Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20
या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
thanks Lajo
thanks Lajo
मला ४ दिवस, ३ रात्र ट्रिप
मला ४ दिवस, ३ रात्र ट्रिप साठी जायचे आहे. तिथे हॉटेल्स वगैरे खुपच कमी आहेत. त्यामुळे बरेचसे सामान घरुनच घेउन जायचे आहे. कुकिंगची सोय आहे. पण जेवणासाठी पटकन बनवता येतील आणी सामान पण कमी लागेल असे पदार्थ सुचवा ना.
उपमा, शिरा वगैरे उपमा-सर्व
उपमा, शिरा वगैरे
उपमा-सर्व भाजून फोडणी मिक्स करून ठेवायची.
शिरा- भाजून घी मध्ये परतून घ्यायचा.
खिचडी- तांदूळ व डाळ भाजून फोडणी मिक्स करून.
(मला इतकच येते)
सँडविच - ब्रेड - जॅम - सॉस -
सँडविच - ब्रेड - जॅम - सॉस - चटण्या - स्प्रेड्स - चीझ स्लाईसेस - बटर इ. सोबत घेऊन गेल्यास फटाफट सँडविच बनवता येतील. कांदा, टोमॅटो, काकडी इत्यादी ऑप्शनल.
सूपची पाकिटे किंवा क्यूब्ज घेऊन गेल्यास सूप, सॅलड, सँडविच असा पोटभरीचा मेनू होईल.
हवाबंद पास्ता सॉस व पास्ता सोबत घेऊन जाऊन आयत्या वेळी पास्ता बनविता येईल.
रवा भाजून नेल्यास त्याची खीरही पटकन बनवता येते. शेवया भाजून नेल्यास त्यांचीही खीर. तांदळाच्या पिठाची उकड हाही झटपट होणारा पदार्थ आहे.
ओतलेली / थापलेली भाकरी - पिठलं किंवा भात-पिठलं हेही सराव असेल तर पटपट होणारे.
जाडे पोहे / पातळ पोहे नेल्यास ते भिजवून दही-पोहे / दूध-गूळ-पोहे खाता येतील.
चंदन बटवा कींवा बथुआ ही भाजी
चंदन बटवा कींवा बथुआ ही भाजी ताकात बनवायची रेसिपी कोणि देउ शकेल क??
इथे असणार ही कृती.. तरीपण
इथे असणार ही कृती.. तरीपण क्वीक रेफ साठी.
जिरे, मिरची, हिंग यावर ही भाजी फोडणीला टाकायची. नीट शिजल्यावर मीठ टाकायचे आणि वरुन बेसन किंवा तांदळाचे पिठ लावलेले ताक ओतायचे. आणि कढीप्रमाणे शिजवायचे. पण ही भाजी कढीपेक्षा थोडी पातळच करतात. आमच्याकडे हळद / कांदा / लसूण घालत नाहीत.
सुखदा, सुलेखा काकुंनी इथे
सुखदा, सुलेखा काकुंनी इथे काही दिवसांपूर्वीच बथुआच्या बर्याच रेसेपी टाकल्या होत्या http://www.maayboli.com/taxonomy/term/12049 इथे.
सुखदा,बथुवा पाने चिरुन अगदी
सुखदा,बथुवा पाने चिरुन अगदी थोड्या पाण्यात वाफवुन घ्यायची.हाताने छान कुसकरुन घ्यायची.त्यात दाट ताक किंवा फेटलेले दही,मीठ,साखर ,हि.मिरची,लाल तिखट घालायचे वरुन हिंग-जिरे फोडणी घालायची.याला बथुवा रायते म्हणतात..तयार रायते पुन्हा गरम करायचे नसते.
कोणी सॅन्ड्विच मेकर मधे कधी
कोणी सॅन्ड्विच मेकर मधे कधी केक करून पहिला आहे का ? नेट वर एक-दोन रेसिपी सापडल्या. करून बघाव्या का ? तज्ञांना काय वाटते जमेल का ? नविन सॅन्ड्विच मेकर घेतला आहे. त्यात सॅन्ड्विच व्यतिरिक्त अजून काय काय करता येईल ?
`प्रवासी चिवडा' म्हणून जो
`प्रवासी चिवडा' म्हणून जो मिळतो, तो कुठल्या पोह्यांचा असतो ? पुण्यात हे पोहे कुठे मिळतील ?
