शास्त्रीय संगीत प्रश्नोत्तरे

Submitted by webmaster on 9 June, 2008 - 21:35

हिन्दुस्तानी शास्त्रोक्तं संगीताचा उगम कुठे आणि कसा झाला?

माझ्या वाचण्यात आलेल्यापैकी काही theories खालील प्रमाणे:

Theory क्र. १) हिन्दुस्तानी शास्त्रोक्तं संगीत हे पर्शियन म्हणजे इराणी संगीतातून निघालयं. साधारण बाराव्या शतकात हे संगीत भारतात आलं आणि त्या नंतर काही महान विभूतिंनी (उदा. तानसेन इत्यादि) त्या संगीताला वेगवेगळी स्वरूपं दिली जसे खयाल, ध्रुपद, ठुमरी, कजरी, टप्पा इ.

Theory क्र. २) ही theory आपल्याला पार पुरातन काळात घेऊन जाते. ब्रम्ह्ना, हनुमान, शिव आणि क्रुष्ण ह्या देवादिकांनी चार 'मत' स्थापन केले. इथे 'मत' चा अर्थं 'मती' किंवा 'बुद्धी' असा घ्यावा.
ब्रम्हा-मत पासून खायाल गायन निघाले.
हनुमान-मत पासून ध्रुपद गायकी उत्पन्न झाली.
क्रुष्ण-मत पासून ठुमरी, कजरी इ. निघाले.
शिव-मत ...??? [ sorry , मला ह्या बद्दल फ़ारसं माहीत नाही].

इथून पुढे ह्या सर्वं गायकी प्रचलित झाल्या.

Theory क्र. ३) नारद मुनींनी गायन विद्या ही स्वर्गातून प्रुथ्विलोकांत आणली. अथर्वंवेदाचा पाठ हा हिन्दुस्तानी शास्त्रोक्तं संगीताच्या स्वरांमध्ये केल्या जातो. वेदांचं पठण होऊ लागल्यापासून हे संगीत प्रचलित झालं. हा झाला mythology चा भाग. परंतु ह्या मागील व्यावहारिक संदेश काय असेल?

ह्यातली कुठली theory खरी मानायची, आणि कितपत खरी मानायची?

ह्यावर कुणि प्रकाश टाकू शकेल काय? वरील माहिती दुरुस्तं करावयाची असल्यास जरूर करावी.

हा प्रश्न rakhalb यानी विचारला होता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तरीसुद्धा मग हार्मोनिअमचा वापर इतका रूढ कसा काय झाला? म्हणजे अनेक दिग्गजांच्या मैफलीतही हार्मोनिअम दिसते.

हार्मोनियम वाजवायला सगळ्यात सोपी आहे..

विद्याधर ओकांनी फार मस्त सांगितले आहे श्रुतिंबद्दल... एकदम आवडला तो व्हिडिओ..

श्रुती ऐकू येतात मधल्या सुद्धा.. ऐकू न यायला काय झाले.. २० मिली सेकंदांपेक्षा जास्त वेळ कानावर पडलेला कुठलाही स्वर व्यवस्थित कळतो..

हार्मोनियम वाजवायला सगळ्यात सोपी आहे.. <<< वाजवायला सोपी आहे म्हणून एवढे प्रॉब्लेम असूनही (दिग्गजांकडूनही) स्वीकारली गेली असावी का?

श्रुती ऐकू येतात मधल्या सुद्धा>>>>>>> श्रुती च ऐकु येतात, म्हणुन त्यांना श्रुती म्हणतात.

उदा : समजा "सा" जर ५१२ ला असेल आणि तर मानवी कान ५१३, ५१४ ह्या frequency वेगळ्या ( ५१२ पेक्षा वेगळ्या ) आहेत हे समजु शकणार नाही. अश्या प्र्कारे frequence वाढवत नेली, तर ज्या frequency ला तो स्वर ५१२ frequency च्या "सा" पेक्षा वेगळा आहे हे सर्वसामान्य मानवा ला ओळखु येइल तिथे पहीली रे ची श्रुती असते.

वाजवायला सोपी आहे म्हणून एवढे प्रॉब्लेम असूनही (दिग्गजांकडूनही) स्वीकारली गेली असावी का?>>>>>> दुसरा पर्याय काय? सारंगी सारखी वाद्ये वाजवणे प्रचंड अवघड आहे ( पेटी पण अवघडच आहे ). मग साथीला कोण मिळणार.

माझ्या माहितीनुसार हार्मोनियमला संवादिनीचे स्वरूप सर्वप्रथम पंडित मनोहर चिमोटे ह्यांनी दिले आणि आकाशवाणीवरील हार्मोनियमच्या बंदीविरूद्धही त्यांनी यशस्वी लढा दिला होता.
https://www.youtube.com/watch?v=JUzAgjP7YHQ
इथे त्यांच्या संपादित चित्रफितींची अशी एक चित्रफीत पाहता येतील

टोच्या ने म्हटल्याप्रमाणे एका आवाजा पासुन वेगळा असा ओळखु येणारा आवाज म्हणजे वेगळी श्रुती.
अश्या प्रकारे २२ श्रुती होतात. सगळे स्वर हे श्रुतीच आहेत.

