पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिनी मी पण हेच विचारायला आले होते.

अनारशे आणि चिरोटे दोन्ही ची लिंक देता का ईथे कोणि?
रच्याक ने दोनी एकच का हो? ( संदर्भ :- देवा काय हा अज्ञानाचा अंधार पसरलाय सगळीकडे >>>>>>>> खो खो)

मला कोजागिरीला करतात त्या आटवलेल्या दुधाच्या मसाल्याची कृती हवी आहे. इथे सापडली नाही.

आणि अजून एक
मेथीच्या लाडूत घालण्यासाठी माझ्याकडे खारकेची पूड नाही. ती नाही घातली तर चालेल का ?

कालच http://www.maayboli.com/node/6359?page=39 इथे ही चर्चा झाली मितान.
त्याचा संदर्भ :
मिनोती | 19 October, 2010 - 12:33
घरी दूध मसाला करता येईल - http://vadanikavalgheta.blogspot.com/2007/03/blog-post_5494.html.

लाजो | 19 October, 2010 - 13:37
नुसतं बदाम मिल्क करायचं

बदामाची पावडर, साखर, केशर आणि वेलची मिक्स करायची. दुध आणि कंडेन्सड मिल्क एकत्र करुन एक उकळी आणायची त्यात वरचे मिश्रण घालुन मंद आचेवर गरम करायचे. फार उकळायचे नाही. मधुन मधुन ढवळायचे. मस्त बदाम मिल्क तय्यार

हिच प्रोसेस स्लो कुकर मधे करायची. दुध आणि कंडेन्सड मिल्क एकत्र करुन एक उकळी आली की कुकर लो सेटिंगवर ठेवायचा. सारखे ढवळावे पण लागत नाही

चितळे चे डिंकाचे लाडू किती दिवस टिकतील ?
फ्रीज मधे ठेवु कि फ्रीजर मधे? दिड किलो आहेत.२५-३० लाडू

डिंकाचे लाडू इथे लवकरात लवकर पाठवले तर खराब झाले म्हणून वाईट वाटणार नाहे. Happy

साखरेच्या पाकाचे आहेत काय? आणि भारतातून आणले असतील तर आतच राहू दे नाहीतर वरचा उपाय बेस्ट anytime.

फ्रीझर मध्ये नको, दगड होतील नी मग पुन्हा वाट पहावी लागेल उन्हात बसून कधी नरम होतात ह्याची. आता थंडी असल्यान्र उन्हं मिळणार नाहीच.

jokes apart , फ्रीझ मधे ठेवा.

सकसची प्रॉड्क्ट्स चांगली असतात असे एकलेय. मुंबईत मिळतात का? नी कुठे? कोणाचा अनुभव कसाय तेही लिहा. Happy

प्रश्णाची जागा चुकली असे वाटले तरी पाक़कृतीविषयी आहे म्हणून लिहिले नाहीतर योग्य जागा दाखव, म्हणजे प्रश्णाला हो.

पराग कोण? नवीन आयडी? गेल्या ६ महिन्यातले बदल माहीत नाहीत. थँक्स पण सांगितल्याबद्दल.

ते जर ह्याचे उत्पादक/वितरक असतील तर "प्रॉड्क्ट कसे आहेत, चांगलीत का असे विचारले तर मग असे होइल ना, एखाद्याच्या हॉटेलात शिरून विचारायचे हॉटेलच्या मालकांनाच की तुमचे वडे चांगले आहेत ना? Happy
ह.घ्या.

मुंबईत मिळत असतील तर कुठे मिळतात फक्त ती माहीती दिली तर बरे होइल. ह्या वारीत घेइन मग.

मी उत्पादक किंवा वितरक नाही पण सकस उद्योगाचा नातलग आहे.. त्यामुळे मी म्हणू शकतो की सकस उत्पादने उत्तम असतात !!! Happy
पुण्याला मेहेंदळे गॅरेजच्या मागे मिळतात. त्याचा डिटेलवार पत्ता आर्चच्या एका जुन्या विपूत सापडेल.
मुंबईचं मला नक्की कुठे ते माहित नाही. विचारून सांगतो. Happy

अगं पराग म्हणजे adm...त्यांच्या घरचं प्रॉड्क्ट आहे म्हणून तसं लिहिलं मी Happy

मुंबईत मिळत असतील तर कुठे मिळतात फक्त ती माहीती दिली तर बरे होइल>> हे तोच नीट सांगू शकेल.

पराग , नीट माहिती लिही की मग सकस बद्दल आहारशास्त्र गृप मधे . उत्पादनं काय काय आहेत, कुठे मिळतात , वितरणाच्या वेळा काय आहेत इत्यादि .

