शास्त्रीय संगीत प्रश्नोत्तरे

Submitted by webmaster on 9 June, 2008 - 21:35

हिन्दुस्तानी शास्त्रोक्तं संगीताचा उगम कुठे आणि कसा झाला?

माझ्या वाचण्यात आलेल्यापैकी काही theories खालील प्रमाणे:

Theory क्र. १) हिन्दुस्तानी शास्त्रोक्तं संगीत हे पर्शियन म्हणजे इराणी संगीतातून निघालयं. साधारण बाराव्या शतकात हे संगीत भारतात आलं आणि त्या नंतर काही महान विभूतिंनी (उदा. तानसेन इत्यादि) त्या संगीताला वेगवेगळी स्वरूपं दिली जसे खयाल, ध्रुपद, ठुमरी, कजरी, टप्पा इ.

Theory क्र. २) ही theory आपल्याला पार पुरातन काळात घेऊन जाते. ब्रम्ह्ना, हनुमान, शिव आणि क्रुष्ण ह्या देवादिकांनी चार 'मत' स्थापन केले. इथे 'मत' चा अर्थं 'मती' किंवा 'बुद्धी' असा घ्यावा.
ब्रम्हा-मत पासून खायाल गायन निघाले.
हनुमान-मत पासून ध्रुपद गायकी उत्पन्न झाली.
क्रुष्ण-मत पासून ठुमरी, कजरी इ. निघाले.
शिव-मत ...??? [ sorry , मला ह्या बद्दल फ़ारसं माहीत नाही].

इथून पुढे ह्या सर्वं गायकी प्रचलित झाल्या.

Theory क्र. ३) नारद मुनींनी गायन विद्या ही स्वर्गातून प्रुथ्विलोकांत आणली. अथर्वंवेदाचा पाठ हा हिन्दुस्तानी शास्त्रोक्तं संगीताच्या स्वरांमध्ये केल्या जातो. वेदांचं पठण होऊ लागल्यापासून हे संगीत प्रचलित झालं. हा झाला mythology चा भाग. परंतु ह्या मागील व्यावहारिक संदेश काय असेल?

ह्यातली कुठली theory खरी मानायची, आणि कितपत खरी मानायची?

ह्यावर कुणि प्रकाश टाकू शकेल काय? वरील माहिती दुरुस्तं करावयाची असल्यास जरूर करावी.

हा प्रश्न rakhalb यानी विचारला होता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेधा, चीजांचे सुरुवातीचे काही शब्द (जसे ऐकायला येतात तसे) आणि कोणत्या रागात आहे एवढे सांगितलेत तर माहिती मिळणे सोपे होईल.

कोठे टाकावे हे कळले नाही म्हणून इथे विचारतेय. उद्या मुकुल शिवपुत्रच्या गाण्याला कोणी येतेय का इथले?

गाणं होईल की नाही ह्याची मुळीच खात्री नसल्याने नाही.... दोनदा असा प्रकार घडलेला ऐकला आहे.. एकदा आजोबा स्वतःच तिथे होते.. कार्यक्रम ठरवून ऐनवेळेस कुठेतरी गायब.. मग शेवटच्या क्षणी दुसरेच कोणी तरी गायला स्टेजवर..

नको रे असा नाट लावूस ....
दोन वर्षांपूर्वी गरवारेत काय भन्नट गायला होता. मागे एकदा उलटा बसून गायला होता म्हणे Happy

आरती गाणे झाले की परत एक नविन किस्सा.... आणि झाले असेल तर कसे झाले.. काहीतरी नविन ऐकायला मिळाले की परत जुनेच....

अरे सांगायचं राहिलच की.
झाले झाले गाणे झाले. तो आला....इतकेच नाही तो गायला... इतकेच नाही तो प्रेक्षकांकडे तोंड करून गायला...इतकेच नाही अगदी सुकून से गायला...इतकेच नाही अगदी मनापासून गायला...
जोक्स अ पार्ट छान गायला. मला त्या रागदारीतले फार डिटेल नाही कळत पण बहुदा बिहाग, कौशी अन शेवटी अगदी थोडी भैरवी. पण झक्क तीन तास गायला, मध्ये फक्त १० मिनिटं गॅप. मला आवडलं. ज्या सुकूनतेने ( मराठी शब्द काय बरे Uhoh ) गायला ते फार आवडलं. गायकी दाखवण्याचा सोस नव्हता Happy इतकी सहजता फार कमी कलाकारांमध्ये असते असं वाटतं, अर्थात मला संगीतातलं फार कमी कळतं बरं का. आपलं थोडेफार कानसेन इतकचं Happy
माझ्या एका नव्या मित्राने फोटो काढलेत इथे बघ
http://www.facebook.com/home.php?#!/album.php?aid=246434&id=540452203
अन त्याच्यावरचे एक आर्टिकल
http://www.facebook.com/home.php?#!/album.php?aid=246434&id=540452203

