पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळयांचे नवरे फारच उद्योगी दिसतात.. काही बाही घेऊन येतात.. Proud Light 1

प्रिन्सेस, युएस मधे असशील ते डब्यातले बिन्स तयारच असतात ना?? फक्त मायक्रोव्हेव मधे गरम काढून, मीठ घालून टोस्ट वर घालायचे.. चिज किसून घालायचं वर.. पाहिजे असेल तर थोडं केचअप किंवा चिली सॉस..
२ मिनिटात तयार होणारा ब्रेकफास्ट्/स्नॅक्स आहे तो. (स्वानुभव) Happy

हे बीन्स ज्या सॉसमधे असतात, तो बराच गोडसर असतो. ते लक्षात ठेवून याची उसळ वगैरे करता येते. ऑलिव्ह ऑईल मधे कांदा परतून त्यावर तिखट किंवा मिरपूड घालून हे बीन्स टाकून सोपी उसळ होते. खिचडी मधेही हे घालता येतात.

धन्यवाद अ‍ॅडम आणि दिनेशदा.

अ‍ॅडमा Proud
-प्रिन्सेस...

अडमला मोदक.

कमळाच्या बींच्या लाह्या (मखाना ) ची खीर कशी करतात ? त्याची दुसरी काही पाककृती करता येईल का ?
- मनी.

हे मखाणे सोनेरी रंगावर तूपावर परतून घ्यायचे. मग त्याची पूड करायची आणि त्याची खीर करायची. साधारणपणे असेच तळून चिवड्यात वा भाज्यांवर वरुन घालता येतील.

हो तळून भाज्यांमधे चांगले लागतात. पंजाबी पद्धतीच्या किंवा ब्राऊन ग्रेव्ही असलेल्या भाज्यात जास्त चांगले लागतात. उदा. कढाई पनीर, मिक्स व्हेज ई.

ते अमिताभ, गोविंदा आणि माधुरी च्या चित्रपटातलं, मखणा हे गाणं त्या संदर्भात असावं का ? म्हणजे अमिताभ आणि गोविंदा माधुरीला अगं सोनेरी रंगाची वगैरे म्हणतात असं ? Happy

विषयाला फाटे फोडू नका. चित्रपटाबद्दल बोलण्याकरता दुसरे बीबी आहेत. Wink

एक प्रश्ण. मला एका साऊथ इंडियन मैत्रिणीने डबा भरून मुरकू (तांदळाच्या पिठाच्या चकल्या) दिल्या आहेत. त्या फारच कडक आहेत. त्या मऊ करता येतील का? ( वाफ देऊन वगैरे?) किंवा त्याच काय करता येईल?

आर्च, रश्श्यात किंवा आमटीत सोड! Proud

आता मला या दोन्ही बा फ च्या हेतूबद्द्लच शंका येतेय !!!

दिनेश, खरच प्रश्ण आहे. मला तुमच्याकडून मदत हवी आहे. एवढ्या चकल्या फेकवणार नाहीत आणि मृ, त्या सांड्ग्यासारख्या वर्ष भर रहाणारपण नाहीत. मला वाटल कुकरमध्ये वाफ देऊन जरा नरम करता येतील वगैरे.

वाफ देउन बघ. प्रयोग जमला तर युक्ती वर टाक. फसला तर माझं काय चूकलं वर टाक हा का ना का.

त्यात मोहन कमी पडलेय व तांदूळ आणि डाळीचे प्रमाण चुकलेय. त्यात त्या तळलेल्या असल्याने फार टिकणार नाहीत. त्या मिक्सरमधे बारिक करुन, पाण्याचा हबका मारुन परतून घ्यायच्या. त्या मिश्रणाची चव बरी लागत असेल, तर त्याच्या कचोर्‍या, भरली वांगी, भरली कारली वगैरे प्रकार करता येतील. ( या सारणाची चव लाल तिखट, गरम मसाला घालून सुधारता येईल )
हेच मिश्रण दह्यात भिजवून त्याचे डांगर करता येईल. ( त्यात कांदा, ओली मिरची घालता येईल. अगदी आपल्या डांगराप्रमाणे लागेल )

पण मुरुक्कू नेहमी कडकच असतात ना?
विकतचे पॅकबन्द असतील तर तीन चार महिने तरी सहज टिकतात.
तसच त्याचे लहान लहान तुकडे करून सर्व केले तर ड्रिन्क्स बरोबर खायला बरे लागतात.

मुरुक्कु हे नेहमीच कडक असतात.

मला ते मुरुक्कु कडक असतात म्हणुनच खुप आवडतात. माझी शेजारीन करते, ते जर मवु किंवा खुसखुशीत झाले तर बिघडले अस तीच म्हणण . Proud
पण खरच अगदीच खाता येत नसेल तर मायक्रोवेव्ह मध्ये झाकन ठेवुन २०/२५ सेकंद ठेवले तर नक्की थोडेसे soft होतील्.(तेल सुटल्यामुळे)

मुरुक्कु ह्या नेहमी कडक'च' असतात. त्या नरम किंवा भाजणी चकलीसारख्या कधीच खुशखुशीत अश्या नसतात. उलट कडकडीतपणा हिच ह्या चकल्यांची खासियत आहे. माझी एक तामिळ वहीनी अश्याच मुरुक्कु बनवते. आणि ऑथेंटीक मुरुक्कु 'फक्त' नेहमी तांदूळाच्याच असतात.डाळ आता काही लोक वेरीएशन म्हणून घालत असतील. मला खूप आवडतात ह्या मुरुक्कु. माय्क्रोवेव मध्ये ५ सेकंद ठेवून बघाव्या.

