पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20

या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

टुनटुन, ह्याच पानावर उजव्या बाजूला वर 'नविन पाककृती' हे निळ्या अक्षरांत लिहिलेलं दिसेल, त्यावर क्लिक करा आणि हे उन्नीअप्पम तिकडे लिहा.

मंजूडी धन्यवाद, पण माझ्याकडे काल ते पान उघडतच नव्हतं, एरर येत होती. ( माबो साईटचा प्रॉब्लेम नव्हता ) म्हणून मी इथे टाकले दुरुस्त करतेय.

कुणी पाणीपुरीचं पीठ वापरून पुर्या केल्यात का? मला इकडच्या इं.ग्रो.त मिळालंय....प्र्योग म्हणून आणलंय.

रताळ्याचा किस करता येईल. उंधीयू पद्धतीची भाजी किंवा बटाट्याची करतो त्या कुठल्याही पद्धतीची भाजी.
ज्या भाजीत बटाटे घालतो त्या कुठल्याही भाजीत घालता येतात.

कच्च्या चकत्या मिरच्या आणि दाण्यांबरोबर ठेचून ( जाडसर ) चटणी करता येते.

हो तशीच करायची. पिवळे मूग जास्त दिवस ठेवू नयेत. खराब होतात. ( म्हणून बाजारात कमी असतात.)

मी कल्याणी - आवळे वाफवून घ्यायचे त्यात साख्र मिसळून शिजवून घ्यायचे घट्ट पाक होईपर्यंत फोडी वेगळ्या काढून उन्हात वाळवायच्या कॅन्डी सारख्या खाता येतील पाक अ‍ॅज अ सरबत होईल पाक फ्रीजमध्ये ठेवावा लागेल. त्या पाकात पाणी घातले की सरबत तयार. आवळे किसून दीडपट साखरेत शिजवायचे घट्ट होईपर्यंत - साखरांब्याप्रमाणे थंड झाल्यावर बाटलीत भरून ठेव खूप दिवस टिकते. पाण्यात मिसळून सरबत होईल पोळी ब्रेड बरोबरही खाता येईल.

मला चोको लाव्हा केकची कृती हवी आहे, मायबोलीवर वाचल्यासारखी वाटतेय पण आता सापडत नाहिये.

पाणीपुरीचे पिठ म्हणून काय वेगळे घटक आहेत त्यात ? हे पिठ भिजवताना डींक / उडदाचे पिठ / समुद्रफेस यापैकी काहितरी एक घालावे लागते. तसेच पिठ अगदी घट्ट भिजवावे लागते. सर्वच पुर्‍या फुगत नाहीत. ज्या फुगत नाहीत, त्या भेलपुरीसाठी वापरतात.
त्यामूळे असा काही खास घटक असल्यास आणि भिजवण्याचे तंत्र संभाळल्यास चांगल्याच होतील.

इथे कोणाला कैरीच्या भाजीची पाकॄ माहीत आहे का? धुळे-जळगाव भागात करतात तशी पारंपारिक रेसिपी हवीये.

आभार दिनेशदा. घटक दिलेले नाहीत नुस्तंच पानीपुरी आटा असं लिहिलंय आणि पाकिटावर सुचना देखील नाहीत..घट्ट भिजवून ट्राय करेन Happy

चिंगी आजच सुलेखा काकुंनी अमिया का सालन नावाची एक कैरीच्या भाजीची कृती लिहिलिये.

मेथी मलइ मटर ची रेसिपी पाहिजे आहे.... त्याचे जैन वर्जन आहे का? मी खाल्ली होती पण रेसिपी विसरले आहे...

कैरीच्या भाजीची पाकॄ:
कैरीचा चोकोनी फोडी करून घेणे.कढीत तेलावर मोहोरी हिंग हळद आणि तिखटाची फोडणी करून वर फोडी टाकायचा, मीठ आणि गुळ टाकून झाकणावर पाणी ठेवून कैरी वाफावयाची.गुळ विरघळून फोडी मऊ झाल्या म्हणजे लुन्जी/रुंजी/कैरीची भाजी तयार.

मागे कुठल्यातरी धाग्यावर मासे वाफवूनही छान लागतात असं लिहिलं होतं, कुणाला बेसिक पाकृ माहिती आहे का? जागूताई Pls help

गोजं/मेथांबा असाच करतात ना ? त्यात मेथ्या घालतात फोडणीत आणि झाकण न घालता शिजवतात फोडी.

मेथी मलई मटर ची माझी कृती इथे आहे. http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/135057.html?1176513292

क्वीक रेफ साठी ..

मेथी मलाई मटार

खुपदा पुस्तकात यासाठी कसुरी मेथी वापरायला सांगितलेली असते, पण मला ताजी मेथी वापरायला आवडते.

एक वाटी मटाराचे दाणे वाफ़वुन घ्यावेत. चार कांदे किसुन घ्यावेत. एका काळ्या वेलचीचे दाणे, एक दोन लवंगा, दोब साध्या वेलच्या, अर्धा ईंच दालचिनी (किंवा एखादे चक्रीफ़ुल) गरम करुन त्याची पुड करावी. एक वाटी ताज्या मेथीची फ़क्त पाने घ्यावीत.

तेलाची लाल मिरचीचे तुकडे घालुन फ़ोडणी करावी. त्यात किसलेला कांदा त्याला सुटलेल्या पाण्यासकट टाकावा. तो अगदी मंद आचेवर परतत रहावा. त्याचा कच्चट वास गेला की त्यात वरच्या मसाल्याची पुड घालावी.मग मेथीची पाने न चिरता घालावीत व परतत रहावे. ती पाने शिजली की मटार घालावेत व सगळे एकत्र करावे. एक कप भरुन दुध घालुन मंद आचेवर शिजु द्यावे. शक्य असल्यास काजुची पेस्ट किंवा मगजाची पेस्ट घालावी. मीठ घालावे. हवे असल्यास थोडेसे पाणी घालावे. सर्व्ह करताना पाव कप क्रीम घालुन परत थोडे गरम करावे. यात हळद अजिबात घालायची नाही.
हा सगळा प्रकार मंद आचेवर फ़ुरसतीने करायचा प्रकार आहे.

कांद्याशिवाय ही ग्रेव्ही करायची तर बटाटा / कच्चे केळे वगैरे वापरावे लागेल.

प्राची, जागू सांगेलच. पण तरी..

माश्यांना मिरची कोथिंबीरीची हिरवी चटणी ( जरा जास्त तिखट करुन, आले लसून वापरून ) आत बाहेर चोळायची. मग तो मासा केळीच्या नाहीतर हळदीच्या पानात गुंडाळायचा. मग चाळणीवर ठेवून १०/१२ मिनिटे वाफवायचा.
पारसी पात्रा नु मच्छी असे शोधल्यास नेटवर प्रमाण मिळेल.

प्राची दिनेशदांनी सांगितल त्याप्रमाणेच पण जर तुला मसाल्यात हव असेल तर मसालाही लावू शकतेस. केळीचे किंवा हळदीचे पान नाहीच मिळाले तर स्वच्छ कापडही ठेऊ शकतेस. पण नंतर त्या कापडाला वास येईल. तू अशीच पानांमध्ये ठेऊन निखार्‍यावरही भाजू शकतेस (इथे कापड नाही चालणार :हाहा:) . भाजलेली उकडलेल्यापेक्षा जास्त चविष्ट लागते. खमंग वास येतो.

Pages