अरे... मुकूल गायले. त्यांच्या बद्दल पं भीमसेन जोशी असं म्हटलेत की, "तो गायला तेव्हा हा आणखी कुणाला गाऊ देईल का नाही असं वाटलं"...
मुकुलजींचा तोडी ऐकलाय... लाजवाब.
पितृॠण, गुरूॠणातून उतराई होण्यासाठी तरी त्यांनी गावं....
हल्ली मान्यताप्रद राग जोगकौस हा मुळचा कौशी हे कुमारांनी सांगितलं होतं म्हणे...
आरती, तुझी अगदी असुया वाटते आहे.
ज्याला तू सुकून म्हणते आहेस, ती सहजता, तो "पॉइझ" जर खरोखर मुकुलना लाभला असेल तर आपल्यासारख्या कानसेनांना, ह्या कलाकाराकडून अजून काही ऐकण्याची संधी आहे.... नाहीतर... त्यांचं गाणं आणि एकूणात आयुष्यं बघितल्यास.... त्यांना "शांततेआधीचं वादळ" म्हणता येईल!!

दाद Happy
अगं मला शास्त्रीय संगीतातलं कमीच कळतं. पण ते गात असताना इतक्या प्रसन्नतेने आणि काय म्हणावं बरं... पुर्ण तृप्ततेने... भरीव शांततेने गायले की खरच खुप छान वाटत होतं ऐकताना. मागे गरवारेला ऐकलं होतं त्यांचं. मजा आली होती, पण कुठेतरी आपल्याला सिद्ध करण्यासाठीची ...एक देणं देऊन मोकळं होण्याची धडपड वाटली होती, अर्थात तेही भारीच होतं सगळं.
पण परवा मात्र मी गाण्यासाठी गातो हाच अन फक्त हाच समर्पित भाव वाटला...म्हणूनच मला "सुकून" हा शब्द वापरावा वाटला Happy
मागे एकदा एक भारी नाटक पाहिलं होतं... "मी मालक या देहाचा " त्यात विक्रम गोखले त्यांना दिसत असलेल्या भावदेवतेचे वर्णन करत असतात. तेव्हा असाच काहीसा अनुभव आला होता....मी नास्तिक अगदी डायहार्ट नास्तिक असूनही Happy ती समर्पण भावना पोचते गं कशी ही , नाही का ? Happy
धन्स गं Happy

आरती तुम्ही भाग्यवान खरच. मुकुलजींच गाण म्हण्जे रसिकांसाठी साक्षात पर्वणीच.

मध्यंतरी त्यांच्याबद्दल बरच उलटसुलट ऐकु येत होतं तेव्हा खुप वाईट वाट्लं होत पण आता ते परत गायले हे ऐकुन खरच खुप बरं वाट्लं .

आरती२१
'सुकून' ने गाणे याला 'तब्येतीत गायला' असे म्हणतात. म्हणजे स्वतःच्या मस्तीत, एकदम समरस होऊन आणि ऐकणार्‍यांचेही दिल खूष करून टाकणारं गायला.

शिवरंजनी आणी यमन रागातील ३ ताल बंदीश येथे देत आहे..
चु.भु. द्या. घ्या.

१ शिवरंजनी..

हा राग मायनर पेंटाटोनीक स्केल मधे आहे..
त्या मधे असणारे स्वर असे ...

ह्या मधे "ग" कोमल आहे..

आरोही: सा रे ग प ध सा..
अवरोही: सा ध प ग रे सा..

आणी काही गाणे ह्या रागा मधील...

"जाने कहा गये वोह दिन कहते थे तेरी याद मै"
"कही दीप जले कही दिल"

आणी तीन ताल ची बंदीश अशी आहे..

