शास्त्रीय संगीत प्रश्नोत्तरे

Submitted by webmaster on 9 June, 2008 - 21:35

हिन्दुस्तानी शास्त्रोक्तं संगीताचा उगम कुठे आणि कसा झाला?

माझ्या वाचण्यात आलेल्यापैकी काही theories खालील प्रमाणे:

Theory क्र. १) हिन्दुस्तानी शास्त्रोक्तं संगीत हे पर्शियन म्हणजे इराणी संगीतातून निघालयं. साधारण बाराव्या शतकात हे संगीत भारतात आलं आणि त्या नंतर काही महान विभूतिंनी (उदा. तानसेन इत्यादि) त्या संगीताला वेगवेगळी स्वरूपं दिली जसे खयाल, ध्रुपद, ठुमरी, कजरी, टप्पा इ.

Theory क्र. २) ही theory आपल्याला पार पुरातन काळात घेऊन जाते. ब्रम्ह्ना, हनुमान, शिव आणि क्रुष्ण ह्या देवादिकांनी चार 'मत' स्थापन केले. इथे 'मत' चा अर्थं 'मती' किंवा 'बुद्धी' असा घ्यावा.
ब्रम्हा-मत पासून खायाल गायन निघाले.
हनुमान-मत पासून ध्रुपद गायकी उत्पन्न झाली.
क्रुष्ण-मत पासून ठुमरी, कजरी इ. निघाले.
शिव-मत ...??? [ sorry , मला ह्या बद्दल फ़ारसं माहीत नाही].

इथून पुढे ह्या सर्वं गायकी प्रचलित झाल्या.

Theory क्र. ३) नारद मुनींनी गायन विद्या ही स्वर्गातून प्रुथ्विलोकांत आणली. अथर्वंवेदाचा पाठ हा हिन्दुस्तानी शास्त्रोक्तं संगीताच्या स्वरांमध्ये केल्या जातो. वेदांचं पठण होऊ लागल्यापासून हे संगीत प्रचलित झालं. हा झाला mythology चा भाग. परंतु ह्या मागील व्यावहारिक संदेश काय असेल?

ह्यातली कुठली theory खरी मानायची, आणि कितपत खरी मानायची?

ह्यावर कुणि प्रकाश टाकू शकेल काय? वरील माहिती दुरुस्तं करावयाची असल्यास जरूर करावी.

हा प्रश्न rakhalb यानी विचारला होता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज जे सन्गीत कर्नाटकी किन्वा दक्षिणी म्हणून ओळखले जाते, तेच खरे भारतीय सन्गीत आहे, असे म्हणतात. आपण ज्याला उत्तर हिन्दुस्तानी शास्त्रीय सन्गीत म्हणून ओळखतो ते मुघल काळात सुरू झाले.

दक्षिणी सन्गीतात म्रुदुन्ग वापरतात. तबला हा मुघल काळात आला आणि हिन्दुस्तानी सन्गीताचा घटक बनला. मुघल सत्ताधीशाना भारतातील प्रत्येक वस्तू मोडण्याचा नाद होता... त्यातूनच म्रुदुन्ग मोडला जाऊन तबला तयार झाला असेल का? जाणकारानी शोध घ्यावा.

शास्त्रीय सन्गीताच्या परम्परेत लन्काधिपती रावणाचाही आदराने उल्लेख होतो... तो नेमका कशासाठी?

गजाननराव,
१. मुस्लीम आक्रमणाच्या पूर्वी भारतात एकाच प्रकारचे संगीत प्रचलीत होते. पण मुस्लिमांनी ज्याप्रकारे भारतातील राजकीय जीवन उध्वस्त केले त्याचप्रमाणे भारतातील संस्क्रुती व संगीतातही जाणूनबुजून भेसळ केली. भारतीय संगीतात तुर्की व फार्सी संगीत घुसवून त्याचे संपूर्ण स्वरूपच बदलून टाकले. दक्षिण भारतात मुस्लिमाचा प्रभाव फारसा नसल्यामुळे ते संगीत बदलले नाही. फक्त त्यातील भाषा संस्क्रुताऐवजी तेलुगु, तमिळ, कन्नड व मल्याळम या झाल्या. उत्तर भारतातील परिवर्तित संगीतालाच आज आपण , 'हिन्दुस्थानी संगीत' म्हणून ओळखतो("हिन्दुस्थानी" हा शब्द देखील अमीर खुस्रोनेच प्रचलित केलेला).

