Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00
तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?
उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मामी... ___________/\________
मामी...
___________/\____________
मामी.... खरेच दंडवत
मामी....
:G:
खरेच दंडवत आपल्याला....
वर एका प्रतिसादात लिहिले आहेच, बापू सही बोले थे....
An eye for an eye makes whole world blind...ते बदलुन म्हणावेसे वाटते आहे...Eye to eye makes the music/sensibility/creativity dead !!!
अर्रर्रर्रर्र .... ते दंडवत
अर्रर्रर्रर्र .... ते दंडवत वगैरे मागे घ्या लोक्स. मी फक्त कॉपी पेस्ट केलंय.
जबसे हुइ है मोहोब्बत. >>
जबसे हुइ है मोहोब्बत. >> स्वस्ति या धाग्याची पहीली दोन पाने नजरेखालून घाला... आणि मग पुन्हा हा व्हिडीओ पाहा.. (अर्थात तेवढी हिंमत असेल तर..) पण कधीही पाहीला तरी हसायला येतं.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=5HrNLkZx7Gg << अ आणि अ
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=5HrNLkZx7Gg << अ आणि अ अ ओ, आता काय करायचं
>>> बॅटरी के सेल????
अरे टण्या,इलाज होता तर तो भाउ का कोण येऊन अशक्य आक्रामक वाक्य बोलायची वाट कशाला बघत बसलास...गाण म्हणून झाल्यानंतर त्या डॉक्टर ला खोपचात घ्यायच ना...काहीही आहे हा सीन
या गाण्यात स्टीरिंग जास्त का
या गाण्यात स्टीरिंग जास्त का नवीन निश्चलची मान जास्त हलते आहे ---प्रचंड स्पर्धा आहे. अगदी विरुध्द नटीचे डोळे आणि हावभाव
याला लायसन्स कुणी दिले तो अचाट असणार
https://www.youtube.com/watch?v=Ci2EEsnVHB4
चित्रपट - शैतानी
चित्रपट - शैतानी ड्रॅक्युला
सीन सांगण्यापूर्वी वैधानिक इशारा : हा प्रकार (चित्रपट म्हणवत नाही) आपल्या जबाबदारीवर पहावा. इतका बेजबाबदार रीतिने बनवलेला सिनेमा कधीच पाहिला नाही. गुंडा मध्ये तरी काही किमान कथानक व कंटिन्युटी आहे, इथे तुमच्या बुद्धिची दृश्यांमध्ये सुसंगती लावण्याची परीक्षा घेतलेली आहे.
तर यात अचाट काय आहे? नावाला सुद्धा कंटिन्युटी नाही. तुम्ही उलटा सुलटा, कुठुनही कसाही पाहा, काही फरक पडणार नाही. एवढेच काय म्यूट करून पाहिलात तरी देखील तुम्हाला तेवढाच चित्रपट समजेल जेवढा आवाजासहित पाहिल्यावर समजला असता. फक्त अशक्य आचरट संवादांना मात्र तुम्ही मुकाल. आणि एडिटिंग वर अजिबात कष्ट घेतलेले नाहीत. उलट 'मेरी अगली लाईन क्या है' या कुजबुजत केलेल्या प्रश्नालाही कात्री न लावता चित्रपटात स्थान आहे.
सीन क्र. १ :
एक वेअरवुल्फ(मानवी लांडगा) एका मुलीवर हल्ला चढवतो. सम्पूर्ण चित्रपटभर निरनिराळे मॉनस्टर असेच हल्ले चढवत राहतात. मग तिचा प्रियकर तिच्या मदतीला धावतो व मानवी लांडग्याला एक हलकासा फटका देतो. यामुळे लांडगोबांचा मुखवटा निघून येतो व खाली पडतो (हो हे चित्रपटात पाहायला मिळते!) तिघेही (पक्षी प्रियकर, मुलगी व लांडगा) क्षणभर थांबतात, प्रियकर टॅमप्लीज म्हणून बाजूला होतो व लांडगा त्याचा मुखवटा उचलून पुन्हा घालतो आणि फाईट पुन्हा सुरु. एवढी मेहनत घेऊनही २ मिनिटात तो मुखवटा पुन्हा निघून येतो.
