शास्त्रीय संगीत प्रश्नोत्तरे

Submitted by webmaster on 9 June, 2008 - 21:35

हिन्दुस्तानी शास्त्रोक्तं संगीताचा उगम कुठे आणि कसा झाला?

माझ्या वाचण्यात आलेल्यापैकी काही theories खालील प्रमाणे:

Theory क्र. १) हिन्दुस्तानी शास्त्रोक्तं संगीत हे पर्शियन म्हणजे इराणी संगीतातून निघालयं. साधारण बाराव्या शतकात हे संगीत भारतात आलं आणि त्या नंतर काही महान विभूतिंनी (उदा. तानसेन इत्यादि) त्या संगीताला वेगवेगळी स्वरूपं दिली जसे खयाल, ध्रुपद, ठुमरी, कजरी, टप्पा इ.

Theory क्र. २) ही theory आपल्याला पार पुरातन काळात घेऊन जाते. ब्रम्ह्ना, हनुमान, शिव आणि क्रुष्ण ह्या देवादिकांनी चार 'मत' स्थापन केले. इथे 'मत' चा अर्थं 'मती' किंवा 'बुद्धी' असा घ्यावा.
ब्रम्हा-मत पासून खायाल गायन निघाले.
हनुमान-मत पासून ध्रुपद गायकी उत्पन्न झाली.
क्रुष्ण-मत पासून ठुमरी, कजरी इ. निघाले.
शिव-मत ...??? [ sorry , मला ह्या बद्दल फ़ारसं माहीत नाही].

इथून पुढे ह्या सर्वं गायकी प्रचलित झाल्या.

Theory क्र. ३) नारद मुनींनी गायन विद्या ही स्वर्गातून प्रुथ्विलोकांत आणली. अथर्वंवेदाचा पाठ हा हिन्दुस्तानी शास्त्रोक्तं संगीताच्या स्वरांमध्ये केल्या जातो. वेदांचं पठण होऊ लागल्यापासून हे संगीत प्रचलित झालं. हा झाला mythology चा भाग. परंतु ह्या मागील व्यावहारिक संदेश काय असेल?

ह्यातली कुठली theory खरी मानायची, आणि कितपत खरी मानायची?

ह्यावर कुणि प्रकाश टाकू शकेल काय? वरील माहिती दुरुस्तं करावयाची असल्यास जरूर करावी.

हा प्रश्न rakhalb यानी विचारला होता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिम्स, अतिशय सुंदर विशद करून सांगितलायस तो तोडा. त्याला कथ्थक नृत्य प्रकारात, गिनतीचा तोडा म्हणतात.
एकच सुचवणार आहे. त्यातला शेवटचा '१' (किंवा 'धा') हा पुढल्या आवर्तनाच्या समेवर यायला हवा. त्यासाठी एकाऐवजी दोन मात्रांचा पॉज हवा.
१ २ ३ ४ ५ १ २ ३ ४ ५ १ २ ३ ४ ५ १
२ ३ ४ १ २ ३ ४ १ २ ३ ४ १ २ ३ १ २
३ १ २ ३ १ २ १ २ १ २ १ ऽ ऽ १ ऽ ऽ

हे अती विशद झालं असेल तर माफ करा. पण राहवलं नाही.

माझ्याकडे अनेक जुन्या कॅसेट्स आहेत. त्या डिजिटल फॉर्मॅटमधे आणण्यासाठी, मी irever कंपनीचा mp3 प्लयेर घेतला. त्याला line input देता येतं. तेव्हा लाईन इनपुट देता येईल असा कोणताही mp3 प्लेयर चालेल. बहुतेक हे mp3 प्लेअर्स शहाणे अस्तात. सरळ सरळ wma किंवा mp3 फोर्मत मधेच फाईल तयार होते. अर्थात अख्खी कॅसेट करून मग त्यातल्या गाणांना विभागणं हा एक मोठ्ठा डोकेखाऊ प्रकार आहे. पण त्याला इलाज नाही.

दाद धन्यवाद...
खरे तर हे असेच पाहिजे... हे बरोबर आहे आणि वाजवताना पण बरोबर येते समेवर.. वाजवून बघितले पण.... पण बदलायचा कंटाळा केला...
=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"

नमस्कार,

२७ तारखेच्या सा रे ग म प कार्यक्रमात "स्वप्नातल्या कळ्यानो" हे सलामत अली खान(चु भु द्या घ्या) यांच्या कुठल्याशा गझलेवर आधारीत आहे असे (पंडीतजीनी) सांगितलेले ऐकले.

हे मुळ गाणे कुठे ऑन्लाईन आहे का?

धन्यवाद.

नमस्कार,

मला "स्वप्नातल्या कळ्यानो" चे पंडीतजीनी उल्लेख केलेले मुळ गाणे मिळाले.

http://www.hummaa.com/music/playlistpage.php?pid=30903
या लिन्क वर "ओ मोरे नैन" हे नजाकत अली खान, सलामत अली खान
यांचे गाणे ऐका.

धन्यवाद.

मनोज, 'स्वप्नातल्या कळ्यांनो' आणि या ठुमरीचा काही संबंध आहे असे म्हणायचे आहे का?

