पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20

या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ब्रेडच्या उरलेल्या कडांच काय करायच तेच सुचत नाही>>>> त्याच्या इडल्या बनवता येतील.कडा पाव कप,रवा एक कप,दही एक कप,आले,मिरच्या,चिमूटभर सोडा घालून वर फोडणी देउन मिश्रण १० मिनिटे ठेऊन इडल्या करायच्या.

ब्रेडच्या कडा मिक्सरमधून बारीक करून घ्यायच्या व गरम दूध + साखर घालून खायच्या. किंवा फोडणीत घालून त्यांचा ब्रेडचा उपमा बनवायचा. कटलेट, टिक्कीत देखील सारणात भर म्हणून वापरता येतात. किंवा या ब्रेड कडांच्या चुर्‍यात घोळवून शॅलो फ्राय करता येण्यासारखे बरेच पदार्थ आहेत.

माझ्याकडे त्या लांबुडक्या पांढरट मिरच्या पडल्यात (गोव्यात बहुतेक याच मिरच्यांची भजी देतात उसळपावाबरोबर) हालापिनो सारख्या तिखट नाहीयेत. तश्या माइल्डच आहेत. त्यांचं हालापिनो नगेटस/ बाइटस, स्टफ्ड हालापिनो सारखं काही करता येईल का?
मावे बंद आहे त्यामुळे बस गॅसकाही सहारा है!

गोष्टीच्या पुस्तकात (शामची आई) `मुळ्याच्या शेंगा घालून वांग्याची भाजी' असा उल्लेख वाचला. त्याची रेसिपी माहिती आहे का कोणाला ?

नीधप, त्यात उकडलेल्या बटाट्याचे / बेसनाचे सारण भरुन परतता येतील.

रावी, त्या काळातली ब्राम्हणी भाजी म्हणजे ओल्या मिरच्या / खोबरे / तीळकूट / गूळ अशीच असणार.

वत्सला, मला वाटते यासाठी मिक्सर ब्लेंडर वापरण्यापेक्षा, एका ग्लासातून ऊंचावरुन दुसर्‍या ग्लासात ओतायचा प्रयोग केला तर जास्त चांगले. असे केल्याने फेस येईल पण क्रीम वेगळे होणार नाही.

वडापाव किंवा ढोकळ्याबरोबर ज्या देठासकट मिरच्या देतात ना त्याची रेसिपी आहे का इथे?? त्या खूप तिखट नसतात पण साध्या हिरव्या मिरच्याच वापरलेल्या आहेत असं वाटतं. त्या चिरून, बिया काढून, वाफवून, फोडणीत टाकायच्या का?

आख्या हिरव्या मिरच्या तळायच्या. तेल निथळून गार झाल्या की त्यावर मीठ घालायचं असं परवाच कुठे तरी वाचलं.

त्या मिरच्या अर्ध्या लेंग्थ वाइज कापून ताकात मीठ टाकून भिजिवतात. मग तळतात. फॉर दॅट आंबट तिखट यम्मिलिशस टेस्ट.

त्यात उकडलेल्या बटाट्याचे / बेसनाचे सारण भरुन परतता येतील<<
ह्म्म करून बघते

त्या मिरच्या अर्ध्या लेंग्थ वाइज कापून ताकात मीठ टाकून भिजिवतात. मग तळतात. फॉर दॅट आंबट तिखट यम्मिलिशस टेस्ट. <<
कल्पनेनेच तोंपासु...
ताकात किती वेळ ठेवायच्या?

दिपा, मिळाली कुठे कृती - मीच काढली चित्र Happy
बरं ही घे लिंक. बघ आता जमतय का? : http://arati21.blogspot.in/2013/01/blog-post_22.html
इब्लीसजी मग कागदाचा फुगा पण येत असणार, बरोब्बर याच्या उलट, त्रिकोणी घडीचा Happy

मिरच्या तळताना अख्ख्या तळायच्या नाहीत, फुटून अंगावर उडतात. थोडी तरी चिर द्यायला हवी.

किती वेळ? मंजे बघा १५ मिनिटे? आणि आपल्या साध्या मिरच्या. जाड्या वगिअरे नाही. एक लेंग्थ वाइज कट द्यायचा. डिप फॉर १५ अँड फ्राय. ह्या मिरच्या छोले भटुरे बरोबर पण मस्त लागतात.

हो दिनेशदा... मी पण हेच सांगणार होते.

मिरच्या कधिहि अख्ख्या टाकु नयेत तेलात. माझ्या ओळखिच्या एका काकु आहेत. त्यांच्या डोळ्यात उडाली होती अशी मिरची Sad

वडापाव किंवा ढोकळ्याबरोबर ज्या देठासकट मिरच्या देतात ना त्याची रेसिपी आहे का इथे??
एका वाटीत पाणी घेऊन त्यात खाण्याचा सोडा घालायचा व त्यात हिरव्या (शक्यतो कोवळ्या) मिरच्यांचे पोट फाडून १०-१५ मि. टाकून ठेवायच्या. पाण्यातून बाहेर काढल्यावर मिरच्यांमधे जरासे मिठ भरायचे. एखाद्या भांड्यात एक चमचा तेल टाकून त्यात ह्या मिरच्या घालायच्या व झाकण ठेवून मंद आचेवर एक वाफ आणायची. अगदी कमी तेलात, कमी ठसक्यात व कमीत कमी वेळेत मिरच्या तयार.
सिंधुताईंची स्वयंपाक मधली आहे ही कृती. मी नेहमी ह्याच पद्धतीने करते मिरच्या.

धन्यवाद नलिनी. तुझी कृती सोपी वाटतेय आणि मुख्य म्हणजे तळणं नाही. मला पण त्या मिरच्या वाफवलेल्याच वाटतात. पण थोड्या तेलात परतून वाफवणे जास्त बरे.

बेडगि रंगासाठी आणि शंकेश्वरी तिखट.>>>>> धन्यवाद सोनाली

बेडगि प्लेन आणि शंकेश्वरी स्प्रींग सारखि असते ना Uhoh

इब्लिस, हो हो हाच Happy
झालं आता मला हंस करून दाखवणं आलं Proud
दिपा, तू, मी, इब्लिस यांना हाकलणार बहुदा इथून Wink

दीपा, इब्लिस, अवल, आपापल्या विपूत हस्तकलेच्या गप्पा मारा. हा धागा पाककृतींसाठी आहे Proud

इब्लिस
मी किती दिवसापासून कसा करायचा कागदाचा फुगा ते आठवत होते.
झालं आता मला हंस करून दाखवणं आलं >> +१

दीपा, इब्लिस, अवल, आपापल्या विपूत हस्तकलेच्या गप्पा मारा. हा धागा पाककृतींसाठी आहे
>>>
अर्र्र्र्र्र्र्र्र.. मी पण म्हणजे!

Pages