@रावी, महात्मा फुले मंडईजवळ
@रावी, महात्मा फुले मंडईजवळ पूना शुगर डेपो आहे तिथे प्रवासी चिवडा वाले पोहे मिळतील.
@अरुंधती कुलकर्णी > धन्स!
@अरुंधती कुलकर्णी > धन्स!
धन्स,अल्पना,दिनेशदा,सुलेखा!!
धन्स,अल्पना,दिनेशदा,सुलेखा!!
मेतकूट कसं करतात? कोणीतरी
मेतकूट कसं करतात? कोणीतरी सांगा प्लिज..
http://www.maayboli.com/hitgu
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/105396.html?1160916387 इथे आहे.
परत पोस्ट करतोय !
मेतकुट
पुर्वी मेतकुट अगदी घरोघर असायचेच. काय असेल ते असो, पण प्रत्येक बाईच्या हातच्या मेतकुटाची चव वेगवेगळी लागायची. आणि प्रत्येक घरात मेतकुट खायचे नवीन नवीन प्रकार दिसायचे.
मेतकुट हे जमावे लागते.
दोन वाट्या चण्याची डाळ, एक वाटी ऊडदाची डाळ, अर्धी वाटी तांदुळ, पाव वाटी गहु, पाव वाटी काळि मोहरी, दोन चमचे जिरे, दोन चमचे हिंगाची पुड, दोन तीन लाल मिरच्या, अर्धा चमचा मिरीदाणे, एखादे हळकुंद, दोन चमचे धणे, अर्धे जायफ़ळ, एखादा सुंठिचा तुकडा.
शक्यतो लोखांडी कढईत, धान्ये भाजायला घ्यावीत. हि धान्ये कोरडीच भाजायची असल्याने खुप वेळ लागतो. पण तरिहि संयमाने भाजायची, प्रत्येक धान्याचा खमंग वास आला पाहिजे, तरिहि काहिहि करपता कामा नये. हिंग, हळकुंड, जायफळ वैगरे भाजता येत नाही, त्यामुळे ईतर धान्ये भाजताना, शेवटी ते टाकुन जरा गरम होवु द्यावे. जसजसे भाजत जाऊ तसतसे ते एखाद्या पेपरवर पसरत जावे. त्यावर पेपर झाकावा म्हणजे वाफ धरत नाही. मग सगळे एकत्र करुन अगदी बारिक दळावे. मैद्याच्या चाळणीने चाळुन घ्यावे. दोन तीन बाटल्यात भरावे. वरती हिंगाचा खडा ठेवावा.
धान्ये अशी खमंग भाजल्याने पाण्याचा अंश निघुन जातो, व ते खुप टिकते.
मला कॉटेज चिजपासुन पनिर कसे
मला कॉटेज चिजपासुन पनिर कसे बनवायचे सांगाल का?
दिनेशदा मागील पानावर फ्रिज
दिनेशदा मागील पानावर फ्रिज ड्राईड दह्याचा उल्लेख केला आहेत. हे घरी केलेत का मिळते?
कसे करतात?
मोनाली, ते मी घरीच केले. एका
मोनाली, ते मी घरीच केले.
एका मोठ्या गाळण्यात स्वच्छ रुमाल पसरुन त्यावर दही ओतले. पण चक्क्यासारखे बांधून न ठेवता उघडेच एका मोठ्या भांड्यावर ते ठेवले. ( नो फ्रॉस्ट फ्रीज मधे ) मग जरा घट्ट झाल्यावर एका प्लेटमधे पसरुन ( फ्रिजमधेच ) ठेवले. हळूहळू ते सुकत गेले आणि त्याची पावडर बनली. पाण्याचा अंश मात्र लागू दिला नाही.
हि पावडर मी गेले दोन महिने विरजणासाठी वापरतोय ( सोबत तुरटी पण असतेच ) मस्त आपल्या चवीचे दही लागतेय. मी दूधाची पावडर वापरतो, दह्यासाठी.
असे काही प्रॉडक्ट बाजारात नाही. म्हणजे मोठ्या प्रमाणावर डेअरी उद्योग असेल तर आहे पण घरगुति वापरासाठी नाही. इथे आपल्यासारखे दही मिळत नाही, त्यामूळे मला जी चव हवी होतत, ती मिळत नव्हती.