तबला

|धा धिन धिन धा|धा धिन धिन धा | धा तिन तिन ता | ता धिन धिन धा |

स्थायी"

|ग रे सा - ध सा ग - - - ग प ध सा - ध - प ग प ग रे सा (३)%|

|सारे गग रेग पप पध सासा धसा रे ग म (१)|

|गरे सासा रेसा धध साध पप धप गग पग रे ग सा (२)|

अस्थायी:

गग प ध सा - - - ध सा रेग रेसा रेसा ध - प - ग - - पध -- ग - धप - ग प ग रे सा

|ग रे सा - ध सा| |रेग पध साध पग | |ग रे सा - ध सा| |ध सा रे ग प| |ग प ध सा |

|ग रे सा - ध सा| |सा रे ग | | ध सा रे | | प ध सा | | रे ग प सा|

२ यमन कल्यान

ह्या रागा मधील स्वर असे

आरोही: नी रे ग म ध नी सा

अवरोही: सा नी ध प म ग रे सा

ह्या रागा मधे येणारी काही चित्रपट गीते

"पिया ले गयो जी मोरा सांवरीया"
"चंदन सा बदन चंचल सी... "
"आंसु भरी है ये जीवन की रांहे कोई ऊनसे केहदे"
"वोह शाम कुछ अजीब थी ये श्याम कुछ अजीब है"

यमन बंदिश..

आरोही: नी रे ग म ध नी सा
आवरोही: सा नी ध प म ग रे सा

स्थायी:
अ: |- - - -|- - प प|नीध नीध पम प| रे रे सा सा| ग रे म ग|- - प प| %३

बः |ग ध ग प| प ध म प| नी ध प प| रे रे सा सा|

अंतरा
अ: |प प सां सां|सां - सां सां|नीं - नीं ध| % ३
बः |नी रे सां सां | नी ध पम प |नीध नीध पम प| रे रे सा सा | % २

फील ईन नोट्स किंवा कनेक्टींग नोट्स खालील प्रमाणे असतील

फील ईन नोट्स १ :
|नीरे ग- रेग म| गम प- मप ध| पध नी- नीध सा|
|सानी ध- नीध प| धप म- पम ग| मग रे- गरे सा|

स्थायी : अ: २ मेजर रीपीट करावे

फील ईन नोट्स २ :

|नी रे ग म| रे ग म ध | ग म ध नी | म ध नी सा|
|सा नी ध प | नी ध प म | ध म ग रे| म ग रे सा|

स्थायी :अ: शेवटचे २ मेजर रीपीट करावे

फील ईन नोट्स ३ :

|नीरे गम ध- -|रेग मध नी- -|गम धनी सा- -|
|सानी धप म- -| नीध पम ग- -|पम गरे सा- -|

स्थायी: अ: पुर्ण रिपीट करावा ...

वर मुकुलजींच्या गाण्याचा उल्लेख वाचून, रहावत नाही म्हणून ही आठवण...

२ वर्षांपूर्वी माझ्या ऑफिसमधे वसुंधरा कोमकलींचं गाणं होतं. (आयटी मधली कंपनी असूनही, अशा सुरेख कर्यक्रमांमुळे तिचं वेगळेपण कळतं.) पासेस तर सगळे पहिल्याच दिवशी संपले होते बहुतेक करून. आणि प्रत्यक्ष मैफिलीच्या दिवशीही, उशिरा आलेल्या (फक्त कंपनीच्या लोकांना) आत बसायला (म्हणजे खरं तर उभंच रहायला) जागा दिली होती. आमचे HR लोक भले होते, त्यातले काही स्वतः चक्क पायर्‍यांवर बसले, आणि लोकांना जागा दिली.

गाणं अप्रतिम झालं !!! मी काय बोलणार त्यावर! मला शास्त्रीय संगीतातलं काहीही कळत नाही, पण त्यांनी नुसता पहिला "सा" की काय तो लावला, आणि कसं कोण जाणे, पाणीच आलं डोळ्यात माझ्या!!
पुढचे ३ तास मी माझ्यात नव्हतेच! मधे १० मिनिटांचा ब्रेक दिला होता, आणि जस्ट त्याच्या आधी भिमपलास गायल्या होत्या त्या. (हे नाव मी अवर्जून लक्षात ठेवलंय.) इतका सुंदर अनुभव!!

आणि मग कार्यक्रम संपताना त्यांनी कुमारांचं भजन गायलं होतं. शेवटची सम (समच ना?) गाठल्यावर मंचावर गाण्यात तल्लीन झालेल्या वसुंधराताई आणि प्रेक्षागारात टाळ्यासुद्धा वाजवायचं विसरलेले आम्ही श्रोते...अजूनही हे दृश्य ताजं आहे डोळ्यासमोर...

