Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00
तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?
उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उदय
उदय
उदयन ह्याच पिक्चरमधेच बहुतेक
उदयन
ह्याच पिक्चरमधेच बहुतेक बोमन इराणी परदेशात पोलीसांच्या कंट्रोल रुममधे हेड असतो.. आणी हिंदीतुन ऑर्डर्स देतो सगळ्यांना!! तिथे अनिल कपुर सोबत पण हिंदीत बोलतो.. बाकी परदेशी लोकांना कसे कळाले ? वर तेही असे लुक्स देतात की सगळं समजलेलं आहे
'जिन्दगी एक जुआ' नावाच्या
'जिन्दगी एक जुआ' नावाच्या पिक्चरचा एक सीन पाहिला. त्यात अनिल कपूर एका गाडीतून येतो. रस्त्यात समोर खूप पिंपं ठेवलेली असतात. तो एक पिंप लाथेने ढकलत १-२ पिंपावर ढकलतो तेव्हा स्फोट होतो. पण ती पिंपं बाजूला करून गाडी पुढे न्यायचं त्याला सुचत नाही. ती पिंपं. हा माठ. दुसरं काय.
तेव्हढ्यात दोन्ही बाजूने तोंडावर मास्क घातलेले लोक येतात. ढिशूम ढिशूम मारामारी झाल्यावर ७-८ लोक मिळून त्याचे हात आणि पाय बांधतात. हात बांधायला दोन आणि पाय बांधायला २ लोक पुरले असते. पण ग्रामीण रोजगार हमी योजना असल्यासारखे ७-८ लोक हे काम करतात. नुस्तं बघत उभं राहिलं तर त्यांना आपण युसलेस आहोत असं वाटत असेल कदाचित. हे सर्व चालू असताना अनिल कपूर किमान हातपाय झाडतो. म्हणजे 'चालू द्या तुमचं. मी थोडा थोडा प्रतिकार करतो तोंडी लावण्यापुरता'. मग हे झाल्यावर ते लोक त्याला ब्रिजवरून पाण्यात ढकलतात. एका गोळीने काम झालं असतं - तेही चोख. पण नाही.
मग ते लोक तिथून गेल्यावर पोलिसांची गाडी येते. त्यातून सुरेश ओबेरॉय उतरतो. आणि डायरेक्ट धावत पाण्यात उडी मारतो. अनिल कपूरला आत टाकलंय हे त्याला कसं कळतं देवाला ठाऊक. मग तो पाण्यातच त्याचे हात पाय सोडवतो आणि त्याला बाहेर काढतो. अजब मामला सगळा!
स्वप्ना )
स्वप्ना :))
परवा " मिशन इम्पोसिबलः घोस्ट
परवा " मिशन इम्पोसिबलः घोस्ट प्रोटोकॉल" जरा जास्तच जवळुन बघितला...
शेवटची हाणामारी मुंबईत दाखवली आहे... एका इमारतीमधे गाड्यांचे पार्किंग बनवलेले आहे त्यात मारामारी चालु आहे..
परंतु मारामारीची दृश्ये चित्रीत करताना गाड्यांचे नंबर प्लेट नाही बदलले
.. अमेरिकन नंबरप्लेट्स सगळ्यांच गाड्यांना दिसतात.. बीएमडब्ल्यु, मर्सिडीज सगळ्या विदेशी गाड्या आहेत.. एक तरी भारतीय घ्यायची.. निदान 

चला नाही घेतली........ पण किमान नंबर प्लेट तर भारतीय वापरा ........
उदयन, ती बिल्डींग भारतातली
उदयन, ती बिल्डींग भारतातली म्हणून दाखवलीय का ? लक्षात नव्हते आले. तसाही तो सिनेमा इतक्यावेळा ठिकाणं बदलतो कि सध्या कुठल्या देशात आहोत तेच कळत नाही.
