Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00
तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?
उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रदिप कुमार नाही भारतभुषण
प्रदिप कुमार नाही भारतभुषण म्हणा
प्रदीप कुमार किंवा भारत भीषण
प्रदीप कुमार किंवा भारत भीषण यांच्या चेहर्यावर भाव उमटतात हे म्हटल्याबद्दल जाहीर निषेध!
कोणत्याही भावाचा अभाव हा ज्यांचा स्थायीभाव त्यावर कसला उमटणार भाव कपाळ?
रामरहिम यांचा ट्रेलर
रामरहिम यांचा ट्रेलर पाहिल्यावर प्रदिप कुमार आणि भारत भुषण यांच्या चेहर्यावर भाव उमटतात हे मी गर्वाने आता म्हणु शकतो.
दिदे , स्पार्टा
दिदे , स्पार्टा
.
एन्टर्टेन्मेन्ट बघितला .
बॅंकॉक मध्ये इतका बर्फ , मला तरी माहीत नव्हता .
अर्थात तो पूर्ण सिनेमाच अ आणि अ आहे .
"अरे पापी लोकहो, तुम्हाला
"अरे पापी लोकहो, तुम्हाला गुरुजींच्या लीला कधी समजणार?" - इति गुरमीत रामरहीम गुरुजींचे तूनळीवरील भक्त
आजवर इंडस्ट्रीत एवढा टॅलेंटेड माणूस आलेला नाही. डेरा सचा सौदा (ज्याचे काका, सॉरी गुरुजी, प्रमुख आहेत) च्या साईटनुसार गुरुजींचा बायोडाटा - author, inventor, agriculturist, scientist, athlete, multi-lingual orator, scholar, director, musician,lyricist and de-addiction specialist, among others.
त्यांच्या अफाट गाण्यांविषयी काय म्हणावे? ("धन धन सदगुरु तेरा आसरा" - भक्तगण)
हे नमुन्यादाखल ऐका आणि कान तृप्त करुन घ्या - https://www.youtube.com/watch?v=Q48tagwurUw
आणि अशा माणसाची (ते स्वतःच म्हणतात "हम तो है इन्सान") आपण प्रदीपकुमार, भारतभूषण सारख्या मर्त्य मानवांशी तुलना करतोय!! हा धिक् धिक् यूयम्!!
मिथुन चक्र्वर्तिचा ब्रेन
मिथुन चक्र्वर्तिचा ब्रेन transplant खरच महान आहे! मायक्रोवेव्ह कम डीप-फ्रिजर तर अफलातुन!...सर्जरी तर अजुन महान !!!सामान्यतः अशा नाजुक सर्जरीत होणारा रक्तस्त्राव कापसाने वैगरे ब्लोट करत असतिल इथे उतु गेलेला चहा भराभरा पुसुन घ्यावा तसा ब्रेन बसवल्यावर वरतुन कवटिचे फ्लॅप(!?) लावुन पुसुन घेतलय...
जाल द ट्रॅप व आन - मेन अॅट
जाल द ट्रॅप व आन - मेन अॅट वर्क (टीव्हीवरच्या नावानुसार मेन एट वर्क) दोन्ही थोडे थोडे पाहिले. दुसरा अजून चालू आहे. दोन्ही मधे रीमा सेन आहे व मिनीमन अडीच किलोचे हात असलेले विविध लोक. अमरिश पुरीचे स्टंट्स ("अब तक तुम्हारे कई स्टंट्स देखे है, अब मेरी जंपे देख ले" हे मुलाला उद्देशून म्हंटलेले वाक्य).
हैदर हा चित्रपट नक्कीच जाल द ट्रॅप वरून उचलला आहे. कारण दोन्ही मधे तब्बूचे अतिरेक्यांशी संबंध व दोन्हीमधे पहिला नवरा मेल्यावर दुसर्याशी लग्न. कदाचित हॅम्लेट नाटकही जाल द ट्रॅप वरून उचलले असेल. शेक्सपियर ने ते कोठे नाकारल्याचे वाचलेले नाही.
लोहाच्या क्लायमॅक्स मधली शेवटची दोन मिनीटे पाहिली - मोहन जोशी धर्मेन्द्राला कसल्यातरी लोखंडी गोष्टीने (बहुधा बंदुक) मारतो, तर टण टण आवाज येतो खांबावर मारल्यासारखा. आता लौकरच बाकीचा बघायला हवा.
