हिन्दुस्तानी शास्त्रोक्तं संगीताचा उगम कुठे आणि कसा झाला?
माझ्या वाचण्यात आलेल्यापैकी काही theories खालील प्रमाणे:
Theory क्र. १) हिन्दुस्तानी शास्त्रोक्तं संगीत हे पर्शियन म्हणजे इराणी संगीतातून निघालयं. साधारण बाराव्या शतकात हे संगीत भारतात आलं आणि त्या नंतर काही महान विभूतिंनी (उदा. तानसेन इत्यादि) त्या संगीताला वेगवेगळी स्वरूपं दिली जसे खयाल, ध्रुपद, ठुमरी, कजरी, टप्पा इ.
Theory क्र. २) ही theory आपल्याला पार पुरातन काळात घेऊन जाते. ब्रम्ह्ना, हनुमान, शिव आणि क्रुष्ण ह्या देवादिकांनी चार 'मत' स्थापन केले. इथे 'मत' चा अर्थं 'मती' किंवा 'बुद्धी' असा घ्यावा.
ब्रम्हा-मत पासून खायाल गायन निघाले.
हनुमान-मत पासून ध्रुपद गायकी उत्पन्न झाली.
क्रुष्ण-मत पासून ठुमरी, कजरी इ. निघाले.
शिव-मत ...??? [ sorry , मला ह्या बद्दल फ़ारसं माहीत नाही].
इथून पुढे ह्या सर्वं गायकी प्रचलित झाल्या.
Theory क्र. ३) नारद मुनींनी गायन विद्या ही स्वर्गातून प्रुथ्विलोकांत आणली. अथर्वंवेदाचा पाठ हा हिन्दुस्तानी शास्त्रोक्तं संगीताच्या स्वरांमध्ये केल्या जातो. वेदांचं पठण होऊ लागल्यापासून हे संगीत प्रचलित झालं. हा झाला mythology चा भाग. परंतु ह्या मागील व्यावहारिक संदेश काय असेल?
ह्यातली कुठली theory खरी मानायची, आणि कितपत खरी मानायची?
ह्यावर कुणि प्रकाश टाकू शकेल काय? वरील माहिती दुरुस्तं करावयाची असल्यास जरूर करावी.
हा प्रश्न rakhalb यानी विचारला होता.
रॉबीन, आपल्यासारख्या
रॉबीन, आपल्यासारख्या सामान्यांना ते बहुधा भरपूर श्रवण आणि अभ्यासानंतरच समजत असावे. काहींना उपजतच स्वरांतले अंतर कळण्याची देणगी असते तो भाग निराळा.
सगळं गाणंच पट्टीच्या सापेक्ष
सगळं गाणंच पट्टीच्या सापेक्ष असतं. का मला समजला नाही तुमचा प्रश्न?
चैतन्य: मस्त कल्पना. मी पुण्यात नाही, पण skype call पण करता येईल का? गणपतीच्या सुमारास पुण्यात येणारे, तेव्हा प्रत्यक्ष सेशनला नक्की येईन.
समोरच्या गाणार्याचा ठहराव
समोरच्या गाणार्याचा ठहराव अमुक एक स्वरावर आहे हे कसे कळते ? >> तानपुर्या वरुन. तानपुर्या वर सा प सा वाजत असतात. त्याच्या अनुशंगाने बाकीचे स्वर ओळखता येवु शकतात. मला अजुन जमत नाहीत पण.
स्वरज्ञान हा खूपच महत्त्वाचा
स्वरज्ञान हा खूपच महत्त्वाचा भाग आहे. आमचे सर रोज १० मिनिटे सा लावून त्याच्या रेफरन्स मध्ये स्वर ओळखणे असा खेळ घायचे. पेटीवर करून बघा, एकाला वाजवायला सांगा तुम्ही ओळखा.
पट्टीवरून: अजय चक्रवर्ती मैफिलीत राग म्हणत असताना, मधेच राग तोच स्वर तेच पण जर पट्टी (रेफरन्स) बदलला तर कसा वेगळाच राग होतो हे प्रात्यक्षिकांसह करताना पाहिलंय. एक चारुकेशी होता दुसरा आता आठवत नाही.