(बाकी, माझ्या स्मृतीबद्दल सभ्य शब्दांत सांगायचं तर versatile आणि स्पष्ट्पणे सांगायचं तर अवसानघतकी अशा प्रकारात ती मोडते. कधीही काहीही लक्षात रहातं, आणि कधीही काहीही विसरायला होतं. Sad , त्यामुळे कर्यक्रमातले खूपसे डीटेल्स लिहिता येत नाहियेत याचं वाईट वाटतंय. )

आरती, इथे डोकावलेच नाही.... त्यामुळे तुझ्या प्रतिसादाला दाद द्यायची राहून गेली Happy
मुकुल मनात वादळ घेऊन जगलेत... चुकुन गायला बसले तर मात्रं त्यांच्यातलं सृजन, कातळ फोडून अंकूर बाहेर पडावा तसं उसळून येतं.
मुकुल, गायले आणि मनसोक्तं गायले ही ऐकणार्‍यांची पुण्याई.
नाहीतर उड जा जा हंस अकेला... हेच खरं.

दाद Happy
अन >>>उड जा जा हंस अकेला... हेच खरं<<< अगदी अगदी ...
प्रज्ञा, माझंही खुपसं तुझ्यासारखच ! कळत नाही काही पण भावतं... भिडतं ... Happy खरच खुप मोठी शक्ती आहे संगीतात ते अशा वेळेस कळतं नाही ? Happy

कोइ कहियो रे प्रभु आवन की-
मीराबाईचे हे भजन संजीव अभ्यंकरच्या गोड आवाजात (सलिल कुलकर्णीचं संगीत) इथे ऐका.
http://www.youtube.com/watch?v=BByKl3uAvts&feature=related

लक्ष्यात राहिलेल्या गाण्यान्मधे १९८३ मधे सवाई महोत्सवा मधले कुमारजीन्चे गायन आहे. सम्पूर्ण मालकंस! तार सप्तकातला रिषभ कसा बाणा सारखा काळीज भेदणारा होता. आणी पन्चम म्हणजे गुलाबदाणीतल्या सुगन्धी थेम्बान्चा शिडकावा !
पुढे दोन दिवस "काहे करत मोसे" च्या आमलाखलीच गेले होते.

हिंडोल रागात पंचम वापरून "आजाद हिंडोल" नावाचा एक राग आहे, असं मे ऐकलं आहे. कोणाला याचे आरोह-अवरोह, पकड वगैरे काही माहिती आहे का? लिंक्स वगैरे?

कालपासून सुदर्शन हॉल इथे डॉ. अरविंद थत्ते यांचे शास्त्रीय संगीतावर चार दिवसांची कार्यशाळा चालू आहे. ज्यांना शास्त्रीय संगीतात खोलात जाऊन माहिती घ्यायची असेल त्यांनी जरूर यावे. संधाकाळी ६-८. प्रती दिवशी रु. १५०. चारही दिवसांचे रु. ४००
उशीरा सांगितल्याबद्दल क्षमस्व .

या धाग्यावर एवढे अनमोल खजिने आहेत की त्यातील ऐकता ऐकता हा जन्म तरी नक्कीच अपुरा पडणार.......
ठीक आहे........ काही काही गोष्टींचा तर आनंद घेता येईल - तेवढ्यानेच सार्थकता होईल.......
सर्व प्रतिसादकर्त्यांना मनापासून धन्यवाद....... सर्वांच्या अंतःकरणात असेच सूर सदैव झंकारत राहोत.......

1_1.jpg

नमस्कार!!!!वरील चित्रांमधील शास्त्रीय संगीतातील परफ़ॉर्मर्स कोण आहेत हे कृपया सांगावे.मला या क्षेत्रातले फ़ारसे ज्ञान नसल्याने मला हे लोक कोण आहेत ते माहीत नाही.धन्यवाद!

१. उल्हास कशाळकर
२. ?
३. सलिल भट्ट
४. एन. राजम
५. पं. सुरेश तळवळकर
६. पं रघुनंदन पणशीकर

नक्की कशाला हवी आहेत ही नावं?

सुलु धन्यवाद.अ‍ॅक्टुअली एका परदेशी व्यक्तीला ती नावे हवी आहेत.त्या व्यक्तीला भारतीय शास्त्रीय स.न्गीतात रुची आहे.

मला एक प्रश्न आहे. कुमार गन्धर्व आणि किशोरीताई आमोणकर यांची रागाची interpretations वेगळी आहेत कि मलाच वाटतात. उदाहरणच द्यायच झाल तर या दोघानी गायिलेला नंद (राजन अब तो आ आणि आ जा रे बालमवा) इतर लोकानी गायिलेल्या नंद पेक्षा मला वेगळे वाटतात, तसच भीमपलासी, बागेश्री आणि जयजयवंती बद्दल.
म्हणजे हे खरच वेगळे आहेत कि माझ्य कानाला भास होतोय?

Pages