मनोज, 'स्वप्नातल्या कळ्यांनो' आणि या ठुमरीचा काही संबंध आहे असे म्हणायचे आहे का?
---------------------------------------------------------------------------
हो. हे गाणे (का ताना?) या मूळ ठुमरीवरुन घेतले असे पंडीतजीनी सांगितले. सारेगमप मधे अमृता नातु हे गाणे गायली तेव्हा तिला त्यानी सूचना केली की मुळ गाणे ऐका (सलामत खान यांचे).
त्यानी सांगितले की हे गाणे जेव्हा बनवले गेले तेव्हा ही ठुमरी खुप लोकप्रिय होती.

नमस्कार,मला पन्डित निव्रुत्तिबुवान्च्या लाइव्ह मैफिलीन्चे रेकोर्डिन्ग कुठे मीळु शकेल?

आयडिया सा रे ग म प या कार्यक्रमात काही वेळा काही स्पर्धकांना वरचा सां दिला आहे पण सा च्या वर टिंब का दिले नाही?

स्वरलिपी संबंधी माहिती कुठे मिळेल ? भातखंडे, पलुस्कर तसेच परकीय स्टाफ नोटेशन या लिप्यांची माहिती कुठे वाचता येईल ?

ही माझी एक आवडती साईट..:)
http://homepage.mac.com/patrickmoutal/macmoutal/rag.html

आमिर खान साहेब, बडे मियां गुलाम अली खान साहेब, बंदे खान, अब्दुल करिम खान, केसर बाई
सगळ्यांना ऐकता येइल इथे..:)
बालगंधर्वांचा जोगिया कलिंगडा खासच

यू ट्यूब वर शोधा
Artists च्या नावाने शोध घेतला तर खूप काही सापडेल (उदा. Jasaraj ; Hariprasad ; Zakir & so on)
Down load करण्यासाठी keepvid या साइट्चा वअपर करावा

सन्जीव

१ हंसध्वनीतील चीज, ताल - त्रिताल. जा तोसे नहीं बोलू कन्हैया वर हा प्रतिसाद, त्याच रागात.

स्थायी
बोलत नाही काहे मोसो

ऐसो गुमान काहेको तुमको

अंतरा
समझत नाही कैसे समझाऊं

नितही दुखावत अतही मनको

देवा, हि फारच सुंदर साईट आहे. बहुतेक सगळी गाणी मी डाऊनलोड केली आहेत. त्यासाठी रात्री जागरण केले आहे. पण सार्थक झाले. एखादीच चीज छान असे नाहीच सांगता येत. सगळीच नाणी अस्सल आणि खणखणीत आहेत. सुशीला टेंबे, यांचा तराणा, तर मी रोज आठ दहा वेळा ऐकतोय.

उदय भवाळकरांच्या गायकीच्या काही सीडी उपलब्ध आहेत का बाजारात? मी मुंबईला र्‍हिदम हाऊस, ठाण्याला जय गणेश आणि पुण्याला एका दुकानात (लक्ष्मी रस्त्याच्या सुरुवातिलाच आहे - आता नाव नाही आठवत) विचारले पण कुठेच नाही मिळाली.

खूप वर्षानी चारही दिवस हजेरी लावली
दोन गोष्टी जाणवल्या. sound balancing improove व्हायला हवे. काही वेळा तबला कमी वाटला. एकूणच आवाज थोडा कमी वटला.शाहिदजीन्च्या मीन्डमधले शेवटचे स्वर ईकू येत नव्हते.
दुसरे म्हणजे प्रत्येक कलाकाराला वेळ जास्ती मिळाला पहिजे. विशेश करून हरिजी ; कशाळकरजी वगेरे याना. कदचित एकूण कलाकारान्ची सन्ख्या कमी करायला लागेल त्यासाठी.

एकूण fresh वाटले

गोल्डन माइलस्टोनस नावाने एक सिरीज आहे जुन्या क्लासिकल तबकड्यांची. त्यातली पलुस्करांची सीडी मी कॉपी करुन घेतली आहे ( त्या आधी रिदम हाउस मधे शोधली होती , पण मिळाली नाहि Sad ).
त्यातल्या गाण्यांचे शब्द नीट कळत नाहीयेत मला. फ्रीडीबी वर पण जे दिसतात ते काही नीट वाटत नाहीत. कोणाकडे सीडी असल्यास , किंवा चीजा माहिती असल्यात इथे ( किंवा माझ्या विपु मधे ) लिहाल का ?

नेमके कुठले पलुस्कर... विष्णू दिगंबर पलुस्कर की डी व्ही पलुस्कर.. ? डी व्हीं च्या काही चीजा सीडी च्या दुकानात डाउनलोड करता येतात.. कोयलिया बोले अंबुवा , पायोजी मैने रामरतन धन पायो, ठुमक चलत रामचंद्र एवढे तीन मी घेतले आहेत..

http://www.youtube.com/watch?v=S-iBG3Fl4j0

पायलिया झनकार..

हे कुठल्या चित्रपटातील आहे... ?

पूरिया धनाश्री.

पं भिमसेन यांच्या आवाजातील कुठे मिळेल?

(रंगीला मधील हाय राम ये क्या हुआ च्या आधी आहे.. )

अखिया हरिदर्शन की प्यासी.... मोहम्मद रफी... मी एकदा हे रेडिओवर ऐकले होते... मारवा (?) की पूरिया आहे... आज सापडले.. हे कुठुन डाउनलोड करता येईल?

http://www.youtube.com/watch?v=gLDXrE_4PHo

पलुस्करांच्या बाकीच्या गाण्यांचे शब्द मलाही समजले नव्हते.. म्हणून मीही एवढीच गाणी घेतली होती.. Happy .. यु त्युब वर मिळतील..

Pages