पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टण्या, मी जे वर लिहिलेले आहे ते बरोबर आहे. दुधीभोपळा हा लांब असतो पण लाल भोपळा हा गरगरीत तर असतोच शिवाय लांबुळका (means Eliptical) पण असतो. पण एक आहे की देशानुसार, भोपळ्याचा आकार बदलतो. इथे मिळणारा भोपळा गोल असतो आणि आकारानी पण एकदम पिटुकला असतो. विदर्भात मी जे भोपळे पाहिले आहेत ते आकारानी अबब असतात आणि फार लांबुळके असतात. दुधींचे आकार मात्र सगळीकडे सारखेचं.

कोहळ्याची भाजी मला माहिती नाही. मंगलोरीयन कोकणी लोकांमधे, भोपळ्याची कोवळी पानं सांबारात टाकतात.

बी,
कोहळा बर्‍याचदा लाल फडक्यात बांधून घरात अडकवितात. हा खूप दिवस टिकतो. त्याला हात लावला तर हाताला पांढरी पावडर लागते. कोहळ्यामुळे केस पांढरे होतात असे म्हणतात त्यामुळे जपून हाताळावा लागतो.

मला गोंधळायला होत आहे. कुणीतरी चित्र टाका ना इथे. अथवा संकेतस्थळ द्या.

कुणाला ओल्या हळकुंडाचे लोणसे कसे करतात माहिती आहे का? मला हवी आहे.

ओल्या हळदीचे लोणचे
हळद साले काढून, किसून घ्यावी. त्यात चवीप्रमाणे मीठ, साखर आणि लिंबू लोणचे मसाला घालावा आणि भरपूर लिंबू पिळावे आणि छान कालवावे. वरुन मोहरीची फोडणी घालावी. पण हे लोणचे फार टिकत नाही .

आणि या लोणच्याचा विशेष असा फायदा होतो का? म्हणतात की हळदीमुळे रक्त शुद्ध होते. इथे विपुल प्रमाणात ही हळद मिळते. त्याला Yellow Ginger असे म्हंटले जाते.

हे प्रचण्ड मोठे भोपळे म्हणजे.. हॅरी पॉटरमध्ये असतात तेच का.. ?

हो. मी पण ऐकलेय तसे पण नक्की माहित नाही. माझ्या घरी आईने अंगणात हळद लावली होती त्यामुळे ती बर्‍याचदा हे लोणचे किंवा हळदीच्या पानांपासून पातोळे बनवायची.

याच लोणच्यात आले, लिंबू, सैंधव, मिरी वगैरे घालूण टिकाऊ लोणचे करता येते. लोणच्याचा तयार मसाला वापरावा.
ओली हळद किसताना किसणी आणि हात पिवळेधम्म्क होतात. किसणी अगदी स्टीलची असली तरी पिवळी पडते, त्यामूळे किसण्यापेक्षा तूकडे केले तर जास्त चांगले. अर्थात किसून केलेले लोणचे मिळून येते.

आल्याचे,ओल्या हळदीचे अन आंबे हळदीचे जुलिएन कापून त्यात मीठ अन लिंबाचा रस घालून ठेवावे. मी तरी इथे फ्रीझमधे ठेवते. रोज जेवणात थोडं थोडं खावं असं लोणचं आहे हे.
भाटिया, हरकिसनदास, नानावटी इथल्या जेवणात आवर्जून असतं हे लोणचं.

जुलिएन कापून म्हणजे नक्की काय?

julienne गूगल कर .

केलं, हे सापडलं Wink

ओल्या हळदीचे अन आंबे हळदीचे जुलिएन कापून >> जुलिअन सोड, तुला ओली हळद नि आंबे हळद कुठे मिळाली ते सांगशील का pl ?

Julienning is a method of cutting raw vegetables into long thin strips, not sure about sizes.

ओली हळद कुंडीत लावली तर छान वाढते. हळदीच्या पानातल पापलेट, पातोळे करायला ताजी पान भरपूर मिळतात.
शोनू, या लोणच्याला फोडणी नसते का?

