Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
आज २९ डिसेंबर....राजेश खन्ना
आज २९ डिसेंबर....राजेश खन्ना यांचा जन्मदिवस. त्याचे औचित्य साधून कोल्हापूरच्या रा.शाहू स्मारक भवनात येथील अक्षर प्रकाशनने 'पहिला सुपरस्टार' हे पुस्तक प्रकशित केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नाट्य आणि सिने अभिनेत्री श्रीमती आशालता वाबगांवकर आणि दिग्दर्शक यशवंत भालकर उपस्थित होते.
संयोजकांनी कार्यक्रम सुरू करण्याची सूचना निवेदकाला देताक्षणीच आशालताताईनी त्याना थांबविले. सभागृहात उपस्थितासमोर 'निर्भया' च्या दु:खद निधनाबद्दल बोलून तिच्यासाठी आपण दोन मिनिटाची शांतता पाळून तिला श्रद्धांजली अर्पण करू आणि मगच मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करू या अशी सूचना केली....ती अर्थातच सर्वानी मान्य केली आणि त्या दुर्दैवी जीवाला सभागृहाने मूक श्रद्धांजली दिली.
नंतर मुख्य भाषणातदेखील आशालताताईंनी या उद्वेगजनक घटनेचा उल्लेख करून सुरक्षिततेच्या प्रश्नाबाबत सार्या स्त्रियांच्या वेदना मांडल्या.
सर्व जण आपापल्या घरच्यांशी,
सर्व जण आपापल्या घरच्यांशी, कमीत कमी वयात आलेल्या मुलं मुलींशी संवाद साधा. नोकरी करणारे - तुम्ही सर्वजण सर्व जाती-धर्म-प्रदेश या लोकांच्या संबंधात येता. तुम्ही संवाद साधा. तुमच्या आजूबाजूला जितक्या मुली आहेत त्याना विश्वासात घेऊन चक्क vigil group स्थापन करा.
स्थानिक पोलिस अधिकार्याना भेटून संकटाच्या वेळी लवकरात लवकर कशी मदत मिळवता येईल याची माहिती घ्या आणि offices, societies मधे शिबिरे घेऊन ही माहिती द्या.
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17893501.cms डॉ.विनय वाईकर गेले
डॉ.विनय वाईकर गेले.... माझी
डॉ.विनय वाईकर गेले....
माझी उर्दुशी असलेली तोंडओळख, सलगीमधे रुपांतरीत होण्यात ह्यांच्या पुस्तकांचा मोठा वाटा आहे.
देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो..
डाॅ. वाईकरांना श्रद्धांजली.
डाॅ. वाईकरांना श्रद्धांजली.
आईना- ए - गझलकार वाईकरांना
आईना- ए - गझलकार वाईकरांना विनम्र श्रद्धांजली !!
मुंबईच्या प्रायोगिक,
मुंबईच्या प्रायोगिक, व्यावसायिक नाट्य वर्तुळातला एक महत्वाचा पण गेल्या काही वर्षात दुर्लक्षिला गेलेला प्रकाशयोजनाकार उमेश मुळीक यांचे निधन.
माझ्या पहिल्या वहिल्या नाट्यप्रयोगाचे (आतल्यासहित माणूस) लाइटस उमेशने केले होते आधी ठरलेल्या लाइटच्या मुलाला रंगीत तालमीत काही जमेना म्हणून एका शब्दावर मुंबईहून धावत आला. एक नुसती तालीम आणि दोन रं ता च्या रन्थ्रूज एवढ्यावर प्रयोगाचे लाइटस केले. कविता-नाट्याच्या या फॉर्मची लय, ताल, प्रवाह सगळं सगळं लाइटसमधून दिलं त्याने एवढ्याश्या तालमीवर.
वाईट वाटलं.
प्रकाशयोजनाकार उमेश मुळीक
प्रकाशयोजनाकार उमेश मुळीक यांना श्रद्धांजली!!!!
असा गुणी कलाकार दुर्लक्षित राहिला हे वाचून वाईट वाटलं !!
दुर्लक्षित म्हणजे गेल्या काही
दुर्लक्षित म्हणजे गेल्या काही वर्षांमधे. ८०-९० च्या दशकांत ज्याने ज्याने मुंबईत मराठी थिएटर केले असेल प्रायोगिक वा व्यावसायिक.. ते सगळे त्याला ओळखतात.
