हिन्दुस्तानी शास्त्रोक्तं संगीताचा उगम कुठे आणि कसा झाला?
माझ्या वाचण्यात आलेल्यापैकी काही theories खालील प्रमाणे:
Theory क्र. १) हिन्दुस्तानी शास्त्रोक्तं संगीत हे पर्शियन म्हणजे इराणी संगीतातून निघालयं. साधारण बाराव्या शतकात हे संगीत भारतात आलं आणि त्या नंतर काही महान विभूतिंनी (उदा. तानसेन इत्यादि) त्या संगीताला वेगवेगळी स्वरूपं दिली जसे खयाल, ध्रुपद, ठुमरी, कजरी, टप्पा इ.
Theory क्र. २) ही theory आपल्याला पार पुरातन काळात घेऊन जाते. ब्रम्ह्ना, हनुमान, शिव आणि क्रुष्ण ह्या देवादिकांनी चार 'मत' स्थापन केले. इथे 'मत' चा अर्थं 'मती' किंवा 'बुद्धी' असा घ्यावा.
ब्रम्हा-मत पासून खायाल गायन निघाले.
हनुमान-मत पासून ध्रुपद गायकी उत्पन्न झाली.
क्रुष्ण-मत पासून ठुमरी, कजरी इ. निघाले.
शिव-मत ...??? [ sorry , मला ह्या बद्दल फ़ारसं माहीत नाही].
इथून पुढे ह्या सर्वं गायकी प्रचलित झाल्या.
Theory क्र. ३) नारद मुनींनी गायन विद्या ही स्वर्गातून प्रुथ्विलोकांत आणली. अथर्वंवेदाचा पाठ हा हिन्दुस्तानी शास्त्रोक्तं संगीताच्या स्वरांमध्ये केल्या जातो. वेदांचं पठण होऊ लागल्यापासून हे संगीत प्रचलित झालं. हा झाला mythology चा भाग. परंतु ह्या मागील व्यावहारिक संदेश काय असेल?
ह्यातली कुठली theory खरी मानायची, आणि कितपत खरी मानायची?
ह्यावर कुणि प्रकाश टाकू शकेल काय? वरील माहिती दुरुस्तं करावयाची असल्यास जरूर करावी.
हा प्रश्न rakhalb यानी विचारला होता.
दाद, तुमच्या कडे देण्याजोगे
दाद, तुमच्या कडे देण्याजोगे खुप खुप आहे.
तुम्ही तर लिहाच, पण कार्यशाळेचाही नक्की विचार करा.
माझा नं पयला!
प्रश्न - १ राग मालकंस थाट :
प्रश्न - १
राग मालकंस
थाट : भैरवी (म्हणजे रे् ग् ध् नी् कोमल असलेले राग)
आरोह : सा ग् म ध् नी् सां
अवरोह : सां नी् ध् म ग् सा
प्रश्न :
थाट आसावरी ( ग् ध् नी् कोमल असलेले राग)
मालकंस मधे ग् ध् नी् कोमल आहेत व रे वर्ज आहे.
मग मालकंस राग हा भैरवी थाट का मानला जातो आसावरी थाट का नाही?.
अगो, सुरेख पोस्ट्स.
अगो, सुरेख पोस्ट्स.
अनिलभाई डेंजरस आहेत
अनिलभाई डेंजरस आहेत
माझ्याकडे, भेटवण्यासारखं खूप
माझ्याकडे, भेटवण्यासारखं खूप आहे. देण्यासारखं (शिकवण्यासारखं) काहीही नाही. मला कडकडून भेटलेले सगळे क्षण मी भेटवायचा प्रयत्नं करेन. त्यातून शिकण्यासारखं काही असेल असं वाटत नाही. पण आयुष्यं लखलखीत उजळणारे हे क्षण ... मोठी उबदार सोबत करतात.... करतील.
असो...
< रे् ग् ध् नी्> रे आणि नी चा
< रे् ग् ध् नी्>
रे आणि नी चा पाय कसा मोडला?
