Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00
तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?
उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ती जी नाचते आहे तिचे नाव
ती जी नाचते आहे तिचे नाव सुनंदा आहे.
असल्या अचाट सिनेमाची गोष्ट
असल्या अचाट सिनेमाची गोष्ट लक्षात नाही आता
लोल वा लहान पणी बघितलेले
लोल वा
लहान पणी बघितलेले बरेचे सिनेमे लक्षात आहेत माझा
लक्ष्याचे एक गाणे आहे
लक्ष्याचे एक गाणे आहे 'कोंबड्यानो, विचार करा की थोडा, अंडी द्या नैतर खुराडी सोडा.'
इवाउवा
इवाउवा
च्यायला त्या दिपक देऊळगावकरचे
च्यायला त्या दिपक देऊळगावकरचे गाणे मी टाकले त्यावर इतके उत्खनन झाले की पन्नास प्रतिसाद पडले,व तो पिक्चर ज्यांनी नेटावर शोधुन काढला ते धन्य आहेत.सर्वांना माझ्यातर्फे इवाउवा तुळतुळ शुभेच्छा.
माझं सौभाग्य मृणालचा पहिला
माझं सौभाग्य मृणालचा पहिला पिक्चर आहे वाटतं. इंट्रोड्यूसिंग म्हणताहेत.
ती 'इवाउवा' वाली 'रात' पिक्चर मधे भूत आहे असा माझा संशय आहे
सिंजि !! आपने चॅलेंज दिया था
सिंजि !! आपने चॅलेंज दिया था !! हमने ढूंढके निकाला उसको
(No subject)
ती 'इवाउवा' वाली 'रात' पिक्चर
ती 'इवाउवा' वाली 'रात' पिक्चर मधे भूत आहे असा माझा संशय आहे >>> इवाउवा वाली चं नाव 'सुनंदा मदभावी' आहे. 'रात' मधल्या भूताचं नाव नुसतंच 'सुनंदा' म्हणून दाखवतंय IMDB. ही सुनंदा 'मीरा का मोहन', 'लाट साब' वगैरे पिक्चर्स मधे आहे म्हणे. मला या दोन्ही सुनंदा सेमच वाटतायत.
ती 'इवाउवा' वाली 'रात' पिक्चर
ती 'इवाउवा' वाली 'रात' पिक्चर मधे भूत आहे असा माझा संशय आहे >> एकच बाई आहे ती. गायची पण ती. काधलन (प्रभु देवाचा मुकाबला) मध्ये एक गाणं गायलंय तिने, सागर से मिलने का असंच काहीतरी. एका ट्रिव्हिया नाईटमध्ये हे सगळं डिस्कशन ऐकलं होतं त्यामुळे ही माहिती.
हायला! सही!! सागर से मिलने के
हायला! सही!! सागर से मिलने के लिए तिने गायलंय होय? भलतीच व्हर्सटाइल आहे की!
एका ट्रिव्हिया नाईटमध्ये हे
एका ट्रिव्हिया नाईटमध्ये हे सगळं डिस्कशन ऐकलं होतं त्यामुळे ही माहिती. >>> थॅन्क्यू! :). मला अपार कॉम्प्लेक्स आला होता हे वाचायच्या आधी
फा, मी मात्र सगळी माहिती IMDB
लक्ष्याचे एक गाणे आहे
लक्ष्याचे एक गाणे आहे 'कोंबड्यानो, विचार करा की थोडा, अंडी द्या नैतर खुराडी सोडा.'>> माझ्या माहितीप्रमाणे हे गाणं 'आम्ही दोघं राजा राणी' या चित्रपटातलं आहे. लक्ष्याचा कुकुटपालनाचा व्यवसाय असतो आणि हिरविण सेल्स गर्ल असते, कुकुटखाद्याची. एक दिवस त्याच्या पोल्ट्री फार्मवरून नेत्याविरुद्ध एक मोर्चा जातो, त्या लोकं घोषणा देत असतात, कामं करा नाहीतर खुर्ची सोडा. आणि मग लक्ष्या कोंबड्यांना गाण्यातून असं म्हणतो.
सागर से मिलने के लिए तिने
सागर से मिलने के लिए तिने गायलंय >> बापरे !! ते आवडते गाणे आहे अगदी
काल सिवाजी द बॉस मधला लोकल
काल सिवाजी द बॉस मधला लोकल च्या पुढे उभा वाला सीन बघत होते.अती भयंकर काय च्या काय आहे.
तो सीन त्या सीन मधल्या एका ३ सेकंदाच्या विवक्षीत दृष्यासाठी लिहीला गेला असावा असं वाटलं.
खिचडी मधलं अर्चना जोगळेकर आणि
खिचडी मधलं अर्चना जोगळेकर आणि एक हिरो यांचे प्रेमासाठी झुकले खाली धरणीवर आकाश हे गाणे अलरेडी येऊण गेलेय का इथे?
