शास्त्रीय संगीत प्रश्नोत्तरे

Submitted by webmaster on 9 June, 2008 - 21:35

हिन्दुस्तानी शास्त्रोक्तं संगीताचा उगम कुठे आणि कसा झाला?

माझ्या वाचण्यात आलेल्यापैकी काही theories खालील प्रमाणे:

Theory क्र. १) हिन्दुस्तानी शास्त्रोक्तं संगीत हे पर्शियन म्हणजे इराणी संगीतातून निघालयं. साधारण बाराव्या शतकात हे संगीत भारतात आलं आणि त्या नंतर काही महान विभूतिंनी (उदा. तानसेन इत्यादि) त्या संगीताला वेगवेगळी स्वरूपं दिली जसे खयाल, ध्रुपद, ठुमरी, कजरी, टप्पा इ.

Theory क्र. २) ही theory आपल्याला पार पुरातन काळात घेऊन जाते. ब्रम्ह्ना, हनुमान, शिव आणि क्रुष्ण ह्या देवादिकांनी चार 'मत' स्थापन केले. इथे 'मत' चा अर्थं 'मती' किंवा 'बुद्धी' असा घ्यावा.
ब्रम्हा-मत पासून खायाल गायन निघाले.
हनुमान-मत पासून ध्रुपद गायकी उत्पन्न झाली.
क्रुष्ण-मत पासून ठुमरी, कजरी इ. निघाले.
शिव-मत ...??? [ sorry , मला ह्या बद्दल फ़ारसं माहीत नाही].

इथून पुढे ह्या सर्वं गायकी प्रचलित झाल्या.

Theory क्र. ३) नारद मुनींनी गायन विद्या ही स्वर्गातून प्रुथ्विलोकांत आणली. अथर्वंवेदाचा पाठ हा हिन्दुस्तानी शास्त्रोक्तं संगीताच्या स्वरांमध्ये केल्या जातो. वेदांचं पठण होऊ लागल्यापासून हे संगीत प्रचलित झालं. हा झाला mythology चा भाग. परंतु ह्या मागील व्यावहारिक संदेश काय असेल?

ह्यातली कुठली theory खरी मानायची, आणि कितपत खरी मानायची?

ह्यावर कुणि प्रकाश टाकू शकेल काय? वरील माहिती दुरुस्तं करावयाची असल्यास जरूर करावी.

हा प्रश्न rakhalb यानी विचारला होता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनिलभाई, हरी भजनाविण काळ घालवु नको रे हे सोहनी रागात बांधलेय असं कुठेसं वाचल्याच आठवतय. ऐकताना पण सोहनीच वाटतो . जरा खात्री करुन सांगाल का प्लीज?

स्काईप वर मी सुद्धा यायला तयार आहे... आपल्या वेळा भयानक वेगवेगळ्या (भारत, सिडनी) असणारेत. पण जमेल तितक्या वेळा येईनच. खरच मजा येईल. खूप शेअर करायचय. ते सगळं लिहिणं कित्ती कठीण आणि काही काही बाबतीत तर अशक्यच. उदा. अख्तरीबाईनी केलेली तालाची गंमत Happy

मागे पण एकदा विचारलं होतं. आता परत विचारतो. ़़किशोरीताई लूर सारंग या नावाने जी रचना गातात रसियो बुलाये अशी त्याचे पुर्ण बोल माहितीये का?

<<त्याला रंजकता तानसेनाने आणली - ख्याल गायकी आणुन
>>
??
amir khusro!

Specific frequencies decide 'sur' or note.. there are in-between frequencies that are detectable or playable ( by experts) that are shruti's..

उस्ताद दिलशाद खान ( परवीन सुलताना यांचे पती ), यांचे गायन कुणी ऐकलय? मेन म्हणजे कुणाला आवडलय का? मी ऐकलं आणि आजिबात आवडलं नाही, कारण ताना इतक्या फास्ट आहेत की आऊट ऑफ ट्युन वाटल्या. म्हणजे, मी एका धाग्यात सुनंदा पटनाईक यांचा जयजयवंती डकवलाय, त्यांच्या पण ताना फास्ट आहेत, पण आऊट ऑफ ट्युन नाहीत वाटल्या. त्यामुळे माझ्या ऐकण्यात काही चुकलं का अशी भिती वाटतीय. जाणकारांनी प्रकाश पाडावा!

