतीय दुकानात जे देशी दही मिळते त्याने विरजण चांगलं लागतं एकदम. घरी दही लावणारे कोणी भारतीय असतील तर त्यांच्याकडेही विरजण मागू शकता. कधी कधी रेस्टॉरंटवाले देखील विरजण देतात. अगदीच नाही मिळालं तर स्टोनीफिल्ड चं ऑर्गॅनिक दही , किंवा ट्रेडर जो मधलं ग्रीक दही वापरून पण विरजण लावता येतं. दुधाला पुर्ण उकळी काढावी. मग अगदी गार व्हायच्या आधी, जरा कोमट असताना विरजण लावून झाकून ओव्हन मधे ठेवावं. रात्री लावलं तर अगदी हिवाळ्यात सुद्धा सकाळपर्यंत मस्त घट्ट दही जमतंय.

अवचटांनी त्यांच्या एका पुस्तकात लिहिलं होतं की विरजण एका छोट्या वाटीत घेऊन त्यात चमचाभर कोमट दूध मिसळून चांगलं घोटून घ्यावं . मग हे मिश्रण दुधात घालून चमचा एकाच दिशेने गोल गोल फिरवत मिसळून घ्यावं. ( मला वाटतं ५०-६० राउंडस असं त्यांनी लिहिलंय ).
मी कधी कधी असं करते, पण नाही केलं तरी व्यवस्थित लागतं दही.

या भागात येणार असाल तर कळवा, मी देईन विरजण !

धन्यवाद दिनेश, शोनु! इथे स्टोनीफिल्ड मिळते ते वापरुन पाहते.

वान्गे भाजण्याविषयी/दूध विरजण्यासंबंधी इथे विस्तृत चर्चा झाली होती. >>> पुस्तकासारखे सलग वाचुनच काढते लगेच Happy

माझ्या कडे बरिच सफरचंदे आहेत? काय करु ?

सकाळ, संध्याकाळ असं एक एक खाऊन टाका. Wink

सॉरी, मस्करी करत होते. इथेच लालूची अ‍ॅपल रेलिशची रेसिपि आहे ती पहा.

अ‍ॅपल पाय, अ‍ॅपल रेलिश, अ‍ॅपल सिनमन केक, वगैरे.. Happy

दही लावण्याची माझी हमखास method
दुध मायक्रोवेव्ह मध्ये तापवुन घ्यायच. (उकळुन नाही. वरती सायीसारखा लेयर आला कि बास)
ओव्हन १८० डिग्रीला सेट करायचा.
दुध थोडावेळ गार होवु द्याव. साधारन ५/६ मिनिटानंतर दुध बोटाला सोसवण्याइतपत (कोमट नाही. )
उबदार झाल कि दही घालाव. बीटर ने किंवा रवीने चांगले घुसळुन घ्यावे. झाकण लावावे.
ओव्हन १८० डिग्री ला सेट झाला असेल तर बंद करावा. आणि भांड ओव्हन मध्ये ठेवावे.
३/४ तासात मस्त दही तयार होते.
दुध कोमट अजिबात होवु द्यायच नाही. थोड warm on hotter side अस पाहिजे .:)
हे जमल नाही तर crockpot मध्ये अगदी मस्त दही होते. ते करुन बघा.

mod हे इथ लिहायच नाही आहे. पण मला दह्याचा बीबी सापडत नाही आहे. बघते अजुन एकदा आणि मग Delete करते.
------------------------------------------------------------------------
रोज ४ च पोस्ट लिहिणार. सेव्ह ग्रीन. Proud

जरा मदत हवी आहे..दीवसभराच्या प्रवासात नेता येतील असे काही पोटभरीचे सुचवा विशेषता डायबेटीसला चालेल आसे (सासु-सासरे आलेत !)मी पुर्या, चट्णी-सेन्ड्वीच, दही बुत्ती असे नेते पण दरवेळेस तेच कसे नेणार..

स्वाति थेपले कर ना.

मला कोनि ओनिअन कुल्चा ची रेसिपी सागेल का

स्वाति,इडली-चटणी,पुरी-बटाटयाची भाजी,कोरडा झुणका-चपाती ने या वेळी.

१. इडली चटणी व्यवस्थित टिकते. चटणीमधे खोबरे असेल तर छोट्या इग्लू मधुन नेले तर बरे उन्हळ्याच्या दिवसात. २. एखादा दिवस रहाण्यासाठी जाणार असाल तर २ कप चा राईस कुकर मिळतो तो न्यायचा. पुलावसारखे तांदूळ भाजुन मसाला घालुन न्यायचे पाणि घालुन ऐनवेळी लावता येतो.
३. मेथीचे पालकाचे ठेपले जरा खमंग भाजुन न्यायचे एक दिवस नीट टिकतात.
४. काकडी टोमॅटो घेउन जायचे. तेलात दाण्याची चटणी कालवुन न्यायची. ऐन्वेळी काकडी टोमॅटो कापुन सँडविचेस करता येतात.
५. भेळीचे सामान नेता येते ऐन्वेळी मिसळुन खाता येते.