फारएण्ड लोहाचा शेवट नाही
फारएण्ड लोहाचा शेवट नाही बघितला तरी चालतो पण सुरुवात बघाच! मोहन जोशी व दीपक शिर्के मध्ये जे काही अलंकारिक शाब्दिक युद्ध होते त्याला तोड नाही - "मै तेरा वो हाल करूंगा जो दीमक लकडी का और छिपकली मकडी का करती है" बशीरभाई बब्बर कोण संवादलेखक आहे शोधला पाहिजे.
फा
फा
फारेण्डा, लोहा "मस्ट वॉच"
फारेण्डा, लोहा "मस्ट वॉच" आहे. अजिबात चुकवू नकोस. निवांत बघ आणि निवांत परीक्षण लिही.
>>कदाचित हॅम्लेट नाटकही जाल द
>>कदाचित हॅम्लेट नाटकही जाल द ट्रॅप वरून उचलले असेल. शेक्सपियर ने ते कोठे नाकारल्याचे वाचलेले नाही.
पुलंच्या 'वार्यावरची वरात'मधला सीन आठवला. "असेल असेल, बाईंनी आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय तर असेल शेक्सपियरचं एक थडगं अमेरिकेतही..."
फारेण्ड,मेसेंजर पहा बरे लवकर
फारेण्ड,मेसेंजर पहा बरे लवकर आणि त्यावर स्वतंत्र लेख लिहा.जुन्या सेन्सॉर बोर्डाच्या आत्म्याल शांती लाभेल.
टण टण आवाज येतो खांबावर
टण टण आवाज येतो खांबावर मारल्यासारखा. >>>>. फार हसले
हहपुवा :ड :ड
हहपुवा :ड :ड
तुम्ही प्रिटेन्शिअस मूव्ही
तुम्ही प्रिटेन्शिअस मूव्ही रिव्यूज बघता का? कनन गिल आणि बिस्वा रथ हे दोघे अश्याच अ आणी अ सिनेमांचे रिव्यू करतात. यूट्यूब वर फेमस आहेत हे. काल त्यांचा लाइव्ह कार्यक्रम होता बॉलिवूड वर. आणि फार अशक्य विनोदी होता. त्याबद्दल इथे काही लिहीणे शक्य नाही. पण पाकिस्तानी कॅट वुमन चे पोस्टर, देशी स्पायडर मॅन चित्रपटाचा रिव्यू, बॉलीवूड मध्ये स्टोरी कशी लिहीतात वगिअरे प्रकार जबरी होते. ह्याची गाळीव व्हर्जन येइलच.
दोघे हाय आंटी असे लिहीलेला टीशर्ट घालून आले होते. ह्याला मै. प्रेमकी दिवानी मधील ह्रितिकच्या ओवर द टॉप हाय आंटी असे विश करण्याचा संदर्भ आहे. चित्रपटाचा प्रेम की दिवानी चा रिव्यू नक्की बघा. श्रद्धा आणि फारेंड तुम्ही असे काहीतरी चॅनेल नक्की चालू करू शकाल. बघा बाई.
अमा , बहुतेक सगळे रीव्ह्युज
अमा , बहुतेक सगळे रीव्ह्युज बघितले आहेत मी . ते दोघेजण अगदी अशक्य आहेत .
प्रेमअगन , डीडीएल्जे , मैप्रेकीदिहून रीव्ह्युज भयान्क आहेत
चित्रपट -बेताज बादशाह अनिल
चित्रपट -बेताज बादशाह
अनिल 'झकास' कपूरच्या पडेल घरात जुही चावलाला गांधीजींचा फोटो दिसतो, तर संवाद पुढीलप्रमाणे-
जु.चा - अरे ये गोडसे के घर में गांधी की तस्वीर कैसे
अ.क - किसी से मैने पुछा की ये कौन है तो पता चला की राष्ट्रपिता है, मै अनाथ, मेरे पिता नही तो राष्ट्र्पिताही सही, मै इनको घर ले आया.
गांधीगिरीचे मूळ इथे आहे, उगाच राजू हिरानीला क्रेडीट मिळाले.