प्रेक्षकांना दिग्दर्शकही क्वचित माहिती असतात. बाकी तंत्रज्ञ तर दूरच.
'प्रेक्षकांना दिग्दर्शकही
'प्रेक्षकांना दिग्दर्शकही क्वचित माहिती असतात. बाकी तंत्रज्ञ तर दूरच'
अगदी बरोबर.. पडद्यामागचे कलाकार कायम पडद्यामागेच राहतात..शेवटपर्यन्त.
"...प्रेक्षकांना दिग्दर्शकही
"...प्रेक्षकांना दिग्दर्शकही क्वचित माहिती असतात. बाकी तंत्रज्ञ तर दूरच...."
~ कटु पण प्रखर सत्य आहे वरील वाक्यात. अन् ही स्थिती एकट्या मराठी रंगमंचाची नसून समस्त मनोरंजन क्षेत्रातील सार्या तंत्रज्ञांची आहे. सौरभ पारखे {किंवा योगेश केळकरही असेल कदाचित} यानी मागे केव्हातरी मराठी रंगभूमीवरील एक ज्येष्ठ प्रकाशयोजनाकार राघू बंगेरा यांच्या हलाखीचा उल्लेख करून अशा एरव्ही स्टेजवर 'प्रकाश' टाकणार्या पण आता स्वत: "अंधारा" त गेलेल्या वा ढकलल्या गेलेल्या तंत्रज्ञाविषयी 'सामना' किंवा 'लोकसत्ते'मध्ये जे लिहिले होते ते वाचून सुन्न झालो होतो. पत्नी कॅन्सरने गेली....मुलगा बायकोला घेऊन बाहेर पडला...अर्धांगवायूमुळे कामे मिळेनाशी झालीत...कमाईही अर्थातच आटली....वडापाव खावून दिवस ढकलणे नशिबी आले.
तीसचाळीस वर्षे प्रकाशयोजनेची सुंदर कामे करून, अनेक पारितोषिके मिळवूनही जर असे अंधाराच्या गर्तेत जगण्याचे दिवस ज्येष्ठाच्या भाळी येत असेल तर अन्यांची काय कथा !
ईश्वर....उमेशच्या आत्म्यास चिरशांती देवो.
डॉ. बि. मा बाचल यांचे
डॉ. बि. मा बाचल यांचे निधन.
बाचल सरांना विनम्र श्रद्धांजली!
हो, कळलं सकाळीच. अतिशय उत्तम
हो, कळलं सकाळीच.
अतिशय उत्तम शिक्षक. ज्यांचा विद्यार्थ्यांना खरा आदरयुक्त धाक होता असा मुख्याध्यापक!
विनम्र श्रद्धांजली
रकाशयोजनाकार उमेश मुळीक यांना
रकाशयोजनाकार उमेश मुळीक यांना आणि बाचल सरांना श्रद्धांजली!!
प्रसिद्ध लेखिका ज्योत्स्ना
प्रसिद्ध लेखिका ज्योत्स्ना देवधर यांचे पुण्यात राहत्या घरी निधन ..!! ईश्वर मृतात्म्यास शांती देओ ...!!
माझ्या लहानपणी पुणे
माझ्या लहानपणी पुणे आकाशवाणीचा 'गृहिणी' हा कार्यक्रम बुधवारच्या दुपारी मुंबई आकाशवाणीवरून सहक्षेपित होत असे. तेव्हा ज्योत्स्ना देवधर तो कार्यक्रम सादर करीत असत. पुढे त्यांची लेखिका म्हणून ओळख झाली.
श्रद्धांजली.
प्रसिद्ध लेखिका ज्योत्स्ना
ज्योत्स्ना
ज्योत्स्ना देवधर......'घरगंगेच्या काठी' निव्वळ ह्या एका कादंबरीमुळेही त्यांचे नाव नेहमी मराठी साहित्यक्षेत्रात कोरलेले दिसून येईल. आकाशवाणीवरील त्यांची कारकिर्दही त्यांच्या साहित्यप्रेमाने फुलून गेल्याचा इतिहास आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली.
भावपूर्ण श्रद्धांजली!
भावपूर्ण श्रद्धांजली!
