Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
संपादित
संपादित
फारच धक्कादायक बातमी... अरेरे
फारच धक्कादायक बातमी... अरेरे फार वाईट वाटले!!!
अतिशय दुर्दैवी घटना.आनंदजी,
अतिशय दुर्दैवी घटना.आनंदजी, अक्षय व प्रत्यूशला श्रध्दांजली.
संदिप खरे व पुष्कर शोत्री यांच्या प्रतिक्रियांवरही विचार करण्याची गरज आहे.
http://marathiactors.blogspot
http://marathiactors.blogspot.in/2012/12/anand-abhyankar-and-akshay-pend...
वाईट बातमी!
खूपच वाईट बातमी कोकणस्थ
खूपच वाईट बातमी कोकणस्थ चित्रपटाचे शुटीन्ग करुन रात्री सव्वा दहाला हे पाच जण निघाले होते इथे बघा.. http://www.youtube.com/results?search_query=akshay+pendse&oq=akshay+p&gs...
अतिशय दुर्दैवी अपघात.
अतिशय दुर्दैवी अपघात. श्रद्धांजली !
दुर्दैवी घटना! श्रद्धांजली!
दुर्दैवी घटना! श्रद्धांजली!
अरेरे काय हे!! >>>आनंद
अरेरे काय हे!!
>>>आनंद अभ्यंकरांनी साकारलेला 'असंभव'मधील आजोबा केवळ अविस्मरणीय >> खरंय.
श्रद्धांजली!!
दिल्ली रेप व्हिक्टिमचे
दिल्ली रेप व्हिक्टिमचे सिंगापूरमध्ये निधन.
<< दिल्ली रेप व्हिक्टिमचे
<< दिल्ली रेप व्हिक्टिमचे सिंगापूरमध्ये निधन. >>
माझी श्रद्धांजली. खूप वाईट झालं. नराधमांना मनुष्यवधाच्या गुन्हयाअंतर्गत लवकरात लवकर फाशी होईल ही आशा!
<< दिल्ली रेप व्हिक्टिमचे
<< दिल्ली रेप व्हिक्टिमचे सिंगापूरमध्ये निधन. > Just read d worst news of d day
आई गं!!! सुलु + १
आई गं!!!
सुलु + १
>>>>नराधमांना मनुष्यवधाच्या
>>>>नराधमांना मनुष्यवधाच्या गुन्हयाअंतर्गत लवकरात लवकर फाशी होईल ही आशा >>>>>>> आपण फक्त आशाच ठेवू शकतो. प्रत्यक्ष काही होत नाही. आजच अजून २ रेपच्या घटना वाचण्यात आल्या. कर्नाटकातील हासनमधे एक आणि अजून एक उत्तर भारतात कुठेतरी.
वाईट परिस्थिती आहे खरं.
दिल्ली रेप व्हिक्टिमचे
दिल्ली रेप व्हिक्टिमचे सिंगापूरमध्ये निधन<<< वाईट झालं. त्या मुलीच्या इच्छाशक्तीला आणि झुंझारी वृत्तीला माझा सलाम. शेवटी दैवच जिंकलं हे खरं असलं तरी तिने खूप प्राणपणाने लढा दिला...
दिल्लीच्या पिडीत युवतीने
दिल्लीच्या पिडीत युवतीने वखाणण्याजोगी झुंज दिली. सिंगापुरला हलवले असे वाचल्यावर शंकेची पाल चुकचुकली होती. निधन झाल्याचे वृत्त वाचुन वाईट वाटले.
तिच्या कुटुंबियांना आणि आप्तांना हा धक्का सहन करण्यासाठी आणि पुढील अत्यंत क्लिष्ट असा कायदेशीर लढा देण्यासाठी बळ मिळो.
त्या पोरीच मरण वाया जाऊ नये
त्या पोरीच मरण वाया जाऊ नये ही कळकळीची इच्छा! खरच खूप झुंजली बिचारी! तिच्या कुटुंबियाना कशी मदत करता येईल? कुणी सांगू शकेल का? या घटनेने भारतीय समाजात सकारात्मक उलथापालथ व्हावी.
