Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20
या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
श्रावणघेवडा, दुधी अशा
श्रावणघेवडा, दुधी अशा कंटाळवाण्या भाज्या जरा हटके चवीच्या कशा करायच्या? मी ओलं खोबरं/ दाणेकूट, गोडा मसाला, गूळ वगैरे नेहमीचे पदार्थ घालते. काहीतरी नवीन चवीच्या करायच्या तर काय करायचं?कांदा लसूण घालून उग्र होतील का? किंवा इतर काही?
श्रावणघेवडा, उभा बारीक कापून.
श्रावणघेवडा, उभा बारीक कापून. लाल मिरची, गाजर ( उभे कापलेले ) मका घालून, ( हिंग जिरे फोडणी, हळद नाही ) किंवा असाच कापून, उकडून दही / कूट घालून कोशिंबीर.
दुधी + बटाटा + चणाडाळ एकत्र उकडून त्यात लाल तिखट + चिंचेचा कोळ + ओल्या खोबर्याचे तेलात परतलेले तूकडे.. बंगाली पद्धत. किंवा किसून मुटके किंवा कोफ्ते.
माधवी., बास्केट्स (कॉर्न
माधवी., बास्केट्स (कॉर्न कॅनपीज्) तयार विकत मिळतात. मोठ्या ग्रोसरी शॉप्स, मॉल मध्ये चौकशी करून पाहा.
नाहीतर घरी मैद्याची/ बटाट्याची बास्केट तयार करता येते, पण त्यासाठी तळणे वगैरे प्रकार आले!
सफरचंदाचे काय काय करता येइल?
सफरचंदाचे काय काय करता येइल? खुप आहेत अशीच खायला नको आहेत
(No subject)
सफरचंदाचे काय काय करता येइल?
सफरचंदाचे काय काय करता येइल? खुप आहेत अशीच खायला नको आहेत >>> रिक्षा : सफरचंद-बटाटा थालिपीठ
ह्या वेळेच्या गणेशोत्सवात घेतलेल्या पाककृती स्पर्धेतल्या प्रत्येक पाककृतीत सफरचंद आहे. भरपूर चॉईस आहे. इथे प्रवेशिका बघायला मिळतील.
सफरचंदाचे काय काय करता
सफरचंदाचे काय काय करता येइल?>>> मायबोली गणेशोत्सव २०१२ बघा
मंजूडी, तीच लिंक शोधायला गेले
मंजूडी, तीच लिंक शोधायला गेले होते
सफरचंद पुडिंग करता येइल. साल
सफरचंद पुडिंग करता येइल. साल काढुन करायचं.
सफरचंदाचे तुकडे दह्यात घालून
सफरचंदाचे तुकडे दह्यात घालून रायते करता येईल.
हि.मि/ ला. ति. + कोथिंबीर + मीठ बास एवढंच लागतं.
सफरचंदाच्या लोणच्याचीही कृती
सफरचंदाच्या लोणच्याचीही कृती आहे इथे माबोवर. मस्त चव आणि पटपट होते!
उजु, इथे मटकी पुलाव आहे. तो
उजु, इथे मटकी पुलाव आहे. तो मोड आलेली मिश्र कडधान्ये घालून करता येइल. ब्राउन राइस घेतला तर भरपूर हेल्दी होइल.
शूम्पी, ते न्युट्रिशन विजेट असणार नक्की. तुला सापडलेल्या लेखाची लिंक दे.