२. तबला या वाद्याला अत्यंत प्राचीन परंपरा आहे. वेदोत्तर काळात भारतात 'पुष्कर' नावाचे एक वाद्य प्रचारात होते. त्याला आजच्या तब्ल्याचे पितामह म्हणता येईल. म्रुदंगाला मोडून मुसलमान लोकान्नी तबला बनविला ह्या थिअरीला सबळ पुरावा उपलब्ध नाही.

३. असे म्हणतात की लन्काधिपती रावण हा उच्चकोतीचा संगीतज्ञ होता. शिव शंकराना त्याने शिव रंजन स्तोत्र गाउन प्रसन्न केले होते.

नमस्कार,

१. सा रे ग म प कार्यक्रमात प. हृदयनाथ मंगेशकर आणि सुरेश वाडकर यानी काहीना सांगितले
"आवाजाची जवारी काढा" असे काहीतरी. याचा अर्थ काय? कुणी जरा विषद करुन सांगेल का?
(सोप्या शब्दात उदाहरण देउन)

२. याच कार्यक्रमात "सावर रे" गाण्यात त्यानी काहीतरी मात्राचा प्रयोग यावर १२ ऐवजी ९ वापरले (चु भु द्या घ्या) असे काहीतरी म्हणाले. याचा अर्थ काय?
कोणी सोप्या शब्दात उदाहरण देउन सांगेल का?

धन्यवाद.

कुठे शास्त्रीय संगीत माझ्या संगणकावर उतरवून घेता येईल का? मी ITCSRA वर शोध केला, पण तिथे फक्त दोन तीन मिनिटाच्या वर जास्त नाही.
धन्यवाद

झक्की- esnips वरून उतरवून घेता येईल. कूठल्याही रागाचे नाव टाका, पानं येतील.
उदा- सहेला रे - किशोरी असा सर्च दिला तर किशोरीताईंचा अजरामर भूपाली येईल.

कोणाचे गायन, वादन हवे ते लिहा. माझ्याकडे बर्‍याच सिड्या आहेत. Happy

'जवारी काढणे' हा शब्द प्रयोग तार वाद्यांच्या संदर्भात वापरला जातो.. त्याचा मला माहित असलेला अर्थ -तंबोर्‍याच्या तारा जुन्या झाल्या की त्यावर गंज वगैरे बसून त्यातून निघणारा आवाज बदलतो.. तसेच तारा ज्या घोडीवर बसवतात तिच्यावर पण बर्‍यापैकी धूळ कचरा जमा झालेला असतो.. ते साफ करुन तंबोरा परत योग्य स्वरात लावणे. स्वरात लावताना.. शिवण्याच्या दोर्‍याचा वापर पण करतात.. घोडी आणि तार ह्यांच्या मधे तो दोरा सरकवतात जेणे करुन घोडी आणि तारे मध्ये थोडीशी जागा निर्माण होऊन पाहिजे तो योग्य सुर मिळतो.
चू.भु.दे.घे. ह्या हून वेगळे काही असल्यास उद्या उत्तर देतो..

आता त्यांनी हा शब्द प्रयोग आवाजाच्या बाबतीत का वापरला ते त्यांनाच माहिती.. कदाचित त्यांना गायकानी अजून रियाझ करुन गळा साफ करावा असे सुचवायचे असेल..

झक्की.. www.esnips.com आणि तूनळी वर बरेच शास्त्रीय संगीत आहे जे तुम्हाला उतरवून घेता येईल..
=========================
नूतन वर्षाभिनंदन..

