पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सब्जा ल हिंदी मधे तुकमारिआ म्हणतात त्याच नावाने देसी स्टोर मधे मिळतो. कांदा लसुण मसाला बे एरियामधे मिळतो.

मृण्मयी, <<<हिरव्या टोमॅटोची बाकर भरून भाजी अतीशय चवदार होते>>>
बाकर म्हणजे? (म्हणजे, जनरल, कुठलेही स्टफिंग म्हणायचे आहे का?) शोधली मी जुन्या माबो वर, नाही सापडली. दिनेशदांचे नर्गिसी कोफ्ते फक्त दिसले. लिहीणार का प्लीज हिरव्या टोमॅटोची बाकर भरून भाजी?

अभिनेत्री सुहास जोशी, यानी खुप वर्षांपूर्वी पालकाची कोफ्ता करी लिहिली होती. त्यात करीसाठी कच्चे टोमॅटो, हिरवी मिरची वगैरे वाटून त्याची करी दिली होती.
हिरवे टोमॅटो, हिरवी मिरची, तीळ हे सगळे तेलात परतून त्यात हवे तर दाणे वा खोबरे घालून मस्त चटणी होते. चवीप्रमाणे गुळ, मीठ घालायचे. टोमॅटो बारिक चिरला तर हि चटणी वाटावी पण लागत नाही.

भाजी झक्क झाली..आता बाकर-भाजीची वाट बघतेय Happy

स्वाती, कोन्च्या पद्धतीने केल्याली?

कृपया कोणाला चिले कसे करतात माहित आहे क?? मध्यन्तरि झी मराठी वर दाखवलं होत....पण मला आठ्वत नाहीये...
प्राजु...

चिले म्हणजे डाळीच्या पीठाची धीरडी करतो तसेच असतात ना ? धिरड्यापेक्षा थोडे जाड असतात.

कुकरमध्ये केक कसा करतात? ओव्हनशिवाय / मायक्रोशिवाय केक करायचा आहे.. या आठवड्यात गावाकडे जायचय.. पुतण्यांना केक आवडतो, पण घरी केला जात नाही अन बाहेरुन फक्त वाढदिवसाला आणला जातो.. यावेळी जर ५-७ दिवसांपेक्षा जास्त रहाणं झालं तर त्यांना खाऊ घालावा अशी इच्छा आहे.. बिन अंड्याच्या केकची कृती हवीये...
याव्यतिरिक्त काही पुडींग वैगरे पदार्थ पण सुचवा.. गावात रहात असल्यामुळे वेगळं काहीच अन कधीच खायला मिलत नाही त्यांना (अपवाद सुट्टीत बाहेर गेल्यावर फक्त) अगदी इडली-डोसे पण नाही. नेहेमी आपलं पराठे, राजमा, छोले जास्तित जास्त दहीवडे.. सोप्पे अन वेगळे पदार्थ सुचवा.. पुतण्या ४ अन १० वर्ष वयाच्या आहेत..

अल्पना, इथे रव्याच्या केकची कृति आहे. अंड्याशिवाय होतो तो.
कुकरमधे केक करण्याला माझ्या तत्वतः विरोध आहे. हा केक कुठल्याहि साधनाशिवाय होतो. हवे तर तव्यावर वाळू घालुन त्यावर केकचे भांडे ठेवावे. वरही दुसरा तापलेला तवा ठेवावा.

आई करायची खरं पुर्वी स्टोव्हवर्..खाली लोखंडी तवा त्यावर वाळु, मग त्यावर केकचे भांडे, त्यावर अजुन एक तवा अन तव्यावर निखारे...असं काहीतरी..पण गॅस असुनही ती स्टोव्हवरच करायची..तिला विचारलं तर म्हणाली गॅसवर नीट होणार नाही.. Sad म्हणुन कुकरबद्दल विचारलं.. ह्या पद्धतीने करायचा झाल्यास गॅसवर करावा का चुलीवर करावा? किती वेळ लागेल?

तुला ढोकळा, समोसा, कचोरी, बटाटा वडा ह्यातिल काही पदार्थ करता येतील. फ्रिज असेल तर जेलीचे पॅकेट सोबत नेऊन जेली सेट करुन नुसती किंवा आईस्क्रिमवर टाकुन आणि त्यावर फळे टाकुन देऊ शकतेस. मुगाचे, रव्याचे दोसे असे सोपे पण छान पदार्थ करु शकतेस.

सँडविच ची चटणी व इतर तयारी करुन त्यांनाच सँडविचेस करायला दाखवू शकतेस.
कोथिंबीरीच्या वड्या करता येतील. अप्पेपात्र असेल तर अप्पे करता येतील.

