शास्त्रीय संगीत प्रश्नोत्तरे

Submitted by webmaster on 9 June, 2008 - 21:35

हिन्दुस्तानी शास्त्रोक्तं संगीताचा उगम कुठे आणि कसा झाला?

माझ्या वाचण्यात आलेल्यापैकी काही theories खालील प्रमाणे:

Theory क्र. १) हिन्दुस्तानी शास्त्रोक्तं संगीत हे पर्शियन म्हणजे इराणी संगीतातून निघालयं. साधारण बाराव्या शतकात हे संगीत भारतात आलं आणि त्या नंतर काही महान विभूतिंनी (उदा. तानसेन इत्यादि) त्या संगीताला वेगवेगळी स्वरूपं दिली जसे खयाल, ध्रुपद, ठुमरी, कजरी, टप्पा इ.

Theory क्र. २) ही theory आपल्याला पार पुरातन काळात घेऊन जाते. ब्रम्ह्ना, हनुमान, शिव आणि क्रुष्ण ह्या देवादिकांनी चार 'मत' स्थापन केले. इथे 'मत' चा अर्थं 'मती' किंवा 'बुद्धी' असा घ्यावा.
ब्रम्हा-मत पासून खायाल गायन निघाले.
हनुमान-मत पासून ध्रुपद गायकी उत्पन्न झाली.
क्रुष्ण-मत पासून ठुमरी, कजरी इ. निघाले.
शिव-मत ...??? [ sorry , मला ह्या बद्दल फ़ारसं माहीत नाही].

इथून पुढे ह्या सर्वं गायकी प्रचलित झाल्या.

Theory क्र. ३) नारद मुनींनी गायन विद्या ही स्वर्गातून प्रुथ्विलोकांत आणली. अथर्वंवेदाचा पाठ हा हिन्दुस्तानी शास्त्रोक्तं संगीताच्या स्वरांमध्ये केल्या जातो. वेदांचं पठण होऊ लागल्यापासून हे संगीत प्रचलित झालं. हा झाला mythology चा भाग. परंतु ह्या मागील व्यावहारिक संदेश काय असेल?

ह्यातली कुठली theory खरी मानायची, आणि कितपत खरी मानायची?

ह्यावर कुणि प्रकाश टाकू शकेल काय? वरील माहिती दुरुस्तं करावयाची असल्यास जरूर करावी.

हा प्रश्न rakhalb यानी विचारला होता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फिती? म्हणजे तुमच्या काळात असायच्या तशा कॅसेट्स का? Proud
माझ्याकडे आता कॅसेट प्लेयरसुद्धा नाही, नाहीतर मी नेल्या असत्या. संगणकावर घातल्यात की कळवा मला. Happy

संगीत मी आता संगणकावर घालणार >> म्हणजे मॉनिटरवर राग यम, भूप, भैरवी.. सी.पी.यू.वर राग ललत, तोडी, आसावरी.. कीबोर्डवर राग मालकंस, हंसध्वनी, शंकरा.. आणि माऊसवर राग मल्हार, बसंत, जयजयवन्ती का? Light 1
संगणकावर पोचले की मला ही कळवा..
=========================
नूतन वर्षाभिनंदन..

स्वाती, वाट बघा! खरेच. माझ्याकडे यंत्र आहे, ते वापरून बघितलेहि आहे, चांगले चालते.

माझ्याकडे आहे(त) कॅसेट प्लेयर (स).
मला पाठवा त्या धनिफिती. मी सांगिन कुठले राग आहेत वगैरे.
संग्णकावर घातल्यात तरी पण पाठवा. मी तुमची आठवण काढत ऐकेन

पत्ता द्या. पण त्या कॅसेट्स वर लिहायला पाहिजे, कोणता राग ते, नि सकाळचा का दुपारचा की कुठल्या वेळचा ते पण!!! ते काम करणार का?