आमच्या इथे सब्जी मंडी मधे मिळते. एडिसन च्या बहुतेक सर्व ग्रोसरी मधे मिळते. बॉस्टनचं काही माहीत नाही.
फोडणी/ मसाला काही घालत नाहीत यात.

शिंडी बाय ओली हळद अन आल्याचं तू 'ते' करच अन फोटो टाक इथे Happy

सिंड्रेला, म्रुण्मयी, जगु, लालु सगळ्यांना धन्यवाद. मी थोडा पालक चिरून फ्रीझ करुन ठेवलाय आणि कालच पालक प्युरी पण आईस ट्रे मधे घालुन क्युब्ज केली आहे. नवरा अगदी वैतागला आहे पालक खाऊन खाऊन ...
आज हापिसात आणलाय कुणाला हवा असेल तर... पब्लिक घरी जाताना घेऊन जाईल...

चॉकलेट रॅप करायचा पेपर कोणत्या प्रकारच्या दुकानात मिळतो? स्टेशनरी मध्ये मिळेल का?

chocolate गुंडाळायला सेलोफिन पेपर स्टेशनरी मधे किंवा गिफ्ट राप्स जीथे मिळतात तिथे मिळेल. चकचकीत रंगीत कागद सुद्धा तिथे मिळतिल..

जैन लोकांची बाटी आणि गट्टे की सब्जी ची कृती लिहा ना कुणीतरी.. मला हवी आहे. पण जुन्या मायबोलीवरची नको. बाटीचे आवन येते असे वाचले. खरयं?

थॅन्क्स लाजो. व्हेज कबाब ( कोणतेही ) ची क्रुती सांगा कोणी प्लीज.

मला पास्ताच्या रेसिपीज हव्या आहेत.

सुर्भी, कबाबचा एक नवा प्रकार.
मसूर साधारण कोरडे शिजवून घ्यायचे. त्यात उकडलेला बटाटा, पावाचा चुरा, चवीप्रमाणे, आले लसूण मिरची पेस्ट आणि मीठ घालून मऊसर गोळा करायचा.
एका ताटलीत, कान्दा व सिमला मिरची बारिक चिरुन घ्यायची. मसूराच्या मिश्रणाचा गोळा करुन तो एका स्वच्छ पेन्सिलीला लपेटायचा. मग हा कबाब ताटलीतील का.न्द्यावर अलगद फिरवायचा. कि.न्चीत दाबुन, आतली पेन्सिल काढून घ्यायची. यावेळी कबाब तूटता कामा नये, तूटल्यास आणखी पावाचा चुरा घालायचा. मग तो शॅलो फ्राय करायचा कि.न्वा ग्रील करायचा. गरज नाही पण हवे तर वरुन तेल लावावे.
आज बरहाचा प्रॉब्लेम आहे, म्हणुन भाषा शुद्ध नाही.

जागु, पास्ताच्या कृती आहेत इथे.

मला मिळाल्या नाहीत. प्लिज लिंक द्या.

PRR - लिंक दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी अकोल्याचाच. आमच्याकडे आंबूसघार्‍या अजूनही आई करते. माझी आत्त्या खूपच चविष्टा आंबूसघार्‍या करते. मज्जा आली लेख वाचून. सुंदर लिहिला आहे.

धन्यवाद बी तु आवर्जुन लेख वाचलास. आपल्या मायबोलीवर आंबूसघार्‍यांचा उल्ले़ख आढला नाही म्हणुन विचारले.
तुमच्याकडेपण करण्याची हिच पाककृती की अजुन काही वेगळी?

PRR - हो आई आणि आत्त्या अशाच करतात आंबूसघार्‍या. मी जास्त करून आत्त्याकडेच आंबूसघार्‍या खाल्लेल्या आहेत. तू केलेल्यास का कधी?

भोपळ्या/कोहळ्याचा नुस्ता घार्‍या नावाचा एक प्रकार आहे ना.. तोही आंबट असतो चवीला. मला वाटतं भोपळा शिजवून त्यात बाजरीचे पिठ आणि ताक घालतात आणि मग त्याला तळतात.

बाजरीच्या पीठाचे दिन्ड की काय कसे करतात ??

Pages