सध्या रोज दुपारी जेवणाबरोबर लस्सी / ताक असते.
एका फ्लास्कमधे रात्री विरजण लावतो. सकाळी त्यात बर्फ आणि इतर घटक टाकतो. दुपारी जेवताना फ्लास्क शेक करुन घेतला, कि झाले.
मधे एकदा कोणितरी दही व मिल्क
मधे एकदा कोणितरी दही व मिल्क पावडर पासुन खरवस बनवण्याची रेसिपी दिलेली. कुठे गेली ती?
ओके. एका प्लेटमधे पसरुन (
ओके.
एका प्लेटमधे पसरुन ( फ्रिजमधेच ) ठेवले. हळूहळू ते सुकत गेले >> हा अंदाज केला पण आधीची गाळायची प्रोसेस असु शकते हे कळाले नव्हते. मस्तच.
खूप खूप धन्स दिनेशदा मेतकुट
खूप खूप धन्स दिनेशदा
मेतकुट करून बघतेच आता.
इन्स्टंट खरवस
इन्स्टंट खरवस
कॉटेज चीज म्हणजेच पनीर ना?
कॉटेज चीज म्हणजेच पनीर ना? म्हणजे मी तरी आतापर्यंत तसेच समजत होते. हा समज चुकीचा असेल तर कृ. बरोबर काय ते सांगावे.
खुप धन्यवाद भरत!! खरवस म्हणुन
खुप धन्यवाद भरत!! खरवस म्हणुन शोधलं तरी नाही मिळालं.
मला साऊथ इंडियन लोक गोड
मला साऊथ इंडियन लोक गोड आप्पे ( आपम् ) तांदळाचे करतात त्याची रेसिपि हवी आहे ( मला नेटवर रव्याचि मिळाली ) ...
अकु: मी कॉटेज चिज म्हणुन आणले
अकु: मी कॉटेज चिज म्हणुन आणले आहे ते पनीर सारखे नाहिये. थोडेसे पातळ आहे पनीरपेक्शा. म्हणुन मग त्याचे तुकडे पडत नाहिये.
पेरु, एका ब्लॉगवाल्या बाईंनी
पेरु, एका ब्लॉगवाल्या बाईंनी लिहिलंय की त्या सरळ अशा कॉटेज चीजचे लहान गोळे करून लोण्यात मंद आंचेवर तळून घेतात - तेव्हा ते कॉटेज चीज गोळे एकमेकांना चिकटू शकतात व त्या गोळ्यांवर दाब देऊन त्यांना चपटे करून मग त्याचे क्यूब्ज करता येतात....!!!
http://elekhni.com/2008/06/the-easy-way-make-paneer-from-cottage-cheese/
पण मला तरी ती मेथड ट्रिकी वाटतेय...
त्यापेक्षा जे कॉटेज चीझ आहे ते पंच्यात घट्ट बांधून त्यामधील जास्तीचे पाणी काढून टाकायचा प्रयत्न केल्यास कदाचित त्याचे तुकडे करता येतील : http://www.buzzle.com/articles/how-to-make-cottage-cheese.html
<< How to Make Cheese Cubes
When making cottage cheese people tend to aim for the crumbly soft texture. However, you can also create cubes of cottage cheese, and use it to make delicious paneer curries or use small cheese cubes in salads.
When you are about to drain the cheese, use a cheesecloth to drain water.
Tie the cloth tightly around the cheese, and place something heavy on it.
Let the cheese settle down for about 20 - 30 minutes.
Carefully remove the cloth and put the cottage cheese in a dish.
Dip a knife in hot water and cut the cheese in any shape you like.
>>
माझी (अ)ज्ञान - मौक्तिके आता आवरती घेते. प्रयोग करून बघ आणि काय होतंय ते सांग इथे!
तोवर कोणी जाणकारांनी अनुभवाचे चार बोल इथे सांगितले तर फारच बरे!! 
आंब्याच्या शिर्याची रेसिपी
आंब्याच्या शिर्याची रेसिपी हवी आहे. लिंक देवु शकाल का?
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/16026
धन्स अकु. आज करुन पाहाते.
धन्स अकु. आज करुन पाहाते.
Pages