त्याची गाणे चालू होण्या आधीची प्रस्तावना मिस करु नका.>>>>
फार चम्या होता तो हिरो. अभिनयशुन्य. बहुतेक कॅमेरामन का निर्माते नाईक म्हणून होते त्यांचा मुलगा.>>>>>
कहर सिनेमा होता हा. बालपणाचा अशोक सराफ म्हणून अतुल परचुरे होता त्यात. घरातून पळून जाऊन तो मँगेनीजच्या खाणी वगैरे घेतो असं ही होतं. बहुतेक खाणीत काम करताना काळा झाला असावा. अशोक अन रंजनाचं एक नऊवारी नऊवारी गाणं सुद्धा होतं.
तो बावळट हीरो नंतर अशोक अन लक्षाच्या एका सिनेमातही होता. त्यात हे दोघे जुळ्या बहिणींच्या प्रेमात पडतात (एकीच्या डाव्या गालावर तीळ, दुसरीच्या उजव्या) वगैरे स्टोरी होती. जुळ्या बहीणींचा रोल रेखा राव नी केला होता.
ती 'इवाउवा' वाली 'रात' पिक्चर
ती 'इवाउवा' वाली 'रात' पिक्चर मधे भूत आहे असा माझा संशय आहे >>
वॉव! काय जबरस्दस्त निरीक्षण!
बाकी 'रात' पिक्चर ची कास्टिंग ज्यानं ठरविली तो किती हुशार म्हणावा! या तुळुतुळू गाण्यातून बरोब्बर आपलं भूत शोधून काढलं!
ती 'इवाउवा' वाली 'रात' पिक्चर
ती 'इवाउवा' वाली 'रात' पिक्चर मधे भूत आहे असा माझा संशय आहे >>
वॉव! काय जबरस्दस्त निरीक्षण!
बाकी 'रात' पिक्चर ची कास्टिंग ज्यानं ठरविली तो किती हुशार म्हणावा! या तुळुतुळू गाण्यातून बरोब्बर आपलं भूत शोधून काढलं!
'खिचडी'तला बावळट हिरो - शेखर
'खिचडी'तला बावळट हिरो - शेखर नाईक
मी तो सिनेमा थेट्रात पाहिला होता. पण अतुल परचुरे, मँगेनीझच्या खाणी वगैरे आता काही आठवत नाही.
"इवा उवा तुळतुळ झाले मी
"इवा उवा तुळतुळ झाले मी व्याकुळ"
अशक्य विनोदी गाणं आहे, please सगळ्यांनी बघा आणि तुमच्या प्रियजनांना पण दाखवा 
(No subject)
ते इव्वा उव्वा सुरेश वाडकर
ते इव्वा उव्वा सुरेश वाडकर आणि आशाबाईंनी गायल्यासारखं वाटतंय.
तुमच्या प्रियजनांना पण दाखवा
तुमच्या प्रियजनांना पण दाखवा >>> अप्रियजनांना तर नक्कीच दाखवा :). किंबहुना त्यांचा मोबाईल हॅक करून त्यांना कॉल आला की कॉलर रिंगटोन म्हणून यातल्या ओळी वाजतील असे करा - मुलगा असेल तर "घे ना हा तिळगुळ..." व मुलगी असेल तर "नको करून चुळबुळ, मी झाले व्याकुळ" ई. तुम्ही तेथे असाल, तर हे तुझे आवडते गाणे आहे ना असे विचारा आणखी.
आणि कॉल सेंटर्स आणि लोन
आणि कॉल सेंटर्स आणि लोन वाल्यांचा फोन आला की वाचव रे पांडुरंगा वाजेल
(No subject)
आणि बॉसचा आला की फक्त ते
आणि बॉसचा आला की फक्त ते "इव्वा ss उव्वा sssss!"
खिचडी मीही थेटरात पाहिलेला,
खिचडी मीही थेटरात पाहिलेला, तेव्हा माबो नसल्याचा दुष्परिणाम.
अशोक सराफचा डबल रोल आहे हे शेवटी कळते. पिक्चर अचानक रहस्यमय होतो पण ते रहस्यहि अ आणि अ वर्गातले. शेवट पण काहीतरी सारवासारव करून गुंडाळलेला. पण तेव्हा बऱ्यापैकी चाललेला तो. अर्चना जोगलेकरची थोडी हवा होती तेव्हा.
काल त्या तुळतुळ आणि रात मधला
काल त्या तुळतुळ आणि रात मधला संबंध आठवल्यानंतर बॅड मूव्ही ट्रिव्हियाबद्दलच्या डिस्कशन्सच्या आठवणींनी मी चुळबुळ करत होतो
आणि मग हे रत्न आठवलं.
जख्मी कुंकू : https://www.youtube.com/watch?v=CzRiQGXQ3qQ
म्हटलं तर विशेष असं काही नाही. ८०-९० मधल्या अनेक फूलनदेवी बेस्ड चित्रपटांच्या लाटेतला हा आणखी एक. पण, अचाट प्रकार हा आहे कि यात अलका कुबल ला फूलन देवीचा रोल दिलाय
Pages