अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक

Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00

तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?

उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "

या आधिचे सीन या दुव्यावर वाचा

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता तीन इक्के शोधायला लागणार >>> मिळाला तर इथे लिंक देण्याचे करावे. मी गेली अनेक वर्षं शोधते आहे. 'कहने में क्या हर्ज है' कार्यक्रम टीव्ही वर लागत असे तेव्हापासूनच Proud

मिळाला तर इथे लिंक देण्याचे करावे. मी गेली अनेक वर्षं शोधते आहे.>>> +१/

लोटा डान्स अजरामर आहे!!! रंगाखुश पण बर्‍याच दिवसांत पाहिला नाही. आज उद्या बघावा!

मी आज क्लर्क बघणार होते. असा सिनेमा पुन्हा होणे नाही.

ईफेक्टीव जॉगींग. मध्ये मध्ये एक मिनिट पॉज घ्यावा कसा ते हि दाखवलेय. पार्टनर असेल तर उत्तम. १:३४ स्टेपला पार्टनर बरोबर असेल तर जाँगिग कसे असावे आहे.
०.२२ मिनिटाने व्यायाम कसा असावा ह्याचे प्रात्यक्षिक सुरु होते.
http://youtu.be/tJBtu5SBq7A

............
...................

ज्योतिषीही हसतहसत सांगतो- 'ये बेटा चक्रवर्ती होगा,क्योंकी इसकी सभी उंगलियोंपे चक्र है'
आता एवढं सांगितल्यावर ते पोरग मोठं होउन निदान मिथून चक्रवर्तीतरी होईल असं आपल्याला वाटतं पण ते होतं अनिल कपूर, झकास! >>>>>>>>>>:) Happy Happy Happy Happy Happy Happy Happy Happy bhayanak

"मै तुम्हे लेडी ड्रॅक्युला बनाऊंगा और फिर तुम मेरे लिए और ड्रॅक्युला पैदा करोगी" अ ओ, आता काय करायचं असले संवाद आणि कन्सेप्टस आहेत या पिक्चर मधे!! सिरीअसली?? ड्रॅक्युला पैदा??? पूर्ण पिक्चर अ आणि अ आहे रे देवा! >>>>> रमद , ड्रॅक्युला "पैदा" करायची आणखि एक रेसिपी तो खुद्द ही सान्गतो ,

" फिर हम उन सब लोगोन्का खून पी लेंगे . उनके खून मे "किटाणू" डाल के और कई ड्रॅक्युला पैदा करेन्गे "

असच काहीतरी . पण (उनके खून मे "किटाणू" डाल के ) हे १००% नक्की !

ड्रॅक्युलाचे दात जत्रेत मिळणारे प्लेस्टिकचे दात आहेत >>>
आणि ती लेडी ड्रॅक्युला - थर्मॉकॉलचे पंख लावून फिरते.
शीतल त्याना क्रॉस ने मारताना चक्क धिशुम धिशुम असा आवाज येतो .

माझी शनीवरची दूपार एकदम मजेत गेली Happy

ते चक्कर येवून पडणे आणि उलटी होणे हे प्रकार लहानपणी कळत नसत. पण मी तेवढी आगाउ नसल्याने विचारले नाही कोणाला प्रश्ण पडला तरी.
पण माझ्या पेक्षा जराशी मोठी असलेली मावसबहिणीने, आजी एकदा उपास तपास करून देवळात उन्हातून चालत जावून आल्यावर चक्कर येवून पडलेली,

हिने लगेच, आजेला बाळ होणार का आता? विचारलेले. Proud

____/\_____ eye to eye .............my cat eyes.........:) Happy Happy Happy Happy Happy

प्लिज कुणितरी मै प्रेम की दिवानी हू चं परिक्षण (??) लिहायला घ्या.
अचाट आणि आतर्क्य पणाची परिसिमा आहे हा सिनेमा.

सुंदर नगर छोटं गाव असावं, पण तिथे समुद्र आहे, विमानतळ आहे, अतिशय मोठं आणि सर्व सोयीनी युक्त कॉलेज आहे. मॅकडी सारखं मोठं स्नॅक सेंटर ही आहे, सुरेख साईट्स आहेत म्हणून अमेरिका सोडून अभिषेक सरळ इथं प्रोजेक्ट सुरू करायला येतो, याच गावात रुबू भाटिया आणि जावेद जाफरी व्हॅलेंटाईन म्हणू नका, फ्रेंडशिप डे म्हणू नका सर्व पार्ट्या साजर्या करतात. लव्ह बोट नावाचं एक हॉटेल आहे (कमीत कमी सप्त तारांकित असावं)शिवाय ननिसर्गरम्य,,,, नो गर्दी नो रहदारी

तुमसे मिलने को दिल करता है या गाण्यात "रे बाबा" ही ओळ जोडणार्‍याचा शनिवारवाड्यावर जाहीर सत्कारच करायला हवा Happy अतर्क्य पेक्षाही अतर्क्य लॉजिक आहे

पियू तु कशाची लिंक दिली आहेस?

>> युट्युबवर दोन येडे वेगवेगळ्या चित्रपटांचे विनोदी परीक्षण टाकतात. त्याची लींक आहे.
युट्युब बॅन असेल तिथे. मोबाईलवर किंवा घरी जाऊन बघ.

अचाट आणि अतर्क्य लॉजिक चा एक विडीओ वॉट्स अ‍ॅप वर आला आहे , तो बघतानाच या धाग्याची आठवण आली. इथे कसा पोस्ट करावा कळत नाही. Happy

हम उन सब लोगोन्का खून पी लेंगे . उनके खून मे "किटाणू" डाल के और कई ड्रॅक्युला पैदा करेन्गे " >>>

असे जत्रेतले चीप न धुतलेले दात असल्यावर त्यात किटाणू नाहीतर काय असणार? Proud

करीनाचे बरेचसे चित्रपट येतील ह्यात.

खुशी( लहान बाळांचा सीन, वगैरे वगैरे)
मुझे कुच कहना है
मै प्रेम की दिवानी
रेफ्युजी

रेफ्युजी अचाट आणि अतर्क्य होता?????? मला तरी पहिलाच सिनेमा म्हणून तो निवडल्याबद्दल करीना अणि अभिषेक दोघांचंही कायम कौतुक वाटलंय.

एक वेळ असोकाचं नाव घेतलं असतं तरी चाललं असतं.

प्रेम अगनमधलं एक्सरसाईझ साँग आमचं बरंच फेवरेट होतं.

मै प्रेम की दिवानी आणि रेफ्युजी - एकाच लायनीत .
मै प्रेम की दिवानी हा अचाटपणाचा कळस होता. आणि हृतिक ची अक्टिंग हा आचरटपणाचा कळस होता. अभिषेक हा बावळट पणाचा कळस होता

यादों की बारात या सिनेमा आख्‍खा अतर्क्यच आहे. परवाच पाहिला. काय तर म्हणे व्हिलनला ओळखण्याची एकच खूण आहे आणि ती म्हणजे तो एका पायात आठ नंबरचा आणि दुसऱ्या पायात नऊ नंबरचा बूट घालतो. वा रे लॉजिक. त्यातही विजय अरोरा नामक हिरो (?) अॅक्टिंगच्या नावाखाली जे काय करतो, ते अगदी भयानक. यादों की बारात या शेवटच्या गाण्यात धर्मेंद्राला रडताना पाहून अक्षशः हसू फुटते.

Pages