पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20

या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Bob's Red mill Gluten free Mighty Tasty Hot Cereal असं खतरा नाव वाचून आण्लं आणि दोन कप शिजवलं तर ़ कुणालाच फारसं आवडलं नाही..शिजलेलं तसंच फ्रीजमध्ये ठेवलंय. कशात खपवता येईल?
आणि उरल्या पाकिटाचं काय करू? त्यांनी त्या पाकिटावर एक मफिनची रेस्पि दिली आहे. पण ती कोंबडीपेक्षा मसाला महाग टाइप वाटतेय. आणि शिवाय माझ्या बेकिंग स्कीलला आव्हान दिल्यासारखं होईल ते वेगळंच Wink
Ingredient list for the cereal says Whole Brown Rice,corn,sorghum,buckwheat.
Any suggestions for any different receipt to try???

थोडंसं रवाळ टाइप दिसतंय...कदाचित आण्खी कसलं पिठ घालून दोसे होऊ शकतील. पण शिजलेलं थोडं गचका झाल्यासारखं दिसतंय. त्याचं काय करावं हा प्र्श्न्च आहे..नवर्याचं म्ह्णणं वडे कर अर्थात त्याला कशाचेही वडे चालतील पण मला फार काही सुचत नाही...त्यात थोडं आटवलेलं दुध घालून खीरीसारखं करून (एकदाचं) संपवावं लागेल असं दिसतय.

ओह, मग ढोकळ्याचं बघ थोडा रवा घालून. जर पीठ होईल असं वाटल्यास मिक्सीतून काढून दोसे घालता येतील का ते पहा.

वेका, उकडलेल्या कुस्करलेल्या बटाट्यात तिखट, मीठ, ही सीरियल आणि इतर मालमसाला (चवीप्रमाणे) घालून त्याचे चपटे गोळे करायचे व नॉन स्टिक तव्यावर थोडेसे तेल घालून त्यावर खरपूस भाजायचे असे करता येईल का? क्रंची कटलेट / टिक्की स्टाईल काहीतरी पदार्थ होईल तयार बहुतेक! Happy

buckwheat / Kuttu ka atta म्हणजे मराठीमध्ये काय म्हणतात?
हे मुंबई मध्ये मिळते का?

मुग्धा, मंजूडी, सुचारिता खुप खुप धन्यवाद. केल्यावर नक्की सांगते व आंबोळ्यांचे फोटोही टाकते. Happy

पीआरार,
कुट्टु का आटा म्हणजे मखाण्याचा आटा / पिठ. मखाणे म्हणजे कमळाचे बी.उपवासाला याच्या तिखट पुर्‍या, तुपात भाजुन गोड शिरा,भजी,वडे असे बरेच पदार्थ करतात.आजारी व्यक्तिला कुट्टु च्या आट्याची खीर बनवुन देतात.पचनाला कलके/सुपाच्य तसेच पौष्टीक आहे.हे मुंबईत मिळत नाही. ग्वाल्हेर्,दिल्ली , उ.प्र. हरियाणा मधे जास्त मिळते.पोळ्याच्या दिवशी --कुट्टु पदार्थांचा विशेष भोग लावतात.या कुट्टु आट्याचेच लहान लहान आकाराचे दोन बैल बनवुन त्याची साग्रसंगीत पूजा करतात आणि त्यांचे संध्याकाळी विसर्जन करतात.

मी पटेल मधुन अक्खा राजगीरा आणलाय. लाडु करायचे होते. Sad
पण तो फुलतच नाहीये .. खुप प्रयत्न करुन पाहीले. .. पण काही उपयोग नाही.

काय करुन संपवू, उपाय सुचवा.

काळजीवाहू, सब्जाचं बी पाण्यात भिजवायचं... तासाभरात चांगलं फुलतं... मग त्यात गार दूध + साखर, हवं असेल तर रोझ सिरप असं घालून प्यायचं. फालुद्यात पण वापरतात.

