Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आळीवाचे लाडू कसे करायचे? आणि
आळीवाचे लाडू कसे करायचे? आणि आळीवाला हिन्दीत/ इंग्लिशमधे काय म्हणतात?
१०-१२ लाडू करायचे आहेत, तर घटक पदार्थांचं प्रमाण काय तेही सांगा प्लीज.
प्रज्ञा इथे बघा -
प्रज्ञा इथे बघा - http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/115677.html?1158036653
धन्यवाद मिनोती. या प्रमाणात
धन्यवाद मिनोती.
या प्रमाणात किती लाडू होतील ते कळत नाहिये, पण करून बघते आता.
कॅन्ड नारळचं दूधाचे काय करता
कॅन्ड नारळचं दूधाचे काय करता येइल?
सोलकढी, गव्हाची खीर,
सोलकढी, गव्हाची खीर, मुगडाळीची खीर करता येईल.
नारळाचं दूध टोमॅटोच्या सारात,
नारळाचं दूध टोमॅटोच्या सारात, फिश करीत, कोणत्याही कडधान्याच्या बिरड्यात किंवा आमटीत, थायी सुपात वापरता येईल.
केक साठी आपल्या भारतीय
केक साठी आपल्या भारतीय पध्द्तीने icing बनवण्याची क्रुती कोणी प्लिज द्याल का? मी wilton च्या पध्द्तीने बर्याचदा icing केले आहे. पण मला आपल्या पध्द्तीचे icing खुप आवडते, म्हणुन विचारते आहे. धन्यवाद.
सशलची मेथी पुलावाची पाककृती
सशलची मेथी पुलावाची पाककृती आहे त्यात नारळाचं दूध वापरायचं आहे.
नारळाचे दूध घालून करायच्या
नारळाचे दूध घालून करायच्या अजून काही पाकृ
कोळंबो : नारळाचे दूध घालून केलेले सांबार : http://www.maayboli.com/node/22001
टोमॅटो बिर्याणीत ना. दू. : http://www.maayboli.com/node/21343
बटरनट स्क्वाश सूप : http://www.maayboli.com/node/22821
तिखटाचे भानोले, लसणाचे आक्षे : http://www.maayboli.com/node/3397
सात्त्विक गोकुळ भाजी : http://www.maayboli.com/node/19327
पुलाव करते सोपा वाटतय थँक्यु
पुलाव करते सोपा वाटतय
थँक्यु सगळ्यांना
.
.
मला बटरनट स्क्वाश ची आपल्या
मला बटरनट स्क्वाश ची आपल्या महाराष्ट्रीयन पध्द्तीची पाकृ हवीय, कुणाला माहीत असेल कृपया लिंक द्या ना.
आणि बटरनट स्क्वाशचे साल काढूनच भाजी करावी की त्याचे साल पण शिजते?
दिपाली
दिपाली, इथे
दिपाली,
इथे आहे
http://www.maayboli.com/node/17967
खरं तर लाल भोपळ्याची कुठलिही कृति वापरता येईल. साल शिजते पण अगदी मऊ होत नाही.
पण काहि जणांना सालीची अॅलर्जी असू शकते. काढली तर चांगले.
http://evolvingtastes.blogspo
http://evolvingtastes.blogspot.com/search/label/vegetable%3A%20winter%20...
बटरनट स्क्वाशच्या इथे आहेत दोन रेसिपीज बघा आवडतात का...
धन्यवाद, दिनेशदा आणि मिनोती.
धन्यवाद, दिनेशदा आणि मिनोती.
दिपाली,
दिपाली, http://www.maayboli.com/node/12774 ह्या कृतीने सुद्धा छान होते.
साक्षी, मखाना च्या रेसीपी
साक्षी, मखाना च्या रेसीपी माहीत आहे का? मुलाना द्यायला योग्य आहे का? >>>
मखाने कुर्मा, भाजी, बिर्याणी, खिरीत वापरतात किंवा कढईत खमंग भाजून त्यात थोडे तूप सोडून मग मीठ, मीरपूड घालून खातात. पण हे पचायला जरा जड असतात. उत्तरप्रदेशात मखान्यांना फारच महत्त्वाचं मानलं जातं. त्यांना बदाम, काजूचा दर्जा आहे.
दिनेशजि मागे तुम्हि पालक
दिनेशजि मागे तुम्हि पालक पनिरचि भाजि कशि करायचि त्याचि link दिलि होति, ति पुन्हा द्याल का प्लिज. खुप छान झालि होती पण आता ती लिन्क मिलत नाहि आहे.
बाहेरच्या सारखे नुसते डिंक व
बाहेरच्या सारखे नुसते डिंक व खोबर्याचे लाडू मिळतात त्याची रेसीपी कोण देइल का?