हो.............. अनिल कपुर
हो.............. अनिल कपुर साठी तो भारतात येतो........ मुंबईच्या रस्त्यांवर भरधाव नविन कोरी बीएमडब्ल्यु कार चालवतो.... नंतर व्हिलन टिव्ही टॉवर सेंटर मधुन बाहेर पडुन पळतो ..त्याचा पाठलाग करत..तो त्या बिल्डिंग मधे जातात
ओह. टॉम क्रुझ आणि कॅमेरुन
ओह.
टॉम क्रुझ आणि कॅमेरुन दियाझ चा पण असाच एक अचाट सिनेमा आला होता. अजिबात चालला नव्हता तो.
नाईट अँड डे................
नाईट अँड डे................ ठिक होता......स्टोरी मधे गडबड होती.... अॅक्शन भारी होती...
आता त्याच चित्रपटावरुन रितीक आणि कतरीनाचा "बँग बँग" नावाचा चित्रपट येत आहे
ह ह मे..
ह ह मे..
कुर्बानी चित्रपटात 'क्या
कुर्बानी चित्रपटात 'क्या देखते हो, सुरत तुम्हारी' हे गाणं आहे. cowboy छाप कपड्यातला फिरोज खान आणि अतिशय तोकडे कपडे घातलेली झीनत अमान. जर आता या अशा जोडीवर हे गाणे चित्रीत झाले आहे, तर नायक नायकिणीच्या रूपाचे वर्णन करताना 'रोज रोज देखू तुम्हे नयी नयी लगे तेरे अंगोमे अमृत की धारा' असे संस्कृतप्रचुर उच्च शब्द वापरेल का? निदान गाण्याचे बोल काय ते लक्षात घेऊन तरी नायक नायिकेची निदान त्यांच्या वेषभूषेची तरी थोडी काळजी घ्यायची होती
त्यातील अचाट आणि अतर्क्य हे
त्यातील अचाट आणि अतर्क्य हे "सुरत तुम्हारी" हे उत्तरच आहे
त्या गाण्यात 'लगती नही ठीक
त्या गाण्यात 'लगती नही ठीक नियत तुम्हारी' हे शब्द गीतकाराच्या विनोदबुध्दीची साक्ष देतात. असले कपडे घालून आपण समोर आल्यावर हिरोने 'आज मुझे एहसास हो रहा है की मेरी कोई बहन नही है. क्या तुम मुझे राखी बांधोगी बहन?' असं म्हणावं अशी तिची अपेक्षा आहे काय?
स्वप्ने
स्वप्ने

स्वप्ना
स्वप्ना
स्वप्ना हे बाकी ग्रेट
स्वप्ना हे बाकी ग्रेट हं.....
म्हणजे 'स्वतः '' आ बैल मुझे मार...'' अशे सिच्युएशन निर्माण करायची आणि नियत ठीक नाही म्हणायचे. खासा न्याय !
(अर्थात काही विदुषी इथे असाही वाद घालू शकतील तिला तिच्या आवडीचे कपडे घालायचेही स्वातंत्र्य नाही की क्वॉय. आणि तिने कसेही कपडे घातले म्हणून त्याला काहीही करायचा अधिकार प्राप्त होतो की क्वॉय आणि अंगभर कपडे घातले तरी त्याची नियत बिघडत नाही असे थोदेच आहे वगैरे वगैरे....)
स्वप्ना रॉक्स...
स्वप्ना रॉक्स...
यावरून मला दोस्ताना
यावरून मला दोस्ताना (अमिताभचा) मधला सीन आठवला. झीनतला पेंटल छेडतो, तर ती त्याची मानगूट पकडून पोलिस स्टेशनला घेऊन जाते. तिथे तक्रार करते की याने मला बघून शिटी मारली...गाणे म्हटले. अमिताभ त्याला लॉकप मध्ये पाठवतो. झीनतला वरपासून खालपर्यंत बघतो आणि म्हणतो, मेमसाब आप ऐसे कपडे पहन के निकलेगी तो गुंडों की सीटोयाँ नही तो क्या मंदिर की घंटियां बजेगी?
स्वप्ना.......
स्वप्ना.......