कुलु, मला त्यांच्या अति द्रुत ताना गुळण्या केल्यासारख्या वाटतात Happy मी कोणी थोर समिक्षक नाही, पण असेच वाटले ऐकताना. त्यांनी म्हणे परविनबाईंशी लग्न करण्यासाठी हिंदु धर्म बदलला.

गुळण्या Rofl खरंय पण अगदी. खरं सांगायचं तर त्यांची न परवीन बाईंची जुगलबंदी ऐकताना, पण परवीनबाईं सांगितिक द्रुष्ट्या प्रगल्भ वाटतात. आणि त्यांची एकीकडे मुलाखत ऐकताना ते म्हणाले की त्यांचा आवाज म्हणे पाच सप्तकात फिरतो. Uhoh हे खरंच शक्यय का ? कारण मुळात अतितार सप्तकच इतक compressed आणि टोकेरी आहे की त्याच्या वरच्या सप्तकाची कल्पना करवत नाही. त्याच मुलाखतीत ते असं पण म्हटले की त्यानी ५०० पेक्षा जास्त राग तयार केले म्हणे! Uhoh
परत एकदा म्हटले की "आम्हीच फक्त आकारत गातो जे लोकाना पटत नाही", पण मग आपलं जयपुर घराणं तर सगळं आकारातच आहे की पहिल्यापासुन. त्यांचे हे सगळे विचार विचित्र वाटले, शिवाय त्यांचा गाणं पण काही आवडलं नाही. त्यामुळे त्यांच्याविषयी माझं मत जर नकारात्मक आहे. Sad

त्याचा संगीताच्या दर्जाशी काय संबंध? Uhoh >>>> अनुमोदन! सुमेधाजी वाईट वाटुन नका घेऊ पण कलाकाराच्या खाजगी गोष्टीबद्दल नको बोलायला.

कुलू,
त्यांचे गायन मलाही फारसे आवडले नाही.
पण कुमार म्हणायचे तसं,
"जे डोक्यात आहे ते गळ्यातून यायला हवं." हे काही थोडक्याच कलावंतांच्या बाबतीत सातत्यानं घडतं.
इतरांच्या बाबतीत १० मधल्या ४-५ वेळाच घडत असावं.
परवीन सुलताना यांचा जो हंसध्वनीमधला प्रसिद्ध तराणा आहे तो दिलशाद खाँसाहेबांनी बांधलेला आहे.
त्यावरून अंदाज बांधला तर सांगीतिक समज/ प्रगल्भता तितकीही कमी नसावी.
परवीन सुलताना त्यांच्याकडे शिकल्या आहेत. त्यामुळे असं म्हणू शकतो की दिलशात खाँसाहेबांचे विचार त्या गळ्यातून उतरवू शकतात.

(अर्थात- आजकाल परवीन सुलतानाही जे गातात, ते कधी कधी पाट्या टाकल्यासारखं वाटतं. वैयक्तिक मत. कुणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नाही.)

रॉ हू. व कुलू , संगीताच्या दरजाशी धर्माचा काहीही संबंध नाही पण मला समजले तेव्हा थोडा धक्का बसला म्हणून लिहिले, अवांतर माहीती समजा.

र्थात- आजकाल परवीन सुलतानाही जे गातात, ते कधी कधी पाट्या टाकल्यासारखं वाटतं.>>>>> अगदी अगदी. त्यांच ते दोन सप्तकात तान रीपीट करायची पद्धत छान वाटायची पण हल्ली फक्त तेवढ्याच कारणासाठी गातात असं वाटतं. त्यांचे जुने रेकॉर्ड्स चांगले आहेत, जोग, गुजरी तोडी, नंदकंस, गोरख कल्याणचे.

परवीन सुलताना त्यांच्याकडे शिकल्या आहेत. त्यामुळे असं म्हणू शकतो की दिलशात खाँसाहेबांचे विचार त्या गळ्यातून उतरवू शकतात.>>>>>> पटलं अगदी!

संगीताच्या दरजाशी धर्माचा काहीही संबंध नाही पण मला समजले तेव्हा थोडा धक्का बसला>>>>> मला पण जेव्हा तुम्ही सांगितलं तेव्हा धक्क बसला खरंच. मी नेट वर चेक पण केलं.

पुर्वी बेगम परवीन सुलताना आणि दिलशाद हुसेन खान यांची एकत्र गायनाची कॅसेट होती. चांगले गायले होते दोघे.
मारवा रागातला तराणा होता त्यात. रागाला साजेसा हळूवार होता. पुढे ते फारसे एकत्र गायले नाहीत.
रझिया सुलतान चित्रपटात त्यांचे एकत्र गायलेले गाणे आहे आणि त्यावर गोपीकृष्णचा नाच आहे.