संपूर्ण देश जी बातमी यायला
संपूर्ण देश जी बातमी यायला नको अशी प्रार्थना करीत होता, ती असह्य अशी बातमी आज पहाटे आलीच.
त्या दुर्दैवी घटनेनंतर तिने पहिले काही दिवस जगण्याची जिद्द दाखविली होती अशाच वार्ता येत होत्या....आईवडील, तो मित्र, तसेच दिल्ली पोलिस विभागाने नियुक्त केलेले अधिकारी यांच्याशी तिने थोडासा का होईना संवाद साधल्याचे बोलले गेले होते, त्यामुळे तिच्या जिवंत राहाण्याची आशा देशातील सर्वच नागरिकांना वाटत राहिली.
तरीही उपचारासाठी तिला 'सिंगापूर' ला नेले या वृत्तामुळे नाही म्हटले तरी मनात शंकेची पाल चुकचुकली होतीच. झालेही तसेच....तरीही ज्या जिद्दीने तिने त्या भयावह अशा घटनेचा आणि त्यामुळे झालेल्या जखमांचा सामना केला त्याबद्दल तिचे करावे तितके कौतुक कमीच.
भावपूर्ण श्रद्धांजली.
देश शरमिंदा आहे.! आज या
देश शरमिंदा आहे.!
आज या देशातील प्रत्येक भारतीय शरमिंदा आहे की आम्हि या देशातील परीस्थिती सुधारावी म्हणुन काहिहि केले नाहि!
khup vaaiit jhaal.. Ha bb
Ha bb varti disla ki halli bhitich vaatate :-/
अशोक + १
अशोक + १
श्रद्धांजली
श्रद्धांजली
या घटनेने भारतीय समाजात
या घटनेने भारतीय समाजात सकारात्मक उलथापालथ व्हावी. >>> +१
त्या नीच नराधमांनाही या अशा
त्या नीच नराधमांनाही या अशा प्रसंगातून जायला लावा.
प्रचंड संताप, मानभंगाचे दु:ख, अवहेलना, आगतिकता, पराकोटीची लाज, असहायतेची भावना या सगळ्या भावना काय असतात हे जाणवून देणारी शिक्षा करा. हीच 'निर्भया' करता आणि अशा इतर अनेक स्त्रियांकरता खरीखुरी श्रद्धांजली ठरेल.
उपचारासाठी तिला 'सिंगापूर' ला
उपचारासाठी तिला 'सिंगापूर' ला नेले या वृत्तामुळे नाही म्हटले तरी मनात शंकेची पाल चुकचुकली होतीच. झालेही तसेच..<<< हेच म्हणतो.
दुर्दैवाची परिसीमा! मात्र, ज्या अवस्थेत ती होती, तिचे निधन होणे हीच सुटका वाटावी अशी परिस्थिती होती असे म्हणावे लागेल.
भारतात गोंधळ होऊ नये म्हणून तिकडे हालवलेले असणे शक्य आहे. (किंवा कदाचित मृत्यूनंतरही तिकडे हालवलेले असणे शक्य आहे, नक्की कोणालाच काही समजणार नाही).
श्रद्धांजली, आदरांजली या शब्दांना येथे काही अर्थ नाही. तिच्या जिद्दीची वाखाणणी करण्यालाही! कारण ही परिस्थिती तिने एखाद्या महान कार्याच्या पूर्ततेत जिद्द दाखवण्यासाठी स्वतःवर ओढवून घेतलेली नव्हती, तर अत्यंत विकृत व अमानवी दुर्दैवाने हा घाला तिच्यावर घातलेला होता. तिची ही जिद्द कदाचित तिला स्वतःला समजलेलीही नसेल.
ती मागे सोडून गेलेल्या आपल्या समाजमनाला निदान इतका तरी तिच्या मृत्यूचा उपयोग व्हावा की अत्याचारी नराधमांना किंचित तरी जरब बसावी. जन आंदोलन छेडले जाऊ शकते याची तरी जाणीव व्हावी. दुर्दैवी जीव तर आता गेलेलाच आहे, त्यासाठी दोन आसवे गाळणे इतके सध्या आपल्या सर्वांच्या हाती आहे. आपापल्या घरात निदान अर्धे मिनिट शांत उभे राहून प्रार्थना करून तिच्या आत्म्यासाठी शांततेची विनवणी नशिबाकडे केली तर निदान आपल्या भावनांचा एकत्रीत परिणाम कुठेतरी अज्ञातात होईल अशी आशा वाटते.