आपण आवाजा पासुन सुरु करुया.
आवाज कसा होतो. तर आघात झाल्यावर. जसे दोन वस्तु एकमेकावर आदळुन होणारा आवाज.
ह्याला आहत अस म्हणतात.
दुसरा आहे तो अनाहत आवाज म्हणजे जो कुठल्याही आघाताशिवाय असलेला unstruck sound.
हा युनिवर्सच्या सुरवतीपासुन अस्तित्वात असलेला. ध्यानधारणा करताना एखाद्याला असा दैवी आवाज ऐकायला येतो तो. ते राहु दे. आपण आहत आवाजाबद्दल बोलु.

आता हा आवाज दोन प्रकारचा असतो.
१. कर्कश्य गोंधळ असलेला
२. मधुर जो कानाला गोड वाटतो असा.

ह्या मधुर आवाजाला नाद अस म्हणतात.

आता ह्या नादापासुन एकमेकाहुन वेगळ्या ऐकु शकु अश्या नादा ला श्रुती म्हणतात.
अश्या २२ श्रुती
ह्या बावीस श्रुती तुन १२ स्वर कोमल तिव्र व शुद्ध निवडले आहेत.
जे वर बर्‍याच जणानी सांगीतले आहेत.

माझा आणिक एक बाळबोध प्रश्न..
गायकाला मैफीलीत संवादीनी कींवा सारंगी या वाद्याची साथ का हवी असते? म्हणजे तानपुर्‍यावर त्याला
हवे असलेले रेफरंस स्वर हे सतत झंकारत असतातच. मग संवादीनी कींवा सारंगी नी गायकाच्या स्वरांना ट्रेस करत जाणं याचं प्रयोजन काय असतं? मैफीलीत रंजकता तर येतेच पण त्याला अजून काही तांत्रिक कारण आहे का?

श्रीयू, तुम्ही म्हणताय तसं तानपुरा/ स्वरमंडल गायकाला पुरेसं होतं, हार्मोनियम/ सारंगी साथीला असते, मैफिलीत रंग भरायला.
गायकाने मध्ये एक आवर्तन सोडलं तर साथ करणारा भर घालतो, जुगलबंदी करू शकतात, एक वेगळं पर्स्पेक्टीव्ह ऐकायला मिळतं गायकाबरोबर साथ करणारा follow करत असेल तर ते कानाला फार छान वाटतं ऐकायला. (वै म).
अर्थात शेवटी मैफल हि फ़क़्त आणि फ़क़्क गायाकाचीच असते.

धन्यवाद अमित.. संवादीनी कींवा सारंगी नि:संशय मैफीलीत वेगळीच रंजकता येते.
सारंगी/संवादीनी ची साथ मैफीलीत घेणं हे केव्हापासून सुरु झालं असेल?
ध्रूपद्/धमार गायकीत तानपूरा आणि म्रुदंग एव्हढेच असायचे ना साथीला?

इतर वाद्ये असली की रंजकता येते. गाणाञाला अधुन मधुन श्वास घ्यायला वेळ मिळतो. त्यामुळे साथीला वाद्य घेणे लोकप्रिय झाले.

ध्रुपद धमार ही अती बोर गायनपद्धती होती.

त्याला रंजकता तानसेनाने आणली - ख्याल गायकी आणुन

प्रश्न - १

राग मालकंस
थाट : भैरवी (म्हणजे रे् ग् ध् नी् कोमल असलेले राग)
आरोह : सा ग् म ध् नी् सां
अवरोह : सां नी् ध् म ग् सा

प्रश्न :
थाट आसावरी ( ग् ध् नी् कोमल असलेले राग)
मालकंस मधे ग् ध् नी् कोमल आहेत व रे वर्ज आहे.
मग मालकंस राग हा भैरवी थाट का मानला जातो आसावरी थाट का नाही?.

उत्तर १ :

जर तुम्ही भैरवी गात असाल तर मधे मधे तुम्ही मालकंस चे स्वरसमुह गावु शकता. त्यामुळे रागाचा रसभंग होत नाही. म्हणजे रागाचा तिरोभाव होत नाही.

पण आसावरी बेस रागामधे 'प' व रे स्ट्रोंग असतात व मधे जर तुम्ही ते वगळुन मालकौस चे स्वर समुह गायले तर नक्कीच रागाच रसभंग होतो.

म्हणुन मुल कोणासारख आहे कस वागत ते पाहुन बाप ठरवला जातो. Happy

प्रश्न - २

भैरव
सा रे् ग म प ध् नि सां
सां नि ध् प म ग रे् सां

अहिर भैरव
सा रे् ग म प ध नि् सां
सां नि् ध प म ग रे् सा

प्रश्न :
अहिर भैरव हा अहिर भैरव नावाने का ओळखला जातो.?.