पराग,
मुंबईत कुठे मिळतात हि माहीती उपयुक्त होइल. व कुठले प्रॉडक्ट्स ते सुद्धा लिहा.
आता मालक आहात किंवा मालकांचे नातलग म्हटल्यावर हा प्रश्णाचे ठराविक उत्तर मिळणारच हि खात्री आहेच. Happy
तुम्ही ते चि** ह्यांच्यासारखा लूक नाही दिलात इथे ह्याच्यासाठी मात्र आभारी आहे. कारण एक साधासा असाच एक प्रश्ण पुण्यालाच चि** ह्यांच्या दुकानात विचारला, हे लाडू किती दिवस टिकतील? तेव्हा एकदम घ्यायचे तर घ्या आणि असले भलते सलते प्रश्ण विचारु नका असा न बोलता तीला लूक होता. ती त्याचे(लूकचे) खमंग वर्णन किती दिवस इथे येवून आम्हाला सांगत होती. आता आम्ही तिथे न्हवतो म्हणून खरे मानले तीचे. Happy

jokes apart, तुमची माहीती उपयोगी ठरेल. बर्‍याच लोकांना सुद्धा सांगेन मुंबईच्या. लाडू, मसाले,पीठं काय काय आहे ते सर्व कळू दे.

बरं.. मला शक्य झालं तर डिटेल माहिती दिवाळीच्या आधीच लिहायचा प्रयत्न करेन. नाहितर मुंबईचा पत्ता तरी देईनच... Happy

धन्यवाद तुम्हाला पराग. अजुन तरी वेळ आहे मुंबईला जायला तेव्हा एका महिन्यात कधीही लिहिले तरी हरकत नाही.

मग मी बरेचसे काय काय घेवून येइन इथे व अनुभव शेयर करेन. मग मायबोली प्रथेप्रमाणे फक्त चांगल्याच प्रतिक्रिया लिहिन. Happy

पराग, अरे मला माहित नव्हतं ते सहस्त्रबुद्धे तुझे नातेवाईक आहेत ते. अगदी आमच्या इथेच आहे घराजवळ आहे. त्यांची खूप जूनी गिरणी सुद्धा तिथेच आहे. उन्हाळ्यात मसाला-तिखट तिथे दळलं जायचं तेंव्हा आमचा वार्षिक परीक्षेचा अभ्यास चालू असायचा. अजूनही उन्हाळ्याचे ते दिवस आठवले की अभ्यास आणि तो वास असं एकत्र आठवतं.

मनू, सकसचे प्रॉडक्टस मी स्वतः वापरले आहेत. अगदी पीठं, आगळ, लाडू वगैरे.. जवळ्जवळ सगळेच म्हणायला हरकत नाही. परागशी ओळख होण्याआधीपासून वापरते आहे. माझ्या साबाही रेग्युरली सकस उत्पादनं वापरतात. त्या पूर्वी वर्षभराची ज्वारी, बाजरी विकत घेऊन दळून आणायच्या भाकर्‍यांसाठी.. पण आता सबकुछ सकस.. खरोखरीच सगळी उत्पादन उत्तम आहेत. तू डोळे झाकून खरेदी कर.

पन्ना, तु पुण्याला जावून आणलीस का? मुंबईच्या अपना बाजारात मिळतात?. बरे डोळे झाकून नाही घेणार,चुकुन वेगळेच अपना बाजारचेच लोकल ब्रॅडचे पाकिट उचलून आणेन.

पण खरेच, मी सुद्धा खूप तारीफ एकली सकसची एकीकडून. ती मायबोलीकर नाही व मराठी नाहीये. पुण्याची आहे. तीने नक्की काय आणले कळले नाही. पण बरीच तारीफ केलीय. मग म्हटले घ्यायची तर सकसचीच. आता खव्याच्या पोळ्या अ‍ॅड करते यादीत. मोदक पीठ असेल तर ते.

मुंबईला कुठे मिळतात ते माहीत नाही गं, ते परागच व्यवस्थित सांगू शकेल.

पराग, पटकन सांग... मुंबईतल्या नातेवाईकांपर्यंत सकसची महती पोचवेन मग मी Wink

मला वाटतं मी दादरला पाहिलंय सकस वाल्यांचं दुकान. शिवसेना भवन च्या जवळ. स्वामी समर्थांच्या मठाच्या रोडवर. माझी आई पण वापरते सकस ची पिठं. मुंबईत नक्की मिळतात.

Pages