अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक

Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00

तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?

उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "

या आधिचे सीन या दुव्यावर वाचा

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

I am pain killer
हसून हसून पुरेवाट झाली माझी.
रच्याक ने हा वेणु मल्लेश म्हणजे ऋन्मेश नाही ना ????
हसून हसून गडबडा लोळण

अक्शय कुमारचा "जय किशन" साल १९९२
फ्लश ब्याकः- २० साल पहले तुम्हारे पिताजी को इसी दरिन्देने मारा था
कट टु सीनः एक मारुती ओम्नी वेन

च्या मारि तेव्हा मारुती ओम्नी वेन हुती व्हय र

बाहुबली बस मध्ये पाहिला.फार लक्षात नाही पण तो बाहुबली कुठूनही कुठेही उड्या मारतो आणि रॅपलिंग करतो त्या धबधब्याच्या गाण्यात.
जरा 'या पिक्चरची इतकी हाईप का होती' असा प्रश्न पडला पण तो बस मध्ये गोंधळात नीट पाहिला नाही म्हणूनही असेल.

आणि बाईच्या डोक्यावरुन पाणी गेले तर ती उभी कशी राहिल बाळाला पकडून? फ्लोटिंग च्या नियमाप्रमाणे आडवी नाही होणार का?

ताहेर शाह ची angel song ideology वाचुन मला तो सीन आठवला..
थ्री इडियट्स मधला प्रोफेसर आमीर ला विचार तात ना भाई कहना क्या चाहते हो...
ताहेर बोलेल angel सर angel .... Rofl

मध्यंतरी एक मराठी सिनेमा टीव्ही वर पाहिला. संदीप कुलकर्णी आणि ऐश्वर्या नारकर मुख्य जोडगोळी.

संकु ची परिस्थिती एकदम हालाखीची असते. तो कुठल्याशा कंपनीच्या गेटवर चकरा मारत असतो नोकरी मिळेल तर पहावी म्हणून्. योगायोगाने एक ओळखीचा मित्र त्याच कंपनीत कामाला असतो. तो मित्र संकु ची त्याच्या बॉस शी ओळख करून देतो. हा यडपट बॉस कुठल्याशा डिरेक्टर मीटिँग ला निघालेला असतो. हातात एक कोरी फाईल्. आणि फाईल मध्ये फक्त एक कागद्! मग रिक्शा मध्ये बसून तो बॉस आणि संकु निघतात्. तर तो बॉस टेन्स असल्याचे बघून संकु कारण विचारतो . तर तो बॉ. म्हणतो की आज डिरेक्टर च्या मीटिँग मध्ये एका प्रश्नाचे उत्तर सर्वाँना द्यायचे आहे. आणि फाईल उघडून एक कागद दाखवतो. त्यात एक गणिती गँमत टाईपचे शालेय लेव्हल चे कोडे असते. कुठल्या कंपनीत डिरेक्टर्च्या मीटिँग मध्ये येणाृया सदस्यांना कोड्याचे उत्तर घेऊन यायला साँगतात्. Uhoh

बरे चित्रपटाचा डिरेकटर डुलक्या घेणारा असेल तरी या कलाकाराँना समजत नाही का? Angry काहीही आचरट सीन आहे तो एकँदरीत्. आणि कहर म्हणजे संकु करेक्ट उत्तर देतो म्हणून त्याला इंटरव्हू ला बोलावले जाते.

---मध्यंतरी एक मराठी सिनेमा टीव्ही वर पाहिला. संदीप कुलकर्णी आणि ऐश्वर्या नारकर मुख्य जोडगोळी.---
अंकगणित आनंदाचे असं नाव आहे त्या चित्रपटाचं. मी काहीतरी गणितावर असेल म्हणून पहायला घेतला (असं अतर्क्य लॉजिक का वाटलं मला कोण जाणे) तर भलताच निघाला.

