तूरडाळ अगोदर किमान तासभर भिजवून मग किंचित तेल, हळद, हिंग घालून प्रेशरकुकर मध्ये शिजवून घ्यावी. शिजलेली डाळ घोटून त्यात चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या उभी चीर देऊन चिरून, आल्याची साल काढून त्याचा तुकडा व कोहळ्याच्या फोडी घालून पुन्हा शिजवत ठेवावी. हवे असल्यास टोमॅटोच्या फोडी घालाव्यात. भाज्या शिजत आल्यावर चिंचेचा कोळ घालावा. नारळाचे दूध घालावे. उकळी येऊ द्यावी. चवीनुसार मीठ घालावे. वरून तेल-मोहरी-हिंग-हळद-कढीपत्त्याची फोडणी द्यावी.
डोसा/ इडली/ भात/ पोळी बरोबर खावे.
तूरडाळीसारखेच मुगाच्या किंवा मसुराच्या डाळीचे कोळंबोही करतात. त्यात सांबाराप्रमाणे शेवग्याच्या शेंगा, वांगी, टोमॅटो घालतात. कोळंबो हा खरे तर सांबाराचाच एक प्रकार असावा, फक्त त्यात नारळाचे दूध घालतात त्यामुळे चव वेगळी येते. कोहळ्याचे कोळंबो अप्रतिम लागते.
आम्ही (बहीण + मी) उडीद डाळ + मुगाच्या डाळींना समप्रमाणात चार तास वेगवेगळे भिजवून त्यांचे पीठ करून त्यांचे डोसे केले व त्याबरोबर हे कोळंबो हादडले. ही खास मंगलोरच्या बाजूची पाकृ आहे. बहिणीच्या सासूबाई साऊथ कॅनरा स्टाईलने जरा वेगळ्या प्रकारे करतात. पण चव जवळपास अशीच लागते.
मस्तय !!
मस्तय !!
छान आहे..... आधी कोलंबी चं
छान आहे..... आधी कोलंबी चं चुकून कोळंबो लिहीलं की काय असं वाटलं होतं....
श्रीलंकेत पण असाच एक प्रकार
श्रीलंकेत पण असाच एक प्रकार करतात. त्याचे नाव पण कोळंबोच. हा प्रकार पण छान वाटतोय.
वा वा.. बघुन एकदम मस्त
वा वा.. बघुन एकदम मस्त वाटले. सांबार माझ्या आवडीचे त्यामुळे हेही आवडेल.
मलाही कोलंबीचाच प्रकार आहे असे वाटलेले.
माफ करा. धागा चुकला..
माफ करा. धागा चुकला..
मेधा, कैलास, साधना,
मेधा, कैलास, साधना, दिनेशदा...प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
कैलास, साधना... नाव ऐकल्यावर माझाही जरासा वेगळाच समज झालेला, पण मग बहिणीने सांगितले की कोळंबो म्हणजे नारळाचे वाटण घालून केलेले सांबार....तेव्हा समजले!
दिनेशदा, कोळंबो बरोबर केलेल्या डोशांना मंगलोर साईडला पोळ/ पोळे (ह्याच्या मधील काय जो उच्चार असेल तो!) म्हणतात. मग आपण ज्याला डोसा-सांबार म्हणू त्याला तिथे पोळ/ पोळे- कोळंबो म्हणत असणार! (ळ चे इतके उच्चार एकसलग केल्यावर माझी जीभ थकून गेली! ;-))
कोळंबा मस्त
कोळंबा मस्त
हे वाचलच नव्हतं. मस्त वाटतेय
हे वाचलच नव्हतं. मस्त वाटतेय कृती. करते लवकरच
अरुंधती, मस्त वाटतीये कृती...
अरुंधती, मस्त वाटतीये कृती... कोळंबी चा काही प्रकार असेल म्हणुन इथे पाहिलेच नव्हते
बरं, कोहळा म्हणजे 'लाल दूधी' का?
धन्स सगळ्यांचे. सुनिधी, कोहळा
धन्स सगळ्यांचे.
सुनिधी, कोहळा म्हणजे लाल दुधी नव्हे! ह्या लिंक ला बघ : http://www.thefullwiki.org/Winter_melon
http://en.wikipedia.org/wiki/Winter_melon
इथे तुला कोहळा दिसेल.
बहिणीच्या सासूबाई ह्या कृतीत
बहिणीच्या सासूबाई ह्या कृतीत नारळाचे दूध + मिरच्या + चिंचेचा कोळ मिक्सरमध्ये एकत्र फिरवून एकजीव करून वापरतात. चवीतही त्यामुळे थोडा फरक पडतोच!
आईगं दूध मिरच्या आणि चिंचेचा
आईगं दूध मिरच्या आणि चिंचेचा कोळ वाचून बेशुद्ध पडणार होत्ये (मनात 'मायबोलीवरील सुगरण पब्लिकने आता फक्त दुधापासून वाईन वगैरे टाकायचे ठेवले आह'' हा डायलॉग मारला). मग 'नारळाचे' हा शब्द खाल्ल्याचे समजले.
रैना
रैना
मला वाटल अकु तु कोळंबीपासुन
मला वाटल अकु तु कोळंबीपासुन बनवलेला पदार्थ लिहला असशील. हा तर शुध्द शाकाहारी आहे.
नितीनचंद्र, गेल्या काही
नितीनचंद्र, गेल्या काही दिवसात मी एक से एक पाककृतींची नावे ऐकली आहेत व त्या पाकृंना बहिणीच्या कृपेने चाखले आहे! घश्शी, उपकरी, कोद्दल/ळ, दालितोय, आंबट वगैरे वगैरे. पॉळ - कोळंबोही त्यातलेच एक!
मस्तच!!!
मस्तच!!!
कोहळा आयुष्यात कधी पाहिला
कोहळा आयुष्यात कधी पाहिला नाही व वापरला नाही.. थँक्स अरुंधती. नक्की करणार हे. आणि तो मसूर भात पण केला होता, मस्त लागतो एकदम.
.. नशिब करुन नाही पाहिलेस.
रैना