अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक

Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00

तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?

उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "

या आधिचे सीन या दुव्यावर वाचा

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गेल्या वीक-एण्डला कुठल्यातरी चॅनलवर सुनील शेट्टीचा 'गोपी किशन' हा अचाट सिनेमा लागला होता.
इथल्या एक्स्पर्ट मंडळींनी लिहिलंय का या सिनेमावर? Biggrin
नसेल तर ताबडतोब लिहायला घ्या...

गिटार वाजवायची अशी पद्धत आजपर्यन्त तरी पाहिली नव्हती. असा नाचून सुद्धा तो एकालाही धडकत कसा नाही हीच अचाट गोष्ट आहे.

>> अफाट आहे ती पद्धत. बहुतेक रायफल धरतात तशी धरलीये गिटार बराच वेळ. मला तर वाटायला लागले कि आता गिटारच्या वरच्या भागातुन कधीही गोळ्या सुटु शकतात आता. Lol

सुरक्षा नावाच्या मिथुनच्या चित्रपटात गुंड लोक कार चालवताना देखील हेल्मेट घालुन चालवतात Wink
"सुरक्षा" थोडी जास्तच घेत आहे असे वाटत होते

गोपिका | 2 December, 2014 - 09:05
हे गाणे अवश्य पहा...खूप खूप आवडेल.आगदी सुरुवातिपसुन ते शेवटपर्यंत.कॅप्शन्स अवश्य वाचा....
https://www.youtube.com/watch?v=f8uK_mWnbr4

>> हा व्हिडिओ पाहुन हिटलरची रिअ‍ॅक्शनः https://www.youtube.com/watch?v=MCNLkg26J3M

सुरक्षा नावाच्या मिथुनच्या चित्रपटात गुंड लोक कार चालवताना देखील हेल्मेट घालुन चालवतात डोळा मारा
"सुरक्षा" थोडी जास्तच घेत आहे असे वाटत होते

>> त्यांनी माबोवरचा "हेल्मेटसक्ती"चा धागा वाचला असेल. Rofl

डोम्बल ते गोपिकाने आय टू आय ची लिंक दिली आहे होय! खबरदार त्या गाण्याला कुणी हसाल तर ते गाणं इतकं महान आहे की सर्वसामान्य लोक ते समजून घेऊच शकत नाहीत. ताहिर शहा या जमान्यामध्ला सर्वोत्कृष्ट कलाकार आहे.

ताहिर शहा फॅनक्लबची तहहयात सदस्य नंदिनी.

आय टु आय भयंकर आहे. मला कोणीतरी फॉरवर्ड केले होते मी आधी पाठवणार्‍या च्या डोक्यावर शंका घेतली आणि मग पूर्ण पाहिल्यावर खूप हसले.

गोपिका | 2 December, 2014 - 09:05
हे गाणे अवश्य पहा...खूप खूप आवडेल.आगदी सुरुवातिपसुन ते शेवटपर्यंत.कॅप्शन्स अवश्य वाचा....
https://www.youtube.com/watch?v=f8uK_mWnbr4

>> हा व्हिडिओ पाहुन हिटलरची रिअ‍ॅक्शनः https://www.youtube.com/watch?v=MCNLkg26J3M >>

भ... या... ण!!! अमानवीय मध्ये टाकायला हवं
(तसाही तो धागा गारठलाय!)

माझे नवे ऑल टाईम फेवरिट
१ जबसे हुइ है मोहोब्बत.
२ वेणु मल्लेश
३ आणी आता आय टू आय.
आय टू आय दोनदा बघा. एकदा अभिनयासाठी आणी एकदा लिरिक्स साठी.

वरील तिघांनी एकत्र येऊन एक मुझिक व्हिडिओ काढला तर प्रलय येइल आणी कलकी अवतार प्रकट होईल.

बापरे! ते आय टु आय काय खल्लास गाणं आहे. तो खुर्चीवर केस उजव्या खांद्यावरून पुढे घेऊन बसतो ती एकदम खतरा पोझ आहे. अशी नक्की कोणती मजबुरी असेल की ज्यामुळे त्याला हे गाणं बनवावं लागलं असेल?

अशी नक्की कोणती मजबुरी असेल की ज्यामुळे त्याला हे गाणं बनवावं लागलं असेल?>>>:हहगलो:
मी पण २ मि च्या वर हे गाण नाही पाहु शकले.

