उपवासाची पौष्टिक न्यॉकी/न्योकी आणि कोथिंबीर पेस्टो (फोटोसहित)

Submitted by लाजो on 29 July, 2012 - 22:18
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

न्यॉकी/न्योकी साठी :

स्वीट पोटॅटो / भोपळा किंवा बटाटे / रताळी यातिल काहिही किंवा सर्व
शिंगाड्याचे पिठ/ उपवासाची भाजणी / वरीचे पिठ
चविला मिठ
जीरे पावड ऐच्छिक

सोबत: पुढिलपैकी कहिही ऐच्छिक

दही (तिखट -मिठ किंवा हिरवी मिरची - मिठ घालुन, किंवा गोड दही)
साजुक तुप
चोचवलेली काकडी

किंवा

कोथिंबीर पेस्टो :

कोथिंबीर - धुवुन आणि चिरुन
काजु - थोडावेळ गरम पाण्यात भिजवुन
लाल सुक्या मिरच्या - थोडावेळ गरम पाण्यात भिजवुन
आल्याचा तुकडा
थोडासा लिंबाचा रस
जिरे - भरडुन किंवा पावडर
चवीला मिठ, साखर
तेल (मी ऑऑ वापरले - उपवासाला चालते का ते माहित नाही)

क्रमवार पाककृती: 

मागे मी बटाट्याच्या न्यॉकी / न्योकी ची पाककृती दिली होती.

काल खुप दिवसांनंतर परत न्यॉकी केली. घरात स्वीट पोटॅटो होता म्हणून म्हंटलं त्याची पण न्यॉकी करुन बघु. मग विचार केला उपवासाची न्यॉकी केली तर??? आणि मग करुनच बघितली Happy

जे नेहमी उपवास करत असतिल त्यांच्यासाठी अजुन एक छान पौष्टिक पदार्थ Happy

spg08.JPG

*****
क्रमवार कृती:

१. स्वीट पोटॅटो / भोपळा किंवा बटाटे / रताळी यातिल काहिही किंवा सर्व उकडुन / रोस्ट करुन घ्या. थंड झाल्यावर साले काढुन पोटॅटो मॅशरने मॅश करा किंवा किसणीवर किसुन घ्या. तुकडे / गुठळ्या राहु देऊ नका.

२. यात चवीला मिठ आणि जिरेपुड घालुन घ्या नीट मळा.

३. मिश्रणात आता शिंगाड्याचे पिठ / उपवासाची भाजणी / वरीचे पिठ घाला. पिठ घालताना एका वेळेस थोडे थोडे घाला - अगदी जस्ट सगळं मिश्रण एकत्र येऊन मऊ गोळा होण्याइतपतच. हे मिश्रण हलकेच मळुन घ्या. त्याचे २-४ भाग करा.

४. ओट्यावर थोडे पिठ भुरभुरवुन त्यावर एक भाग अगदी हलके मळुन त्याची अंगठ्याऐवढी जाड (साधारण दीड सेमी व्यासाची) सुरनळी बनवा (गोळा रोल करा). सुरीच्या पात्याला पिठ लावुन या सुरनळीचे इंच रुंदीचे तुकडे करा.

spg01.JPG

५. एका पिठ भुरभुरवलेल्या ट्रे मधे हे तुकडे वेगवेगळे मांडुन ठेवा. एकावर एक ठेवलेत तर चिकटतिल. उरलेल्या गोळ्यांच्या अश्याच सुरनळ्या करुन तुकडे करुन घ्या.

spg02.JPG

६. एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळायला ठेवा. उकळत्या पाण्यात न्यॉकीचे गोळे एकावेळेस थोडे थोडे घाला...गोळे एकाच लेयर मधे असायला हवेत.. एकावर एक आले तर चिकटतिल. न्यॉकी आधी तळाला बसतिल पण लगेच मिनीटभरात पाण्यावर तरंगायला लागतिल. तरंगायला लागताच न्यॉकी चाळणीवर काढुन घ्या.

spg03.JPG

७. गरम गरम न्यॉकी खा. किंवा नॉनस्टीक पॅनवर किंचित साजुक तूप टाकुन खरपूस परतुन घ्या. किंवा तुम्हाला आवडेल तशी दह्या बरोबर, ककडी बरोबर खा Happy

spg04.JPGspg05.JPG

मी कोथिंबीर पेस्टो बरोबर खल्ली Happy

spg06.JPGकोथिंबीर पेस्टो:

८. चिरलेली कोथिंबीर, भिजलेले काजु आणि लाल मिरच्या, आल्याचा तुकडा, लिंबाचा रस, मिठ, साखर, जिरे मिक्सर / चटणी ग्राईंडर मधे टाका. थोडे तेल घालुन भरड वाटुन घ्या आणि न्यॉकी बरोबर खा Happy नुसताच खायला पण मस्त लागतो हा पेस्टो Happy

spgcp.JPG

वाढणी/प्रमाण: 
खाल त्याप्रमाणे - सोबत दही घेतल्यास एक बोलभर खल्ल्यावर पोट भरेल :)
अधिक टिपा: 

१. स्वीट पोटॅटो / भोपळा यांना जास्त पानी असेल तर एखादा बटाटा कुस्करुन घालता येइल.