अनिलभाई डेंजरस आहेत >> +१
अनिलभाई डेंजरस आहेत >> +१
भातखंडेंनी मालकंस भैरवी थाटात का घेतला असावा? ह्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
कोमल धैवताची श्रुती वेगळी असावी का भैरवी आणि असावरी थाटात? आणि ते कारण असावं का?
कारण मालकंसातला कोमन निषाद आणि भीमपलासमधला कोमल निषाद हेही थोडे वेगळे आहेत (असं ऐकलंय इतकंच... प्रत्यक्षात तो फरक काही झेपलेला नाहिये
)
राग मालकंस थाट : भैरवी
राग मालकंस
थाट : भैरवी (म्हणजे रे् ग् ध् नी् कोमल असलेले राग)
आरोह : सा ग् म ध् नी् सां
अवरोह : सां नी् ध् म ग् सा
प्रश्न :
थाट आसावरी ( ग् ध् नी् कोमल असलेले राग)
मालकंस मधे ग् ध् नी् कोमल आहेत व रे वर्ज आहे.
मग मालकंस राग हा भैरवी थाट का मानला जातो आसावरी थाट का नाही?.
भाईंच्या प्रश्नाचे आजोबांनी दिलेले उत्तर..
मालकंस मध्ये शुद्ध रे नाही. आसावरी थाटामध्ये ग् ध् नी् कोमल बरोबरच शुद्ध रे सुद्धा येतो.. त्यामुळे मालकंसचा समावेश आसावरी थाटात न करता भैरवी थाटात केलेला आहे.
>>आसावरी थाटामध्ये ग् ध् नी्
>>आसावरी थाटामध्ये ग् ध् नी् कोमल बरोबरच शुद्ध रे सुद्धा येतो..
ओह, म्हणूनच 'कोमल रिषभ आसावरी' असा वेगळाच राग आहे का?
धन्यवाद हिम्सकुल
कोमल रिषभ आसावरी हा आसावरी
कोमल रिषभ आसावरी हा आसावरी थाटातच येतो. पण त्यात रे कोमल असतो.. जो आसावरी मध्ये शुद्ध असतो.
उत्तर हिंदुस्थानी मध्ये १० थाट मानले गेले आहेत. आणि प्रत्येक थाटात सगळे सूर असतातच.. संपूर्ण आरोह म्हणजे एक थाट.
कर्नाटक मध्ये ७२ थाट आहेत. कारण सगळे पूर्णतः गणिती अंगाने ठरवलेले आहे. उत्तर हिंदुस्थानीत श्रवणीयतेला महत्व जास्त दिल्याने जे कानाला ऐकायला मधुर असतील असेच थाट तसे राग सुद्धा केलेले आहेत.
उत्तर हिंदुस्थानी थाट पुढील
उत्तर हिंदुस्थानी थाट पुढील प्रमाणे.
१. बिलावल - सा रे ग म प ध नी
२. कल्याण - सा रे ग म प ध नी
३. खमाज - सा रे ग म प ध नी
४. काफी - सा रे ग म प ध नी
५. भैरव - सा रे ग म प ध नी
६. मारवा - सा रे ग म प ध नी
७. आसावरी - सा रे ग म प ध नी
८. पूर्वी - सा रे ग म प ध नी
९. भैरवी - सा रे ग म प ध नी
१०. तोडी - सा रे ग म प ध नी
बोल्ड अक्षरांत कोमल आणि तीव्र सूर..
हिम्सकुल, धन्यवाद. पुनश्च एक
हिम्सकुल,
धन्यवाद.
पुनश्च एक शंका.
भूप रागाचे सगळे स्वर शुद्ध असूनही तो बिलावल थाटात न येता कल्याण थाटात येतो, त्याचे काय कारण असावे?