बाकी, निर्भयाच्या मृत्यूनंतर 'स्त्रीवर अश्या कोणत्याही प्रकारचा अन्याय होताना आढळला तर आहोत तिथे थांबून तो अन्याय टाळण्याचा जमेल तसा प्रयत्न करण्याची' माझ्यापुरती प्रतिज्ञा!
-'भूषण कटककर'!
नराधमांना मनुष्यवधाच्या
नराधमांना मनुष्यवधाच्या गुन्हयाअंतर्गत लवकरात लवकर फाशी होईल ही आशा!>> +१
का हा समाज असा आहे? खोटारडा,
का हा समाज असा आहे? खोटारडा, दांभिक, क्रूर आणी वखवखलेला?? मिडिया म्हणते..तिला शांत मृत्यु आला! अरे काय बोलताय?
"...तिचे निधन होणे हीच सुटका
"...तिचे निधन होणे हीच सुटका वाटावी अशी परिस्थिती होती असे म्हणावे लागेल....."
~ अगदी अगदी मनातील लिहिले आहे श्री.कटककर तुम्ही. ज्या पद्धतीची वर्णने वाचनात येत होती तिच्या शारीरिक स्थितीची {सफदरजंग इस्पितळाचे चीफ सर्जनच बुलेटिन काढत होते} त्यावरून तिची त्या हालातून सुटका होणे म्हणजे नेमके काय व्हायला हवे याचे उत्तर मनी येत असे. तरीही 'प्रार्थना' नावाचा एक उपाय असतो मानवाच्या हाती....तो सारेच करत होते.
"...आपापल्या घरात निदान अर्धे मिनिट शांत उभे राहून प्रार्थना...."
~ हे आम्ही केले. आज सकाळी रंकाळ्यावरील आमचा स्वीमिंग ग्रुप पोहोणे आटोपून आपापल्या घरी जाण्याच्या तयारीत होता त्याचवेळी नंतर येणार्या दुसर्या ग्रुपमधील एकाने ही बातमी दिली. बसलेल्या धक्क्यातून सावरल्यानंतर आमच्या लीडरने त्या मुलीच्या आत्म्यासाठी 'दोन मिनिटाच्या शांततेचा/प्रार्थनेचा' प्रस्ताव मांडला, त्याला मी अनुमोदन दिले आणि त्या दुर्दैवी जीवाला श्रध्दांजली वाहिली.
शक्य असेल तर सर्वांनी आपापल्या परीने इतरांना घेऊन अशी प्रार्थना करावी.
मिडिया म्हणते..तिला शांत
मिडिया म्हणते..तिला शांत मृत्यु आला! >>>>> कसला शांत मृत्यु???? तिने किती वेदना सहन केल्या असतील याची कल्पनाच करु शकत नाहि!
बाकी, निर्भयाच्या मृत्यूनंतर
बाकी, निर्भयाच्या मृत्यूनंतर 'स्त्रीवर अश्या कोणत्याही प्रकारचा अन्याय होताना आढळला तर आहोत तिथे थांबून तो अन्याय टाळण्याचा जमेल तसा प्रयत्न करण्याची' माझ्यापुरती प्रतिज्ञा! >>>>> +१००
मीपण केली!
बाकी, निर्भयाच्या मृत्यूनंतर
बाकी, निर्भयाच्या मृत्यूनंतर 'स्त्रीवर अश्या कोणत्याही प्रकारचा अन्याय होताना आढळला तर आहोत तिथे थांबून तो अन्याय टाळण्याचा जमेल तसा प्रयत्न करण्याची' माझ्यापुरती प्रतिज्ञा! >>>>> शक्तीने नाही जमलं तर युक्तीने, स्वतःसाठी आणि इतर बहिणींसाठी अवश्य लढेन.
Pages