अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक

Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00

तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?

उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "

या आधिचे सीन या दुव्यावर वाचा

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोण हे जोगिंदर महर्षी? शी: बै, अशी थोर थोर मंडळी माझ्या आयुष्यात कधी आलीच नाहीत.

बापरे पायस, ते गाणं कैच्याकैच महान आहे. गरीबांचा दाढीवाला ब्रुसली, गरीबांची हेलन आणि गरीबांची अरुणा इराणी काय काय भरलंय त्यात.

थर्माकोल .... Lol अगदी अगदी

मामी., तेरे को जोगंदर पता नही. लोटा डान्स या अत्युत्कृष्ट नृत्यपद्धतीचा उगम ज्या महान कलाकाराने केला तो जोगिंदर तुला माहित नसणं म्हणजे कहर आहे.

युटुयुबवर लोटा डान्स बाय जोगिंदर शोधणे!

जोगिंदर म्हणजे बर्‍याच चित्रपटात खलनायक, बर्‍याच रामसेपटात सहनायक आणी सत्ते पे सत्ता मध्ये एक भाऊ.

ह्या पोस्टी वाचून माझ्याडोक्यात ते लोटा डानस च मुजीक वाजायला लागलं अल्टिमेट अ नि अ.!!!!

नाही गं बाई!

असली नवनवोन्मेषशालिनी प्रतिभा असलेल्या जोगिंदर महर्षींना ________/\________

राजु बन गया जंटलमॅन या चित्रपटात जेव्हा शाहरुख खान कंपनीच्या नविन कन्स्ट्रक्शनचा जमाखर्च सांगतो तेव्हा कंपनीचा बॉस त्याच्या हिशोबतपासणीसला विचारतात तेव्हा ते बेण समोर असलेल्या डॉस कंम्पुटर वर सरळ dir टाईप करून सगळ्या फाईल्सची नावे आणतो आणि वर सांगतो हिशोब बरोबर आहे Rofl असाच प्रकार गुलाम या चित्रपटात आमिरखानचा भाउ झालेल्या अभिनेत्याने देखील केला आहे

आधी लिहीला असेल पण परवा पिक्चर पाहिला आणि परत प्रकर्षाने जाणवलं म्हणूनः
नो एंट्री मध्ये फरदीन खान चुकून डोंगराव्रुन खाली पडतो आणि सेलिना आणि मैत्रिणी वाचवायला येतात(त्यांच्यामुळेच पडलेला असतो) तेव्हा जी मुलगी "मै इतने खुबसूरत लडके को मरते हुवे नही देख सकती" म्हणून स्वतःचा स्क्र्ट काढायला लागते आणि बाकी मुलींना गाठ मारुन दोरी बनवण्यासाठी पँट काढायचं भावनिक आवाहन करते तिच्या स्कर्ट ला एखादी गाठही बसू शकणार नाही इतका तो लहान असतो. Happy

पायस..भयंकर आहे ते गाण..
शी बाप्पा त्या पोरींच्या नादात तो बाप्या जास्त वेळ दाखवलाच नै पन..
कसला सॉल्लीड्ड हाल्लाय तो नाचायच्या नावावर Proud Biggrin

जोगिंदर म्हणजे बर्‍याच चित्रपटात खलनायक, बर्‍याच रामसेपटात सहनायक आणी सत्ते पे सत्ता मध्ये एक भाऊ.>>>>>
नाही हो नाही... सत्ते पे सत्ता मध्ये जोगिंदर नाहीये. (नाहीतर तो अमिताभऐवजी जोगिंदरचा सिनेमा म्हणून ओळखला गेला असता.) नुसती दाढी असल्याने कुणी जोगिंदर बनत नाही.

(नाहीतर तो अमिताभऐवजी जोगिंदरचा सिनेमा म्हणून ओळखला गेला असता.) नुसती दाढी असल्याने कुणी जोगिंदर बनत नाही.<<< Lol

नुसती दाढी असल्याने कुणी जोगिंदर बनत नाही >> Lol बरोबर सत्ते पे सत्ता मधे तो नाही. या कॉमेण्ट वरून मात्र आखरी रास्ता मधला "हर दाढीवाला टैगोर नही होता" हे "इन्व्हेस्टिगेशन" आठवले.

जोगिंदर पूर्वी ७० च्या दशकात बर्‍यापैकी बी ग्रेड सिनेमात असे असे अंधुक लक्षात आहे. 'मर्द' मधे त्याला मनमोहन देसाई ने २-३ मिनीटांसाठी आणला होता.

जोगिन्दर? कोण आहे हा महान इसम?
गुगल सर्च केला तर बरेच दाढिधारी जोगिन्दर येत आहेत.
चेहरा ओळखीचा वाटेना.
एका चित्रपटाचा पोस्टरवर एक दाढिढारी होता.
पण फोटॉ क्लीअर नाहिये.
त्याच्या माहिती मध्ये तो मल्टीटेलेन्टेड होता. अगदी चित्रपट वितरक देखील अशी माहिती आहे.

जोगिन्दर पता नाही ?
मै मर जावां.

तुम्ही ज्वाला डाकू नावाचा सिनेमा पहा. त्यात जोगिन्दर घोड्यावरून निघालेला असतो. मधेच डोंगर लागतो. तो घोड्यासहीत डोंगरावर चढतो. अगदी टकमक टोकावरूनही त्याचा वेग काही कमी होत नसतो. त्याच वेगात लक्शात येतं की पुढे मोठी दरी आहे आणि त्यापलिकडे दुसरा डोंगर. त्याचं शिखर मात्र किंचत उंच असतं.

जोगिंदरचा घोडा टोकाशी थांबतो. दोन पावलं खाली उतरतो.
आणि तिथे जोगिंदर घोड्याला शपथ घालतो आणि काय आश्चर्य. घोडा असा अज्जात उडतो का नाय , येकदम दरीच्या पल्याड त्या वरल्या अंगाच्या टोकावं !!

अबबबब, म्या तर माझी समजून शेजारच्या टिंग्याचीच पाची बोटं तोंडात घातली व्हती.

जोगिंदरने आयुष्यभर लाऊड (आणि साजिद खान म्हणायचा तशी ham) acting केली पण काही काही सिनेमात, जिथे रोलाची गरज लाऊड आहे, तो शोभूनही दिसलाय. प्यासा शैतान मध्ये कमल हसनच्या बरोबरीने त्याने कमाल केली आहे. रंगा खुश त्याचा सर्वात महान सिनेमा आहे (याचे आणि जमले तर ३ इक्केचे वेळ मिळाल्यावर डिट्टेलवार परीक्षण लिहिण्यात येईल)
अजून ओळखी ज्यांना जोगिंदर माहित नाही
१) तिरंगातला भ्रष्ट पोलिस सत्यवादी दुबे
२) जितेंद्राच्या हातिमताई मध्ये दुसऱ्या प्रश्नातला गोगा कपूरला त्रास देणारा डाकू
३) बहुतेक येस बॉस मध्ये पण होता आत्ता नक्की आठवत नाही
४) मस्ट वॉच - रंगा खुश, ३ इक्के, वीरू उस्ताद, कसम दुर्गा की

खसा
Lol

हायला, आता पाहिल पाहिजे हे.
आम्ही दुरदर्शन कृपेने फरिश्ते, तिरंगा वै लेव्हल पर्यंतच पाहिलय.
हे प्रकरण त्याहुन महान दिसतय.

Pages