मनु, खाताना कुडुम कुडुम आवाज येण्याइतक्या कडक असतात मुरुक्कु? जेणेकरून दात तुटायची भीति वाटावी?
तांदळाचेच असतात पण त्यात मोहन अजिबात नसत?
मायक्रोवेव्हमध्ये ठेअव्लावर लगेच खाल्या पाहिजेत न?

दात तुटायची भिती वाटावी खरेच इतक्या कायच्या काय कडक आहेत? मग नक्कीच तिने मोहन जरासुद्धा घातले नाही. दोन वाटीला ४ लहान(खायचे जे चमचे असतात नं) चमचे मोहन नाहीतर वितळलेले बटर घालायचे असते नुसत्या तांदूळाच्या पिठात नी लगेच करायच्या. तसेही तांदूळाच्या पिठ कुरुकुरीतपणा म्हणा किंवा कडकपणाला घालतात कशातही. भजीत घातले तर मस्त भजी होतात त्या.
काय करु शकतेस तू एक पेपरटोवेल घे त्यावर ह्या चकल्या पसरून ठेव, ३ सेकंद आधी मग चेक कर.. पुन्हा ३ सेकंद असे करून बघ. खाली पेपर घातल्याने त्याचे ऑइल अ‍ॅबझोर्ब होइल मग लगेच त्या बाहेर ठेव १५ एक मिनीटे. मग बंद डब्यात दुसरा आणखी एक पेपर टोवेल घालून ठेवून दे.(एकदा माझ्या भाजणीच्या चकल्या मोहन विसरल्याने कडक झाल्या. तो फक्त एकच घाणा खराब झाला तेव्हा मी हेच केले(आईचा सल्ला एकून). चांगल्या होत्या २-३ दिवस्.(अर्थात त्या चकल्या मी आधी खपवल्या). नाहीतर नवीन दात येणारं कोणी मुलं नाहीये का? Happy

माझा प्रयोग,

कडक मुरुक्कु थोड्या कोमट ताकात भिजवायच्या, मऊ झाल्या की मोडून नीट ढवळून (हवे असेल तर मिक्सर मधे काढुन) घ्यायच्या. त्यात हिरवी मिरची, जीरे, कढीपत्ता, हिंग, कोथिंबीर आणि आवश्यक असल्यास चवीला मीठ घालायचे. आणि धीरडी घालायची. मस्त खुसखुशीत होतात. अनुभव के बोल....

आजचा नवा सक्सेस्फुल प्रयोगः
चकली चाट
कोमट ताकात भिजवून हे मुरुक्कु दह्यात टाकले. दह्यात मीठ, थोडि साखर टाकली. वर चाट मसाला, थोडा पुदिना, तिखट घातल. मस्त चाट तयार झाली. थोडी क्रंची ठेवली. हव तर चिंचेची चट्णी घालावी. दिसायलापण छान दिसत होती.

पुढच्या पार्टीला चकली चाट नक्की. It is going to be a hit item.

ह्याबद्दल रुपा आणि दिनेशंना thanks!

लाजो, तुझी आयडियापण छान आहे.

मंजु, तुझी आयडियापण छान आहे.

आर्च, मैं कहां हूं?? तुझं मनु आणि लाजो एकत्र झालं बहुतेक.... Proud

मग या पदर्थाला आर्चाट म्हणायचं का ?

आर्चाट Happy

भरितासाठी वान्गे कसे भाजावे??
माझ्याकडे देशातल्यासारख्या स्टोव आहे, कॉइल नाही. पण तिथे भाजताना, सगळे तेल पसरते बाजुला, (अल्युमिनियम फॉईल लावते मी), तेलामुळे भडका उडण्याची भीती वाटते. ओवन मध्ये भाजले जाते का नीट? किती वेळ, किती तापमानाला ठेवावे?
दुसरे म्हणजे वान्ग्याला सुटणारे तेल भरितात टाकावे का?

पहिल्या पानावर वाचले, सर्वे फूडा कुकस्य पोटम आश्रयंति Happy एक जुना फिशपॉन्ड आठवला.
प्रफुल्लता नावाच्या एका सुद्रुढ मुलीला Wink प्रकर्षेण फुल्लते, लठ्यते, जाड्यते इति प्रफुल्लता Happy

अ‍ॅड्मिन, ही पोस्ट उडवता येइल का?

जोंधळ्याचे काही करता येईल का ? अख्खे आहेत, म्हणून भाकरी होणार नाही . खिचडी ई. काही करता येईल का ? ( हे आता मीच आणलेत. Happy ) थोडेच आहेत , म्हणून एकदाच काहीतरी करून बघायचे आहे .:)

वांगे भाजण्याबद्द्ल अलिकडेच चर्चा झालीय.
संपदा, जोंधळ्याची उसळ छान होते.
बारा तास पाण्यात भिजत घालायचे, मग उपसून फडक्यात बांधून ठेवायचे. दोन तीन दिवसात लांब मोड येतात. हि उसळ फक्त हिरवी मिरची मीठ आणि खोबरे घालून करायची. अगदी मोत्याच्या उसळीसारखी दिसते ( इति दूर्गा भागवत ) चवीला पण छानच लागते. अशीच गव्हाची आणि बाजरीची उसळ होते.

Pages