सीन क्र २ :
काही लोक एका सुमो सारख्या गाडीत बसून जंगलात येतात. ड्रॅक्युला त्यांना मारण्यासाठी एका भूतणीला पाठवतो. ती अत्यंत आचरट डायलॉग्ज मारुन त्यांना घाबरवते. आता अशा वेळी त्यांनी पळत जाऊन गाडी गाठणे अपेक्षित आहे कि नाही? पण ते निवांत चालत जातात, अजिबात घाई न करता गाडीत बसतात व मग जंगलातून पळून जातात. विशेष म्हणजे भूतणी ते गाडीत बसेपर्यंत एका कडेला गपचूप उभी राहते. बहुधा परत गेल्यावर मालकाला काय थाप मारावी याचा विचार करत असावी. असे कामचुकार सेवक असल्यावर शेवटी ड्रॅक्युलाचा अंत होणार नाही तर अजून काय होणार.
युट्युब लिंक द्याअसल्या
युट्युब लिंक द्याअसल्या भन्नाट प्रकाराची.
शबाना, ते गाणं केवळ मदन मोहनसाठी ऐकावं. बघण्याचे कष्ट काहून घ्यावेत?
नवीन निश्चलः नावाला जागून काम करणारा माणूस. कायमच नवख्यासारखं आणि निश्चल.
पायस.. मी पडले खुर्चीतुन..
पायस.. मी पडले खुर्चीतुन..
(वाचुनच)
युट्युब लिंक द्याअसल्या भन्नाट प्रकाराची. >> +१
हे बहुतेक स्केअरी मुव्ही म्हणून एक कॉमेडी प्रकार आहे त्यातले वाटते.
नवीन निश्चल : देवानंद चा
नवीन निश्चल : देवानंद चा रुमाल्,डोळ्या>त राकु चा रोमँटिक भाव्,जितेन्द्र सारख थोडफार हाव्भाव करायचा नादात्,सगळच भिघडून बसल.त्यात चित्रपटाच अजून एक गाण पाहण्याचा मी प्रयत्न केला (कारण बघवतच नव्हत),पार्टी साँग...ती नटी फारच भयाण दिसत होती
ड्रॅकुला : होरर मोव्हीपेक्षा तो पॉ. मोव्ही जास्त वाटतो...पियु, युट्युब वर नाव टाका,दिसेल
@पायस खरं की काय? कसलं
@पायस
खरं की काय? कसलं जबरदस्त वर्णन केलंयत तुम्ही. लिंक पायजेच बाबा असल्या शिणुमाची.
काही लोक एका सुमो सारख्या गाडीत बसून जंगलात येतात. >>>> सुमो नसेल. ओम्नी असेल बघा!
..... रच्याकने, हॉरर मुव्हीचं स्पूफ केलं असेल काय? एक अशीच शंका आली. त्या Twilight सिनेमाची पॅरोडी काढली होती Vampires Suck या नावानं. तसं काहीसं असू शकतं.
युट्युब लिंक द्या असल्या
युट्युब लिंक द्या असल्या भन्नाट प्रकाराची. >> शोधा म्हणजे सापडेल
हा सगळ्यांसाठी एंजॉयेबल नसल्याने लिंक शेअर करत नाहिए पण इच्छूकांसाठी युट्युबवर उपलब्ध आहे.
ड्रॅकुला : होरर मोव्हीपेक्षा तो पॉ. मोव्ही जास्त वाटतो >> नाही ओ
बी ग्रेड हॉररला साजेसे अंगप्रदर्शन निश्चित आहे पण तसला नाहीये. रामसेंच्या मॉडेलच्या भ्रष्ट कॉप्या अनेक आल्या त्यातली ही २००६ सालची एक.
काही लोक एका सुमो सारख्या गाडीत बसून जंगलात येतात. >>>> सुमो नसेल. ओम्नी असेल बघा! >>>> ती कुठली ते नक्की करण्यासाठी तेवढ्यासाठी हा चित्रपट पुन्हा बघणे नाही. त्यामुळे ओम्नी पण चालेल
ज्यांची सहनशक्ती मर्यादित आहे त्यांच्यासाठी याचा एक भन्नाट रिव्ह्यु आहे तो शेअर करीत आहे.
http://teleport-city.com/2013/03/08/shaitani-dracula/
कसला डेडली लांबलचक रिव्यू आहे
कसला डेडली लांबलचक रिव्यू आहे तो! वीकेण्डलाच वाचायला हवा
त्या रिव्ह्यू मधे चार पटकथा
त्या रिव्ह्यू मधे चार पटकथा तयार करुन महेश भट चार हॉरर (आणि हॉरीबल) सिनेमे बनवू शकतो!
रिव्हू वाचुन डिव्हीडी घ्यायचा
रिव्हू वाचुन डिव्हीडी घ्यायचा विचार करताहेत लोक
(खालच्या कॉमेन्ट्स वरुन)
>>उलट 'मेरी अगली लाईन क्या
>>उलट 'मेरी अगली लाईन क्या है' या कुजबुजत केलेल्या प्रश्नालाही कात्री न लावता चित्रपटात स्थान आहे.