छे छे! मला नकोय. मी असले उपव्याप करत नाही. स्वंयपाक करणे आपला नावडता भाग आहे कारण मी गायत्रीची लेक आहे.
पण खरेच रेसीपी हवी आहे कुणालातरी.
http://www.maayboli.com/hitgu
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/125809.html?1144955170
Sweetupie, इथे आहे बहुतेक ति कृति.
ध्वनी, इथे जी कृति आहे तिच वापरता येईल. पण डींक आणि खोबर्याशिवाय, गूळ वा साखर, खसखस
आणि तूप वापरावेच लागेल.
इथे डिंकाची रेसीपी नाहि
इथे डिंकाची रेसीपी नाहि मिळाली. मला लाडवाची चव बाहेरच्या सारखीच हवी होती. त्याच्यात काय काय असते. तुम्हाला माहित असेल तर प्लिज लिहा.
ध्वनी, त्यात तळून घेतलेला
ध्वनी,
त्यात तळून घेतलेला डींक, सूक्या खोबर्याचा जाडसर किस, खसखस, काजू, बेदाणे, वेलची, जायफळ, भाजून घेतलेली कणीक एवढेच असते. हे सगळे गूळाच्या पाकात मिसळलेले असते.
सांगते मैत्रीणीला. बाहेरचा
सांगते मैत्रीणीला. बाहेरचा डिंक कसा अक्खा असतो व मस्त चिकट लागतो. आमच्या मातोश्री एकदम असेच करायच्या असे प्रकार पण आता बंद केलेत झेपत नाहित. मातोश्री फोनवर मिळाल्या नाहित म्हणून इथे विचारले.
तुम्हाला धन्यवाद.
दाताला चिकटतो ना तो. अर्थात
दाताला चिकटतो ना तो. अर्थात त्याचीही एक मजा असतेच. तूपात तळून घेतलेले जाडे पोहे पण साधारण तसेच लागतात पण दाताला चिकटत नाहीत. म्हणून अनेकदा त्या लाडवात घालतात.
मला तो चिकटपणा आवडतो. हे
मला तो चिकटपणा आवडतो. हे वरच्या रेसीपीने होतील का तसेच चिकट?
डींकाचे खडे बाजारात मिळतात
डींकाचे खडे बाजारात मिळतात तेवढ्याच आकाराचे ठेवले तर ते आतपर्यंत तळले जात नाहीत. त्यातला गाभा तसाच राहतो म्हणून त्याला चिकटपणा येतो.
घरगुती करताना ते खडे बारीक करतात किंवा त्याची पुड करतात.
मी नेहमी गीट्सचे गुलाबजामचे
मी नेहमी गीट्सचे गुलाबजामचे पाकीट आणून गुलाबजाम करते.
मला घरी खवा आणून गुलाबजाम करायचे आहेत. योग्य प्रमाण सांगाल का ?
ईथे शोधले तर गुलाबजामच्या साहित्यात, पनिर, मैदा, अरारूट पावडर, रवा , कॉर्न फ्लोअर यापैकी एक आहे.
नक्की काय घालावे आणि किती ?
मला पाव किलो खव्याच्या प्रमाणात साहित्य सांगाल प्लिज ?
मिल्क पावडर वापरून गुलाबजाम करता येतील ?
काला जामून , आणि गुलाबजाम यात फरक काय ?
जुयी, पाव किलो खव्याला एक
जुयी, पाव किलो खव्याला एक टेबलस्पून अरारुट (नाहीच मिळाला तर मैदा) पुरेल. हे सगळे नीट मळून घ्यायचे. वरच्या घटकांपैकी एकच काहीतरी घालायचे.
चांगला ताजा खवा असेल तर नाही लागत, काही घालायला. पण यापैकी एक घटक टाकला तर गुलाबजाम सहसा फुटत नाहीत.
मिल्क पावडरचे गुलाबजाम इथे आहेत. पण पावडर चांगल्या दर्जाची नसेल तर चांगले होत नाहीत.
काला जामून हा वेगळा प्रकार. रंगाने काळाच असतो. त्यात पनीर घालतात. त्याची कृति मी लिहिली होती.
http://www.maayboli.com/node/13624
जुई, हे बघ -
जुई, हे बघ - http://chakali.blogspot.com/2010/03/gulab-jamun-sweets-gulabjam.html
दिनेशदा वाटलच तुम्ही उत्तर
दिनेशदा वाटलच तुम्ही उत्तर द्याल ... धन्यवाद
रवा घालायचा असल्यास कच्चा घालावा की भाजलेला..
आणि बेकिंग सोडा हवाच का?
Pages