आज Heart Transplant वर हे
आज Heart Transplant वर हे रत्न सापडलं
जगाच्या पाठीवर हा गाजलेला
जगाच्या पाठीवर हा गाजलेला चित्रपट. राजा परांजपे, सीमा यांचा अभिनय, सुमधुर संगीत आणि गीतांसाठी प्रसिद्ध. खूप अपेक्षेने पाहायला घेतला. पहिला तीन चतुर्थांश भाग अतिशय आवडला. शेवटही काहीतरी दमदार होईल अशी आशा होती. पण हाय रे दैवा! इतका सुमार, ओढून ताणून बनवलेला शेवट बघवला नाही. तुला पाहते रे जरी आंधळी मी तुला पाहते, हे गीत अंध सीमा गात असताना अचानक तिला गीत संपता संपता दॄष्टी परत मिळते, योगायोगाने तिचे लहानपणीच दुरावलेले आई वडील तिथेच उपस्थित असतात, ते तिला ओळखतात, सीमा त्यांची राजा परांजपेशी भेट घडवून आणायचा प्रयत्न करते पण परत योगायोगाने तो तिच्याच आईवडिलांकडे कामाला आधी असतो, आणि काही अफरातफर केल्याचा त्याच्यावर संशय असतो म्हणून तो तेथून पळ काढतो. हे कमी म्हणून की काय, त्याची दॄष्टी जाऊन तो अंध होतो. अप्रतीम चित्रपटाचा हा शेवट सगळा कचरा करतो. सीमाचे डोळे अचानकपणे परत कसे काय येतात देव जाणे! आणि उगीचच ओढून ताणून शोकांतिका करायची म्हणून राजा परांजपेचेही डोळे घालवले आहेत. इतका सुंदर चित्रपट पण शेवटात पुरा गंडला आहे
काल लोहा सिनेमातील मोहन जोशी
काल लोहा सिनेमातील मोहन जोशी आणि दीपक शिर्के यांच्यातील ते डायलॉग याची कानी ऐकले, याचि डाोळा पाहिले आणि धन्य झालो. हाही एक लोहा आहे, हे मला माहितीच नव्हते. मी केवळ शशी कपूरचा मुलगा, धर्मेंद्र आणि शत्रुघ््न सिन्हा असलेला लोहा पाहिला होता. तो थोडा सुसह्य होता. अर्थात् मिथुनच्या कोणत्याही सिनेमातला कुठलाही सीन कोणत्याही सिनेमात फिट बसू शकतो. त्यामुळे हाही एखाद्या चित्रपटाचा काढून टाकलेला सीन ठिगळ म्हणून वापरलेला असू शकतो.
मिथुनच्या चित्रपटांकडून आशा
मिथुनच्या चित्रपटांकडून आशा केव्हाच सोडून दिली आहे...पण राजा परांजपे यांचा चित्रपट असा अपेक्षाभंग करतो तेव्हा वाईट वाटतं
एकापेक्षा एक या चित्रपटात अंध
एकापेक्षा एक या चित्रपटात अंध सचिन पिळगावकर पोलिसांची जीप चालवितो असे एक दृश्य आहे ते कुणी पाहिले आहे काय?
व्हय चेतन म्या बघिट्लो. त्यो
व्हय चेतन म्या बघिट्लो.
त्यो गाडी चालवताखेरीज वैकल्याबरीक डोले करौन शिनी बघ्टो.
Heart Transplant >> तो
Heart Transplant >> तो parody film मधला सीन आहे हो !
अचाट आणि अतर्क्यपणाचा बाप
अचाट आणि अतर्क्यपणाचा बाप -
https://video-sjc2-1.xx.fbcdn.net/hvideo-xtp1/v/t42.1790-2/11194154_1015...
चित्रपट - हम नौजवान देव
चित्रपट - हम नौजवान
देव आनंदने केवळ या चित्रपटात आपण आहोत म्हणून हे नाव ठेवले असे जर तुम्ही समजत असाल तर ते साफ चुकीचे आहे. (तसे असते तर ते 'मै नौजवान' असते, नाही का?) असो तर हा कॉलेज तरुणांवर आणि शिक्षणव्यवस्थेवर आधारित आहे - म्हणजे तसे देव आनंदनी मधून मधून संदेशात्मक डायलॉग मारून स्पष्ट केले आहे. बाकी कथानक इ. बाबी गौण आहेत. थोडक्यात सांगतो कि हा सिनेमा क्लर्कच्या वाटेने जातो. मनोजकुमार क्लर्क होता, देव आनंद प्रोफेसर आहे. अर्थात क्लर्कने आत्मिक उन्नती
याच्यापेक्षा जास्ती होते.