प्रज्ञा९: दुधी-भोपळ्याच्या
प्रज्ञा९:
दुधी-भोपळ्याच्या भाजीसाठी हे बघितलस का?
http://www.maayboli.com/taxonomy/term/1059
http://www.maayboli.com/node/28465#comments
ही घे लिंक
ही घे लिंक सिंडी
http://www.webmd.com/food-recipes/features/the-truth-about-kale
प्रज्ञा९ -- माझी आवडती
प्रज्ञा९ -- माझी आवडती श्रावणघेवडा रेसिपी. तेलात पंचफोरण (नसल्यास मोहोरी, जिरे), हिंग, हिरव्या मिरच्या उभ्या चिरुन फोडणी करायची. त्यात बारीक कापलेला कांदा घालून परतायचा. त्यात १ ईंच लांब चिरलेला श्रावणघेवडा घालायचा. शिजत आल्यावर थोडं ओलं खोबरं घालायचं (ऑप्शनल). मस्त लागते, माईल्ड असते मात्र चव. (रेस्पी माझी नाही, कालनिर्णय मधली आहे.)
केल मध्ये प्रोटिनपण असतं असं
केल मध्ये प्रोटिनपण असतं असं संजय गुप्ताने Prevention ला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं आहे...
मला अजून तरी ही भाजी घरी करून घशाखाली उतरत नाही
श्रावण घेवडा शिरा काढून(
श्रावण घेवडा शिरा काढून( असल्यास ....कारण हल्ली श्रा.घे.ला शिरा नसतात.) बारीक डायमंड शेपात कापून घ्यायचे. कुकरात १ शिट्टी करून वाफ काढून टाकायची. त्यात ओलं खोबरं, भरपूर कोथिंबीर, मीठ, अगदी थोडं दाण्याचं कूट(ऑप्शनल), लिंबू, साखर घालून वरून तेलाची मोहोरी,हिंग, हि. मिरचीची फोडणी. हळद नको. आणि श्राघे वाफवल्यावर चाळणीवर टाकून निथळून घ्यावं .
हसरी.............सफरचंदाचं वॉल्डॉर्फ सॅलड हल्ली हॉटेलात मिळतं.:
सफरचंदाच्या सालं काढून बारीक फोडी+ अक्रोड...साधारण हातावर चुरा करून+ मेयॉनीज.
यातलं मेयॉनीज नको असेल तर, घरातलं दही टांगून, (चक्का) त्यातच थोडं ऑऑ, मीठ साखर घालावं.
दोन माणसात ४/५ सफरचंद इझीली खपतात.
धन्यवाद!
धन्यवाद!
दुधी भोपळ्याची भाजी : आलं
दुधी भोपळ्याची भाजी : आलं मिरच्या वाटून घ्याव्यात. फोडणीत जिरे घालावेत, आलं मिरच्यांचे वाटण, हिंग, हळद घालावे. दुधीच्या फोडी घालाव्यात. पाणी न घालता झाकणावर पाणि ठेऊण वाफेवर शिजवावे. शिजले की मीठ घालावे. पाणी सुटले असेल तर ते आटवावे. वरून कोथिंबीर.
सफरचंद-नारळ वडी !
सफरचंद-नारळ वडी !
दक्षिणेकडील मंदिरामध्ये
दक्षिणेकडील मंदिरामध्ये प्रसाद म्हणून खिचडी मिळते तांदळाची कशी करतात माहित आहे का?
( आजारी व्यक्ती आहे. अपघातामधुन वाचलेली त्यामुळे त्यांना पहायला येणारे फळे घेउन येतात पेशंट जास्त खात नाही मग घरी रवानगी होते. किती तरी आजुबाजुला वाटुन टाकतो)
आरती तुम्ही दिलेल्या कृती प्रमाणे रविवारी चिक्कुची वडी केली आणि आवडली ही. पण सफरचंदाची निट होइल का म्ह्णणुन शंका होती. वरती दिलेले प्रकारमधले २ तिखट करुन बघते
(आजारी व्यकतीची हाडे खुप तुडली आहेत तर ती भरुन येण्यासाठी सुपच्या रेसिपी हव्यात)
गाजर आणी बीट चे सुप देतो पण रोज रोज ते तेच खाउन कंटाळा आलाय.