आर्याने जेव्हा झाले युवती मन म्हंटलं होतं तेव्हा पण तेव्हा शंकर महादेवन ने होहंसध्वनी रागामधला एक सुरावट म्हंटली होती... सही होतं ते एकदम.. !! त्यानी आणि आर्यानी एकत्र म्हंटलं होतं ते.. गाणं आणि ती सुरावट.. लिंक टाकेन अहोंकन चं यु ट्यूब प्रोफाईल अप झालं असेल तर.. Happy

सारेगमप मधे म्हंटल्या जाणार्‍या गाण्यांवरची अशाप्रकारची चर्चा तिथे पण करा रे.. !!!!

किशोरी ताईंचा हंसध्वनी परत ऐकत्येय अत्ता - गणपत विघ्नहरन गजानन (ताल अडाना)............आज सजन संग मिलन (दृत तीनताल)............आणि तराना.........मोजुन ७० मिनीटे.... एक आवर्तन ऑलरेडी झालेय... Happy तंद्रीच लागते ऐकताना........

त्या आधी भूप ऐकला - सहेला रे...आहा हा....

आता सांगु नका त्या वेळेचे राग त्या त्या वेळेलाच ऐका म्हणून....

काही वर्षांपुर्वी संगणकाच्या सहाय्यानी संगीत रचायचे काही प्रयोग मी केले होते. त्यात हंसध्वनी देखिल होता. इतक्यात तिकडे फिरकलो नाही. इथे त्या लिंक्स देत आहे:

http://www.astro.caltech.edu/~aam/music/music.html

--------------------------------------------------------------
... वेद यदि वा न वेद

चर्चा तिथे पण करा रे.. !!!!>>> करायला काय हरकत नाय..पण तो बीबी फक्त भेलांडे बाई आणि पल्लवी जोशी च्या ड्रेस सेन्स वैगरे साठी राखीव आहे काय असे वाटते... Proud

०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा

माला जवारी बाबत बाबत अस वाटत ,रैना म्हणतात ते अगदी बरोबरच, पण आमच्या गुरुंच्या सांगण्या प्रमाणे, जेव्हा तंबोरा लावतात तेव्हा (प सा सा सा ) लावल्या नंतर शेवटचा सा वाजतो तो पर्यंत प ची आस मिळायला पाहिजे म्हणजे तो नाद तो पर्यंत मिळाला पाहीजे, तर सा पर्फ्क्ट लगतो (म्हण्जे कानात घुमला पाहिजे)तसाच गळ्यातुनही निघण आवश्यक आहे. तंबोर्याची जव्हारी अ‍ॅडजेस्ट करुन तो झंकार कमी अधिक केला जातो, त्या साठी जे दोरे वापरतात ते सुद्धा ठराविक नंबरचे वापरतात, योग्य इफेक्ट येण्यासाठी म्हण्जे झंकार छान मिळतो त्यातुन गळ्यातुनही असाच निघण अपेक्षित आहे, कदाचित लिहीण्या पेक्षा गाऊन दाखवण अधिक सोप आहे अस वाटत.
माझ्या अल्पबुद्धी ला झेपेल त्याप्रमाणे मांडायचा प्रयत्न केला.चु भु देणे घेणे

झक्की काका, मराठी गाणी रागावर आधारित इथे पहा
http://www.swarganga.org/marathisongs.php

आणि हिंदी काही इथे आहेत
http://www.swarganga.org/hindisongs.php
तुम्ही वसंतराव देशपांड्यांचा मारवा ऐकला आहे का ?

स्मिता, वसंतराव देश्पांडेंचा, बरवा, जैत आणि मधुकंस या रागाचे अगदी जुने ध्वनिमुद्रण आहे माझ्याकडे. आपण ज्या वेळेपासुन त्याना ऐकतोय त्याच्याही बर्‍याच अधीच्या काळातले आहे हे.
वर्णन काय करु ? असमर्थ आहे मी.

