दु:खद घटना - जुना धागा

Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला वाटते हल्लीच इंडीयन आयडॉलमध्ये आशा भोसले आल्या होत्या त्यांच्यासोबत आरडींचे जुने वादकही होते, त्यांच्यात मनोहारी होते...>>> हो.,

वाचून वाईट वाटले. इश्वर त्याच्या मृतात्म्याला शांती देवो.

आत्ताच वाचलेल्या बातमीनुसार आपले एक मायबोलीकर "भोचक" उर्फ अभिनय कुलकर्णी यांचे धुळे येथे अपघाती निधन झाले. Sad
त्यांची पत्नी आणि मुलगी अपघातातून बचावल्या आहेत. या प्रसंगातून सावरण्याची त्यांना शक्ती मिळो या सदिच्छा.

Uhoh

अरेरे Sad
ईश्वर त्यांना शांती देवो.
त्यांचा आय्.डी. शक्य असेल तर कधीच उडवू नका इथून.
..... परि आय.डी. रुपे उरावे !

मी एकदम भावनेच्या भरात त्यांना विपू टाकून आलेय. हे विचित्र वाटलं तर अ‍ॅडमिन प्लिज माझा तिथला मेसेज उडवा.

Sad श्या!

Sad

बापरे.. खुप धक्कादायक..

अपघाताच्या बातम्या रोज वाचतो पण आपल्या ओळखीतला माणुस त्यात सापडला की अचानक कोणीतरी धक्का मारुन जागे केल्यासारखे वाटते.. Sad

बाप रे Sad

भोचक यांचे मिसळपाववरील लेख वाचले आहेत. (प्रचंड आवडलेही होते) ( इथे ते लेख आहेत की नाहीत माहीत नाही)..
इतकं सुंदर लिखाण करणारा,कालपरवापर्यंत लिहीता असलेला माणूस असा जातो म्हणजे काय??? Sad
फार धक्का बसला!!

खूप वाईट वाटलं वाचून... Sad भोचक यांच्या कुटुंबियांना देव हा आघात सहन करायची शक्ती देवो.

Sad

Sad

अतिशय वाईट बातमी. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि कुटुंबियांना सावरण्याची शक्ती. Sad

बापरे... आपला मायबोलीकर?
त्यांच्या कुटुंबियांना ह्यातून सावरायला बळ मिळो...

आपल्या कुटुंबातली व्यक्ती गेली. धुळ्याला कुणी मायबोलीकर असतील, तर प्रत्यक्ष भेटून
मायबोलीकरांच्या भावना पोहोचवता येतील का ?

काहीच दिवसापूर्वी श्री.अभिनय कुलकर्णी यांनी "लोकमत" मध्ये लिहिलेला "मराठी ब्लॉगजगत" हा सुंदर आणि अभ्यासपूर्ण लेख वाचला होता. त्यांचा अकाली मृत्यु खरंच चटका लावणारी घटना होय. ईश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो.

Pages