अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक

Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00

तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?

उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "

या आधिचे सीन या दुव्यावर वाचा

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जूनियर NTR च्या एका सिनेमा मधली क्लिप पाहिली होती, (नाव नाही आठवत) विलन ने त्याच्या ७ वर्षाच्या पोराला झाडाला बांधून घातलेले असते अन त्याच्या पायाला लांब वात असलेल्या जिलेटिन च्या कांडया लावुन वात पेटवलेली असते अन ज्यु एनटीआर ला १५ २० गुंड कूटत असतात, तेव्हा जूनियर एनटीआर त्या पोराला करंगळी दाखवून इशारा करतो अन ते पोरगे शु करून बॉम्ब ची वात विझवते असला सीन आहे तो

बाहुबली मुळे चर्चेत आलेल्या राजामौली चा मगधीरा हा सिनेमाही बघण्याबद्दल मित्रजनांकडून सूचना आलेल्या

काल टिव्ही वर लागलेला म्हणून सुरुवातीचा थोडा भाग पाहिला.

बाईक रेस नंतरचा चिरंजीवी बरोबरचा सीन अचाट विनोदी आहे. Biggrin

आता विकीवरून कळले की मगधीराच्या नटाचे नाव राम चरन आहे आणि तो चिरंजीवी चा मुलगा आहे. Uhoh

इम्रान हाश्मी चा मिस्टर एक्स ह संपूर्ण सिनेमा अचाट आणि अतर्क्य आहे.

पाहिल्यानंतर आम्ही इमॅजिन करत होतो की समजा हा सिनेमा जसाच्या तसा मराठीत आला तर नाव असेल श्रीयुत क्ष. आणि इम्रान ला रीप्लेस करेल मकरंद अनासपुरे.

आणि.... “You can call me X…. Mr. X…” हे गाणे असे बनेल...

'तुम्ही मला एक्स म्हणू शकता.... श्रीयुत एक्स...." आणि मकरंद समोर कॅमेर्‍याकडे बोट दाखवत हे गाणं म्हणतोय इत्यादी कल्पना करून तुफान हसलो होतो.

थोडा पाहिला आहे हा. हृदया कलेयम की काहीतरी नाव आहे. सुरूवात साउथ च्या पिक्चरचे स्पूफ करण्यातून झाली असे आधी वाटते (त्या पावसातील एण्ट्री ला 'पावसात भिजणे आरोग्यास हानीकारक आहे' अशा अर्थाचे काहीतरी विडंबनपर वाक्य आहे). पण नंतर खराच सिरीयस झाल्यासारखा वाटतो हा पिक्चर.

स्पूफ म्हणून पाहिला तर मजेदार आहे. सिरीयस म्हणून पाहिला तर फारच मजेदार. तो मधे सगळीकडे फिरत असलेला लांबून फेकून हृदय डायरेक्ट पेशंट च्या छातीत बसवणारा सीन तो यातलाच.

Rofl

बाकी हा धागा वर आला आणि आठवण झाली - कोणी msg २ पाहिला का? रामरहीम गुरुजींनी पहिल्यापेक्षा भारी करामती केल्यात म्हणे!! पाहिला असेल तर प्लीज प्लीज रिव्ह्यू लिहा!

payas+1

msg २ पाहिला का?

१ कधी आला ते माहीत नव्हते त्याचा २ येईल अशी अपेक्षा तर अजिबात नव्हती ....................
तो संपुर्ण चित्रपट या धाग्याला सूट होणारा आहे.

हृदया कलेयम की काय चित्रपट : स्पूफच आहे तो !>>
याचा आणखी एक व्हिडीओ फिरतोय सध्या. ही इज बॅक म्हणुन. त्यात तो कोंबडी धनुष्याला लावुन बाणासारखी सोडतो हा हॉटशॉटमधला शॉट ढापलाय.

बरेच दिवसांनी किंबहुना वर्षांनी मायबोलीवर परतलो
हसून हसून मुरकुंड्या वळण म्हणजे काय ते पहायला हव होत .
२ ला सगळ्याना सुट्टी आम्हीच तेव्हढे ऑफिसमध्ये .
थोड थोड करत सगळा धागा वाचून काढला

फारेंडाने 'मोहोब्बतें' नव्या माबोवर आणला नाहीये बहुधा, त्यामुळे इकडे टाकते. बाफ असेल नवीन तर नंतर तिकडे पेस्ट करेन.

तर,
काल रेकॉर्ड करून ठेवलेला 'मोहोबतें' पाहत होते. ते पाहताना जाणवलं की खरा संस्कारी चोप्रा कँप, बडजात्या नोहे.
ऐश्वर्या राय जीव द्यायला गळ्यात मंगळसूत्र घालून कठड्यावर चढते. पण तिच्या बाबांना ते लग्न मंजूर नसल्याने खाली कोसळण्याआधी ते गळ्यातून काढते. मग नंतर शाहरुख खानाभोवती सिनेमाभर बागडताना गळा मोकळा असतो. अखेरच्या दृश्यात सासरा जावई दिलजमाई झाल्यावर पुन्हा भुताच्या गळ्यात मंगळसूत्र येते.
तात्पर्य काय, तर हिरविणीला मेल्यानंतरही लग्नाचे पवित्र संस्कार आणि मंगळसूत्राचे माहात्म्य विसरू न देणारे चोप्रा जास्त संस्कारी!

ती आणि किती नाजूक पणे पडते.
ग्रेसफुली अगदी कपडे आणि केसाचा रेसभरही डिस्टर्ब न करता जीव देणं फक्त मोहोब्बते मध्ये ऐश ला आणि गोळ्यांचा मारा रामलीला मध्ये रणवीर दिपीकालाच जमलंय. Happy अगदी रणवीर दिपीका पडताना पण दोघांच्या वजनातला फरक आणि गुरुत्वाकर्षण w=mg फॉर्म्युल्याने रणवीर आधी खाली बदकन पडत नाही.

रणवीर दिपीका पडताना पण दोघांच्या वजनातला फरक आणि गुरुत्वाकर्षण w=mg फॉर्म्युल्याने रणवीर आधी खाली बदकन पडत नाही. >>> Biggrin

रणवीर दिपीका पडताना पण दोघांच्या वजनातला फरक आणि गुरुत्वाकर्षण w=mg फॉर्म्युल्याने रणवीर आधी खाली बदकन पडत नाही. >>> Lol

रणवीर दिपीका पडताना पण दोघांच्या वजनातला फरक आणि गुरुत्वाकर्षण w=mg फॉर्म्युल्याने रणवीर आधी खाली बदकन पडत नव्>>> बाजेीराव मस्तानीमध्ये तर दोघं समोरासमोर नाहीत तरी टायमिंग मॅच करतात.

फार फार वर्षांपुर्वी गॅलिलिओ ने पिसाच्या कलत्या मनोर्‍यावरुन हलका आणि जड असे दोन चेंडु टाकले होते.. जे एकाच वेळेस खाली आले होते..

झालेच तर रणवीरच्या शरीराचे क्षेत्रफळ जास्त असल्याने एअर रेझिस्टन्स जास्त होऊन तो अंमळ उशीराच खाली पडेल. Proud

Rofl चित्रपटामध्ये प्रेमाची समीकरणे आधीच काय कमी होती म्हणून ही समीकरणे आता मांडावी?

Pages