अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक

Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00

तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?

उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "

या आधिचे सीन या दुव्यावर वाचा

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कलर चेन्जिन्ग पान्डाची अ‍ॅड नाय पाहिली का दक्षे?
तसे कलर चेन्जिन्ग लेन्स हैत त्या.
बाजीगर मधी शारुखची लेन्स पडल्यावर जी धडपड होते शोधण्यासाठी ती बघुन कलर चेन्जिन्ग लेन्सची कल्पना आली. Wink

अमिताभ बच्चन आणि कमल हसनचा कुठलातरी सिनेमा...
शेवटच्या फायटिंगचा सिन.. अमिताभ, कमल हसन सगळे मिळेल त्याच्याशी, मिळेल त्या हत्याराने फायटिंग करण्‍यात मग्न असतात. अर्थातच तेथे हिरोची आई, प्रेयसी आदी सर्व आप्तेष्ट असतातच. तेवढ्यात व्हिलन (बहुधा डॅनी असावा) एक भला मोठा (अगदी हॉलीवुडपटात दाखवतात तसला) ट्रक हिरविणीच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न करतो. ती हिरवीण (नाव माहित नाही) ट्रकच्या पुढून बाजूला होण्याचा प्रयत्न करण्याऐवजी चाकापुढे गडबडा लोळत राहते. आता हिरो तिला वाचवायला येणार हे सगळ्यांनाच माहिती असते. अपेक्षेप्रमाणे अचानक हिरो येतो, पण त्याने हिरविणीला बाजूला खेचावं ना? तर तो चक्क हिरविणीच्या अंगावर उडी मारतो आणि तिच्याबरोबर गडबडा लोळायला लागतो. आधी एकटी हिरवीण ट्रकच्या पुढे गडबडा लोळत असते आता कमल हसन आणि हिरवीण एकमेकांना मिठी मारून एकावर एक ट्रकच्या पुढे गडबडा लोळतात. (कमॉन यार... सिच्युएशन काय, तुम्ही करताय काय??)
नंतर दिग्दर्शकाच्या लक्षात येते की, अरे अमिताभही येथेच आहे की. मग तो अमिताभला त्या दोघांना वाचवायला धाडतो. पण यात त्याचे हात चिरडले जातात. तेवढं होऊनही तो ढिशूम ढिशूम फाय‌टिंग चालूच ठेवतो. शेवटी ओम पुरीला मारायचे असते. तो मोठ्या बुलडोझरवर असतो. अमिताभच्या हातात पिस्तूल लागते, पण हायरे देवा, बोटे चिरडलेली. (फायटिंग करेपर्यंत ती दुखत नव्हती). आता गोळी चालवायची कशी? मग त्याच्या गळ्यात कुणीतरी दिलेला ताईत की चेन असते. त्याला काहितरी आठवते आणि बंदूकीचे ट्रिगर त्या चेनमध्ये अडकवून बंदूक पुढे लोटतो. एका गोळीत ओमपुरी ठार. आहे की नाही गंमत. हा संपूर्ण प्रसंगच मी कॉमेडी समजून पाहिला.

राम - लीला....
हा चित्रपट तर पूर्ण अचाट्-अतर्क्य आहे..
१. एका पाच सात वर्षाच्या मुलाच्या मागे (त्याच्या घरात शिरून) बंदूक घेऊन लागतात, नव्हे गोळ्या घालतात तरी तिथे असलेल्या बाया काहीही हालचाल करत नाहीत. त्याच बाया प्रत्येक गाण्याच्या प्रत्येक ठेक्यावर कमरेला लावलेल्या बंदूकी काढून हवेत गोळ्या झाडतात.
२. एक गठ्ठा नाचणारे शे-दोनशे लोक 'राम' नामक व्यक्तीला खांद्यावर घेऊन नाचताना देखील ठेक्यावर हवेत गोळ्या झाडतात. त्यातली इतर कुणाला नाही तरी त्या रामच्या ....ला लागेल अशी पुसटशी शंकाही कुणाला येत नाही.
३. याच बायका गुंड मागे लागले म्हणुन पळापळ करताना बंदूका काढत नाहीत.
४. राम आणि लीला समोरासमोर उभे राहून एकामेकाला गोळी घालतात. त्यांच्या बाजूला अडीच्-तीन फूटी कठडा आहे. तर गोळ्या लागल्यानंतर ते दोघे ९० अंशात वळुन वर उडून, तो कठडा पार करून एकामेकाला समांतर पाण्यात पडतात...

असे अनेक अचाट सीन या चित्रपटात आहेत..

trouble ::अओ:

नुकताच जय हो हा सिनेमा बघण्यात आला

त्यात टँक ने एका रिक्षाला वाचवण्यासाठी अचानक शहरातल्या रस्त्यावर एन्ट्रि मारली व त्याच्या पाठीमागे लागलेल्या सर्व वाहनान्चि नासधुस्स केली व त्या रिक्षास इस्पितला पातूर घेउन गेला.

Proud
Proud

काल अजरामर चित्रपट अमरकबरँथनी पहायचा योग आला. चर्चच्या फादरचा खून होतांना पाठीवर चाकूचे वार होतात असं सूचित केलंय. मात्र अमिताभ जेव्हा प्रेत पाहतो तेव्हा छातीवर जखम दिसते. अमिताभ बोलत असतांना फादरची पाठ व कपडे घावहीन, स्वच्छ दिसतात.

-गा.पै.

नायक सिनेमातील सीन
अनील कपूर: साहेब लास्ट टाइम वो scooty गुम हुअ उसका complaint लिखवायाथा

पोलिस इन्स्प. : अरे तिच्या इथे लोकांच्या टाटा साफार्या गायब होतात त्याचा पत्ता नाही लागत. तर तुझही scooty काय चीज आहे रे Lol

आप का सुरुर चा उल्लेख झालाच आहे. माझ्यामते त्यातील हा सर्वात अतर्क्य प्रसंग!