राजगिर्‍याचे पिठ करुन चपाती / पुर्‍या करता येतील ( थोडी कचकच लागते.) तो भिजवून, मिक्सरमधून एकदा काढून, पाखडून त्याची खीर करता येईल. याचाच उपम्यासारखा प्रकार करता येईल.
गरम कढईत तो अर्धा मूठ घालून नॅपकीनच्या बोळ्याने घोळवल्यास लाही फुटायला पाहिजे. तसे होत नसल्यास तो जूना असण्याची शक्यता आहे. पिठ वापरण्यापूर्वी ते चवीला कडवट नाही, याची खात्री करा.

सब्जा, साध्या पाण्यात, लिंबू किंवा इतर सरबतात, फालुदामधे घालून खाता येईल ( अर्धा तास पाण्यात भिजवून मग वापरायचा ) शक्य असल्यास तो कुंडीत पेरायचा. त्याची पाने सुगंधी असतात.

सब्जा चं बी - फालुदा मधे Happy आहाहा.... थंडगार फलुदा.... यम्मी यम्मी Happy

सब्जाचे बी थंड दूध्+साखर मधे पण चांगले लागते.

व्हॅनिला आयस्क्रिम वर सब्जा आणि वरतून केशर सिरप....

स्ट्रॉबेरी आयस्क्रिम वर सब्जा आणि वरतून व्हॅनिला केकचा चुरा ....

जेली करण्यासाठी मिक्स पॅकेटस मिळतात पण अनफ्लेवर्ड, अनस्वीटनड अशी जिलेटिन पावडर नुसती मिळते का आपल्याकडे?
पार्ल्यात कुठेही मिळाली नाही. रेडी पॅकेटस मधे खूप साखर असते. शॉटससाठी बोर होतात.

नी,

काही दुकानातच मिळते. अनफ्लेवर्ड जिलेटीन ( सध्या भारतात जिलेटीन म्हणजेच अगर अगर / कार्गीनान असे मानतात ) किंवा आस्पिक पावडर मागून बघ. फाईव्ह स्टार कंपनीचे पॅकेट आहे. प्लेन अगर अगर पण मिळेल.
अनफ्लेव्हर्ड चायना ग्रास या नावाने पण मिळेल

अर्रर्र हे माहित नव्हतं. रेडिमिक्स्ड पाकिटं आणली ऑलरेडी. अगार अगार मिळतं पार्ल्यात. आता नेक्स्ट टाइम.
थँक्स दिनेश!

चिकन किती प्रकारे मॅरीनेट करता येवु शकेल?
आलं+लसुण्+दही+लाल तिखट, मिठ+तेल्+काळीमिरी पावडर, ह्या व्यतिरिक्त अजुन काही आहे का?

माझी आई एक हिरवं चिकन करते त्याला ती कोथिंबीर (भरपूर), मिरच्या (झेपतील तशा) आलं लसूण, हळद, मीठ असं लावून ठेवते. हेच मटणाला पण लावते पण ते नेहमीच..चिकन हिरवं करायचं असेल तेव्हा हे हिरवं ट्राय करून बघ.

mala masale bhatasathi masale gharachya ghari kase tayar karayche tyachi mahiti pahije ahe
pls.

सब्जाची पाने खात नाहीत पण विठ्ठलाला सबज्याच्या तूर्‍यासकट वाहतात. टेबलावर ठेवली तरी सुगंध येतो.
मेथीच्या मोडासारखे मोड काढता येतील असे वाटत नाही.

ओल्या काजूची उसळ काळे वाटणे घालून करतात का? कधी केली नाही पण एका कोकणातल्याच मैत्रीणीने सान्गीतले. आई घरी त्यात बटाटे घालून करते.

सामी, काळ्या वाटाण्याच्या उसळीत कधी कधी ओले काजू घालतात. मुबलक असल्याने त्या सिझनमधे वांगी, फणस अशा भाज्यातही घालतात.

Pages