वर उल्लेख केलेला पॉप गायक
वर उल्लेख केलेला पॉप गायक सिद्धार्थ सलाथिया या नवीन गायकाने शास्त्रीय संगिताची ओळख करून दिलेली ही ट्युतो रिअल्स मला खूप उपयुक्त वाटली . ट्युट क्,९,१०,११,१२ ही यमन रागाबद्दल आहे .त्याट्युट मध्ये त्याने अगदी सुर आणि सप्तकापासून बड्या खयालापर्यन्त ओळख करून दिली आहे. ही टुट्स पाहून कोणी प्रतिक्रि या देईल काय?
https://www.youtube.com/watch?v=3V68cCl1vPA
ट्युट ९ ऐकलं. छान ओळख करून
ट्युट ९ ऐकलं. छान ओळख करून दिलेय यमनची, सवडीने ऐकीन उरलेली.
मी , मी, चैतन्य तुझ्या शाळेत
मी , मी, चैतन्य तुझ्या शाळेत मला देशील का प्रवेश ?
स्काईपवर असा एखादा गट स्थापन
स्काईपवर असा एखादा गट स्थापन केला तर श्रोता म्हणून मला हजर राहायला आवडेल.
shruti samajavun saangaa naa
shruti samajavun saangaa naa kunitari..
श्रीयू, श्रुती हा विषयही थोडा
श्रीयू,
श्रुती हा विषयही थोडा क्लिष्ट आणि तांत्रिक आहे (समजावण्याच्या बाबतीत)
प्रत्यक्षात तो त्याहून अवघड आहे.
तरी सोप्या पद्धतीने काही लिहिता येतंय का ते बघतो.
अनिलभाई, दाद, हिम्सकुल - काही चुकत असेल तर दुरुस्त करा.
वरील चित्रात जी काळी आडवी रेष आहे, ती स्वराची फ्रीक्वेन्सी आहे असे समजा.
मानवी कानाला काही मर्यादेपर्यंतचाव स्वर/ आवाज ऐकू येऊ शकतो.
संगीतातला सुरुवातीचा स्वर 'सा' हा रेफरन्स स्वर असतो.म्हणजे, त्या स्वराची जी फ्रिक्वेन्सी आहे त्यावर पुढचे स्वर आणि त्यांची फ्रीक्वेन्सी अवलंबून असते. षड्ज (सा) आणि पंचम (प) हे अचल स्वर मानतात.
षड्जाच्या दीडपट फ्रिक्वेन्सी असलेला स्वर हा पंचम असतो. आणि षड्जाच्या दुप्पट फ्रिक्वेन्सीचा स्वर म्हणजे वरचा षड्ज, तार षड्ज.
आता ह्या, षड्ज, पंचम आणि तार षड्जाच्या अधल्या मधल्या फ्रिक्वेन्सीवर उरलेले स्वर येतात.
रेषेखाली आहेत ते कोमल स्वर आहेत. त्यामुळे षड्जापासून तार षड्जापर्यंतचे स्वर-
षड्ज, कोमल रिषभ, शुद्ध रिषभ, कोमल गंधार, शुद्ध गंधार, शुद्ध मध्यम, तीव्र मध्यम, पंचम, कोमल धैवत, शुद्ध धैवत, कोमल निषाद, शुद्ध निषाद, तार षड्ज. (तार षड्ज सोडून १२ स्वर)
ह्यात ज्या स्वरांचे कोमल / तीव्र असे दोन प्रकार आहेत त्यांचा विचार करा.
षड्जापासून कोमल रिषभापर्यंत जी फ्रीक्वेन्सी आहे त्याच्या अधे-मध्येही अनेक फ्रिक्वेन्सी आहेत.
कोमल रिषभापासून शुद्ध रिषभापर्यंतही अधे-मध्ये अनेक फ्रिक्वेन्सी आहेत.
सोयीसाठी काळ्या रेषेवर लाल ठिपके दिले आहेत.
एखादा राग गाताना, त्याच्या अत्युत्तम अनुभूतीसाठी एखादा स्वर नक्की कोणत्या फ्रिक्वेन्सीचा गायला तर चांगले वाटते याचा अभ्यास पूर्वसूरींनी केला. आणि त्यातून उदा. कोमल रिषभाची षड्जाच्या जवळ जाणारी फ्रिक्वेन्सी किंवा शुद्ध रिषभाच्या जवळ जाणारी फ्रिक्वेन्सी त्यांना उमगल्या. ह्या फ्रिक्वेन्सी म्हणजेच श्रुती.
ढोबळ मानाने रागाचे स्वर सांगताना फक्त शुद्ध/ कोमल/ तीव्र स्वराचा उल्लेख केला जातो.
