दु:खद घटना - जुना धागा

Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

घटना खूपच दुर्दैवी. देव बळ देवो ज्यां लहानग्यांचे जीव गेले त्यांच्या पालकांना. Sad

बाकी, विपन्स बाळगण्याची दिलेली मुभा हा एक कळीचा मुद्दा आहे. मुलगा मानसिक रुग्ण असताना व तो कधीही वायोलंट होवु शकतो कल्पना असताना(जनरली मानसिक रुग्णांचा तोल जातोव जावू शकतो) ,स्वतःची आवड म्हणून असली थरारक विपन्स बाळगणारी व ती विपन्स सहजपणे घरात ठेवणारी ती बाई सुद्धा अजीब होती. घरात ठेवण्याचे काहीच रुल्स कसे नाहीत, बंद कपाटात न्हवती का एक सुद्धा एक प्रश्ण आहेच?
अशा मानसिक रुग्णांची खास सेवा हा सुद्धा एक प्रश्णच आहे.
असो, हा बीबी ह्या चर्चेसाठी नाही पण वरती मुद्द्यात आलेय म्हणून लिहिले.. क्षमस्व.

हो ,आत्ताच वाचले! अत्यंत दु:खद बातमी! आनंद अभ्यंकराबरोबर अक्षय पेंडसे (मला सासु हवी मधला कॅशच्या नवर्‍याचे काम करणारा) आणि पेंडसे यांचा दिड वर्षाचा मुलगाही गेला.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17736568.cms

Anand_Abhyankar.jpg

आनंद अभ्यंकरांचे जाणे चटका लावणारे आहे. बजाज अ‍ॅटो लिमीटेड इथे त्यांनी मेल रिसेप्शनीस्ट म्हणुन आपल्या करीयरची सुरवात केली. ( त्याकाळात बजाज मध्ये स्त्रीयांना नोकरी मिळत नसे) सुरवातीला कामगार नाट्य स्पर्धापासुन सुरवात केलेली अभिनयाची कारकिर्द पुढे कुर्यात सदा टिंगलम च्या व्यावसायीक नाटकाने ओळखली जाऊ लागली.

पुढे अनेक नाटके, चित्रपट आणि आत्ता सिरीयल्स मधुन हा गुणी कलाकार झळकत होता.

मातीच्या चुलीमध्ये अचानक अभिनेता सुधीर जोशींच्या मृत्युमुळे त्या चित्रपटात त्यांना अर्धी चित्रपट झाल्यावर सुधीर जोशींच्या ऐवजीचा रोल करावा लागला होता.

मला सासु हवी या मालिकेचे आता असेच काहीसे होणार असे दिसते. आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे व त्यांचा मुलगा या सर्वांना श्रध्दांजली.

Sad

Sad

Sad

भक्ती बर्वेनंतर आ़णखी दोन कलाकार मुंबई - पुणे एक्सप्रेस हायवेने आपल्या पासुन हिरावुन नेले Sad
तिघांनाही श्रध्दांजली

आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे तथा त्यांचा मुलगा यांना भावपुर्ण श्रध्दांजली !

हे वर्ष आणखी किती गुणीजनांना घेऊन जाणार आहे Sad

आनंद, अक्षय आणि त्या लहानग्या निष्पाप जीवाला श्रंद्धांजली. अक्षयच्या पत्नीस लवकर बरे वाटो आणि तिला हे दु:ख पचवायचे बळ मिळो ही देवाकडे प्रार्थना.

Sad

Pages