>>लांडगोबांचा मुखवटा निघून येतो व खाली पडतो (हो हे चित्रपटात पाहायला मिळते!) तिघेही (पक्षी प्रियकर, मुलगी व लांडगा) क्षणभर थांबतात, प्रियकर टॅमप्लीज म्हणून बाजूला होतो व लांडगा त्याचा मुखवटा उचलून पुन्हा घालतो
बर्टोल्ड ब्रेख्त या जर्मन नाटककाराने रंगभूमीवर काही नवे प्रयोग केले. नाटकाने दोन तास केवळ मनोरंजन न करता त्यात नाटक हे नाटक आहे याची अधूनमधून प्रेक्षकांना जाणीव करून देणे अवश्यक आहे असे त्याचे मत आहे. त्यामुळे त्याच्या नाटकातली पात्रे अधूनमधून प्रेक्षकांशी थेट संवाद साधतात. प्रस्तुत दिग्दर्शकावर ब्रेख्त चा प्रभाव जाणवावा
--आ. न. वि. कु.
ता क : पहिला भाग पाहिला. ड्रॅक्युलाचे दात जत्रेत मिळणारे प्लेस्टिकचे दात आहेत त्यामुळे पहिल्या सीन मध्ये दात नुसतेच शुभ्र दिसत असल्याने सकाळी टूथपेस्ट ने दात घासल्यावर चूळ न भरता ड्रॅक्युला बाहेर आला असे वाटते.
विकु किंवा ब्रेख्त वरही या
विकु
किंवा ब्रेख्त वरही या दिग्दर्शकाचा प्रभाव असू शकतो. ब्रेख्त आधीचा असला तरी काळाचे माध्यम भेदून वगैरे...
'मेरी अगली लाईन क्या है' या
स्केअरी मुव्ही म्हणून एक कॉमेडी प्रकार आहे त्यातले वाटते.>>
पायस आणि इतर.... इतके अ आ अ अख्खेच्या अख्खे चित्रपट पाहण्यासाठी ज्या समाधीवस्थेत जातात... अचाट सहनशक्ती आणि अतर्क्य योगसामर्थ्य !! शिसान स्वीकारावा!!! ___/\___
https://www.youtube.com/playl
https://www.youtube.com/playlist?list=PLBB03A14A5E77299E
हे घ्या शैतानी लिंक
"मै तुम्हे लेडी ड्रॅक्युला
"मै तुम्हे लेडी ड्रॅक्युला बनाऊंगा और फिर तुम मेरे लिए और ड्रॅक्युला पैदा करोगी"
असले संवाद आणि कन्सेप्टस आहेत या पिक्चर मधे!! सिरीअसली?? ड्रॅक्युला पैदा??? पूर्ण पिक्चर अ आणि अ आहे रे देवा!
(No subject)
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=aF3QeJyakd8
त्याच पठडीतला "सन ऑफ ड्रॅक्युला"
अरेरे.. ब्रेख्तच्या
अरेरे.. ब्रेख्तच्या एलियनेशनला कुठे वेठीला धरलंय.. हे भग्गू..
अजून आलं नसेल तर eye to eye
अजून आलं नसेल तर eye to eye बरोबर हे ही बघा..
https://www.youtube.com/watch?v=Cvfvn27Akxk
मॉर्निंग लव
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=iFJg-j5cn9Y
जोगिंदरः बेस्ट डान्सर इन द वर्ल्ड.
लोटा डान्स
लोटा डान्स
लोटा डान्स बापरे ! बघवत नाही
लोटा डान्स
बापरे ! बघवत नाही जास्त . शुट करणारयाचे हाल झाले असतील अगदि . त्यातनं अजुन एडिट करणारयाचा तर अंतच !!!
आय टु आय आणि मॉर्निंग लव
@सन ऑफ ड्रॅक्युला - __/\__
@सन ऑफ ड्रॅक्युला - __/\__ अचाट आहे पण शैतानी इतका नाही.
मॉर्निंग लव -
हा मनुष्य नक्की जब से हुई है मोहोब्बतवाल्याचा लांबचा नातेवाईक असणार. जरा जास्ती वेळा हसतो इतकंच!!
जोगिंदरचा विषय निघाला कि मला सर्वात आधी 'रंगा खुश' आणि 'प्यासा शैतान' या त्याच्या दोन अजरामर कलाकृती आठवतात. पण हा लोटा डान्स देखील कहर आहे.

आता तीन इक्के शोधायला लागणार
Pages