- स्वगृह
- या गृपमधे भाग घेण्यासाठी मायबोलीत प्रवेश करा/मायबोलीकर व्हा !
आहारशास्त्र आणि पाककृती
सदस्य प्रवेश |
मेथी पुलावलागणारा वेळ: ४५ मिनिटे लागणारे जिन्नस: बासमती तांदूळ, धुवून अर्धा तास पाण्यात भिजवून क्रमवार पाककृती: नारळाचं दूध घरी करायचं असेल तर तांदळाच्या दुप्पट पाणी मोजून ठेवावं .. आणि तेच पाणी वापरावं म्हणजे पाण्याचा अंदाज चुकणार नाही .. canned वापरायचं असेल तर शक्यतो मोजून घ्यावं .. थोडक्यात संपूर्ण रेसिपी मध्ये वापरल्या जाणार्या पाण्याचं प्रमाण तांदळाच्या दुप्पट हवं हे ध्यानात ठेवावं .. तर सगळ्यात आधी, कांदा, लसूण आणि आलं वाटून घ्यावं .. थोडा कांदा बारीक चिरून घ्यावा .. आवडत असेल तर काजू तेलात fry करून वरून घालता येतील serve करताना .. मला नेवैद्य दाखवून मेथी पुलाव चा आनंद घ्यावा .. वाढणी/प्रमाण: मला रेसिपी देताना exact measurements देता येत नाहीत, त्याबद्दल क्षमस्व .. :) अधिक टिपा: ह्या रेसिपीत, कांदा दोन प्रकारे लागतो, एकदा वाटणासाठी आणि मग नुसताच चिरून तेलात परतण्यासाठी .. तसंच लवंग, दालचीनी ही, वाटणात आणि मग अख्खी तेलात परतावी .. ह्या पुलाव बरोबर कांदा, टोमॅटो किंवा आवडीप्रमाणे आणखी कशाचंही दह्यातलं रायतं serve करावं .. दह्यातलं रायतं हे छान complement आहे, पुलाव मसालेदार असल्यामुळे .. माहितीचा स्रोत: एक कन्नड मैत्रीण |
|
कसूरी मेथी नसेल तर मेथीची पानं घातली बारिक चिरून तर चालेल का?

----------------------
The cheapest face-lift is a SMILE
तांदूळ न घालताच पुलाव कसा होणार?
ते कधी घालायचे ते लिहिलंच नाहीये.
.
पाककृती छान आहे. मी करून बघेन आणि मग इथे प्रमाण टाकायचा प्रयत्न करेन. पण एकूण साहित्यावरून वाटतंय की साधारण मेथी मटर मलईची चव असते तशी चव लागेल का पुलावाची??
.
पूनम, मेथीची पानं धुवून कडकडीत उन्हात वाळव. हातानेच चुरता येतील इतकी वाळव म्हणजे झाली कसूरी मेथी तयार. आणि आत्ता पावसाळ्यात ऊन पडत नसेल मेथी धुतल्यावर पंख्याखाली सुकव किंवा कोरड्या किचन नॅपकिन वर ठेव. कोरडी झाली ती नुसतीच कडल्यात कुरकुरीत होईपर्यंत परत.....
मस्त लागतो हा पुलाव ! फक्त पाण्याचा अंदाज बरोबर हवा कारण नारळाचं दूध पण असतं ना.
मंजू , मेथी मलई मटर सारखी नाही, कारण हा जरा जास्त मसालेदार होतो, आणि गोडसर पण नसतो.
कसूरी मेथी + मेथीची पानं असं पण छान लागतं गं पूनम.
सशल, दह्यातलं रायतं अजून कशाचं करता येईल याबरोबर, कांदा/टोमॅटो/बटाटा सोडून ?
मेथी कडकडीत करण्यासाठी, मी धुवुन कागदावर पसरवुन वाळवते आणि कोरडी झाल्यावर कागदातच बांधुन फ्रिज म्ध्ये ठेवते. दोन-चार दिवसातच अगदी कडकडीत होते. अशिच कोथीबिर आणि पुदिना पण वाळवते. मग कधी दह्यात, डोस्याच्या पिठात, भजात वापरते. कोथीबीर आणि पुदिना दह्यात मिस्क केला की खुप छान दिसते आणि लागतेही.
कसुरी मेथी आणि आपण वापरतो ती मेथी वेगळी असे मी कुठेतरी वाचलेले.... जाणकारांनी माहिती द्यावी.
एक प्रश्न - तांदुळ कधी घालावेत?? जेव्हा नारळाचे दुध वगैरे घालुन उकळवतो तेव्हाच घालुन सगळे एकत्र शिजवावे??
______________________________________
आला दिवस गेला दिवस - ही रे कसली जिंदगी?
घे उराशी स्वप्न एक, उजळू दे तुझी जिंदगी!
उचल पावले, अन घे तळहातावर तुझी जिंदगी-
पुढेच टाकत तंबू जगणे - हीच खरी जिंदगी!
सगळे घालून झाले व तेल सुटले की शेवटी तांदूळ घालायचे.
पुदीना दह्यात मिक्स करताना आधी वाळवून कुस्करूनच घ्यायचा का ? अजून काय घालायचे त्यात ?
फ्रिजमध्ये ठेऊन दिला की पाने कडकडीत होतात. ती तशीच ठेउन द्यायची. वापरताना हवी तेवढी पाने घेउन टाकताना हातानी चुरडुन टाकायची इतकी कडकडीत होतात की मस्त बारिक पुड होते.. दह्यात खुपच सुंदर दिसते.
एकदा असेच एका मोठ्या (म्हणजे महागड्या ) हॉटेलात गेलेलो. तिथे एका पराठ्याबरोबर कर्ड विथ हर्ब्स होते. मागवले. पाहते तर तेच... कर्ड विथ कुस्करलेला पुदिना आणि कोथींबिर.......इतके हसलो आम्ही.....
______________________________________
आला दिवस गेला दिवस - ही रे कसली जिंदगी?
घे उराशी स्वप्न एक, उजळू दे तुझी जिंदगी!
उचल पावले, अन घे तळहातावर तुझी जिंदगी-
पुढेच टाकत तंबू जगणे - हीच खरी जिंदगी!
अश्विनी, ह्या पुलावाबरोबर रशियन सॅलड छान लागेल. मी आत्ताच लिहिलंय बघ इथे.
अगं page not found येतंय.
ही ही ही .. तांदळाचं राहूनच गेलं ..
एडिट करते ..