पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Thanks सगळ्यांना इतक्या झट्पट उत्तर दिल्याबद्द्ल. दुधीचे गोळे हा प्रकार नविन वाट्तो आहे. तो पण करुन पाहाते. हलवा, कोफ्ते, थालीपीठं, पराठे हे तर नक्कीच करणार आहे!!

सही मृ, आता थालिपीठं वाचुन मला पण खावी वाटत आहेत...दुधी आहेच घरी, उद्या नक्की करणार.

अमयच, दुधीचे गोळे चेंज म्हणुन छान वाटतात, वरणफळासारखे.

धन्स मृ, प्रीती आणि सिंडी. घरी हे पांढरे कोहोळे खूप लागलेत वेलीला, विचारणारच होते काय करता येईल त्यांचं.

अरे हो, आणि एक उपयोग. पांढरा भोपळा किसून हांडवोत घालायचा पानकोबी ऐवजी. हंडवो मस्त हलका होतो. अजीबात आवंढा बसणारा गच्च गोळा लागत नाही.

Namaskar hya forum madhe navinach ahe. Dineshji, apale anek posts vachale ani apala farach abhyas ahe ase janavate..apan mazya khalil 2 prashnannchi uttare deu shakal kay.
Gavhache vade navacha jalgav la kela janara padarth konala mahit ahe ka. kanket pani ghalun mag pasta shape madhe plasticchya kagdavar valavatat. nantar te bhijvun mag kanda dane ani fodani ghalun tyachi bhaji karatat. indian pasta mhanta yeil hyala ..farach healthy asnar...

Rasgulle banavanyachya anek kruti pahilya ani baryach try pan kelya tarihi aajvar bajarsarakhe rasgulle jamale nahit. mb grp madhe koni bajarsarakhe rasgulle ghari karatat ka..asalyas tyachi achuk recipe milel ka.

namaskaar Sumedha.
haa gavhaachaa prakaar malaa navin aahe. nusatyaa kaNakeche nasaavet te, bahutek gavhaachyaa chikaache asaavet.
nusatyaa gavhaache aapaN, shevayaa, boTave, maalatyaa, gavhale aaNi nakhote ase prakaar karatao. yaachee kheer karataat.
gavhalyaanchaa saakharabhaatahee karataat. aapalyaaakDe jaLagaavache koNeetaree aselach,

Rasagullyaachee kRuti aaj raatree liheen

अरे, सुमेधाच्या संगणकावर मराठी दिसत नसेल तर...

एरवी मी म्हराटी मानुस आहे बरं.

धन्यवाद दिनेश़जी,
गव्हाचे वडे ..वाफ् वुन तुप मिठ घालुन पन लहान मुलान्ना देतात. ज़ळ्गाव वाले सान्गतिलच.
मराटी चा पहिल प्रयत्न. चु भु घ्या द्या.
रसगुल्ल्यानचे फोटो जमल्यास उत्तम.

सोलापुरी पावचटणी कशी करतात माहितीये का कोणाला?

जळगाव कडे केला जाणारा गव्हाच्या वड्याचा एक प्रकार जो मला माहित आहे तो गव्हाचा चीक काढल्यानंतर त्याचा जो कोंडा असतो त्याचे वडे उन्हात वाळवुन करतात. चु.भु.द्या.घ्या.

हो मी पण तसेच वाचले होते. असाचा प्रकार ज्वारी बाजरीचा पण करतात.

पफ पेस्ट्रीपासुन चहाबरोबर खाण्याची खारी करता येतिल का? केलिये का कुणी?
पॅटीस जसे थोड्या वेळाने मऊ पडतात तसे खारीचे न होण्यासाठी काय करती येईल?

पफ पेस्ट्रीपासून खारी नक्कीच करता येतात. एरवी त्याचे पिठ करताना जरा जास्त मीठ घातलेले असते.
पॅटिसमधे ओले सारण असल्याने ते मउ पडतात. खारीत सारण नसल्याने त्या मउ पडत नाहीत.

हाय न्याती,

पफ पेस्ट्रीचे खारी छान होतात. पेस्ट्री चे आयताकृती तुकडे (खारीच्या आकाराचे) करायची. आता एका तुकड्यावर भाजुन खरडलेले जीरे आणि हव असल्यास थोड मीठ पसरायचे त्यावर दुसरा तुकडा ठेवायचा. असे ३-४ तुकड्यान्च एक बिस्कीट करायच. वरतुन लाटण्याने हलकेच दबायचे. आणि बेक करायचे. शॉर्ट्कट मेथड - पेस्ट्री शीटस अख्या वापरायच्या आणि लेयर झाल्यावर हव्या त्या आकारात तुकडे कापायचे. ह्यात जीरे-मीठ व्यवस्थीत पसरायला लागते.
पूर्ण गार झाल्या शिवाय डब्यात भरायचे नाही. एअर टाईट डब्बा वापरायचा. ४-५ दिवस मस्त कुरकुरीत रहातात...इतके दिवस उरतच नाहीत. पटापट सम्पतात...

येस्स्स्स्स्स थॅन्क्यू मदत समिती, दिनेशदादा, लाजो!!थॅन्क्यू Happy
आता सन्ध्याकाळी चहा-खारी Happy
या सगळे चहाला..