उदा. मल्हार राग, दरबारी राग= ह्यात कोमल गंधार येतो असे सांगतात.
पण दोन्ही रागात कोमल गंधार स्वराची जी फ्रिक्वेन्सी गायली जाते ती वेगळी असते.
तीव्र मध्यमाचीही श्रुती असते ना? मला खात्री नसल्याने मी त्याबद्दल लिहिले नाही.
अर्थात, हे बारकावे समजणे फार अवघड. मला फक्त थिअरी माहिती आहे, प्रॅक्टिकल म्हणाल तर बासरीवर वाजवताना अशा अधल्या मधल्या फ्रिक्वेन्सीस असतात एवढे जाणवले आहे. पण कोणत्या रागात कोणती फ्रिक्वेन्सी वाजवायची वगैरे ह्या बाबतीत मात्र मी 'ढ' आहे.
चैतन्य चांगली माहिती. तीव्र म
चैतन्य चांगली माहिती. तीव्र म ची पण श्रुती असतेच. हार्मोनियमवर वाजणारे स्वर हे मूळ स्वरापेक्षा काही कारणांनी tampered आहेत.
विद्याधर ओक यांनी २२ श्रुती असलेली हार्मोनिका केलेय. त्याच्या प्रात्यक्षिकाचा हा विडीओ पण बघा वेळ मिळेल तेव्हा. छान सांगितलय. https://www.youtube.com/watch?v=MJ3RQVIKErw
हार्मोनियम सारख्या वाद्यांवर फिक्स फ्रीक्वेन्सी वाजेल पण तंतुवाद्यावर (सतार/ व्हायोलिन / सारंगी / सूर मंडल ..आणि गळा
इ.) वर तुमच्या हातात असेल काय स्वर लावायचा ते.
एक शंका. तसे अनेक स्वर अगदी
एक शंका. तसे अनेक स्वर अगदी ह्या श्रुतींच्या मधे अधे पण असतील ना ? मग त्या कणांना का नाही मोजले श्रुतींमधे? म्हणजे २२ च श्रुती का? त्या तर अनेक असतील ना.
dhanyavaad chaitanya.. khup
dhanyavaad chaitanya.. khup chaan maahIti dilis..
I think it might be more difficult to capture these shrutis on harmonium than on strings right?
or to capture these shrutis on harmonium may require lots of thinking and Riyaz?
barobar ka??
सुमेधाव्ही, भारतीय शास्त्रीय
सुमेधाव्ही,
भारतीय शास्त्रीय संगीतात 'अॅब्सोल्यूट' असं काही नाहिये.
त्यामुळे मी ते मधले ठिपकेही सोयीसाठीच दाखवले आहेत.
आता श्रुती २२ च का असं म्हणाल तर त्यामागे पूर्वसूरींचा अभ्यास आणि आपण कानांनी ऐकून ओळखू शकू अशा आणि त्या त्या रागाला अनुकूल अशाच फ्रिक्वेन्सी त्यांनी निवडल्या असाव्यात.
श्रीयू, बरोबर. हार्मोनियमवर अवघड आहे. वर अमितने सांगितले आहेच, हार्मोनियमवर स्वर जरा टॅम्पर्ड असतात असे.
http://www.youtube.com/watch?v=DOZP4YrNyko
इथे सरोदवर श्रुतींचे डेमोन्स्ट्रेशन दिले आहे. कोमल गंधार..
सुमेधाव्ही, फ्रिक्वेन्सी
सुमेधाव्ही, फ्रिक्वेन्सी पकडणे हा हेतू नसावा. कानाला गोड लागणाऱ्या श्रुती केल्या असाव्या.
वरचा ओक यांचा विडीओ नक्की बघा, बरीच उत्तर मिळतील.
तसे अनेक स्वर अगदी ह्या
तसे अनेक स्वर अगदी ह्या श्रुतींच्या मधे अधे पण असतील ना ? मग त्या कणांना का नाही मोजले श्रुतींमधे? म्हणजे २२ च श्रुती का? त्या तर अनेक असतील ना.>>>> असतातच.. आणि आहेतच.. त्यांना न मोजण्याचे कारण एकच ते म्हणजे कर्णमधुरता. १२वी च्या फिजिक्स मध्ये सोनोमीटरचा एक प्रयोग असतो.. त्यात हे फार छान समजते... त्या तारेवर वाजवल्यावर वेगवेगळ्या श्रुती मिळतात.. आणि त्यातील सगळ्याच श्रुती ऐकायला चांगल्या वाटत नाहीत.. पण ज्या चांगल्या वाटतात त्या ऐकल्या की लगेच लक्षात येतात...
