Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00
तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?
उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
......
......
साधना, तो चित्रपट वेगळा आहे
साधना, तो चित्रपट वेगळा आहे बहुतेक. त्यात एक राकु मरतो आणि चित्रगुप्त की यम कुणीतरी त्याच्यात दुसर्या राकुचा आत्मा भरतो. त्यात सायरा बानो आहे.
यात तो मरत नाही, फकस्त पाय तुटतो. आणि यात साधना (नटी) आहे.
हो बरोबर.. म्हणुन एडिटले.
हो बरोबर.. म्हणुन एडिटले. हिरो हिर्विन दोन्ही एकच त्यामुळे गोंधळले. तो झुक गया आसमान.
झुक गया आसमान वर लिही
झुक गया आसमान वर लिही स्वप्ना. तू काय लिहीणार या कल्पनेनेच हसायला येतंय.
स्वप्ना..
स्वप्ना..
स्वप्ना
स्वप्ना
तो आत्मा बदलेला षिनेमा झुक
तो आत्मा बदलेला षिनेमा झुक गया आसमान,
स्वप्ना, आरजू संपूर्ण पाहायला
स्वप्ना, आरजू संपूर्ण पाहायला हवा होतास. राकुचा पाय कापलाय (तसा तो जयपूर फुट लावून फिरत असतो) म्हणून तो साधनाला दुसर्या कोणाशी तरी (बहुतेक संजय खान) लग्न करायला उद्युक्त करतो. लग्न मोडण्याचे खरे कारण साधनाला कळते तेव्हा ती गांधारीचे अनुकरण करू पाहते हा क्लायमॅक्स. ते कसे ते प्रत्यक्ष पाहण्याजोगेच आहे.
>>त्या देवाची दया कसली, समस्त
>>त्या देवाची दया कसली, समस्त स्त्री जातीवर अनंत उपकारच म्हणायचे.
तेच तेच. (समस्त स्त्रीजातीवर) भगवान की दयासे, मेरी शादी नही हुई.. असं असणार ते वाक्य
धन्स लोक्स भरत, मला वाटतं
धन्स लोक्स
भरत, मला वाटतं आरजूत फिरोज खान आहे. संजय खान असता तर राकुपेक्षा बरा होता. पण फिरोज खान आणि राकु म्हणजे नशिबच फुटलं.
स्वप्ना , अ अॅन्ड अ साठी नवा
स्वप्ना , अ अॅन्ड अ साठी नवा सिनेमा दाखल झालाय ! पाहिलास का ? नसेल तर पहा आणि मग लिही !
इन्ना, कुठला सिनेमा? मी नवा
इन्ना, कुठला सिनेमा? मी नवा हिन्दी सिनेमा पहायचं कधीच बंद केलंय.
धूम ३!!!
धूम ३!!!
भरत , ती नटी लॉग्ज कापायच्या
भरत , ती नटी लॉग्ज कापायच्या मशिनच्या पट्ट्यावर जाऊन बसते तेका?

खूप खूप लहानपणी रविवारी दूर्दर्शनवर पाहिला होता.
परवा मिशन काश्मीर नावाच्या
परवा मिशन काश्मीर नावाच्या सिनेमाचा थोडासा भाग पाहिला....त्यात संजय दत्तच्या लहान मुलाला डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याला हॉस्पिटलात घेऊन जातात असा सीन होता. संजय दत्त दोन्ही हातात मुलाला आडवा उचलून नर्सला विचारतो," नर्स, आय.सी.यू. किधर है ?" यावर ती नर्स उत्तरते, "आगेसे लेफ्ट". आय.सी.यू.त धाडकन दरवाजा उघडून गेल्यावर कोणीही नसतं, यावर नर्सचं उत्तर, " आज कोईभी ड्युटीपे नहीं है".
पूर्ण सिनेमा पाहिला असता तर
पूर्ण सिनेमा पाहिला असता तर हा सीन अचाट आणि अतर्क्य वाटला नसता.
हो साती.
हो साती.