श्यामली, तुम्हाला हवी असलेली सोलापुरी पाव चटणी आमच्याकडे नेहमी केली जाते. फक्त अंदाजाने करत असल्याने तुम्ही आवडीनुसार चव पाहून बदल करणे.
साधारण एक वाटी भाजून सोललेले शेंगदाणे असतील तर एक बारीकसा आल्याचा तुकडा दोन लसणीच्या पाकळ्या तिखटाला २-३ हिरव्या मिरच्या , अगदी थोडीशी कोथंबीर (१-२ काड्याच), दीड चमचा साखर, चवीप्रमाणे मीठ हे सर्व एकत्र मिक्सरमधे बारीक वाटून त्याचा छान गोळा तयार करणे.ताक किंवा दह्यात ज्याप्रमाणे लागेल त्याप्रमाणे ह्या गोळ्यातील चटणी मिसळून जाड स्प्रेड प्रमाणे बनवून पावास लावून खाणे.
मिक्सरमधे वाटताना पाणी घालू नये. लसूण, मिरची इ. मुळे चटणीचा छान लाडवासारखा गोळा बनतो. २-३ दिवस फ्रिज बाहेर व जास्त दिवस फ्रिजमधे रहतो. जेव्हा फक्त पावाबरोबर खाताना लागेल तेवढीच चटणी ताक / दही मधे मिसळून बनवून घ्यावी.

ही आहे होय सोलापुरी पाव चटणी.. आई नेहेमी करते. आंबटपणासाठी कधी दही तर कधी लिंबु घालते.

हे म्हणजे देशी पीनट बटर की !!
मला सोलापूरी कोरडी चटणी पण खूप आवडते. सोलापूरला गेलो कि बर्‍याच पिशव्या घेऊन येतो, तिथे कोरडी खुटखुटीत असणारी चटणी मुंबईत आणली कि तिचे घट्ट गोळे होऊन जातात.

कपकेकसाठी फ्रॉस्टिंगची सोप्पी रेसिपी आहे का कोणाकडे ? त्यातल्या घटकांसाठी तीन दुकानं शोधावी लागतील असली नकोय Happy

चमचाभर दूध आणि अर्धाचमचा लोण्यात घरात असतील ते चॉकलेट बार घालून(निव्वळ चॉकलेट, आत काही भरलेलं नको) डबल बॉयलरवर वितळवून घ्यावेत. एकेक कपकेक त्यात एक तृतीयांश बुडवून वेगवेगळ्या स्प्रिंक्ल्स, एम अँड एम्स, गोडावून रंगवलेला खोबरं कीस ह्यात बुडवावेत. सगळ्यात सोपं आयसिंग + टॉपिंग. सध्या ईस्टर स्पेशल एम अँड एम्स आलेत खूप छान रंगात.ते वापरणार आहेस का?
मोठ्यांसाठी कपकेक बिटर चॉकलेटमधे बुडवून वर पांढर्‍या चॉकलेटचे कुरळ. (कर्ल्स, शेव्हिंग्जला मराठी प्रतिशब्द शोधतेय. Happy ), नट्स चा चुरा, किंवा चांदीच्या वर्खाचे १-२ बारिक तुकडे वर घालता येतील.
दूध, लोणी, साखर, व्हॅनिला आणि अंड्याचं पांढरं मिसळून पण छान फ्लफी आयसिंग होतं. पण मग फ्रिजमधे ठेवायला लागतील कपकेक्स.

पांढर्‍या चॉकलेटचे कुरळ. >>>> तुफान हसलेय यावर Lol

मल्लू लोकं पांढरा भोपळा/कोहळा सांबारात घालतात. यावेळी मीही घालून बघितला, चांगला लागला. कोहळ्याच्या वड्या, खवा घालून मस्त लागतात. कशा करायच्या ते मला माहीत नाही.

ह्याच कोहळावर पाक ओतून पेठा मस्त बनतो.

'कैरीचा भात' (परवाच रेसिपी पाहिली टीव्हीवर), लेमन राईस, चिंच भात, भिसिबीळी भात या सारखा 'आंबट भातां'बरोबर कालवण काय करायचे असते आयडीयली? मुळात भात आंबट असल्याने दही, कढी, सार तर करत नसतील.. मग काय करतात? कृपया पाककृती सांगावी

या भातांबरोबर आंबट काहि करायचेच नसते. तळलेल्या मिरच्या वगैरे ठिक आहेत. आपल्या सांडगी मिरच्या याबरोबर चांगल्या लागतील. तेल, तूप असतेच. पापडही चांगले लागतील.
पण तामिळ लोक खूपच आंबट खातात.

माझ्याकडे भिजवलेली चणा डाळ खुप उरली आहे . कैरीच्या डाळीसाठी भिजवली होती. त्याचे काय करता येईल?

भिजवलेली चणा डाळ वाटुन घ्या. कांदा, मोहरी, हिन्ग कढिपत्ता, हिरवी मिरची ची खमन्ग फोडणी द्या. त्यात डाळ चांगली वाफवून घ्या. कोथींबीर पेरुन खा.

**************************
काढ सखे, गळ्यातील तुझे चांदण्याचे हात
क्षितीजाच्या पलिकडे उभे दिवसाचे दूत

Pages