बेगम पुर्वी फारच सुंदर गायच्या. माझी त्यांची प्रत्यक्ष भेट झाली आहेत. त्या काळातही त्यांचे नाव होतेच पण तरीही त्या अत्यंत नम्र आहेत. ( एक हळुवार आठवण आहे त्यांची.. इथे अस्थानी वाटू नये. आमच्या कॉलेजात त्यांचा कार्यक्रम होता. मध्यंतरात मी त्यांना भेटलो व एक चीज गायची फर्माईश केली, त्यावर त्यांचे बोल होते " जरूर कोशिश करुंगी, वैसे मेरा आजका गाना पसंत तो आ रहा है ना बेटा ? " ... माझे वय १५ असेल त्यावेळी. माझ्याशी बोलताना एवढी नम्रता.. आजही ते वाक्य कानात गुंजते ) कुठल्याही सप्तकात गाताना त्यांचा चेहरा कायम हसरा असतो.

त्यांनी गायलेली काफी रागातली होरी, कैसी करी बरजोरी.. ऐकाच.

त्यांनी गायलेली फिल्मी गीते पण खासच आहेत ( बिछुरत मोसे कान्हा / देव पूजी पूजी / पितल की मेरी गागरी /
हमे तूमसे प्यार कितना... )

त्यांच्या आवाजात काही गझलाही मी ऐकल्यात.

दुष्मनोंमेभी कभी यार नजर आते है .. आणि.... मै हू तेरा बस इतना बता साकिया... असे मुखडे होते.

http://gaana.com/album/parveen-by-begum-parveen-sultana

परवीनबाईंचा रागेश्री....सुंदर आहे! जरूर ऐका !
( तरीही किशोरीताई आणि आणि निखिल बॅनर्जींच्या रागेश्री ला तोड नाही, असं माझं मत आहे! )

मला सुरुवातीला परवीन सुलताना बाईंचं गाणं अत्यंत सर्कस टाईप... मेलोड्रमटिकही वाटायचं.. अती तारसप्तकात तर गातायत की किंचाळतायत ते कळायचं नाही. अती द्रुत तानांमधे स्वर कळायचे नाहीत. त्यांना ऐकायचंच सोडलं होतं काही काळ.
मग लक्षात आलं की मी त्यांच्या प्रत्यक्षं मैफ़िली जास्तं ऐकल्यात. मग थोडं रेकॊर्डेड ऐकलं आणि त्यांचा ’विचार’ ऐकू येऊ लागला.
विचार "मांडणं" आणि विचार "ऐकवणं... सुनावणं" ह्यात फ़रक आहे. हे त्यांच्याच गाण्यामुळे ध्यानात येऊ लागलं.

कुमार, पंडितजी विचार मांडतात. पुन्हा पुन्हा मांडतात. एखाद्या अप्रतिम फ़ुलांच्या सजावटीसारखा. तो समोरच्याला उचलता येतो, निरखता येतो. झेपला तर सवे घेऊन जाता येतो.
नऊपस्तीसची बडाफ़ास्टसारखं कुणी गात असेल... किंवा काहीही करत असेल तर मलातरी झेपवताना नाकी नऊशे तरी येतात..

पंडितजींचं तरूणउमेदीच्या दिवसांतलं गाणं ऐकलं तर असं लक्षात येतं की... किती गाऊ असं झाल्यासारखं गायलेत. बंदिश-बिंदिश... शब्दं वगैरे आहेत... सूर ताल ह्यांना उभे रहाण्यापुरते... कधीकधी ते ही नसले तर बरच... ऐकणारा गुदमरेल असं गायलेत.
हळू हळू वादळ शांत होत गेल्यासारखे होत गेले ते.

गेल्या दोन-तीन वर्षांत बेगमसाहिबांचं ऐकलं नाहीये काही. ह्या चर्चेनंतर पुन्हा ऐकावं वाटू लागलय Happy

संगीतातल्या आवाजा इतकच मधल्या शांततेला महत्व आहे. गाण्यात थोडं मोठं झाल्यावर मला हे कळू लागलय. आवाजांच्या दुनियेत शांततेचा उपयोग आवाजापेक्षाही अधिक परिणामकारक करणारे फार फार थोडे कलाकार आहेत.
ह्याचा विचार करून दिलेलं संगीत, वाजवलेलं संगीत ह्यावर चर्चा व्हायला हवी...
(अगदिच अवांतरलिहिलय), मी)

कुमार, पंडितजी विचार मांडतात. पुन्हा पुन्हा मांडतात. एखाद्या अप्रतिम फ़ुलांच्या सजावटीसारखा. तो समोरच्याला उचलता येतो, निरखता येतो. झेपला तर सवे घेऊन जाता येतो.
नऊपस्तीसची बडाफ़ास्टसारखं कुणी गात असेल... किंवा काहीही करत असेल तर मलातरी झेपवताना नाकी नऊशे तरी येतात..