मानस्मी- सावर रे वर मंगेशकर म्हणाले- """३६ वर्षांपूर्वी ते बिरजू महाराजांच्या कार्यक्रमाला गेले होते. त्यावेळेला म्हाराजांनी एक १६ मात्रांचा तुकडा सादर केला, त्याची गिनती केली आणि नॄत्य सादर करता करता विचारलं -और कितनी मात्रा मे मै इसको पेश करु ? मी म्हटल- ११ मात्रात तुम्ही करुन दाखवा. त्यांनी ११ मात्रात करुन दाखवले. मग मी ९ मात्रात करायची विनंती केली. सवारी (ह्याचा अर्थ मला माहित नाही. कोणाला माहित असेल तर सांगा प्लीज) ची फर्माईश मी करत गेलो. त्यांनी करुन दाखवले. मग मला लक्षात आले की ते कुठल्याही मात्रेत करु शकत होते. "....

"""मुखडा ५ मात्रा, पुढची ओळ ४ मात्रा आणि अंतरा ६ मात्रेत असं पाडगावकरांनी दिलेलं तोडमोड करुन बसवलं. सुंदर ताल म्हणतात त्याला ५ मात्रेचा. सावर रे म्हणल्यावर ऊंच उंच झूला ला किंचीत लय वाढवून घेतली (नाहीतर ती पडते). कधी कधी असं स्वातंत्र्य गाण खूलवण्यासाठी घ्यावं लागतं. पुढच्या वेळेस तुम्ही ते स्वातंत्र्य घ्या. पुढच्या लाईनला लय वाढवायची आहे आणि समेवर येताना दाद्-याच रुप त्याला द्यायच< आहे. मग ते वजन बरोबर येईल. वजनाचच गाणं आहे ते, सुरांच नंतर आहे. """""

तो जो तुकडा म्हणाले ना.. तो असा आहे.
१,२,३,४,५,१,२,३,४,५,१,२,३,४,५,१,२,३,४,१,२,३,४,१,२,३,४,१,२,३,१,२,३,१,२,३,१,२,१,२,१,२,१,१,१

ह्या एकूण ४५ मात्रा होतात ह्यात शेवटचे तिन्ही १ म्हणताना १ मात्रा सोडून द्यायची म्हणजे ४८ मात्रा पूर्ण होतात.. १६ * ३ = ४८.. म्हणजे त्रितालाची तीन आवर्तने किंवा वरच्या मात्र तीनपटीत म्हणल्या की १६ मात्रात बसून बरोबर सम येते..

माझ्या अल्पमतीला जसे समजले तसे लिहिले आहे..
चू भू दे घे..

मायबोलीवरचे तबलजी कुठे गेले.. झोपले असतील बहुतेक आत्ता.. उद्या सकाळी सकाळी देतील बहुतेक बरोबर का चूक ते..
=========================
नूतन वर्षाभिनंदन..

हिम्या- गाऊन किंवा तबल्यावर सांगशील का प्लीज ? क्लिप टाक एक. मनापासून विनंती करतेय.

तिनतालाच्या १६ मात्रा. समज १ सेकंद = १ मात्रा अस गणित केल तर १६ सेकंद.
तर ह्या १६ सेकंदचे ११ भाग करायचे व ११ मात्रा गायच्या(वाजवायचा).
किवा १६ सेकंदाचे १० भाग करायचे व झपताल गायचा(वाजवायचा).

हा पहा .. गोव्याचा लयब्रह्मभास्कर खप्रुमामा..
हा एका हाताने एक्,दुसर्‍या हाताने दुसरा,
एका पायावर तिसरा, दुसर्‍यापायावर चौथा ताल धरुन
तोंडाने पाचवा ताल म्हणायचा व एकाचवेळी समेवर यायचा.

ह्यात क्लिप्स पण आहेत..
http://www.sawf.org/Newedit/edit05282001/musicarts.asp

- अनिलभाई
It's always fun when you connect.