ती नटी लॉग्ज कापायच्या
ती नटी लॉग्ज कापायच्या मशिनच्या पट्ट्यावर जाऊन बसते >>> आणि ती पट्ट्याच्या दुसर्या टोकावर जाऊन बसते. म्हणजे पट्टा हळूहळू सरकून ती पात्याजवळ येईस्तोवर हिरो तिला वाचवायला येऊन पोहोचतो. पाय कापून घ्यायचाच तर पात्याच्या जवळच जाऊन बसायचं ना! अर्ध्या सेकंदात काम झालं असतं.
पाय कापून घ्यायचाच तर
पाय कापून घ्यायचाच तर पात्याच्या जवळच जाऊन बसायचं ना! अर्ध्या सेकंदात काम झालं असतं. >
स्वप्नाच्या आरजुच्या पोस्ट
स्वप्नाच्या आरजुच्या पोस्ट साठी
मिशन काश्मीर हा आख्खा सिनेमाच
मिशन काश्मीर हा आख्खा सिनेमाच अचाट आहे. संजय दत्तचं एक गाणं आहे ना त्यात - त्याच्या बॅगमधे टाईम बॉम्ब टिकटिक करतोय आणि हा बायकोबरोबर गाणं गातोय?
मूळ कथाकल्पना वाईट नाही - पण कैच्याकै दाखवलंय
संजय दत्तचं एक गाणं आहे ना
संजय दत्तचं एक गाणं आहे ना त्यात - त्याच्या बॅगमधे टाईम बॉम्ब टिकटिक करतोय आणि हा बायकोबरोबर गाणं गातोय?>>>>> अस काही आहे यात? मला नाही आठवत
हो. ह्रितिक रोशनने संजय
हो. ह्रितिक रोशनने संजय दत्तला मारण्यासाठी बॉम्ब ठेवलेला असतो. पण चुकून सोनाली कुलकर्णी मरते. (संजय दत्त मधल्यावेळेत घरी येतो असा प्रसंग आहे)
मिशन काश्मिर मला आवडतो. बराचसा रीअल घेतला आहे, वरती अबोलीने जो प्रसंग लिहिलाय, तो अर्धवट लिहिलाय. संजय दत्तचा मुलगा वरून खाली पडतो, पण त्याच्यावर डॉक्टर ट्रीटमेंट करायला नकार देतात, कारण पोलिसवाल्यांवर उपचार करायचे नाहीत असा फतवा निघालेला असतो. म्हणून संजय दत्त त्याला दुसर्या हॉस्पिटलमधे घेऊन जातो, तिथेदेखील कुणीही उप्चार करत नाही आणि उशीर झाल्याने मुलगा दगावतो.
कधी नव्हे ते संजय दत्त यामधे सुसह्य वाटतो. ह्रितिक तेव्हा खूप नवीन होता तरीही त्याचे काम मला आवडले. प्रीटी झिंटा तेव्हा किती फ्रेश दिसायची.
हा एवढा पण अचाट सिनेमा नाही पण मग वरदाने अफलातून, लाल बादशाह, न तुम जनो ना हम, आप मुझे अच्चे लगने लगे वगैरे नितांतसुंदर चित्रपट पाहिलेले नसतील.
त्यामुळे तिला मिशन काश्मिर आचाट वाटू शकतो!!!
हो. ह्रितिक रोशनने संजय
हो. ह्रितिक रोशनने संजय दत्तला मारण्यासाठी बॉम्ब ठेवलेला असतो. पण चुकून सोनाली कुलकर्णी मरते. (संजय दत्त मधल्यावेळेत घरी येतो असा प्रसंग आहे) >>>> ओह्ह! मी विसरले मग...
