दु:खद घटना - जुना धागा

Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खर तर ती घटना घडली तेव्हा पासूनच या विषया बद्दल लिहूच नये इतक दु:खी वाटत होत. नृशंसपणा च्या या दर्शनानंतर अनेक स्वतःला नेते म्हणवणारांनी आपल्या अकलेचे तारे तोडले. सहा लोकांसमोर आपल काय चालणार हे समजून तिन शरण जायला हव होत असा व्यवहारी सल्ला ही कुणीतरी दिला. पण इथच या मुलीच असामान्यत्व आहे. शरण जाण्याऐवजी ती लढली प्रतिकाराचा प्रयत्न केला. अत्याचार निमूटपणे सहन केला नाही. किती जगलात? या पेक्षा कस जगलात? हे महत्वाच याची आठवण करून देत भारतातल्या लोकांना अत्याचारा विरुध्द संघर्ष करायला शिकवून गेली ही मुलगी. श्रध्दांजली...

निर्भयाला भावपूर्ण श्रद्धांजली. तिचा मृत्यू वाया जाऊ नये अशी भयानक सजा त्या नराधमांना मिळायला हवी. काही दिवस बातमी चघळून संपायला नको हीच देवाकडे प्रार्थना !!

मिडियाने "तिला शांतपणे मृत्यू आला" अशा ज्या बातम्या प्रसृत केल्या आहेत त्याबद्दल इथे [तसेच अन्यत्रही] निषेधाचे सूर निघाले आहेत. वास्तविक तसे म्हटले गेले ते सिंगापूरच्या माऊंट एलिझाबेथ हॉस्पिटलकडून निघालेल्या बुलेटिनमधील भाषेमुळे. मुख्य प्रवक्ते डॉ.केल्व्हिन लोह यानी ती बातमी देताना म्हटले आहे की.... "She passed away peacefully at 4.45 a.m. (2.15 IST)," . त्याचा आधार घेऊन मग वार्तांकन झाल्याचे दिसते.

Sad फारच वाईट बातमी .............. श्रद्धांजली Sad

मनात चिड कायमच..आहे, काही दिवस बातमी चघळून संपायला नको हीच देवाकडे प्रार्थना !! +१

<<<बाकी, निर्भयाच्या मृत्यूनंतर 'स्त्रीवर अश्या कोणत्याही प्रकारचा अन्याय होताना आढळला तर आहोत तिथे थांबून तो अन्याय टाळण्याचा जमेल तसा प्रयत्न करण्याची' माझ्यापुरती प्रतिज्ञा!>>>
हे ठरवलेल्या सर्वांना सलाम.
अन्यायाचा प्रतीकार करणार्‍या मुलीला केवळ समाजाकडून पाठिंबा हवा असतो. लढण्याची शक्ती समाजातून मिळावी..आमच्याकडून नक्की प्रतीकार होईल..

चमत्कार घडावा आणि तिने त्या गुन्हेगारांना शिक्षा झालेली बघावी, अशी फार आशा होती मला.
तिच्या आत्म्याला शांती मिळावी, इतपत तरी आपल्या देशाने करावे !

फाशी नाही, भर चौकात हातपाय कापावे अश्या लोकांचे तरच तिच्या आत्म्याला शांती मिळेल.....:अरेरे:

मामी,

>> त्या नीच नराधमांनाही या अशा प्रसंगातून जायला लावा.

सहमत. त्याशिवाय त्यांना अक्कल येणार नाही.

त्या मुलीला श्रद्धांजली. भूषण म्हणतात तसा प्रतिकार अथवा युक्ती लढवण्याचा प्रयत्न करणार.

आ.न.,
-गा.पै.

उपचारासाठी तिला 'सिंगापूर' ला नेले या वृत्तामुळे नाही म्हटले तरी मनात शंकेची पाल चुकचुकली होतीच. झालेही तसेच..<<< हेच म्हणतो.
दुर्दैवाची परिसीमा! मात्र, ज्या अवस्थेत ती होती, तिचे निधन होणे हीच सुटका वाटावी अशी परिस्थिती होती असे म्हणावे लागेल.
भारतात गोंधळ होऊ नये म्हणून तिकडे हालवलेले असणे शक्य आहे. (किंवा कदाचित मृत्यूनंतरही तिकडे हालवलेले असणे शक्य आहे, नक्की कोणालाच काही समजणार नाही). >>>>>>> +१

बाकी, निर्भयाच्या मृत्यूनंतर 'स्त्रीवर अश्या कोणत्याही प्रकारचा अन्याय होताना आढळला तर आहोत तिथे थांबून तो अन्याय टाळण्याचा जमेल तसा प्रयत्न करण्याची' माझ्यापुरती प्रतिज्ञा! >>>>> शक्तीने नाही जमलं तर युक्तीने, स्वतःसाठी आणि इतर बहिणींसाठी अवश्य लढेन. >>>> +१
श्रद्धांजली. Sad
त्या जीवाला आतातरी शांतता मिळावी.

>>चमत्कार घडावा आणि तिने त्या गुन्हेगारांना शिक्षा झालेली बघावी, अशी फार आशा होती मला.
तिच्या आत्म्याला शांती मिळावी, इतपत तरी आपल्या देशाने करावे >><<
+१
अतिशय वाटत होते की तिला जगता येवून नराधमांना फाशी दिल्याचे एकावे.

श्रध्दांजली>+१

डोके सुन्न झालय आश्या बातम्या वाचुन
काय? कसे ?protect करु माझ्या बाळाला या सगळ्या पासुन
देवा मला शक्ती दे प्लीज

नाही वाचवत, नाही लिहवत....:-(

श्रध्दांजली!

माय गॉड! टोनी ग्रेग! सलाम!

(कालच उंच क्रिकेटपटूंमध्ये त्यांचे नांव व माहिती झळकली होती )

बलात्कार करणारे गुन्हेगार पकडले गेले तरी त्यांचा चेहरा समाजापासून लपविण्याची पद्धत आपल्याकडे आहे . त्यामुळे शिक्षा भोगून आल्यानंतरही अनेक गुन्हेगार समाजात उजळ माथ्याने वावरतात . यातून चुकीचा संदेश जाण्याचा धोका असतो . हे टाळण्यासाठी आणि गुन्हेगाराने केलेल्या कृत्याची त्याला लाज वाटावी , पश्चात्ताप वाटावा यासाठी यापुढे बलात्कारातील गुन्हेगाराची सर्व माहिती त्याच्या फोटोसह वेबसाइटवर टाकण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे . (http://www.delhipolice.nic.in/).

रेफ- https://www.facebook.com/ayushyawar.bolu.kahi.vny.cmyk

Pages