व्हीजे सोफिया हक हिचं निधन.
व्हीजे सोफिया हक हिचं निधन.
सोफिया हक ही एमटिव्हीवर व्हीजे होती. कॅडबरीच्या जाहिरातीतली मैदानावर येऊन नाचणारी मुलगी.
ज्योत्स्ना देवधर यांना
ज्योत्स्ना देवधर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
सोफिया..... नव्वदच्या दशकातील
सोफिया.....
नव्वदच्या दशकातील तरुणाईला सदैव हसतमुख चेहर्याने 'एम' चॅनेलकडे खेचून घेणारी सोफिया. व्हीजे म्हणजे नेमकी काय पोस्ट असते हे त्यावेळी कुणाला समजले असेल वा नसेल, पण सोफियाच्या कार्यक्रमासाठी एम टीव्ही पाहाणार्यांची संख्या अतोनातच.
कॅन्सरशी झगडण्यातच तिची गेली काही वर्षे जात होती....अखेरीस कॅन्सरनेच तिला संपविले.
आपल्या लाडक्या खेळाडूचे शतक पूर्ण झाले म्हणून क्रिकेटच्या मैदानावर कॅडबरी खात खात दिलखुलास डान्स करीत, रक्षकांना गुंगारा देवून... धाव घेणारी सोफियाची ती अदाकारी खूप लोकप्रिय झाली होती.
आर.आय.पी.
ज्योत्स्ना देवधर आणि सोफिया
ज्योत्स्ना देवधर आणि सोफिया यांना श्रद्धांजली.
सोफिया हक आणि ज्योत्स्ना
सोफिया हक आणि ज्योत्स्ना देवधर- दोघींच्या मृत्यूची बातमी वेगवेगळ्या रितीने नॉस्टेल्जिक करुन गेली. वाईट वाटलं.
एमटीव्ही आणि सोफिया हे समीकरण डोक्यात अजूनपर्यंत फिट होते. चिन्मयने कॅडबरिच्या अॅडचा उल्लेख केला आहेच. मजा आणली होती त्या जाहीरातीने.
ज्योत्स्ना देवधर हे नाव मराठी पुस्तकांच्या लायब्रर्यांच्या आठवणीशी जवळून जोडले गेले आहे. कोणे एके काळी त्यांची (आणि चंद्रप्रभा जोगळेकर, शकुंतला गोगटे, सुमती क्षेत्रमाडे इत्यादी..) केव्हढी कथा-कादंबर्यांची पुस्तकं आईकरता आणता आणता मग त्यामुळे मी सुद्धा वाचल्याची आठवण आहे. ज्योत्स्नाबाईंचं 'घर गंगेच्या काठी' अजूनही आठवतय. मला वाटतं सिनेमाही आला होता एक मराठी त्यावर.
श्रद्धांजली!
श्रद्धांजली.
श्रद्धांजली.
ज्योत्स्नाबाईंना श्रद्धांजली!
ज्योत्स्नाबाईंना श्रद्धांजली!
-गा.पै.
माझे काका श्रि.नागेश म्हाञे
माझे काका श्रि.नागेश म्हाञे यांचे अचानक २३ जानेवारीला निधन झाले
त्यांना श्रद्धांजली!
ज्योत्स्ना देवधर आणि सोफिया
ज्योत्स्ना देवधर आणि सोफिया यांना श्रद्धांजली.
श्री. नागेश म्हात्रे यांना श्रद्धांजली..
अविगा तुमच्या परिवाराला हे दु:ख सहन करण्याचे बळ मिळो!!
जेष्ठ गांधीवादी ठाकुरदास बंग
जेष्ठ गांधीवादी ठाकुरदास बंग --- विनम्र श्रद्धांजली.
ज्येष्ठ सर्वोदयी नेते, थोर
ज्येष्ठ सर्वोदयी नेते, थोर स्वातंत्र्यसेनानी, प्रख्यात गांधीवादी डॉ. ठाकूरदासजी बंग यांचे निधन.
'माझा साक्षात्कारी हृदयरोग' या पुस्तकाचे लेखक व प्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचे हे वडिल. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो..
सकाळ मधल्या बातमीचा दुवा...
http://esakal.com/esakal/20130128/5430105612487576218.htm
Pages