२. न्यॉकी उकडलेली असल्यामुळे बरिच पौष्टिक आहे Happy

३. न्यॉकी करताना मिठ / जिरे घातले नाही तर न्यॉकी गोड दही-साखर / दुध याबरोबर पण खाता येइल Happy

४. मी स्वीट पोटॅटो आणि वरी चे पिठ व थोडी उपवासाची भाजणी वापरली आहे. बटाट्याचे / साबुदाण्याचे पिठही वापरता येइल बहुतेक.

५. कोथिंबीर पेस्टो ऐवजी साधी कोथिंबीर-मिरची - नारळाची चटणी पण छानच लागेल.

६. या न्यॉक्या उपासासाठी करायच्या नसतिल तर उपासाच्या पिठांऐवजी मैदा वापरता येतो Happy

माहितीचा स्रोत: 
न्यॉकीची मूळ पाककृती आणि माझे प्रयोग :)
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाजो, नेहेमीप्रमाणेच कल्पकतेला प्रचंड दाद .. खुप मस्त दिसतेय न्योकी .. कोथीम्बीर पेस्तो मुद्दाम कनोली (मला नाव आठवत नाहीये नीट पण फूड नेटवर्क च्या शोज् मध्ये आईसक्रीम अशा शेपमध्ये ठेवतात प्लेट वर?) च्या आकारात ठेवला आहेस का प्लेटवर? फार छान ..

_/\_ Happy

छानच! आणि हे बॉइल्ड असल्याने चापून खायला हरकत नाही. नाहीतरी आपला उपास एकादशी दुप्पट खाशीच असतो.
लाजो............!

मस्त आहे. कोथिंबीर पेस्टोही आवडली. न्यॉकीमध्ये चवीला जिरं-मिरची वाटूनही घालता येईल. नक्कीच करून बघणार. Happy

सह्हीच आहे प्रकार. कालच मी साध्या न्यॉक्या करून बटर जाळून सॉटे केल्या होत्या. पाहुण्यांना खूपच आवडल्या. हा प्रकारही झक्कास दिसतोय. Happy

धन्यवाद सगळ्यांना Happy

हो सशल Happy

बॉइल्ड असल्याने चापून खायला हरकत नाही<<< हो Happy पण तूपात परतवुन घेतल्या तर मात्र........ Wink

मंजुडी, हो घालता येइल. फक्त बारीक पेस्ट करुन घे Happy

लाजो, तू मास्टरशेफ मध्ये भाग घे बरं! त्या डॅलविंडरच्या सोबतीने
>>>>>> ए खरच विचार कर ना ह्याचा. मस्त भारतीय टच पण देशील तू.

हे पण झकास!

बघ मी तुला म्हटलं मा शे मध्ये भाग घे! इथे पण सगळेजण तेच म्हणताहेत!

खरच आपण त्यांना (मा शे वाल्यांना) शाकाहारी पदार्थांसाठी वेगळा विभाग काढायला सांगु!

अरे व्वा, मस्तच दिसतोय हा प्रकार.
तळण्याचं काम नसल्याने करून बघू शकते.
लाजो, ते मास्टरशेफचं नक्की मनावर घेणे....

थँक्यु सगळ्यांना Happy

पण पाण्यातून काढल्यावर ते गिळगिळीत नाही होत का?<<< नाही होत... चाळणीत निथळुन घ्यायच्या... माझ्या दिसतायत का गिळगिळीत???

खरच आपण त्यांना (मा शे वाल्यांना) शाकाहारी पदार्थांसाठी वेगळा विभाग काढायला सांगु!<<< अनु Happy मग नक्की विचारे करेन Happy

या न्यॉक्या उपासासाठी करायच्या नसतिल तर उपासाच्या पिठांऐवजी मैदा वापरता येतो Happy

हे मला जमण्यासारखं आहे. करून रिपोर्ट देईन नक्की>> -पौर्णिमा + १
माझी नणंद प्रचंड चविष्ट अन चमचमीत शिन्गाड्याच्या पिठाची थालिपिठं उपासाला (?!) करते ती आठवली. शिंगाड्याचं पीठ + मॅशड बटाटा +शेंगदाण्यांच कूट + बचकभर करकरीत हिरव्या मिरच्यांचा ठेचा ! सुखद जाळपोळ जिभेची.
इथे पाण्यात उकळणं अभिनव अन हेल्दी वाटलं.

लाजो....... ________________/\_____________________

ब्येस्ट Happy

Pages