खूप आधी साजिद खानचा 'कहने में
खूप आधी साजिद खानचा 'कहने में क्या हर्ज है' कार्यक्रम लागायचा. त्यात 'हॅम सीन' नावाचा एक अ. आणि अ. सीन्ससाठी एक सेक्शन होता. त्यातलं हे एक रत्न
-
http://www.youtube.com/watch?v=d0ffh3sotCI
चेन्नई एक्स्प्रेस :- कल्याणला
चेन्नई एक्स्प्रेस :-
कल्याणला केवळ ५ मिनिट थांबते, तीही रात्री ९:१० ते ९:१५. चित्रपटात ती दिवसा जातांना दाखवलीय. कल्याणला स्टेशन बाहेर येउन परत जाणे ५ मिनिटात शक्य आहे ?
पुढे शाखा मित्रांचा कर्जत स्टेशनला भेटायला सांगतो, पण चेन्नई एक्स्प्रेस कर्जतला थांबतच नाही.
शाखाचा मोबाईल इतक्या वरुन फेकुनही जसाच्या तसा? नोकियाची जाहीरात आहे का?
दुधसागर हे स्टेशन आहे का? तसा चित्रपटात उल्लेख आहे, "हम जहा खडी होती है,स्टेशन वहिसे शुरु होती है".
पुढे शाखा मित्रांचा कर्जत
पुढे शाखा मित्रांचा कर्जत स्टेशनला भेटायला सांगतो, पण चेन्नई एक्स्प्रेस कर्जतला थांबतच नाही. >>>>
....आधी बघा मग लिहा .... चेन्नई एक्स्प्रेस कर्जत ला नंतर लोणावळ्याला थांबते....
कैच्याकै ...:खोखो:
Time Table
Train No Train Name Date
11041 CSTM CHENNAI EX 26- Aug- 2013
Stn Code Stn Name Route No Arrival Departure Distance Day Remark
CSTM MUMBAI CST 1 - 14:00 0000 1
DR DADAR 1 14:12 14:15 0009 1
TNA THANE 1 14:38 14:40 0034 1
KYN KALYAN JN 1 15:00 15:05 0054 1
KJT KARJAT 1 15:48 15:50 0100 1
LNL LONAVALA 1 16:38 16:40 0128 1
KK KHADKI 1 17:26 17:28 0186 1
PUNE PUNE JN 1 18:00 18:10 0192 1
DD DAUND JN 1 19:25 19:30 0268 1
KWV KURDUVADI 1 21:43 21:45 0377 1
आणि दुधसागर हे स्टेशन नाही दाखवले.....त्यांनी चैन खेचली होती त्यामुळे त्या स्पॉट ला ट्रेन थांबली
बाकी चे तुमचे लॉजिक बरोबर आहे..........
उदय माझ्याकडे हे दाखवतच नाही.
उदय माझ्याकडे हे दाखवतच नाही. Indian Railways म्हणते की चेन्नै एक्स्प्रेस दारवरुन सुटते
12163 CHENNAI EXPRESS DADAR MON TUE WED THU FRI SAT SUN
SNo Stn Code Stn Name Route No. Arrival Time Dep. Time Halt Time (In Minutes) Distance Day Remark
1 DR DADAR 1 Source 20:30 0 1
2 KYN KALYAN JN 1 21:10 21:15 5:00 45 1
3 LNL LONAVALA 1 22:48 22:50 2:00 119 1
4 PUNE PUNE JN 1 00:05 00:10 5:00 183 2
5 SUR SOLAPUR JN 1 03:55 04:05 10:00 447 2
6 GR GULBARGA 1 06:08 06:10 2:00 560 2
7 SDB SHAHABAD 1 06:33 06:35 2:00 586 2
8 WADI WADI 1 07:15 07:20 5:00 596 2
9 YG YADGIR 1 07:50 07:52 2:00 635 2
10 NRPD NARAYANPET ROAD 1 08:08 08:10 2:00 658 2
11 RC RAICHUR 1 08:48 08:50 2:00 704 2
12 MALM MANTHRALAYAM RD 1 09:23 09:25 2:00 732 2
13 AD ADONI 1 09:58 10:00 2:00 773 2
14 GTL GUNTAKAL JN 1 11:00 11:15 15:00 825 2
15 GY GOOTY 1 11:40 11:42 2:00 853 2
16 TU TADIPATRI 1 12:23 12:25 2:00 901 2
17 YA YERRAGUNTLA 1 13:23 13:25 2:00 969 2
18 HX CUDDAPAH 1 14:08 14:10 2:00 1008 2
19 RJP RAZAMPETA 1 15:08 15:10 2:00 1059 2
20 KOU KODURU 1 15:38 15:40 2:00 1092 2
21 RU RENIGUNTA JN 1 16:45 17:00 15:00 1133 2
22 AJJ ARAKKONAM 1 18:03 18:05 2:00 1205 2
23 PER PERAMBUR 1 18:53 18:55 2:00 1268 2
24 MS CHENNAI EGMORE 1 19:45 Destination 1279 2
असो. जाऊ द्या.