अनिलभाई- आपले आभार कसे आणि किती मानू? सॉफ च्या लिंक्स आधी अनेक वेळा पाहिल्या पण हे सुटलंच होतं माझ्याकडून.
खप्रुमामा टेरर होते म्हणजे.

अनिलभाई, तुम्ही जे सांगितलं आहे त्याला काय करणं म्हणतात?
जवारी काढणे: सतारीच्या संदर्भात उत्तम माहिती इथे सापडली. तांत्रिक बाबींसकट. पण 'आवाजाची जवारी' म्हणजे रियाज करून, घासून पुसून गळा मोकळा / साफ करणे असंच मला वाटतं.
--अंशुमान.

त्याला बहूधा "लयीशी खेळणे " म्हणत असावेत. Happy
गळ्याची जवारी काढणे म्हणजे तुम्ही म्हणता तेच : पुनश्च हरि ओम. बॅक टु बेसिक्स. सूरावर काम करा. तानपुरा जूना झाला की जशी जवारी काढतात, त्याप्रमाणे गळ्याचे/ सुराचे - स्पेअर पार्टस बाजूला काढून मेंटेनंस अँड रिपेयर करा, जेणेकरुन गळ्यातले तंतू पुन्हा एकदा सुरात झंकारले पाहिजेत.

Zen and the Art of Vocal Chords Maintenance Wink

रैना, हिम्सकुल, अनिलभाई....एवढ्या छान माहिती बद्दल आभारी आहे.. Happy
प्रश्ण विचारल्याबद्दल मानस्मी चे पण आभार Happy

०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा

नमस्कार,

कुणी सांगु शकेल का की राग 'हंसध्वनी' ची वेळ कोणती? आणि त्याचे आरोह अवरोह. मला हा राग खूप आवडतो.

माझाही खूप आवडता राग आहे हंसध्वनी...
कोणत्या वेळी गातात हे नक्की माहित नाही..

आरोह - सा रे ग प नी सा (ओडव)
अवरोह - सा नी प ग रे सा... (ओडव)

ग रे सा नी ग प रे सा ग रे सा नी प ग रे सा रे प ऽ ग ऽ रे ऽ सा..

हा मूळचा दक्षिण भारतीय राग आहे.. पण तो उत्तर हिंदुस्थानी संगीतामधे खूपच बेमालूम मिसळून गेला आहे..
फक्त पाचच स्वर असून ही ह्या रागाची व्याप्ती खूप मोठी आहे.. विदुषी किशोरी आमोणकर ह्यांची ह्या रागाची ७० मिनिटांची एक कॅसेट प्रसिद्ध आहे...
दाता तू गणपती गजानन.. हे ह्या रागातली प्रसिद्ध बंदिश आहे..
=========================
नूतन वर्षाभिनंदन..

रैना, गाऊन किंवा वाजवून दाखवणे माझ्यासाठी तरी कठीण आहे पण समजायला सोपे जावे म्हणून इथेच नीट लिहून दाखवतो...
तीनतालाच्या मात्रा १६. आणि त्यात ४८ मात्रा बसवायच्या आहेत
१ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १
धा धीं धीं धा धा धीं धीं धा धा तीं तीं ता ता धीं धीं धा धा
१२३ ४५१ २३४ ५१२ ३४५ १२३ ४१२ ३४१ २३४ १२३ १२३ १२३ १२१ २१२ १ऽ१ ऽ१ऽ १

किंवा
१ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६
धा धीं धीं धा धा धीं धीं धा धा तीं तीं ता ता धीं धीं धा
१ २ ३ ४ ५ १ २ ३ ४ ५ १ २ ३ ४ ५ १
२ ३ ४ १ २ ३ ४ १ २ ३ ४ १ २ ३ १ २
३ १ २ ३ १ २ १ २ १ २ १ ऽ १ ऽ १ ऽ

=========================
नूतन वर्षाभिनंदन..