सगळ्याना धन्यवाद
हसरी, सुप नेहमी पाश्चात्य
हसरी, सुप नेहमी पाश्चात्य पद्धतीने करायची गरज नाही. आपले मूगाचे / चवळीचे / कुळथाचे कढणही चांगले.
( जिरे / कोकम / मिरची घालून केल्याने चवदारही असते.)
ताकातल्या पालेभाज्या, तूरीचे पाणी, राजगिर्याची लापशी चांगली. कोहळ्याचे सार चांगले. सिताफळे पण चांगली.
वैद्यांना विचारून धावड्याचा डिंक देता येईल. हाडासाठी चांगला. कुठल्याही आयुर्वेदीक औषधांच्या दुकानात मिळेल.
दिनेशदा. बिट आणि गाजराच असेच
दिनेशदा. बिट आणि गाजराच असेच करतो फक्त मिरची,आलं,लसुन पेस्ट आणि हिंग,जिरयाची फोडणी.
सारखी औषध घेउन तोंडाला चव नाही आहे. जरा वि.पू मध्ये डिटेल्स मध्ये लिहा प्लिज.
हसरी टोमॅटो गार्लिक सूप :
हसरी
टोमॅटो गार्लिक सूप : कांदा, थोडासा लसूण व गाजर तेलात थोडे परतून टोमॅटोच्या फोडींबरोबर पाणी घालून शिजवायचे, शिजल्यावर गाळून घ्यायचे. या सूपमध्ये चवीप्रमाणे मीठ, मिरपूड, मिक्स हर्ब्ज, क्रीम/लोणी/ किसलेले चीज घालून गरम गरम घ्यायचे.
बीट + कांदा सूप पण चवीला वेगळे व मस्त लागते. वरून लिंबू पिळायचे.
सुंठीची कढी पाचक व तोंडाला चव आणणारी.
दाल शोरबा प्रकार रुग्णाला चालणार असेल तर मुगाची डाळ व वेगवेगळ्या भाज्या घालून सूप्स.
मोड आलेली कडधान्ये, गाजर, कोबी, कांदा घालून सूप्स. आहारात डॉ.च्या सल्ल्याने भरपूर पालेभाज्या.
हाडाची झीज भरुन येण्यासाठी
हाडाची झीज भरुन येण्यासाठी शेवगा, त्याचा पाला खायला सांगा भरपुर..त्यात खूप कॅल्शियम असते
(No subject)
मिक्स कडधान्याबरोबर शेंगदाणे
मिक्स कडधान्याबरोबर शेंगदाणे पण घाल, चाट मधे छान लागतात
केलची मेथीसारखी पिठ पेरून भाजी करता येते.
kale-chips करता
kale-chips करता येतात....
http://allrecipes.com/recipe/baked-kale-chips/
घरात भरपूर केळी आणली गेलीत.
घरात भरपूर केळी आणली गेलीत. नवर्^याचं प्रेडिक्शन होतं की आधी पहिला घड पिकेल मग दुसरा..अर्थात केळ्यांनी त्याचं ऐकलं नाहीये...त्यात मुलांना सर्दी झालीत म्हणून त्यांना द्यायची नाहीयेत्. शिकरण सोडून काय करता येईल्...आई केळ्याचे वडे म्हणून एक पदार्थ करते पण ते तळण आहे म्हणून अव्ह्~ओइड करतेय आणि आधी केले पण नाहीयेत..
कुणाकडे काही आयडिया ? ? ?
बनाना ब्रेड (नेटवर सर्च करा
बनाना ब्रेड (नेटवर सर्च करा रेसिपी. इथे एक आहे.)
तुपावर कुस्करलेली केळी, ओलं खोबरं आणि लागल्यास साखर परतून पुरण - हे फ्रीजमधे टिकेलही.
फेसपॅक (हे फेकत आहे, पण बरोबर निघण्याची दाट शक्यता आहे. :P)
हेअर कंडिशनर (हेही. :P)
Pages