श्रीयू.. हार्मोनियम वर श्रुति मिळणे अवघडच आहे.. कारण ठराविक पद्धतीत सेट केलेल्या रीड्स मधूनच वारा गेल्यावर स्वर वाजतात.. आणि त्यात काही बदल प्रत्यक्ष वाजवताना करता येत नाही..
तंतू वाद्य किंवा सुशिर वाद्यात मात्र सर्व श्रुती वाजवणे शक्य असते कारण त्यात वाजवणारा कसा वाजवतो त्यावर स्वर अवलंबून असतो. तंतू वाद्यात तर तार कशी लावली आहे त्यावरही बरेच अवलंबून असते. समजा सा ची तार लावताना ती ५१२ ह्या फ्रिक्वेन्सीवर लावायच्या ऐवजी ५१० किंवा ५०९ ह्या फ्रिक्वेन्सीवर लावली गेली तर सगळे सूर वेगळेच येतील.. ते लावलेल्या स्वर सप्तकात बरोबर असतील.. पण श्रवणीयतेच्या दृष्टीने कणसूर होऊ शकतील. तसेच ५१२ ला सा ची तार लावल्यावर बरोबर मध्यात पंचम वाजतो पण तो थोडा अलिकडे पलिकडे झाला की वेगळ्या श्रुतीतला पंचम लागतो..
काही चुकले असेल तर बरोबर करा रे...
चैतन्य, अनेकानेक धन्यवाद रे.
चैतन्य, अनेकानेक धन्यवाद रे. मला कधीपासून डॉ. ओक ह्यांचं श्रुतींवरचं विवेचन ऐकायचं होतं.
ह्या धाग्याचं शीर्षक बघून खरंच इथे तांत्रिक चर्चाच जास्त होईल असे वाटते. तसे असेल तर वाचनमोडातच राहायला आवडेल कारण मी खूप जास्त intuitively गाणं ऐकते. तेही बरोबर नाही ह्याची कल्पना आहे. शास्त्र आणि ऊर्मी ( नेमका शब्द काय वापरावा ? ) ह्याचा मध्य साधता आला पाहिजे खरं तर.
रॉबीनहूड, त्यातली एकच क्लिप ऐकली. चांगली वाटली. वर अनेकांनी म्हटल्याप्रमाणे गाणं ही गाऊन/ वाजवून दाखवूनच समजेल, नुसतं वाचून नाही समजणार.
हिम्सकूल आणि चैतन्य, सुरेख
हिम्सकूल आणि चैतन्य, सुरेख लिहिताय. वाचतेय आणि समजतेय
(No subject)
छान चर्चा चालू आहे. मजा येतेय
छान चर्चा चालू आहे. मजा येतेय वाचायला..
छान चर्चा , धन्यवाद सर्वांनाच
छान चर्चा , धन्यवाद सर्वांनाच
डॉ. विद्याधर ओक यांचे 22
डॉ. विद्याधर ओक यांचे 22 shruti and melodium असे सुंदर पुस्तक आहे.
http://www.22shruti.com/about
http://www.22shruti.com/about_dr_oke.asp
हार्मोनिअमचे सूर 'जरा
हार्मोनिअमचे सूर 'जरा टँम्पर्ड' असतात म्हणजे काय? तसे का असतात?
.. त्यांना न मोजण्याचे कारण
.. त्यांना न मोजण्याचे कारण एकच ते म्हणजे कर्णमधुरता.>>>>
माझी माहीती वेगळी होती. "श्रुयते इति श्रुति ( चुभुदेघे ) असे काहीतरी आठवते आहे.
मानवी कानांना ( सर्वसामान्य ) जितका फरक लक्षात येउ शकतो त्यावरुन ह्या २२ श्रुती आल्या आहेत.
ह्या श्रुतिंच्या मधल्या Frequency मानवी कान वेगळ्या काढु शकणार नाही.
ते चुकून टॅम्पर्ड झालंय
ते चुकून टॅम्पर्ड झालंय गजानन. टेम्पर्ड म्हणायचं होतं.
पाश्चात्य संगीताला 'टेम्पर्ड स्केल म्युझिक' असंही म्हणतात.