माझं search चुकलं असं म्हणावं लागेल. लॉजिक गडबडलं. चित्रपट पहाण्याचा परिणाम हवं तर
आतापर्यंत जबरदस्तीने ७-८ वेळा बघितला... हा हा हा ...
अहो तुमची चेन्नई एक्स्प्रेस
अहो तुमची चेन्नई एक्स्प्रेस रात्रीची आहे... चित्रपटात सकाळची दाखवली
तीही रात्री ९:१० ते ९:१५.
तीही रात्री ९:१० ते ९:१५. चित्रपटात ती दिवसा जातांना दाखवलीय.>>> लेट झाली असेल गाडी.
>>अर्थात काही विदुषी इथे
>>अर्थात काही विदुषी इथे असाही वाद घालू शकतील तिला तिच्या आवडीचे कपडे घालायचेही स्वातंत्र्य नाही की क्वॉय. आणि तिने कसेही कपडे घातले म्हणून त्याला काहीही करायचा अधिकार प्राप्त होतो की क्वॉय आणि अंगभर कपडे घातले तरी त्याची नियत बिघडत नाही असे थोदेच आहे वगैरे वगैरे....
त्यांचं म्हणणं बरोबर आहे. पण ते रामराज्यात हो....सध्या कलियुग चालू आहे. दुसरे काय करतात त्यावर आपला अधिकार नाही. आपण काय करतो त्यावर मात्र आहे. बाकी पतौडीच्या सध्याच्या नबाबांच्या बेगम म्हणाल्याच की - आयटम सॉन्गमुळे लोकांच्या मनावर वाईट परिणाम होतात असं मला वाटत नाही. जनात काही म्हणोत, मनात काय समजायचं ते समजल्या असतील. पण कळतं ते वळत नाही ही शोकांतिका आहे.
व्वा. विजय आणि उदयनच्या
व्वा. विजय आणि उदयनच्या वादामुळे खर्या चेन्नई एक्सप्रेसच टाईम टेबल मिळाल आणि सगळ्यात महत्त्वाच म्हणजे या पिक्चरमध्ये अ आणि अ सीनसाठी का होईना पण कल्याण स्टेशन दाखवलं आहे हे समजलं.... आता या सीनसाठी तरी बघायला हवा......
दोन वाजता व्हीटी हून सुटते
दोन वाजता व्हीटी हून सुटते दुपारी. मी पिक्चर रिलीज झाला त्या वीकांताला सौथ बाँबेत गेले होते. तर परत येताना २ वाजताची ठाणा लोकल घेतली तर चे ए जस्ट सुटली होती थोडावेळ बरोबर होती मग सुसाट पुढे गेली.
चे. ए. ने पण चित्रपटात वास्तव
चे. ए. ने पण चित्रपटात वास्तव भुमिका करावी अशी अपेक्षा आहे क क्काय
मग दूधसागर कसे लागेल ? ते तर लोंढा - कॅसल रॉक - वास्को लाईनवर आहे. आणि तिथे स्टेशन नै कै !
उदयन, मग बेशुद्ध झालेल्या
उदयन, मग बेशुद्ध झालेल्या र्हितीकला, कतरीना खांद्यावरून उचलून नेते असा पण सीन असेल त्यात !
Pages