पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही रे... मी कधी नाव पण एकलेले नव्हते...लेख वाचुन रहावले नाही म्हणुन इथे विचारले !

शेपू ची भाजी आणि भजी व्यतिरिक्त पिठलेहि छान लागते.

स्नेहा -- शेपूची भजी आणि पिठल्याची कृती लिहि ना प्लीज.

बी
शेपूच्या पिठल्याची पाककृती पाककृती मधे लिहिली आहे.

..

सन्डविच ढोकळा ची रेसिपी कुठे मिळेल्???लिंक द्याल का???

कुक्या पाडायचे वेगवेगळ्या आकारातले साचे कुठे मिळतील ? मी मागे एकदा एका gourmet shop मधुन आणले होते. तसेच केक करायला वेगवेगळ्या आकारातले केक-पॅन कुठे मीळतील ?

कुकी कटर्स वाल्मार्ट, टार्गेट, कुठलेही ग्रोसरी शॉप , सगळीकडे मिळतात की.

वेगवेगळ्या आकाराचे केकपॅन्स, मायकल्स किंवा इतर क्राफ्ट स्टोअर्स मध्ये मिळतिल (ज्यो ऍन किंवा असेच इतर), कधि कधि वॉलमार्ट मध्ये हि मिळतात (विषेशत: बेअर/जोकर च तोंड, आइस्क्रीम केक किंवा बार्बिच्या केक चे पॅन्स).

गव्हाच्या पीठाच्या केकची पाककृती हवी आहे. कोणी सांगू शकेल काय?
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे...:)

सिंड्रेला,
तुला हव्या असलेल्या गोष्टी ऑनलाइन www.wilton.com साइटवर मिळतात . बहुदा तेच Wilton वाले Michaels मध्ये पण केक डेकोरेशनचे क्लासेस घेतात ना. त्यामुळे Michaels मध्ये पण हे सगळे तुला मिळेल.

मै, रुनी, ममो, धन्यवाद !!! आणले(च) आणि केक केला(च) तर फोटो टाकेन Happy

दिपाली, वेळ नसल्याने मी गीट्सचा ढोकळा केला होता. खमण चे एक पाकिट आणि इडली ढोकळा एक पाकिट. दिलेल्या सुचनेप्रमाणे वेगवेगळे करुन घ्या. ओल्या नारळाची आलं-मिरची घालून चटणी करुन घ्या. इडली-ढोकळा झाला की त्यावर चटणी लावायची आणि वर खमण ढोकळा ठेवायचा. आणि वरून तेलाची फोडणी द्यायची.

सयालिमी,
धन्यवाद...छानच झाला तुझा ढोकळा...पाणी सुटलयं तोंडाला जाम...मी हि करून बघते....

if you are in CA, most of the Mervyn's stores are going out of business--amazing deals on baking pans-Made in USA- beautiful patterns and very sturdy stuff at rock bottom prices.

पाककृती हवी आहे असे म्हंटल्यावर कधि नव्हे ती ती केल्या गेली. पण ती केवळ डोळे बंद करण्याकरता केलेली धुळफेक आहे असे भारताचे म्हणणे आहे.
(राहवले नाही, क्षमा करा Happy कुण्या द्रष्ट्याने आधिच लिहिले असेल तर डबल क्षमा करा)
--------------------------------------------------------------
... वेद यदि वा न वेद

इथे अमेरिकेत फ्रेश क्रीम कुठे मिळेल्???मी वालमार्ट , टारगेट मध्ये चेक केले पण मला समजले नाही. तसचं soue cream, half & half milk काय असते??कश्यासाठी वापरतात?? मिल्कपावडर ला काय म्हणतात इकडे नि कुठे मिळेल???

फ्रेश क्रीम कुठल्याही किराण्याच्या दुकानात. हेवी क्रीम, व्हिपिंग क्रीम ह्या नावाखाली मिळेल.
sour cream बहुतेक आपल्याकडे साईला विरजण लावतात लोणी काढण्याआधी तसा प्रकार. भरपूर आंबट असतो. बरेच लोक इथे श्रीखंडात किंवा चिप्स बरोबरचं डिप करताना किंवा सालसा-बीन चे लेयर लावून जे डिप करतात त्याबरोबर पण घालतात.
half & half milk अर्धं दूध अर्धी साय एकजीव केलेली. पचायला भरपूर जड. चहा कॉफीत किंवा फ्रुट क्रीम वगैरे करताना वापरता येईल.

शोनू तुझ्या पद्धतीने लोणचे केले. मस्त चव आहे. धन्यवाद.

मृण्मयी,
धन्यवाद ग! आता बसलं डोसक्यात.....

आप्पे बेक करुन बनवता येतील का? माझ्याकडे अप्पेपात्र नाहिये- मिनी मफीन पॅन वापरायचा विचार आहे.

भाग्या, अशा प्रकारचे आप्पे पात्र तुला वॉलमार्ट, टारगेट, बेड-बाथ-आणि-पल्याड इ. मधे मीळु शकेल.

भाग्या, मी खूप पुर्वी बेक केले होते आप्पे मफ्फिन पॅन मध्ये. होतात बेक पण ती चव नाही येत. तुला प्रयोग करायचाच असेल तर तेल्/स्प्रे जास्त आणि आकार कमी ठेव. दोनही बाजू ब्राउन होईतोवर बेक करणे. उलटण्याच्या आधी परत स्प्रे करणे. वेळ बराच लागतो.
मी ब्रॉईल करून नाही पाहिले. पहा जमत असेल तर, पण सांभाळून. लवकर करपण्याची शक्यता जास्त.

भाग्या, बेक केल्यावर मी केलेले अप्पे अजीबात चांगले झाले नाही. ३५० वर बेक केले. खरपूस करण्याच्या नादात वातड झाले.
कुणाकडे चांगले बेक्ड अप्पे करण्याची रेसिपी असेल तर मला पण द्या.

बेक्ड आप्पेचे सीक्रेट हेच की थोडा बेकींग सोडा नी थोडी बेकींग पॉवडर टाकावी लागते.

हो ग मनु, बेकिंग पावडर बद्दल विसरलेच सांगायचे.

धन्स सिंडे. बघेन मी टार्गेट ला.
मने, बेक केले असतील तर रेसिपी टाक ना.

कोणाला बाजरिच्या वड्यान्चिइ रेसिपि माहिइत आहे का?

मायबोलीवर केक च्या रेसिपीजची लिंक मला कुणी द्याल का प्लीज?
---------------------------------------------------------------------------
Happy

Pages