भूप रागाचे सगळे स्वर शुद्ध
भूप रागाचे सगळे स्वर शुद्ध असूनही तो बिलावल थाटात न येता कल्याण थाटात येतो, त्याचे काय कारण असावे?>>
हे भातखंडे गुरुजींनाच विचारायला पाहिजे.. (प्रत्यक्ष उत्तर घरी गेल्यावर आजोबांना विचारुन सांगतो)
मालकंस मध्ये शुद्ध रे नाही.
मालकंस मध्ये शुद्ध रे नाही. आसावरी थाटामध्ये ग् ध् नी् कोमल बरोबरच शुद्ध रे सुद्धा येतो.. त्यामुळे मालकंसचा समावेश आसावरी थाटात न करता भैरवी थाटात केलेला आहे.>>>>>> भैरवी मधे पण शुद्ध, कोमल दोन्ही रीषभ येतात च की.
थाटांचा हा गोंधळ बर्याच रागांसाठी आहे. वेगवेग़ळ्या पुस्तकात वेगवेगळे थाट दिलेले असतात एकाच रागाचे.
मला स्वताला ह्या थाटांच्या वर्गीकरणाची गरज च वाटत नाही. कारण प्रत्येक थाटाचे असे काही वेगळे नियम वगैरे नाहीयेत.
मस्तय हा धागा. शास्त्रीय
मस्तय हा धागा. शास्त्रीय संगित शिकत असताना पाठ केलेली सगळी थिअरी पुन्हा वाचताना मजा येतेय. मध्यमा प्रथम पर्यंत शिकले. त्या परिक्षेत थिअरीमुळे पास झाले हे लक्षात येऊन संगित शिक्षण सोडलं. भारतीय संगित क्षेत्र कधीच माझ्या ऋणातून मुक्त होणार नाही.
दोन वर्षापूर्वी एक लेखमाला
दोन वर्षापूर्वी एक लेखमाला लिहायला सुरु केली होती.. ती आता पूर्ण करायला पाहिजे..
भाग १ - http://www.maayboli.com/node/18105
भाग २ - http://www.maayboli.com/node/18136
भाग ३ - http://www.maayboli.com/node/19086
भूप रागाचे सगळे स्वर शुद्ध
भूप रागाचे सगळे स्वर शुद्ध असूनही तो बिलावल थाटात न येता कल्याण थाटात येतो, त्याचे काय कारण असावे?>>>
चैतन्य,
राग भुपाली मधे तिव्र म व नि चे ट्चेस घेतले जातात. म्हणुन त्याला कल्याण थाट मानतात.
राग यमन मधुन तिव्र म व नी काढले की तो भुपाली होतो. चलन तसच आहे.
महाराष्ट्रात तर नुसते टचेस नाहीत तर तिव्र म क्लियरली दाखवला जातो.
पण इतर ठिकाणी नाही.
आता हे सुर संगम सिनेमतल हे गाण बघ
जावु तोरे कमल चरण पर वारी
ह्या गाण्यात तिव्र म क्लिअरली घेतलाय.
प म् ग रे ग ग -- सा रे ग
पण जेव्हा भुपेन हजारीका ने रुडाली मधे हे खालच गाण कंपोज केले तेव्हा ते त्यानी फक्त भुपालीचेच स्वर वापरले.
दिल हुं हुं करे घबराये, घन घम घम करे तरसाये
'जावु' हे कल्याणजी आनंदजी नी कंपोज केलय. ज्यांच फांउण्डेशन हे महाराष्ट्र होत.
हिम्सकूल, सही जवाब एकदम पटलं.
हिम्सकूल, सही जवाब एकदम पटलं. कोमल रिषभ आसावरीच उदाहरण देवून मालकंस भैरवी मध्ये आहे हे आणखी स्पष्ट झाले.
भूप --> कल्याण याचं अनिलभाई यांनी दिलेलं उत्तर मला पेटी शिकताना आमच्या गुरुजींनी दिलेलं आठवतंय.
तीव्र म चे टचेस छान वाटतात भूप मध्ये.
रे आणि नी चा पाय कसा
रे आणि नी चा पाय कसा मोडला?>>
भरत,
पाय मोडायला .h वापर. re.h ga.h dha.h ni.h
फारच उपयुक्त चर्चा चालू आहे.
