पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20

या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते पीठ, गव्हाचं पीठ, बेसन , तांदळाचं पीठ, धणे जिरं पूड, हळद तिखट मीठ, असं मिसळून थालिपीठ करता येईल. बारीक चिरलेला पातीचा कांदा, कोबी, कॉलीफ्लावर, मुळ्याचा पाला, मेथीची पानं असं काही मिसळून पण थालिपीठ मस्त होतं

प्रॅडी, बार्ली, कुसकुस किंवा बर्गुल सारखे वापरून बर्‍याच प्रकारे सॅलडस करता येतात. सूप्स मधे वापरता येते. रिसोटो करता येतो. बेक्ड डिशेस मधे वापरता येते.

Pages