पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20

या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक अबोली, नाही. चिया सीड्स (असाच उच्चार असावा बहुतेक!;-)) वेगळ्या, सब्जा वेगळा!
चिया सीड्स साठी ही लिंक पाहा.

धन्यवाद दिनेशदा. गेल्या सोमवारी रत्नागीरी वरून येताना माणगाव ला चांगले ओले काजू मिळाले. पालखीवरून मार्च महिन्यात परत येताना माझी ही खरेदी फिक्स झालीय. माणगाव ला काजू, वडखळ नाक्याला पांढरे कांदे आणि पोह्याचे पापड.

गुरगाव ला एक दोड्डा नावाची मिठाइ मिळते. ती घरी कशी करायची ते कुणाला माहिते का? अल्पना?
मला इथे पण मिलाली खरतर पण तिथे एक फारच फेमस मिठाइ चं दुकान आहे त्याची सर अजिबातच नव्हती.

शूम्पी, मी कॉलेजातल्या हरयानवी कलिग्जना विचारते, माहित असेल कदाचीत त्यांना. आम्ही विकतच आणतो दोडा बर्फी. Happy

दोन्ही लिंकमधल्या रेसेप्या सारख्याच आहेत, फक्त पहिल्यामध्ये एकतारी पाक आणि दुसर्‍यामध्ये तिनतारी पाक आहे असं वाटतंय. पाकाचा आणि माझा कधी संबंध न आल्याने कुणीतरी दोन्ही पद्धतीने करुन बघा आणि सांगा. मी उद्या कॉलेजात विचारेनच.

मी जी खाल्ली होती त्याची चव स्वर्गीय होती. त्यात खोबर्‍याचा स्वाव असावा असं वाटतय (खात्री नाही). बदाम भरपूर होते आणि तुपाचा फ्लेवर तोंडात जाणवत होता. मैत्रिणीला विचारते. ती म्हणत होती की गुरगाव ला एक फेमस दुकाम आहे (आपल्या चितळे सारखच) तिथल्या दोडडाची सर दुसर्‍या दुकानातल्या बर्फी ला नाही.
पण तरिही वरच्या २ रेसिपी ट्राय मारून बघायला हरकत नाही.

खाल्लेली दोडाबर्फी चवीला रिच पण मऊ होती. तीनतारी पाकामुळे कडक झाली असती ना?
बर्‍याच वर्षांनी शूम्पे तुझ्यामुळे दोड्याची आठवण झाली. करून बघायला हवी.

मऊ, भरपूर बदाम+ तुप + भाजलेला खवा अशीच चव आठवतेय मला पण. २-३ वर्ष झाली खाल्ली नाहीये. आणावीच आता.

मला बकलावाची खात्रीची पाकृ हवी होती. माझ्याकडे पुस्तकात, वहीत लिहिलेल्या आहेत. पण मला ' या कृतीने मस्त होतो बकलावा' कॅटेगरीतली पाकृ हवी आहे. शाळेच्या टीमसाठी ग्रीक फूड - बकलावा करणे माझ्या वाट्याला आले आहे.

रगडा पॅटीस ची पाककृती हवी आहे.
तसेच फ्रोजन सेक्शनमध्ये मिळणार्‍या पॅटीजपैकी नक्की कोणत्या प्रकारची वापरावी?

वत्सला, तूमच्याकडे पांढरे वाटाणे मिळतात का ? मी हल्लीच मटार रगडा पॅटीस लिहिले होते. पॅटीस पण होते.

स्वाती, तुझ्याकडे लिहीलेल्या रेसिपी आहेतच. तशी त्याची खास रेसिपी नाही ...फक्त ते कसे रोल करायचे कितीला बेक करायचे हे महत्वाचे आहे. युट्युब वर बघ कसे करायचे ते. ही एक लिंक http://www.youtube.com/watch?v=1Amh60MwFak ... मी साखरेच्या पाकात थोडे मेपल सिरप टाकलेले. मिक्स ड्रायफ्रुट्..अक्रोड्+पिस्ता+बदाम वापर्लेले.

धन्यवाद विद्याक.

सिंडी, खात्रीचे काय साधेही दुकान नाही म्हणून तर खटाटोप. Happy

वत्सला, रगड्यासाठी वाटाणे ६-८ तास पाण्यात भिजत घालायचे आणि थोडा सोडा घालून कुकरमधे शिजवायचे. तेलावर हिरवी मिरची आणि पुदीना वाटण घालून थोडे परतायचे. त्यात शिजवलेले वाटाणे, धणे -जिरे पावडर, गरम मसाला आणि काळं मीठ घालायचे. चवीप्रमाणे साधे मीठ घालायचे.

@ वत्सला, <<< फ्रोजन सेक्शनमध्ये मिळणार्‍या पॅटीजपैकी नक्की कोणत्या प्रकारची वापरावी? >> हलदीरामची आलू टिक्की. तव्यावर तेल टाकून शॅलो फ्राय करायची. (तळूनही छानच होते.)

शूम्पी, युएस मध्ये हल्दीराम ची दोड्डा बर्फी मिळते. ती मावे मध्ये काही सेकंद ठेउन रु.टें ला आण आणि खा हाकानाका Happy

चितळेंच्या गुलाबजाम मिक्समधे थोडा मावा (खवा) मिसळला की गु.जा. छान होतात असं ऐकून आहे. (अदरवाइज चि. मि.चे गुजा. खूपच मऊसर होतात.) हा खवा मिसळण्याचं प्रमाण कुणी सांगू शकेल का, प्लीज?

चितळेंच्या गुलाबजाम करताना पाकाचे प्रमाण त्यांनी सांगितलेल्या पेक्षा घट्ट केले की गुलाबजाम एकदम मस्त होतात असा माझा अनुभव आहे! त्यांच्या प्रमाणाप्रमाणे पाक पातळ होतो.

स्ट्रॉबेरी पिकिंग नंतर घरी भरपूर स्ट्रॉबेरी झाल्या आहेत. काय काय करता येईल? स्लो कुकर मधे करता येण्यासारखे काही आहे का?

शुगोल, क्रीम घालून करुन बघा. मी बिन खव्याचे गुलाबजाम रेसीपी टाकलेली. त्यात क्रीमच असते. अगदी खव्यासारखे लागतात गुलाबजाम. चितळे मिक्सची पण गरज भासणार नाही नेक्स्ट टाईम. Happy

Pages