फारच उपयुक्त चर्चा चालू आहे. खूप शिकायला मिळत आहे.
भूप कल्याणसारखा गातात. म्हणुन
भूप कल्याणसारखा गातात. म्हणुन कल्याण थाट.
भैरवीत शुद्ध रे अपवादाने लागतो. म्हणुन तो असावरी थाटात न ठेवता भैरवी थाटात आहे.
भैरवीत शुद्द रे च नव्हे तर सगळे बारा स्वर लावता येतात.
जाउ तोरे चरण. अगदी सुंदर
जाउ तोरे चरण.
अगदी सुंदर आहे.
काळ देहासी आला खाऊ ..
याच्यासारखे वाटले.
अनिलभाई, धन्यवादः) अजून नीट
अनिलभाई, धन्यवादः)
अजून नीट ऐकणं व्हायला हवं हे समजलंय
भूप जरी सहज दिसला तरी गायला/ वाजवायला अवघड आहे.
जरा तोल ढळला तर सहज 'शुद्ध कल्याण' मध्ये घुसतो माणुस.
कर्नाटक मध्ये ७२ थाट आहेत.
कर्नाटक मध्ये ७२ थाट आहेत. <<< अबब!
थाट परिचय. थाट कसे बनले आहेत
थाट परिचय.
थाट कसे बनले आहेत ते पाहुया.
सा रे ग म प ध नि सां
ह्या पैकी सा रे ग म ह्याला पुर्वार्ध म्हणतात
प ध नि सां हा उत्तरार्ध.
आता पुर्वार्ध सा रे ग म घ्या व ह्यात कोमल स्वर घेवुन किती कोंबीनेशन बनतात ती बघु
१. सा रे ग म
२. सा रे् ग म
३. सा रे ग् म
४. सा रे् ग् म
५. सा रे रे् म
६. सा ग ग् म
आता उत्तरार्ध प ध नि सां घेवुन
७. प ध नि सां
८ प ध् नि सां
९. प ध नि् सां
१० प ध् नि् सां
११. प ध ध् सां
१२ प नि नि् सां
आता प्रत्येक पुर्वाग घेवुन त्याता प्रत्येक उत्तरांग जोडला तर किती काँम्बिनेशन्स होतील ते पाहु.
जसे नंबर १ बरोबर ७, ८, ९, १०, ११ आणि १२ जोडले तर ६ काँम्बिनेशन्स होतील.
नंबर २ बरोबर ७, ८, ९, १०, ११ आणि १२ जोडले तर ६ काँम्बिनेशन्स होतील.
वगैरे. वगैरे..
जसे
सा रे ग म प ध नि सां
सा रे ग म प ध् नि सां
सा रे ग म प ध नि् सां
वगैरे..
अश्या प्रकारे ६ X ६ = ३६ काँम्बिनेशन्स होतील.
आता हि सर्व काँम्बिनेशन्स शुद्ध म घेवुन आहेत.
अशीच ३६ काँम्बिनेशन्स तिव्र म घेवुन होतील.
म्हणजे सर्व मिळुन ७२ काँम्बिनेशन्स होतील.
आता कुठला ही राग घेतला की तो ह्या ७२ काँम्बिनेशन्स पैकी कोणत्या तरी एका काँम्बिनेशन्स मधे असेल.
म्हणुन सगळे मिळुन ७२ थाट होतात.
त्या पैकी हिंदुस्थानी संगितात फक्त १० थाट घेतले आहेत व सर्व रागांची ह्या १० थाटात विभागणी केली आहे.
त्यामुळे बर्याच वेळा थाटाचा गोंधळ होतो.