बरेच दिवसानी नवे स्ट्रेस बस्टर गाणे मिळाले. सौजन्य फारेंड !

https://www.youtube.com/watch?v=0XkWjsaLvU8

अविवाहीत माबो भगिनींनी गाणे बघु नये! आपल्याला असा डॅशिंग पती मिळणार नाही या जणीवेने विषण्ण व्हाल !

विकु ....... Biggrin

या हिरोपेक्षा त्या शेतातलं बुजगावणं जरी जिवंत होऊन नाचलं असतं तरी परवडलं असतं.

बरं गाणं छान आहे की! आवाज, चाल, म्युझिक वगैरे खूपच छान आहे. ( कोणत्यातरी एका किंवा अनेक हिंदी गाण्यांची आठवण येतेय. कुमार शानु इरातल्या गाण्याचा प्रभाव आहे या गाण्यावर) कोणत्या भाषेतलं आहे म्हणे हे? उडिया?

अविवाहीत माबो भगिनींनी गाणे बघु नये! आपल्याला असा डॅशिंग पती मिळणार नाही या जणीवेने विषण्ण व्हाल !

>> अरेरे.. त्यांना ऊलट चान्स तरी आहे काहीतरी.. आम्हाला तर आता चान्स पण नाही उरला असला डॅशींग पती मिळवण्याचा Girl Cry.gif

तुमच्या नवऱ्याला व्हिडीओ पाठवून द्या, काय सांगावे थोडा फार डॅशिंगपणा उतरेल त्याच्यात Happy

दुधाची तहान ताकावर .......

मामी, 'सरकी जो सरसे वो धीरे धीरे' या गाण्याची चाल वापरली आहे त्यात>>> व्हिडीओ पाहिला नाही, त्यामुळे अंदाजपंचे हा त्या बंगाली हीरोचा व्हीडीओ आहे का??? असल्यास त्या महाभयंकर प्राण्याला माझा इथून साक्षात दंडवत!!

चित्रपट- नया कदम. ८०च्या दशकातील रिमेक-लाटेतील के. बापय्याचे अजून एक रत्न.
कादरखान एका गावातील (संपूर्ण चित्रपटात 'गांव' हा शब्द 'गाऊं' असाच लिहीलेला आहे ते एक असो.) हिटलरप्रेमी जमीनदार. त्याचे हे प्रेम प्रेक्षकांच्या मनावर ठसावे म्हणून त्याच्या गळ्यात एक मोठा नाझी स्वस्तिक सतत टांगलेला आहे. चित्रपटात राजेशकाकाजी खन्ना हे हिरो आणि श्रीदेवी, पद्मिनी कोल्हापूरे आणि जयाप्रदा अशा तीन-तीन हिरविणी आहेत. त्यामुळे पुढे तीन तिगाडा काम बिघाडा होतोच.
एका प्रसंगी काकाजी ह्या जमीनदाराच्या घरी जातात तिथे त्याची मुलगी श्रीदेवी (त्याची म्हणजे जमीनदाराची, हे सांगणे आवश्यक आहे कारण श्रीदेवी काकाजींचीच मुलगी शोभते) त्याला ताक पिण्याचा आग्रह करते. जमीनदार तक्रप्राशनास विरोध करतो पण काकाला अ‍ॅसिडीटी असल्याने (त्याचा चेहरा सिनेमाभर तसाच दिसतो) तो ताक पितो. त्यावर कादरखान ताकाचा ग्लास गोदावरीत (रिमेक करताना हे लोक काहीही बदलत नाहीत) फेकतो आणि 'अछूत असलेकारणाने तू स्पर्षलेली कोणतीही गोष्ट मी अशीच फेकून देईन' असे बजावतो. तात्काळ ताक पिल्याने रिजुव्हिनेट झालेले काकाजी श्रीदेवीचे दीर्घ चुंबन घेतात (हा ट्रीकसीन आहे) आणि 'आता हिंमत असेल तर हीला पण नदीत फेक' असे खुले आव्हान देतात. श्रीदेवी पाण्यात जाण्याच्या कल्पनेने आपण रोमांचित होतो पण तसे काही होत नाही.

Pages