पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दादरला दुकान आहे ना स्वामी समर्थ , तिथे १०-१२ वर्षापुर्वी चितळ्यांचे बरेच काय नी काय मिळायचे.
माझा अंदाज होता की तिथे ट्राय करायचे. पन खात्रीशीर सोर्स करून येइल तर बरे.

दादरला मठाच्या गल्लीत गोडबोले स्टोअर्सच्या समोरच्या दुकानात सकसची सगळी उत्पादने मिळतात.

पराग, ठाण्याचे पत्ते पण टाक.. कोणी वितरक नसतील तर मी होऊ का ठाण्यातली वितरक? Wink

मनु, रागावू नकोस पण कुठलंही पीठ जुनं झालं की खराब होणारच. भारतात घेतलेलं असो की अमेरीकेत...

बहुधा मैत्रीण अपना बाजारच्या ब्रॅडची नातेवाईक असेल. >> पीठ कसे का असेना ही प्रतिक्रीया नक्कीच खवट आहे. असे नातेवाइकांच्या रेकमेंडेशनने कोणते प्रॉडक्ट विकले जाते? त्याची आपली गुणवत्ता असते. एका उद्योगाची कीर्ती बनवायला वर्षानुवर्षे जातात. घरबसल्या रॅगिंग करायला काय.

अमामी, ते गमतीने लिहिलय. इतके काय मनावर घेताय. रँगिग वगैरे अतीच शब्द आहे. उगाच कुठल्या कुठे विषय कशाला नेताय? कोणाला नाव नाही ठेवत आहे.
word of mouth एकलेय ना मग तसेच कोणीतरी सागितले होते.

मनू, पाकिट नवं फोडलंस पण आत पीठ भरून किती महिने झाले होते? Happy
तुझ्याच असं नाही पण बऱ्‍याच जणांच्या पोस्टमधे भारत आणि अमेरीकेत मिळणाऱ्‍या उत्पादनांविषयी तुलनात्मक तक्रार आढळते. ती खटकते एवढंच... बाकी काही नाही.

अरे बापरे इथे भारत नी अमेरीका वर गाडी घसरली. मी कुठे म्हटले की अमेरीकेतच चांगले मिळते व भारतात खराब. मी लिहिता लिहिता सांगितले की लक्ष्मीचे आणले शेवटी ,मला लक्षात देखील आले नाही लोकं इतका वेगवेगळा अर्थ काढतात. उलट इथे अमेरीकेत मी पीठ घेत नाही कारण ती आणखी जुनी असतील म्हणून भारतात जावून'च' अशी खास पीठ एकदम उचलून आणून स्टॉक करते.

कमाल आहे बाकी लोकांची.... खरेच. Happy आताबस करा ते पुराण. नाहीतर आणखी कोणी अमेरीकेचा प्रेमी उपटायचा. ..

कणकेचे पौष्टीक लाडू कसे करायचे...
साखर घातली तर ते वळतात का... माहिते क कुणाला?

कणकेचे लाडू अगदी बेसन लाडवाप्रमाणेच करायचे. तूप पुरेसे असेल तर नीट वळतात हे लाडू.

तांदूळाची पिठी, कणीक, नाचणीचे पीठ हे सर्व लाडू बेसनाच्या लाडवाप्रमाणेच करता येतात.

कमळकाकड्यांची सिंधी पद्धतीने करायच्या कढीची पाकृ कोणास माहिती असल्यास कृपया सांगावी. नेटावर बरेच गुगल्ले. नाही सापडली!
धन्यवाद!

किट्टु कणकेचे पौष्टीक लाडू करायचे असतील तर साखर न घालता गुळ किसुन घाल. किंवा गुळ पावडर मिळते ती घाल. त्यातच डिंक तळुन चुरुन घालता येतो. मी मागच्याच आठवड्यात लेकीसाठी केले होते. त्यात मी थोडं खोबरे किसुन भाजुन आणि बदाम पावडर पण घातली होती. अर्थातच कणीक जास्त आणि बाकी सगळे कमी.

मी रविवार २४ लाच बाजार करुन लगेच सुरवात करणार आहे.. दिवाळीच्या पदार्थांची पुर्वतयारी करतानाही कंबरेचे आटे ढिले होतात. सगळे साफ करा, धुवा, सुकवा, भाजा मग चक्कीवाला किती वाजता भाजणी टाकणार आहे ते विचारा. मग त्याच्याकडे उभे राहुन भाजणीवर लाडवाचे पिठ टाकत नाहियेना ह्याची काळजी घ्या... देवा रे..... हल्ली काही बायका सगळे विकतचे आणतात तेच बरे असे वाटायला लागते.

पण विकतचे आणुन इथे पुरणार कोणाला? आमच्याकडे शेव/चकली/चिवडा यांचे डबे मुलांच्या हाती लागतील असेच ठेवावे लागतात. दिवसभर येताजाता चरणे चालु. गोडाला गि-हाईक नाहीये Sad

आणि खाताना आपल्या पदार्थांची आठवण येत राहणार त्याचे काय? मी एक दिवाळी विकतच्या पदार्थांवरही केलीय Sad

अरे, हे मी आजच वाचले, मी माझ्या दोन्ही मुलींसाठी सकस चीच पीठे वापरते, जेव्हा पुण्यात जाते तेव्हा आणते. श्री उपहार गृहासमोरच्या गल्लीत आहे त्यांचे दुकान. मी बरीच वापरली आहेत, आणि मी खुश आहे त्यांच्या क्वालिटीबद्दल. :). ते पराग चे नातेवाईक आहेत हे माहीत नव्हतं.

ती कढी सिंधी वाटत नाही अकु. इथे मी पुर्वी सिंधी बेसन करी लिहिली होती. त्या पद्धतीने करता येईल.

खारे शंकरपाळे बनवण्याची कृती कोणी सांगेल का प्रमाणासकट? मागे एकदा मी बनवले होते, पण ते खुपच वाईट बनले Sad

दिनेशदा, मलाही ती रेसिपी सिंधी मुळीच वाटली नाही...पण ककाचीक असल्यामुळे लिंक दिली! Happy
सकसची पिठे चांगली असतात. आमच्याकडे सकस आणि अग्रजची पिठे झिंदाबाद! दोन्हींचा दर्जा उत्तम आहे. मुख्य म्हणजे आजकाल पुण्यात ती अनेक दुकानांमध्ये उपलब्ध असतात.

Pages