पंडितजींचं तरूणउमेदीच्या दिवसांतलं गाणं ऐकलं तर असं लक्षात येतं की... किती गाऊ असं झाल्यासारखं गायलेत. बंदिश-बिंदिश... शब्दं वगैरे आहेत... सूर ताल ह्यांना उभे रहाण्यापुरते... कधीकधी ते ही नसले तर बरच... ऐकणारा गुदमरेल असं गायलेत.
हळू हळू वादळ शांत होत गेल्यासारखे होत गेले ते. >

वाह! मी हे वाचतानाच एखाद्या गाण्यासारखे ऐकले. Happy

संगीतातल्या आवाजा इतकच मधल्या शांततेला महत्व आहे>>>> अगदी अगदी खरं. परवाचाच प्रसंग आहे, मी काफीतली गत वाजवत होतो सतारीवर थॉमसबरोबर (माझा सतार शिक्षक). आम्ही एकत्रच वाजवत होतो पण त्याचा न माझा वेगळा वाटत होतं. म्हणुन मी थांबलो आणि त्याला म्हटलं की "I am missing something". त्यानं खुप सुंदर उत्तर दिलं . तो म्हटला की, "You are missing the note of silence!"

गेल्या दोन-तीन वर्षांत बेगमसाहिबांचं ऐकलं नाहीये काही. ह्या चर्चेनंतर पुन्हा ऐकावं वाटू लागलय>>>>>> नक्की ऐका. त्यांच रागेश्री, जोग, गुजरी तर चांगलेच आहेत पण सारंग, हंसध्वनी, कलावती पण छान आहेत! Happy

डॉ. जब्बार पटेल यांनी केलेली, कुमार गंधर्वांवरची फिल्म बघितली का ?

http://www.youtube.com/watch?v=Fv4ynjy8m04

कुमारांचे लहानपणीचे दुर्मिळ रेकॉर्डींग आहे यात. सर्वच जण छान बोललेत आणि गायलेतही.
त्यांचे देवासचे घर, माळव्याचा परीसर, त्यांची शिकवणी.... सर्वच सुंदर आहे.

बेगम परवीन सुलताना यांचा जौनपुरी मधला तराणा कुठे मिळाला तर अवश्य ऐका.
नादीरे तादानी ताना दीम ताना देरे ना...यलली यलली याला लोम..

दिनेशदा,
कुमारांवरची डॉक्युमेंटरी मस्तच आहे. सुरुवातीला भुवनेशने गायलेला भीमपलासी कसा आहे ना सुंदर!
रणरणती दुपार नुकती कुठे संपत आलीये आणि त्यातलं अजूनही थोडं शिल्लक उरलेलं तापलेपण गाण्यात उतरलंय..आणि अनुतप्त भावानं गाणं चालू आहे.... 'इस जगत मे.... तुम बिन कौन....तुम गुरुदेव...."

होय होय... दिनेशदा... बघितलीये. अत्यंत सुरेख केलीये डॉक्युमेन्ट्री

रच्याकने... डिसेंबरमधे भारतात.. पुण्यात येतेय ७डिसेंबरची संध्याकाळ (रविवार) मोकळी आहे. भेटायचय कुणाला?

चैतन्य, दाद..
त्यात सत्यशील देशपांडे जसे बोलले आहेत ना तसे तूमच्या संगीतविषयक गटग मधे बोललात तर किती छान !
दुहेरी तान वगैरे प्रकार असे समजावल्याशिवाय कसे लक्षात येणार ?

अयगिरी नंदिनी हे गाणे साऊथच्या अनेक शिनेमात असते

ओरिजिनल संगीत दिगदर्शक कोण आहे ?

बैरागी भैरव च्या सुरात सगळ्या वरजन्स आहेत

AR rehman चीपण आहे म्हणे

रचना श्री शंकराचाऱयांची आहे

पण मूळ चाल पारंपारिक आहे की कुठल्या अर्वाचीन संगीतकाराची आहे ?

Pages