म्हणजे दोन स्वरांमधली अंतरे (किंवा त्यांच्या फ्रिक्वेन्सीचे गुणोत्तर) हे गणिती पद्धतीने ठरलेले असते.
हार्मोनियम हे मुळात परकीय वाद्य त्यामुळे त्यातले स्वरही असेच गणिती गुणोत्तराने सेट केलेले असतात.
याउलट आपल्याकडे श्रुतींचा वापर असल्याने सुरुवातीला मैफिलीत हार्मोनियम वाजवले जात नसे.
गायकाच्या साथीला सारंगीचा वापर व्हायचा. जेणेकरून गायकाच्या गळ्यातला सूर जसाच्या तसा त्या सहवाद्यातूनही येईल आणि खर्या अर्थाने पूरक सहवादन होईल.
नंतर नंतर हार्मोनियमचा वापर वाढला आणि आता रूढ झाला आहे.
समजा सा ची तार लावताना ती ५१२
समजा सा ची तार लावताना ती ५१२ ह्या फ्रिक्वेन्सीवर लावायच्या ऐवजी ५१० किंवा ५०९ ह्या फ्रिक्वेन्सीवर लावली गेली तर सगळे सूर वेगळेच येतील.. ते लावलेल्या स्वर सप्तकात बरोबर असतील.. पण श्रवणीयतेच्या दृष्टीने कणसूर होऊ शकतील. >>>>>> @हीकु - श्रवणीयते च्या दृष्टीने कसे कणसूर होतील?
जर सतारी चा सा ५१२ च्या ऐवजी ५०० वर जरी सा समजला, तरी बाकीचे स्वर त्या प्रमाणे Adjust होतील. स्वरांच्या Frequency चा रेशो महत्वाचा असतो.
पण त्या सतारी बरोबरचा तंबोरा पण ५०० ला सेट करायला लागेल.
डॉ बी व्ही केसकर नावाचे
डॉ बी व्ही केसकर नावाचे केन्द्रात एक नभोवाणी मंत्री होऊन गेले त्यानी आकाशवाणीवर हॉर्मोनिअम ला बंदी घातली होती. ती बहुधा याच कारणाकरता असावी. (ती चूक की बरोबर हा वेगळा विषय आहे...) ती उठवण्यासाठी कितीतरी दशके प्रयत्न करावे लागले... केसकर हे भातखंडे प्रणालीचे शिष्य होते
चैतन्य ओके, धन्यवाद. वर
चैतन्य ओके, धन्यवाद.
वर अमितव यांनी <हार्मोनियमवर वाजणारे स्वर हे मूळ स्वरापेक्षा काही कारणांनी tampered आहेत.> असे लिहिले ते समजले नाही. मूळ स्वर म्हणजे कोणता? किंवा कोणत्या वारंवारतेचा?
@हीकु - श्रवणीयते च्या दृष्टीने कसे कणसूर होतील? जर सतारी चा सा ५१२ च्या ऐवजी ५०० वर जरी सा समजला, तरी बाकीचे स्वर त्या प्रमाणे Adjust होतील. <<< हिमस्कूल, मलाही हे कळले नाही.
प्रश्न फार बाळबोध वाटण्याची शक्यता आहे. त्याबद्दल कृपया समजून घ्या. धन्यवाद.
आकाशवाणीवर हॉर्मोनिअम ला बंदी
आकाशवाणीवर हॉर्मोनिअम ला बंदी घातली होती. ती बहुधा याच कारणाकरता असावी. >>>>>
ह्या आणि अश्याच कारणासाठी होती बंदी.
१. हार्मोनियम मधे श्रुती वाजवायच्या झाल्या तर एका एका रागासाठी तश्या श्रुतींच्या सूरांची वेगवेगळी पेटी तयार करुन घ्यावी लागेल. असे करुन पण ती पेटी फक्त एकाच बेस "सा" साठी सुरेल वाजू शकेल. जर काळी २ साठी ट्युन केली तर काळी १ साठी बेसुर वाटेल.
२. भारतीय संगीतात, कुठलाच स्वर एकएकटा येत नाही. तो दुसर्या स्वराची आस घेउन येतो आणि नंतर पुढच्या स्वराला स्वताची आस देउन जातो. हे जसे च्या तसे वाजवणे पेटीवर शक्य नाही.
३. जरी दोन रागात एकच स्वर असेल तरी तो तंतोतंत सारखा नसतो. हे पण पेटीवर शक्य नाही.
Pages