भैरव मध्ये ग चा पाय मोडलाय म्हणजे तो कोमल दाखवायचाय का? तो शुद्ध असतो ना?

विकीच्या म्हणण्यानुसार, अहिरी असा राग आहे, जो काफीच्या जवळपास असावा. अहिर-भैरव मध्ये रे आणि नी कोमल आहेत सो रे भैरव प्रमाणे आणि काफी मधला नी (ग वगळून) कोमल असा घेतलाय असं वाटतंय.

इथे म्हटल्याप्रमाणे कर्नाटकी चक्रवक राग म्हणजे अहिर-भैरव. जो भातखंडे पद्धतीमध्ये कुठल्याच थाटात बसत नाही.
http://chandrakantha.com/raga_raag/ahir_bhairav/ahir_bhairav.html
http://en.wikipedia.org/wiki/Ahir_Bhairav

भैरव मध्ये ग चा पाय मोडलाय म्हणजे तो कोमल दाखवायचाय का? तो शुद्ध असतो ना? >> हो तो शुद्ध ग. केलाय बदल.

अहिर म्हणजे गवळी?
मग अहिर भैरवला ’गवळी भैरव’ असं म्हणायचं ठरवलं तर मग ’टोळ भैरव’ही एखादा राग होऊ शकेल का? Proud

अमितवः अर्थात शेवटी मैफल हि फ़क़्त आणि फ़क़्क गायाकाचीच असते. >>> हे काय पटले नाही. साथीदारांमुळे 'तरुन' गेलेल्या अनेक मैफली एकल्या आहेत.

'माझ्या मते मैफल गायकाचीच असावी'. असा अर्थ अभिप्रेत आहे. Happy
लग्नात कधीकधी नवरी पेक्षा तिच्या मैत्रिणी/ बहिणी जास्त भारी कपडे- मेकप करतातच की. Happy

प्रश्न - २

भैरव
सा रे् ग म प ध् नि सां
सां नि ध् प म ग रे् सां

अहीर भैरव
सा रे् ग म प ध नि् सां
सां नि् ध प म ग रे् सा

प्रश्न :
अहिर भैरव हा अहिर भैरव नावाने का ओळखला जातो.?.

उत्तर :
पुर्वीच्या काळी काही जामातीतील लोक सकाळी उठुन लोणी दुध दही विकायला जात असत. (तमाश्यामधल्या बतावणीमधे दाखवतात ना. गौळणी लोणी विकायला जातात त्याना अडवायला कान्हा असतो.. आल का लक्षात?. :)) तर ह्या लोकाना अहिर अस म्हंटल जात. पुरुषाला अहिर आणी स्त्रिला अहिराणी म्हणतात.
तर हे लोक सकाळी झुंजुमुंजु झाल की बाजाराला गाणी गात जात. हे लोक भैरवाचे सुर थोडेसे बदलुन म्हणजे कोमल ध च्या ऐवजी शुद्ध ध व शुद्ध नी च्या ऐवजी कोमल नी घेवुन गात असत.
पुढे ह्याचा शास्त्रिय संगितात समावेश करण्यात आला व त्याला अहिर भैरव हे नाव देण्यात आले.

अहिर भैरव हा संधीप्रकाश राग आहे. सकाळचा ज्यावेळी उजेड अजुन आलेला नाही परंतु तारे दिसेनासे होतात. अशी रात्र व दिवस ह्या मधली वेळ.

ह्या रागातली काही मराठी गाणी

तिर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल

ह्या रागातली काही हिंदी गाणी

अलबेला सजन आयो रे - हम दिल दे चुके सनम
पूछो न कैसे मैंने रैन बिताई - मेरी सूरत तेरी आँखें
वंदना करो, अर्चना करो
रामका गुन गान करिए - राम श्याम गुन गान
मेरी बिना तुम बिन रोये - देख कबीर रोया
मैं तो कबसे तेरी शरण में हूँ - राम नगरी
जिंदगी को संवारना होगा - अलाप
सोला बरसकी बलि उमारको सलाम - एक दूजे के लिए
अपने जीवन की उलझन को - उलझन
मन आनंद आनंद छायो - विजेता
वक्त करता जो वफ़ा आप हमारे होते - दिलने पुकारा
राम तेरी गंगा मैली हो गई - राम तेरी गंगा मैली
धीरे धीरे सुबह हुई हे जग उठी जिंदगी
मेरी गलियोंसे लोगोंकी यारी बढ़ गई - धर्मात्मा
चलो मन जायें घर अपने - स्वामी विवेकनान्द

अहिरबद्दल छान लिहिले आहे.

ध ... कोमल नि ..... कोमल रे .... सा...

हा या रागाचा प्राण. आहे.

माझिया मना जरा थांब ना

सलमान खानचे लगन लगन लग गै है तुझसे मेरी लगन लगी

हर किसी को नही मिलता यहा प्यार जिंदगी मे

अब तेरे बिन जी लेंगे हम

हेही अहिर भैरवात आहेत.

आणि हेही. Happy
www.youtube.com/watch?v=f_qcQ0ga2YE

Pages