नो एंट्री मध्ये शेवटी तिघे हिरो ज्याप्रकारे पडतात आणि एकमेकांचे पाय धरुन लटकतात तो प्रकार प्रचंड अ आणि अ आहे. तसा तो बराच चित्रपट अ आणि अ आहे पण बघायला मजा येते अनिल कपूर मुळे.>>>

असे लटकण्याचे प्रसंग बर्याच चित्रपटात आहेत :

ग्रॅण्ड मस्ति , बोलबच्चन .ई .ई.

ते आय टू आय फारच भयाण आहे अरे. कोबीच्या गड्डयावर निर्गुडीचा पाला ठेवल्यासारखा त्याचा चेहरा आणि रोखून बघत आय टू आय चे न संपणारे पालुपद. मध्ये Reddit वर ताहेर शाह नावाचे पाकिस्तानी गृहस्थ चित्रपट काढणार असल्याची वदंता होती. जर तो हाच असला तर फार अवघड आहे.

तो खुर्चीवर केस उजव्या खांद्यावरून पुढे घेऊन बसतो ती एकदम खतरा पोझ आहे. >>>> आणि त्यासोबत तो हाताच्या बोटं मुडपून हळूच हनुवटी ठेवतो ... कहर , कहर आहे ... कळस कसला कळसूबाई शि़खर .... मेले मी .. मन्त्रमुग्ध होऊन ... तोडलस मित्रा पार तोडलस !!

Eye to eye. Eye to eye
Essentials and sensual eyes
My eyes and your eyes
Colorful eyes our eyes
Fabulous exciting eyes
Eye to eye. Eye to eye
mmmmmmmm.. aaaaaaaah
Keep your love in the soul
Make love with eye to eye
Your flairs and glorious eyes
I can see with my spectrum eyes
Its a genuine classic love
Serious feeling romantic love.
My pride eye to eye
Glowing with your sparkling eyes
Our elegant special love
Sincere peaceful especial love
Eye to eye. Eye to eye
Simple charming eyes
My eyes and your eyes
Dreaming fairies our eyes
Stylish excellent human eyes
Eye to eye Eye to eye
mmmmmmmm.. aaaaaaaah
Eye to eye makes epic era love. life time, once in a life. substantial love is heaven for precise eyes. spectacular eyes.. our eyes.. my eyes and your eyes.. eye to eye.. eye to eye.
Beautiful eyes, and endless love
Your eyes are like a sunshine
Your precious heart belongs to me because i love you
True love always smile
You are mine, always mine
Your love is faithful forever and ever
Without you i am like a butterfly… without fly
Eye to eye. Eye to eye
mmmmmmmm.. aaaaaaaah
Wonderful gorgeous eyes
My eyes and your eyes
Emotional and happy eyes
All lovely eyes full of life
Eye to Eye. Eye to eye
mmmmmmmm.. aaaaaaaah

Eye to eye makes epic era love. life time, once in a life. substantial love is heaven for precise eyes. >>> म्हंजी????

Stylish excellent human eyes >>>> मग आम्ही बकर्याचे डोळे लावतो का हो ?

Without you i am like a butterfly… without fly >>>> ????? म्हणजे butter का रे भाउ ???

हे पूर्ण गाणं म्हणजे कुठल्यातरी दूसर्याच गाण्य्याच भाषांतर वाटतयं , ते पण गूगल ट्रान्स्लेशन वापरून केलेलं Sad

१ जबसे हुइ है मोहोब्बत.
२ वेणु मल्लेश
३ आणी आता आय टू आय.

>> विकुंच्या कमेंटमुळे पहिली २ गाणी सुद्धा बघितली.
म्युझिकवरचा विश्वास उडत चालला आहे.
हिटलर बरोबर बोलला होता.. आय एम ट्रॉमाटाईझ्ड फॉर लाईफ.. Lol

जबसे हुइ है मोहोब्बत. Sad

मी पण आत्ताच बघितल .

हॉरिबल Sad

३-४ वर्शाची मुलं पन छान हावभाव करतात .

एक गंमत बघितली , सुरवातीलाच तो मागे मागे जाउन त्या खांबाला टेकतो आणि लटकतो , तेन्व्हा मागे जाताना तो खांबाचा अन्दाज घेउन सरकतो , आपटणार नाही याची काळजी घेत .

Pages