हंसिकाताई मोटवानी यांना एका गुंडाने बंदुकीच्या निशाण्यावर ठेवले आहे व याच वेळेस हिमेशभाऊ प्रवेश करतात. बरोबर दोन शरीरसंरक्षक आहेत. (यांच्या चेहेर्यावरही मालकाप्रमाणेच काही म्हणजे काSSSही भाव नाहीत) श.सं. १ गुंडाला शरण येण्यास धमकावतो व अर्थातच काही उपयोग होत नाही. कहर म्हणजे याचे मुख्य कारण हिमेश स्वतः श.सं. १ ला बंदूक फेकून द्यायला सांगतो. जेव्हा तो ऐकत नाही तेव्हा हिमेश श.सं. २ ची बंदूक हिसकावून श.सं. १ वर रोखतो वर त्यास you are drunk असे सुनावतो. बर हे केल्यावर तो तीच बंदूक गुंडावर रोखतो. गुंड देखील 'तू नक्की कोणाच्या बाजूने आहेस रे बाबा' असा अभिनय करायचा आटोकाट प्रयत्न करतो (वि.सू. या चित्रपटात अभिनयाची सामूहिक कत्तल आहे!) मग हिमेशजी त्याला जीवनविषयक तत्वज्ञान उलगडून सांगतात आणि गुंडास उपरती होऊन एका दिव्यातून हंसिकाची व प्रेक्षकांची सुटका होते.

केशकर्तनालयात पाहायला, खरं तर ऐकायला मिळालेला चित्रपटाचा अंश.
सन्नी देओल नृत्यवृंदासह नाचत नाचत गाणं म्हणत असतात. गाणं देशप्रेमावर असावं. इंडियन इंडियन असे शब्द होते. त्यांचा कोणी एक मित्र त्यांना तू तुझ्या गाण्यांचा अल्ब्म का काढत नाहीस असे विचारतात.

कट : सनीपाजी स्टेशनवर कोणालातरी रिसीव्ह करायला जात असतात. (तसा त्यांना फोन येतो, भैया याद है ना अमुक तमुक चार बजे की गाडी से आ रहे हैं) मध्येच गाडी स्किड झाल्याचा आवाज. केशकर्तनालयातले कारागीर, गिर्‍हाईक सगळ्यांच्या माना टीव्हीकडे वळतात. स्किड झालेल्या दुचाकीवरून सनीपाजी एक पांढरीशुभ्र ओढणी गुंडाळलेल्या अवस्थेत उठतात. मग तो दुपट्टा जोरजोरात हलवून ये दुपट्टा किसका है अशी बघ्या जमावाला विचारणा करतात. विचारणेत , भाई ये दुपट्टा किसका है असे म्हटल्याचा मला संशय आला.
मग काही क्षणांनी तबु बघ्या गर्दीच्या मागून सावकाश चालताना दिसते. (आता केशकर्तनालयताला ब्रेक संपतो) दुपट्टा क्लेम करते. बहुतेक माफीही मागते. सन्नीपाजी तब्बुताईंना स्त्रीसाठी दुपट्ट्याच्या महत्त्वाचर उत्स्फूर्त भाषण देतात.
मग काही वेळाने पुन्हा एकदा दुपट्ट्यामुळे सन्नीपाजींवर आणखी एक प्रसंग ओढवला असावा. कारण तब्बुताई मागच्या वेळच्या भाषणाचा हवाला देतात आणि तुम्ही सांगितलेल्या मार्गावरूनच मी चालत होते असे सांगतात.

चित्रपटाचे नाव जाल द ट्रॅप आहे असे शोधाशोध केल्यावर कळले.

आक्रोश सिनेम्यात लै मेजर अ आणि अ सीन आहे.
रेल्वे जात असताना अजय देवगण रेल्वेच्या खालुन रुळ क्रॉस करतो. Uhoh
की मी बघताना हुकलोय?

किस्मत पाहिलाय, विश्वजीतचा? त्यातले 'लाखो है यहा दिलवाले' हे गाणे आवर्जून पाहा(नुस्ते ऐकू नका). गिटार वाजवायची अशी पद्धत आजपर्यन्त तरी पाहिली नव्हती. असा नाचून सुद्धा तो एकालाही धडकत कसा नाही हीच अचाट गोष्ट आहे.
तूनळी वर उपलब्ध

नो एंट्री मध्ये शेवटी तिघे हिरो ज्याप्रकारे पडतात आणि एकमेकांचे पाय धरुन लटकतात तो प्रकार प्रचंड अ आणि अ आहे. तसा तो बराच चित्रपट अ आणि अ आहे पण बघायला मजा येते अनिल कपूर मुळे.

भरत :D. येथे लायब्ररीत दोन तीन वेळा ती डीव्हीडी दिसली होती. एवढे भारी सीन्स असतील याची कल्पना नव्हती. पाहायलाच हवा आता.

हे गाणे अवश्य पहा...खूप खूप आवडेल.आगदी सुरुवातिपसुन ते शेवटपर्यंत.कॅप्शन्स अवश्य वाचा....

https://www.youtube.com/watch?v=f8uK_mWnbr4

आणी हो मी इतक्या विश्वासाने सांगते कारण, हे पाहिल्यानम्तर मला फटके देण्याची तुमची कितीही तीव्र इछा झाली तरी,ते शक्य नाही....एखाद्याला त्रास द्यायचा असेल तर हे विडियो बघायला नक्कि सांगुशकता

Pages