हंसध्वनि मधे अनेक रचना आहेत हिंदीत,

जा तोसे नही बोलु कन्हैया
राह चलत पकडी मोरी बैंया ( लता मन्ना डे )

लागी लगन पति के संग ( अमीर खॉं )

बलमा न जा घर सौतनके ( कंकणा बॅनर्जी )

लताने मराठीत,
दाता तू गणपति गजानन, हि रचना या रागात गायलीय ( ती अर्थातच, वातामि गणपति, या तामिळ रचनेवर आधारित आहे )
हा राग बराचसा, शंकरा शी मिळता जुळता आहे.

हंसध्वनीची पकड
रे ग प (ग)रे ग प नी प ग रे सा
=========================
नूतन वर्षाभिनंदन..

हंसध्वनी - ५वा प्रहर (सायं. ६ ते ९)
हे पहा - http://www.adwaitjoshi.com/icm/raagabase.php?sort=4&alpha=
इथे उपयुक्त माहितीचे उत्तम रितीने संकलन केले आहे. (ती बरोबर आहे की नाही हे मात्र मला माहिती नाही, पण स्थळनिर्माता जाणकार वाटतो.)

  ***
  दिसेल दुसरे ते डोळ्यांविण. सरेल मणक्यामधला ताठा.
  पिशी मावशी वदेल सारे... जपून जा, पण जरूर गाठा !

  हंसध्वनी व शंकरा दोनही राग हे बिलावल थाटाचेच आहेत. म्हणून साम्य जाणवत असेल. वादी, संवादी आणि पकड तर वेगळी आहेच, पण आरोह अवरोह पण वेगळे आहेत.

  शंकरा-
  आरोह - सा ग प नी ध सां।
  अवरोह - सां नी (ध)प, ग प (रे)ग (रे)सा।

  हंसध्वनी-
  आरोह - सा रे ग प नी सां।
  अवरोह - सां नी प ग रे सा।

  स्लार्टी: फारच छान लिंक आहे. मस्त. Happy

  स्लार्टी... लिंक फारच मस्त आहे रे...
  =========================
  नूतन वर्षाभिनंदन..

  कोणती मराठी गाणी कोणत्या रागावर आधारित आहेत ते कुठे लिहीले आहे?
  हिंदी गाणी?

  झक्की, स्लार्टीनी दिलेल्या लिंक वर अशी माहिती दिलेली आहे..
  =========================
  नूतन वर्षाभिनंदन..

  सगळ्याना खुप खुप धन्यवाद. माझ्याकडे हन्सध्वनी ची एक सीडी आहे ज्यात उस्ताद रशिद खान यानी गायलेले 'लागी लगन पती सखी सन्ग' आणि बेगम परवीन सुलताना यान्चा एक तराना, तसेच पन्डीत हरीप्रसाद चौरसिया आणि उस्ताद अमजद अली खान यानी पेश केलेला हन्सध्वनी आहे. अति आवडते ही सीडी मला. याच सिरीज मधे आसावरी, तोडी अश्या पण सीडीज आहेत. फारच सुन्दर कलेक्शन आहे.

  आत्ता आत्तापर्यंत मी musicindiaonline वर मनसोक्त संगीत ऐकत होतो. तोडी, भैरव, ललत, जौनपुरी, भीमपलास, मुलतानि, यमन, हंसध्वनि, शंकरा, मालकंस, भैरवी इ. प्रत्येक रागात चांगले दोन दोन तास चालेल असे संगित असे. आताशा का कुणास ठाऊक, पण मधेच बंद पडते!! कुणितरी मला शाप दिला. आता मी इस्निप ऐकतो.

  माझ्या जवळ अनेक ध्वनिफिती आहेत, पण कुणि कुठला राग आहे हे सांगितले नाही, तर मला अजिबात कळत नाही.

  आता त्या फिती कुणाला हव्या आहेत का? जवळ जवळ २५ ते ३० आहेत. काहींवर कुठला राग ते लिहीले आहे. पण ...

  ते सगळे संगीत मी आता संगणकावर घालणार आहे. मग कुणाला हवे असल्यास देता येईल.

  Pages