अल्पना, तू बनॅना ब्रेड अंड्याशिवाय करु शकतेस्(रेसीपी मी लिहिली आहे). फक्त केळे वाढव. स्लो कूकर मध्ये मस्त होतो. मी तिथे लिहिले आहे.

बाकी आपले बरेच पदार्थ आहेत,
तू भरडा काढून इथून घेवून(गावी) जावू शकतेस. अगदी आदल्या रात्री भिजत घालून सकाळी डोसे होतील. चिला मस्त फ्रेश हिरवे वाटाणे घालून होतो. ह्याच भरड्यात सकाळी वाफवलेले हिरवे वाटाणे चिरडून, मिरची,कोथिंबीर घालून चिला तयार.

अल्पना, अगदि कुठल्याही टाईपच्या बर्नरवर हा केक होतो. साधारण अर्ध्या तासात ( मंद आचेवर ) भाजून होतो. कूकर हा ठराविक तपमानासाठी बनवलेला असतो. बेक करताना, किंवा त्यात नान वगैरे करताना तपमान जास्त होते आणि त्या धातूवर परिणाम होतो. कुकरचे भांडे जाड असले तरी ते लोखंडाचे नसते. त्यामुळे कुकर अश्या रितीने वापरु नये.

कराड्कर, तुमच्याच लीन्क वरुन केली, दाणे लावुन Happy

ह्या वेळी, देसि दुकानतुन अन्जीर आणलेत, लेकीला आवड्तील म्हणुन पण अगदिच बेचव आहेत. कोणी हात लावत नाहीए..गोड पदार्थ फारसे खपणार नाहीत, (रसमलाइ, बर्फी बाद ) काय करता येइल अजुन?

दुधात अथवा पाण्यात चार-पाच तास भिजवुन मिल्कशेक करु शकतेस. त्यात मनुका अथवा रेझिन्स घातले तर साखर घालायची पण गरज नाही.

मी एक जुना मोड्का cooker cake करण्यासाठि ठेवला आहे. तो मि फक्त cake साठि वापरते.

अल्पना..पिल्सबरी चे केक मिक्स मिळते..त्यावर कूकर वापरुन केक बनविण्यासाठीच्या सुचना असतात्..ते ट्राय करुन बघ्..छान होतो त्याचा केक...

काही रेसिपीज मध्ये साखर जाळून कॅरॅमेल करण्याची सुचना असते. साखर भांड्यात घालून तशीच ढवळत राहावे?? नंतर भांड्याला चिकटुन थोडी साखर फुकट जाईल ना? शिवाय पाणी अजिबात वापरायचे नाही?

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

कॅरॅमल करताना साखर ढवळायची नसते. मंद गॅसवर ठेवल्यावर ती आधी पातळ होते मग पिवळी, सोनेरी आणि मग चॉकलेटी रंगाची होते. जर तयार कष्टर्ड चे पॅकेट घेतले तर त्यात कॅरॅमल चे वेगळे पाकिट असते.

लेकीच्या शाळेत मसाला ईड्ल्या पाठ्वायच्या आहेत. कोणाला माहित आहे का?

इडली पिठात आलं, हळद, कोथिंबीर आणि पाहिजे त्या भाज्या जसं गाजर, बिन्स बारीक चिरुन चांगलं वाटतं. पाहिजे असल्यास हि. मिरची कुटुन.

मटार, कॉर्न , कोंथिबिर, पालक (बारिक चिरुन) टाकता येईल.

रिकोटाचीजची बर्फी कशी करतात? कृपया कृती द्या.
जुन्या गुलमोहरात प्राजक्ताने दिलेली कृती आहे. पण मला मावा न घालता केलेली बर्फी हवी आहे.

मिनोती, थँक्यु. मला अशी कन्डेन्स्ड मिल्क आणि चीज असलेली हवी होती. आता त्या ब्लॉगवरच्या आणि एकदा आरतीच्या कृतीने करून बघते.

सगळ्यांना नमस्कार!!

मी इथे तशी नवीन आहे. मला पाक कृती हवी आहे.

कुणी कृपया dessert/sweet रेसिपी सांगाल का जी NON-VEG जेवणानंतर देता येईल? बरेच लोक non-veg बरोबर किंवा नंतर दुधाचे पदार्थ खात नाहीत. नेहेमी गुलाबजाम नाहीतर गाजरहलवा करायला पण नको वाटतं. श्रीखंड/ जिलेबी योग्य वाटत नाही. भारताबाहेर राहताना काय आणि कसे करावे काहीवेळा सुचतच नाही.

प्रीया, एखादा केकचा प्रकार करु शकतेस, इथे जुन्या मा बो वर चक्कर टाकलिस तर भरपुर काही सापडेल.

पडवळाची भाजी कशी करतात ? आणी त्यातल्या बिया काढुन टा़कायच्या असतात का ?

Pages