झक्की तूम्ही कॅसेट वरुन एम पी थ्री करण्यासाठी कुठले तंत्र वापरता ? माझ्याकडे काहि जुने दुर्मिळ संगीत होते ( लताच्या आवाजात गीतेचे अध्याय वगैरे ) मला मागे प्रियाने सविस्तर समजावले होते, पण मला ते जमले नाही.
मग आय पॉड वर रेकॉर्ड करुन बघितले, ते जमले पण त्यात स्पष्टता नाही. तूमचे तंत्र इथे सविस्तर लिहाल का ?

अगदी खरय, नंतर मला मधुकंस आणि मारवा सीडीवर पण मिळाला,तो पर्यंत कॅसेट होत्या माझ्या कडे
हरवुन जातो अगदी त्यांच गाण ऐकुन.
वर्णन काय करु ? असमर्थ आहे मी.>>>अगदी अगदी

स्मिता. आसचे वर्णन पर्फेक्टट्ट !! ह्यावरुन खाललेली बोलणी माझ्या कानात अजून आहेत.

लोकहो- ह्यावरील एका पुस्तकाबद्दल मी यो.जा टाकलय आत्ताच.

अगदी खरय, त्यावरुन्ही कितीदा बोलणी खाल्लीयत
तसा जर तंबोरा लागला तर ब्रम्हानंदी लागते नाही ?

तंबोरा लावायची अजूनही धास्तीच वाटते. येत्या पाच वर्षात शिकेन असा अंदाज आहे. Happy
आमचे गुरुजी म्हणतात- "सुरों मे आस आनी चाहिये " (गाताना).

पुण्यात आहेस का ? कुठे शिकता ?

कॅसेट वरून एम्.पी.थ्री. करायची माझी पद्धत..

माझ्या कडे गोल्ड वेव्ह नावाचे एक सॉफ्टवेअर आहे.. त्यावर रेकॉर्डींग संदर्भात बर्‍याच सोयी उपलब्ध आहेत.. डेस्कटॉपच्या Line In पोर्टचा वापर करून रेकॉर्डिंग करावे लागते. तुमच्या कडे असलेल्या कॅसेट प्लेअर च्या Line Out किंवा headphone ह्या पोर्ट मधून वायर घेऊन ती डेस्कटॉपच्या Line In पोर्ट मध्ये लावायची... नंतर आधी गोल्ड वेव्ह मध्ये रेकॉर्डींग चालू करुन नंतर कॅसेट सुरु करायची.. ह्यात एक तोटा आहे. जर कॅसेट प्लेअरचे Headphone पोर्ट वापरले तर कॅसेट वरती काय वाजते आहे ते ऐकू येत नाही.. त्यावेळेस आख्खीच्या आख्खी कॅसेट रेकॉर्ड करुन घ्यायची आणि नंतर त्याचे पाहिजे तसे भाग करुन वेगवेगळ्या एम्.पी.थ्री फाईल्स बनवायच्या...
सर्वात महत्त्वाचे... तुमचा कॅसेट प्लेअर उत्तम स्थितीत व योग्य त्या टेम्पोने गाणे वाजवणारा असला पाहिजे.
=========================
नूतन वर्षाभिनंदन..

बेगम अख्तर वरच्या लेखात 'आवाजाला पत्ती पडायचि' असा उल्लेख वाचलाय. त्याचा अर्थ काय ? एखाद्या रेकॉर्डिंगचा दाखला देता येईल का ?

दिनेश, माझ्याकडे ion कंपनीचे Tape2PC नावाचे यंत्र आहे. त्याची मापे: साडे एक्केचाळीस सें मी. लांब;१३ सें मि. उंच नि पावणे बावीस सें मि. रुंद. USB ने ते संगणकाला जोडण्यात येते. त्याच्याबरोबर त्यांचे सॉफ्टवेअरपण येते. त्यात i-tunes वापरतात (free download) प्रथम टेपवरून त्या यंत्रात, मग i tunes export अश्या दोन तीन पायर्‍यांतून एक गाणे संगणकात जाऊन बसते. मग itunes मधे जाऊन जुळवाजुळव करता येते, जसे सगळे सकाळचे राग एका ठिकाणी वगैरे.