सीन क्लायमॅक्सचा आणि तिथेच प्रेक्षकाला अनबिलिव्हेबल गोष्ट अनुभवयास मिळते. देव आनंदच्या मुलीचा कॉलेजमध्ये रेप करून खून झालेला असतो आणि ते खुन्याला शोधत असतात. खुन्याने फिंगरप्रिंट्स एका विशिष्ट वस्तुवर सोडलेल्या असतात. आता जर नॉर्मल पोलिस असते तर सर्व विद्यार्थ्यांच्या व स्टाफच्या फिंगरप्रिंट्स घेऊन प्रकरण सोडवले असते. पण मग शेवटचा जीनियस सीन कसा पाहावयास मिळेल? ती वस्तु जिच्यावर खुन्याच्या हाताचे ठसे आहेत ती वस्तु आहे - एक अंडरवेअर!! आता खुन्याला देवसाब, अनुपम खेर (पोलिस) आणि इतर लोक घेरतात जिथे देवसाब विचारतात त्याला कि "याद करो ये अंडरवेअर!" खरा जीनियस पुढेच आहे. चिल्लर पब्लिक, ज्यांचे काम विलेनच्या बंदूकीच्या निशाण्यावर बसणे आणि "हमारी चिंता मत करो" वगैरे डायलॉग फेकणे आहे, ते त्यांचे काम इमानेइतबारे पार पाडतात. शम्मी (खून्याचे नाव) अंडरवेअरची मागणी करतो. देवसाबना अर्थातच होस्टेज पब्लिक चिंता व्यक्त करणारे - आपको ये गोली मारेगा टाईप्स - संवाद फेकून मारतात आणि मग देवसाब हा अविश्वसनीय डायलॉग टाकतात
"हट जाओ तुम लोग. क्योंकि मै अंडरवेअर निकालूंगा तो शम्मी मुझपे गोली नही चलाएगा!!!"
टीप : देव आनंद अंडरवेअर प्लास्टिकच्या पिशवीतून काढणार असतात, उगाच गैरसमज करून घेऊ नये.
संपूर्ण सिनेमा तूनळीवर उपलब्ध - https://www.youtube.com/watch?v=CeCAxbxqiHE
अजब सिनेमा आहे हा 'हम
अजब सिनेमा आहे हा 'हम नौजवान'. पायसभाऊंनी भारीच खजाना हुडकलाय.
हायला! छोटी तब्बू आहे त्यात!
हायला! छोटी तब्बू आहे त्यात!
अजब सिनेमा आहे हा 'हम
अजब सिनेमा आहे हा 'हम नौजवान'>> हो. पायसनी आठवण केल्याबरोबर सर्वात आधी हाच सीन आठवला.
देव आनंदनी नंतरच्या काळांत काही अशक्य प्रकार केले होते. त्यापैकी कित्येक सिनेमा सोनीकृपेनं पाहिले होते. मै सोला बरस की थेटरात जाऊन पहाण्यची फार इच्छा होती. तर तो सिनेमा आमच्या गावात आलाच नाही. मग केबलवर पाहिला.
क्लर्कने आत्मिक उन्नती>>>>> अर्थात. हार्ट अॅटॅकवर इलाज आहे त्यामध्ये.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=YzxJNiwp94U
चित्रपट : वीरू उस्ताद (क्लिप मधील गाणे - ऐसी शाम ना कभी आयी है)
१) चित्रपट "Enter the Dragon" चा अनधिकृत रिमेक/कॉपी आहे.
२) ब्रुस ली ची भूमिका - श्वास रोखून धरा - जोगिंदरने केली आहे
३) या गाण्यात आपणास भांगड्यात मार्शल आर्ट्स कसे वापरावेत याचे छोटे प्रात्यक्षिक मिळेल.
४) 'य्बाय्य्ब्ल्ब्ब्ल्ब' या आणि अशा अतर्क्य फ्रेजेस वर ड्यान्स कसा करावा याचा डेमो मिळेल (जोगिंदर इज प्रोफेशनल वी आर नॉट! डू नॉट ट्राय धिस अॅट होम)
Pages