कधी नव्हे ते संजय दत्त यामधे सुसह्य वाटतो. ह्रितिक तेव्हा खूप नवीन होता तरीही त्याचे काम मला आवडले. प्रीटी झिंटा तेव्हा किती फ्रेश दिसायची. >>>> +१
हा एवढा पण अचाट सिनेमा नाही पण मग वरदाने अफलातून, लाल बादशाह, न तुम जनो ना हम, आप मुझे अच्चे लगने लगे वगैरे नितांतसुंदर चित्रपट पाहिलेले नसतील. स्मित त्यामुळे तिला मिशन काश्मिर आचाट वाटू शकतो!!!>>>>
नाही, मी असे नितांतसुंदर
नाही, मी असे नितांतसुंदर शिणुमे पहात नाही, नंदिनी
(अपवाद - तो काजोल-अजय देवगण-महिमा-चंद्रचूड सिनेमा)
मिशन काश्मीर मधले रोल्स संजय
मिशन काश्मीर मधले रोल्स संजय दत्त व हृतिक च्या जागी अमिताभ व शाहरूख करणार होते मूळ प्लॅन प्रमाणे. पण अमिताभ ने बहुधा मोहब्बतेच्या नारायण "नाराज"(***) शंकर च्या रोल्स मुळे डेट्स दिल्या नाहीत आणि शेवटी रोल नाकारला. मग काही कारणाने शाहरूखनेही नाकारला. सोनाली कुलकर्णीचा ही रोल बहुधा मूळचा दुसर्या कोणाचा तरी होता.
(***) - जसपाल भट्टी ने त्या रोल चे अफलातून विडंबन केले होते कोणत्यातरी चित्रपटात. त्यातील कॅरेक्टरचे नाव.
मिशन काश्मीर मधले रोल्स संजय
मिशन काश्मीर मधले रोल्स संजय दत्त व हृतिक च्या जागी अमिताभ व शाहरूख करणार होते मूळ प्लॅन प्रमाणे. पण अमिताभ ने बहुधा मोहब्बतेच्या नारायण "नाराज"(***) शंकर च्या रोल्स मुळे डेट्स दिल्या नाहीत आणि शेवटी रोल नाकारला. मग काही कारणाने शाहरूखनेही नाकारला. सोनाली कुलकर्णीचा ही रोल बहुधा मूळचा दुसर्या कोणाचा तरी होता.>>>> बर झाल.... जो होता है वो अच्छे के लिए....
बॉर्डर मधलं 'संदेसे आते है'
बॉर्डर मधलं 'संदेसे आते है' पाहात होते. 'वहा थोडी दूर है घर मेरा, मेरे घरमे है मेरी बुढी मां' ह्या ओळीवर घराबाहेर आरामखुर्चीत बसलेल्या राखीवर कॅमेरा आला. वारकरी ज्या नेमाने दरवर्षी पंढरीला जातात त्याच नेमाने दर महिन्याला ही बया फेशियल करत असावी इतका टवटवीत चेहेरा आणि व्यवस्थित कोरलेल्या भुवया पाहून हसायला आलं. बहुतेक लेकाची काळजी करुन उरलेल्या वेळात घरात ब्युटी पार्लर चालवत असावी.
लाडला सिनेमात श्रीदेवीच्या
लाडला सिनेमात श्रीदेवीच्या फॅक्टरीतल्या वर्करचा हात अपघातग्रस्त होतो म्हणून अनिल कपूर तिची गाडी न सांगता त्या वर्करला हॉस्पिटलला पोचवण्यासाठी वापरतो. श्रीदेवीला ही गोष्ट कळते तेव्हा ती गाडी पेटवते त्यावेळेला तिने असा ब्लॅक्/ग्रे कॉम्बिनेशनचा फॉर्मल ड्रेस घातलेला दाखवलाय आणि डोळ्यात ग्रे लेन्स.... गाडी पेटवल्यावर घरी जायला गाडी नसते मग मॅडम चालत पावसात भिजत जातात. घरी आल्यावर अरूणा इराणीच्या मांडिवर डोकं ठेवून रडतात तेव्हा डोळ्यात ग्रे ऐवजी हनी कलरच्या लेन्सेस... कधी चेंज केल्या म्हणे?
तु अगदी डोळ्यांपर्यंत बघतेस
तु अगदी डोळ्यांपर्यंत बघतेस ??????? इतकी बारीक नजर ?

Pages