अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक

Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00

तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?

उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "

या आधिचे सीन या दुव्यावर वाचा

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असं गाणं खरंच आहे
चित्रपट जुर्माना
नायक - मिठुन
या गाण्याचं आंतरजाला वर रोमँटि क साँग असं कॅटेगरायझेशन केलय.
(मरून पडलेय मी वाचून) Proud

इवाउवा तुळतुळ!!!

महानच आहे हा प्रकार.

मी बाई साधीभोळी, आता वाचव रे पांडुरंगा!!!!

हे असं गाण्यात आहे.

काल सहज शोले पाहिला टीव्हीवर. तेव्हा अमिताभ अमजद खानच्या पाया लागायच्या निमित्ताने डोळ्यात रंग फेकतो, जसे हे ठरवून होते या हिशोबाने बसंती लगेच टांगा डामटत आणते, तेव्हा आणि आता शोले पहाताना खुप वेगळे वाटते.

निशिगंधा नाहीय ती. चित्रपटाची हिरवीन मृणाल कुलकर्णी आहे. माझा नवरा/हळद कुंकू/मंगळसूत्र/जोडवी/ बांगड्या वगैरे नावाच्या चित्रपटात असते तशी टिपिकल स्टोरी आहे.

नाचणारी अर्थातच हिरोचे प्रेमपात्र आहे, ते नसते तर हिरविणीला माझे सौभाग्य म्हणून टाहो फोडता आलाच नसता....

मृणाल कसली बाळबोध दिसते, पहिला चित्रपट.

खिचडी मधलं अर्चना जोगळेकर आणि एक हिरो यांचे प्रेमासाठी झुकले खाली धरणीवर आकाश हे गाणे अलरेडी येऊण गेलेय का इथे?
त्याची गाणे चालू होण्या आधीची प्रस्तावना मिस करु नका.

अनु, तो खिचडी मी चक्क शाळेत असताना थेटरात पाहीला, फार चम्या होता तो हिरो. अभिनयशुन्य. बहुतेक कॅमेरामन का निर्माते नाईक म्हणून होते त्यांचा मुलगा.

मुग्धा हो, ती रामचंद्र सडेकरांची कादंबरी मी वाचली होती आणि मुवी टिव्हिवर पाहीला पण तरीही मला ते तुळुतुळु गाणं आठवत नव्हतं.

कैच्याकै
ळ ला ळ लावून गाणी लिहिले आहे. गाण्यार्‍याने किमान ५ पट पैसे घेतले असतील. असली भिक्कार गाणी आधी सोकॉल्ड मराठी चित्रपटात असायची. मग कशी गाणी लोकप्रिय होतील.

ते गाणे त्या काळातले टिपिकल मराठी चित्रपटातले गाणे आहे. हिर्विन आधुनिक दाखवायची तर तोच तो एक टिपिकल हेअरकट, मिडी, मेकअप सगळे तेच. फक्त आतली बाई वेगळी. हिरोचा गेटअप पण तोच. पांढरी पॅन्ट मस्ट. महेश कोठारे, अशोक सराफ, लक्ष्या, सगळ्यांचे नाचून झालेय या अवतारात.

अर्र मी शहाणे बद्दल बोलत होते..कसली मस्त मेंटेन्ड आहे आता पण.
अंबिये मला एक्दम श्रम करुन आठवावी लागते.
मला त्या मिड्यांची स्टाईल पण आठवते.व्हाईट्/ऑफ व्हाईट बेस.त्यावर साधारण तिरक्या पिवळ्या, निळ्या आणि रेडीश पट्ट्याचे डिझाईन वरच्या टोर्सो भागावर(मिडीचा कंबरेचा घेर जिथे शिवलेला असतो तिथपर्यंत.) किंवा पूर्ण प्लेन.हाफ स्लीव्ह नेहमी.

हीरॉइन्स चे माहीत नाही पण हीरोंचा ड्रेस हा पद्मालया स्टुडिओज वगैरे साउथ वाल्यांचा युनिफॉर्म असे. सहसा तेव्हाच्या जीतेन्द्र वर दिसे . पांढरे शूज, पांढरी पॅण्ट व वरती इस्टमनकर शर्ट किंवा फुल टी शर्ट. आखरी रास्ता मधे अमिताभलाही घालायला लावला होता यांनी.

मराठी सिनेमाची पार पिसं काढलीत Lol
मराठी चित्रपट निर्माते कपडेपट शेअर करायचे की काय शंका वाटते Biggrin

त्या तिळगुळ गाण्यात हिरवणीने (गाण्याच्या) मुखड्यात समयोचित काळा ड्रेस्स घातला आहे .
पहिल्या कडव्यात तिचा ड्रेस, केश्भुषा बघून वर्षा उसगावकर आठवते.

पण गाण धम्माल आहे - पांडुरंगा वाचव !!!

ओहो तो पिक्चर..आठवला मला पण.दिपक देऊलकर चा.एकदा पाहिला होता.
सौभाग्य कादंबरी पण वाचली होती.सडेकरांच्या इतर कादंबर्‍यात शेवटी कोणीतरी हमखास मरते.इथे आधीच मरुन झाल्याने शेवट बरा आहे.
त्यांची एक वामन/हुंदका नावाची आणि एक रिंकू पाटील घटना आधारीत कादंबरी आहे त्या भयंकर आहेत.कोणाकोणाला सुखाने जगू देत नाहीत.सुखी झाले की लगेच अपघातात कटवतात.

हा मी ही पाहिलाय बहुदा..

सुरुवातील १ भाऊ मरतो.. मग दुसर्या भावाशी तिचं लग्न होतो तेच ना?

Pages