इथे मागे झालेली चर्चा वाचली तर जास्ती आयडिया मिळतील.
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/60712.html?1158287713

धन्यवाद सायोनारा, म्रुण्मयी

हो आज खाल्ले एक सफरचंद Happy .... शोधते इथे रेसिपी

डायबीटीस असेल तर भाताचे पदार्थ चालतील का? मी साधारण डायबीटीसला चालू शकेल अश्याने सांगतेय.
१)तू होल्ग्रेन ब्रेड घेवून जावू शकतेस. मग वरती म्हटल्याप्रमाणे सँडविच करु शकतेस.
२)पेस्टो बनव, पाणीही नसते तेव्हा एका दिवसात खराब होण्याचे चान्सेस कमीच. कोथिंबीर चटणी पाणी न घालता फक्त ऑऑ घालून करायची. सँडवीच वर होइल.
३)मूगाची धिरडी नुस्त्या मूगापेक्षा फक्त जरासेच पोहे घालून केलीस तर चांगले(पोह्याने नरम रहातात.पुन्हा तांदूळ नसल्याने एवढी ज्यास्त सुगर शूट होणार नाही).
४)वरती म्हटलेच आहे तसे पालक्,बारीक मेथी घालून थेपले, लसूण,शेंगदाण्याची चटणी,
५)आजकाल चांगले डबे मिळतात फळे कापून ठेवायला. त्यात डब्याला अ‍ॅट्च कूलर प्लेट असते तेव्हा तू स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी वगैरे कापून एका डब्यात. पपई एका डब्यात्.(ही फळे डायबीटीसला योग्य आहेत).
६)एखादे मफीन्स वा केक वा ब्रेड जो गव्हाचा आहे व साखर न टाकता अ‍ॅपल सॉस,दालचीनी वगैरे टाकून बनव. नाहीतर स्टीवीया वापर.
७)किन्वा (quinoa)उपमा भाजून मसाला टाकून सुके घेवून जावू शकतेस. हे सगळे भाजून मायक्रोवेव कूकर मध्ये फक्त पाणी टाकायचे. जिथे उतरले असेल तिथे फ्रोजन भाज्या मिळतातच आजूबाजूच्या दुकानात. ढोकळा मूग डाळ नी उडीद डाळ भिजवून वाटून करु शकतेस.
८)ड्रायफ्रूट चिवडा, सुखे अंजीर बर्फी व खजूर साखर न टाकता बर्फी बनवून घेवू शकतेस. ज्यास्त वेळ नाही लागत.
वरचे सर्व पदार्थ आदल्या दिवशीही करू शकतेस. हे पदार्थ डायबीटीस नसलेले पण आवडीने खावू शकतात. शिवाय प्रवासात जरा शूगर मेन्टेन केलेली बरी.
वरच्या लिंक मध्ये बरेच ऑप्शन्स आहेत आणखी.

मनु मी पाहीलेच नाही डायबेटीस चे. बरे झाले सांगितलेस ते Wink

अग मी प्रश्ण स्वातीला विचारला गं. असो Happy

अग मी ते न वाचताच सजेशन दिली म्हणुन म्हणले बरे झाले सांगितलेस.

काल गरे असलेला कच्चा फणस घेतलाय विकत( पाव किलोच घेतला).. पण मी आयुश्यात कधीच फणसाची भाजी खाल्ली नाहीये. कशी करतात माहित नाही.. Sad
तो भाजीवाला रोजच म्हणायचा कठहल लेलो म्हणुन घेतला..
कशी करतात अश्या फणसाची भाजी? फ्रीजमध्ये ठेवलाय त्यामुळे खराब व्हायची भिती नाही ना?
मी जुन्या माबोवर बघितलं.. उकडुन करायची क्रुती होती..अजुन काही वेगळी क्रुती असते का? मला आता वाटायला लागलय कशाला फणस विकत घ्यायच्या भानगडीत पडले कोण जाणे? Sad

फणसाची भाजी तशीच उकडून मसालेदार छान लागते. आणखी काही पद्दत असेल तर छानच.
आज मला एक प्रश्ण पडलाय, मी शेवगाची पाने आणली, रोज रोज ते ओले खोबरे मिरची, लसून टाकून बनवण्यापेक्षा दुसर्‍या कुठल्या पद्ध्तीने येइल का करता?
चिकन वगैरे टाकून कशी होइल. (घरातली कोंबडी संपवायची आहे).

स्पाँज केक ची रेसिपी मिळेल? किंवा लिंक..

Pages