अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक

Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00

तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?

उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "

या आधिचे सीन या दुव्यावर वाचा

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालच सेट मैक्स वर "वर्दीवाला - द आयर्न मैन" नामक एक अचाट सिनेमाच्या एक भाग पहिला

तो मुळ सौथिण्डीयन सिनेमा आहे. सौथिंडीयन सिनेमात जे दाखवतात ते अ आणि अ कक्षेबाहेर जाणा-या आहेत....

"रम्भा" आणि कमसीन बदन दुरान्वये ही संबंध नाहिये >> आहे आहे

तिच्या बदन ला चित्रपटात कमी सीन असतात म्हणून असेल

१९८७ मध्ये बॉलीवूड मधेय "सुपर मैन" सिनेमा प्रदर्शित झाला होता.

आता अचाट सीन

१) धर्मेद्र सुपर मैन चा वडील असतो

आणि मुख्य म्हणजे

२) पुनीत एस्सार सुपर मैन असतो......

एवढे पाहिले की सहन शक्ती संपली आणि तूनळी बंद केली.....

शक्तीमान जन्मण्या आधीचा एपिसोड पाहिलाय का कोणी?
त्यात एक भूतीण बाई मॅजेंटा रंगाचे पीस आणि नी लेंथ स्कर्ट घालून जंगली सुंदरीचं रुप घेऊन शक्तीमान च्या मॅरीड वडलांना भुलवायला आलेली असते.शेवटी मरते.
तो सर्व एपिसोड च अ आणि अ आहे.

सापडलं सापडलं !! ( अगदी युरेका युरेकाच्या तालावर , फक्त मी पूर्ण कपड्यांत आहे Proud )

इव्वा उव्वा तुळतुळ !!! सिनेमा आहे " माझं सौभाग्य"

https://youtu.be/rZBZ_OcR5dI?t=56m18s

Lol कहर महान गाणे आहे ध! डान्स सुद्धा काय भन्नाट आहे! त्या काळी गाण्यांच्या कडव्यांच्या मधे एक "फोटो पोज" देण्याची पद्धत होती. तीही यात भरपूर आहे. वृंदावन गार्डन मधे केलेले दिसते शूटिंग.

या गाण्यात मधे एक "वाचव रे पांडुरंगा" सुद्धा येउन गेले बहुधा. शम्मी जसा जंगली मधे 'या हू' ओरडतो तसा हा अधूनमधून इय्या उव्वा ओरडतो Happy

नशीब दूरदर्शनला त्यावेळी हे गाणे माहीत नव्हते. नाहीतर दर संक्रांतीला दाखवले असते चित्रहार मधे. जसे दर दिवाळीला ते "सौ बरस की जिंदगी से अच्छे है, प्यार के दो चार दिन" दाखवत, केवळ त्यात भुईनळे उडवलेत म्हणून.

आणि तुझसे मिलन का दिलमे अरमान हुवा, कमसीन बदन मे ऐसा तुफान हुवा, उठा तुफान तन मे ये मन उडा जाये, तेरे पीछे पीछे दिल मेरा दौडा चला आय हे मिथुन आणी रंभा चे गाणे आठवले.
>>
या सिनेमात रंभा नाहिये, रासि नावाची हिरवीण आहे. सिनेमाचे नाव जोडीदार.
आणि गाणे इथे आहे: https://www.youtube.com/watch?v=OnBWPJH2WkU

जसे दर दिवाळीला ते "सौ बरस की जिंदगी से अच्छे है, प्यार के दो चार दिन" दाखवत, केवळ त्यात भुईनळे उडवलेत म्हणून. >>> Biggrin

वावा तुम्ही शोधून काढलं..
मी शोधायचा प्रयत्न करत होते.
हो कोणीशी फार फेमस नसलेली आहे इतकंच आठवत होतं>
किंवा माझा हे आणी मिरची ओ मिरची कमाल कर गयी धोती को फाडके रुमाल कर गयी मध्ये गोंधळ झाला असावा.

Pages