हा धागा पुन्हा अतितांत्रिक
हा धागा पुन्हा अतितांत्रिक होत चालला आहे.त्यामुळे माझ्यासारख्या संगीताबद्दल उत्सुकता असणार्या पण त॑ंत्र न कळणार्याची पुन्हा गोची होत आहे. आश्चर्य म्हणजे सिद्धार्थ सलाथिया या पॉप गायकाने त्याच्या यू ट्यूबवरील शास्त्रीय संगीतावरच्या ट्युटोरियल मधून मला थोडे तंत्र कळू शकले. बाकी इतर श्रेश्ठांनी टाकलेल्या डेमोत तुम्हाला काही बेसिक गोष्ती ज्ञात आहेत असे समजूनच क्लिप्स टाकल्या आहेत
अनिलभाई, ७२चे गणित एकदम सोपे
अनिलभाई, ७२चे गणित एकदम सोपे करून सांगितलेत.
रॉबीनहूड, ती माहिती गणितातील कॉम्बिनेशन आहे समजून वाचा लगेच समजेल. शेवटी ७२ का १० हा मुद्दा तांत्रिक आहेच, तो वगळून संगीताचा आनंद तितकाच घेता येईलच, पण हे पण समजून घेतलंत तर कदाचित आणखी मजा येईल पुढच्यावेळी ऐकताना/ म्हणताना/ वाजवताना.
रॉहू, शास्त्रीय संगीत ही
रॉहू, शास्त्रीय संगीत ही गणितात बांधलेली कला आहे.. सुरुवातीचा विस्तार सोडल्यास पुढे सगळा गणिताचाच खेळ चालतो..
वरती अनिल भाईंनी लिहिलेले वाचून तुम्हाला अतितांत्रिक वाटत असेल कदाचित पण तसे नाहीये.. हे बेसिक तंत्र आहे.. प्रत्यक्ष सादरीकरणात ह्या गोष्टी विचारात घेतल्या तरच त्यात्या रागाची कल्पना नीट मांडता येते..
भाई.. एकदम बरोबर पण थाट बनवताना त्यात एकच स्वर दोनदा धरत नाहीत.. त्यामुळे तुम्ही लिहिलेल्या प्रकारातील ५, ६, ११, १२ येणार नाहीत..
दक्षिणेकडे हे सगळे धरतात.. आणि त्यामुळे ते ७२ थाट मानतात..
रॉबिनहूड, शास्त्रीय
रॉबिनहूड,
शास्त्रीय संगीताविषयीचा धागा थोडा का होई ना तांत्रिक होणारच हो.
एखादे पियानोचे अँड्रॉईड अॅप घ्या आणि मोबाईलवर वाजवून बघा. मग तितकं क्लिष्ट वाटणार नाही कदाचित.
स्वर, त्यांचे कोमल/ तीव्र हे प्रकार नुसते लिहिलेले वाचून समजण्याजोगे नाहीत हो.
अवांतर-
तुम्ही पुण्यात असता का?
माधव यांनी कार्यशाळेचा विषय काढला आहे.
कार्यशाळा हा जरा अवजड शब्द आहे. कार्यशाळेपेक्षा, संगीताचा आस्वाद घेणारा एखादा ग्रूप (प्रत्यक्ष भेटणारा) तयार करायचा विचार आहे. महिन्यातून एखादा दिवस एकत्र जमून आस्वाद घ्यायचा आणि आधी/ नंतर थोडं विश्लेषण.
इथे संगीताची आवड असणं हा मुख्य क्रायटेरिया धरून सुरुवातीला अगदी बेसिकपासून सुरुवात करू शकतो.
शिकवणी अशी नाही, पण एकमेकांना माहिती असलेलं सगळ्यांबरोबर वाटून संगीताचा आनंद + ज्ञानात भर असं होऊ शकतं.
बोला आहात का तयार? पुण्यातले कोण कोण तयार आहेत?
समोरच्या गाणार्याचा ठहराव
समोरच्या गाणार्याचा ठहराव अमुक एक स्वरावर आहे हे कसे कळते ? कारण जो काही स्वर येत असतो तो त्याच्या पट्टीच्या सापेक्ष कुठेतरी असणारम्ना? उदा. कोमल गंधार लावला आहे , असे?
Pages