मूळ टेप सुद्धा चांगली असायला पाहिजे. कॅसेट प्लेयरची गरज नाही.

मी वाट पहातो आहे, की त्यात एका बाजूने सगळ्या कॅसेट्स एकदम ओतायच्या नि दुसर्‍या बाजूने सीडिज बाहेर पडतील, लेबलसकट! Happy

गिरगावात ठाकुरद्वारी मी पाच वर्षांपूर्वी (साधारण २००४ मध्ये) काही खूप ३०-३५ वर्ष जुन्या भाषणांच्या ऑडीओ कॅसेट्स सीडी मध्ये (.wav)उतरवून घेतल्या होत्या. अगदी व्यवस्थित आणि चोख काम झालं. सगळ्या भाषणांचे चांगले बॅक अप्स सुद्धा झाले त्यामुळे. पुढे मग मी ती सगळी भाषणे सीडी मधून एम पी ३ मध्ये बदलली wav to mp3 वापरून.

शोनू, 'पत्ती लागणे' म्हणजे टिपेच्या सुरावर जाताना आवाज काहीसा फाटतो / चिरकतो - पण काही गायकांच्या बाबतीत तसं झालेलं ऐकताना कानाला त्रास होत नाही, उलट त्याने गाण्याची खुमारी वाढते. पत्ती ठरवून (इथले रॉक / पॉप गाणारे ठरवून raspy आवाज काढतात तसं) लावता येत नाही.

(ऐकीव माहिती. चुभूद्याघ्या.)

आभार सगळ्यांचे, आता देशात गेल्यावर उद्योग करणार हा.

परविन सुलतानांच्या ह्या भजनाची MP3 मिळु शकेल का कोणाकडून?
>>> मृण्मयी जर तुम्हाला mp3 मिळाली नाही, तर
http://www.dvdvideosoft.com/free-dvd-video-software.htm इथले freeware software download करा.
युट्युब वरचे विडिओज डायरेक्ट डाउन्लोड करता येतील.. ते mp3, mp4 (iPod compatible), विडिओ फाइल्स मधे डाउन्लोड करता येतात..फक्त आपण ती युट्युब ची लिन्क द्यायची.
मी वापरतोय ते.. मस्त आहे एकदम Happy

०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा

स्वाती
धन्यवाद. कुठल्या रेकॉर्डिंग मधे ऐकलं असशील तर लिंक दे ना प्लीज ?

हिम्या, मी रेकॉर्डपॅड नावाचं सॉफ्ट्वेअर वापरतो. फीचर्स सही आहेत, पण ते 'फ्रीवेअर' नाहिये. Sad

आणि,
<<<ह्यात एक तोटा आहे. जर कॅसेट प्लेअरचे Headphone पोर्ट वापरले तर कॅसेट वरती काय वाजते आहे ते ऐकू येत नाही.. त्यावेळेस आख्खीच्या आख्खी कॅसेट रेकॉर्ड करुन घ्यायची आणि नंतर त्याचे पाहिजे तसे भाग करुन वेगवेगळ्या एम्.पी.थ्री फाईल्स बनवायच्या...>>>

मला हा प्रॉब्लेम नाही येत. PC स्पीकर्समधून रेकॉर्ड होत असतानाही आवाज येतो की! 'व्हॉल्यूम कंट्रोल्स'मध्ये जाऊन 'Mic Volume' चालू करून पहा. (Recording नव्हे; Playback मध्ये.)
बाय डीफॉल्ट हा म्यूट असतो.
(जर Microphone Tabच दिसत नसेल तर Options>Properties>Playback मध्ये जाऊन Microphoneवर 'टिक' करायला लागेल.)
बहुधा ह्यानं सुटावा प्रॉब्लेम.. Happy

आर्फ्या, बघतो करुन...
=========================
नूतन वर्षाभिनंदन..

Pages