दु:खद घटना - जुना धागा

Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

pradyumnasantu यांना आणि सुहास भालेकर यांना श्रद्धांजली Sad

pradyumnasantu?
श्रद्धांजली
Sad
प्रत्येक कवितेवर त्यांचा आवर्जुन अभ्यासपुर्ण प्रतिसाद असायचा Sad

pradymnasantu ची बातमी धक्कादायक आहे. श्रद्धांजली... Sad

प्रद्युम्नसंतु यांना श्रद्धांजली Sad अनेक वेगवेगळ्या विषयांवर कविता करणारे मायबोलीकर म्हणून कायम लक्षात राहतील.

सुहास भालेकर आणी प्रद्युम्नसंतु यांना विनम्र श्रद्धांजली.:अरेरे:

प्रद्युम्नसंतु यांच्याबद्दल वाचुन मात्र धक्काच बसला.:अरेरे:

सुहास भालेकरांची असंभव मधली भूमिका अप्रतीम छाप उमवटणारी होती.

प्रद्युम्नसंतु ह्यान्ना भावपुर्ण श्रद्धान्जली. त्यान्ची एक कविता मला फार आवडली ती देत आहे. बघा बाप्पान्नी त्यान्चे ऐकले.!!!

तुज निरोप देताना बाप्पा
pradyumnasantu | 23 September, 2012 - 16:26
तुज निरोप देताना बाप्पा
जीव असा गलबलुन येतो
भक्तीत कमी झाले काय
तू इतक्या लौकर जातो
*
तो पाट रिकामा,पाच खडे
माझ्या हृदयातील ओरखडे
जणू गोकुळ ऐशा घरास तू
हे रिकामपण का देतो
भक्तीत कमी झाले काय
तू इतक्या लौकर जातो
*
त्या आरत्या, प्रसाद, नैवेद्य
आणि शुद्ध पदार्थांचे खाद्य
साक्षात तू आमच्या पंक्तीला
ऐकतो मी सतत मंगल वाद्य
मग पाचच दिवसांमधे कसा तू
आम्हास कंटाळतो
भक्तीत कमी झाले काय
तू इतक्या लौकर जातो
*
जर ठरवलेच तर ये देवा
पण पुढच्या वर्षी तू ये लौकर
मज गरज भासली तुझी तरी
तू येशील ना धावत सत्वर?
तू ये, तू ये, तू ये, तू ये
हा जीव सारखा पुकारतो
भक्तीत कमी झाले काय
तू इतक्या लौकर जातो
*
प्रद्युम्नसंतु

प्रद्युम्नसंतू ?

Sad

जस्ट शॉक्ड......... श्रद्धांजली!

खूपच विनम्र होते.. रिअली मिस् हीम

pradyumnasantu ह्यांना श्रद्धांजली Sad

सुहास भालेकर आणि प्रद्युम्नसंतू यांना श्रद्धांजली. Sad

प्रद्युम्नसंतू ..............

माझा तर विश्वासच नाही बसतय
Sad

pradyumnasantu यांना आणि सुहास भालेकर यांना श्रद्धांजली!

प्रद्युम्नसंतू ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

वयाचा अभिमान न मिरवता कुणाकडूनही कविता शिकणारा आणि आस्वादणारा माणूस!

प्रद्युम्नजीं? Sad

प्रद्युम्नजींची आणि माझी कसलीही ओळख नसताना एके दिवशी माझ्या वि. पु. मध्ये ह्या सह्र्दय आणि खर्‍याखुर्‍या कविमनाच्या कवीची खालीलप्रमाणे पोस्ट आली.............

1 August, 2012 - 09:44
नमस्कारः
आपली ओळख नाही. अधूनमधून मायबोलीवर मी कविता प्रकाशित करतो. सहज वाचता वाचता समजले की आपण इंटरस्टिशियल पल्मनरी फायब्रोसिसने त्रस्त आहात. मी देखिल. एक वर्षापूर्वी म्हणजे वयाच्या ६३ व्या वर्षी ही व्याधी डिटेक्ट झाली. सुरुवातीला ६० एम्.जी. स्टिरॉइड्स घेत होतो, आता १० एम्.जीवर आलो आहे. मला रामदेवबाबा यांचे 'श्वासारी' हे आयुर्वेदिक औषध खूपच उपयोगी पडले. खोकला व कफ जवळ जवळ गेला.
आपल्याला इथून अमेरिकेतून काही औषधे वगैरे लागल्यास जरूर कळवावे. मी पाठविनच.
माझा ई-मेल पत्ता satishkarnik@hotmail.com असा आहे. जरूर ई-मेल करावा.
आपला नम्र,
सतीश कर्णिक (प्रद्युम्नसंतु)

पोस्ट वाचुन मी अवाक झाले ! असंख्य मायबोलीकरांपैकी माझ्यासारख्या क्वचित कुठेतरी, कधीतरी मोठ्या मुश्किलीने शब्दांची जमवाजमव करुन अखेर अतिसामान्य प्रतिसाद देणार्‍या, कुणाच्या खिजगणतीतही नसणार्‍या मायबोलीकरणीची कसल्याही प्रकारची ओळख देख नसतानाही प्रद्युम्नजींनी इतक्या जिव्हाळ्याने आणि तत्परतेने विचारपुस केलेली बघुन मी अक्षरशः भारावुन गेले! यानंतर प्रकृतीसंदर्भात तीनदा आम्ही एकेमेकांना ईमेल्स केले. त्यानंतरच्या मधल्या काळात माझ्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही संपर्क होऊ शकला नाही. आणि आता ही बातमी.......... Sad

प्रद्युम्नसंतु यांस भावपूर्ण आदरांजली. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना!

मायबोलीकर वैभव वसंतराव कुलकर्णी (वैवकु) यांच्या मातु:श्रींचे काल रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. ईश्वर मृतात्म्यास शांती देवो व कुलकर्णी कुटुंबियांस हे दु:ख सोसण्याचे बळ देवो. मायबोलीकरांच्या श्रद्धांजलीपर भावना वैवकुंच्या सोबतीला आहेतच. Sad

Pages