अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक

Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00

तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?

उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "

या आधिचे सीन या दुव्यावर वाचा

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

का हो दिनेशदा? कतरीनाला काय नाजुक नार समजलात का? तिने ऑलरेडी एकदा अक्षय कुमारला खांद्यावरून उचलून आगीतून बाहेर आणलंय की....

>>का हो दिनेशदा? कतरीनाला काय नाजुक नार समजलात का? तिने ऑलरेडी एकदा अक्षय कुमारला खांद्यावरून उचलून आगीतून बाहेर आणलंय की....

आणि अक्कीने मागे एकदा WWF च्या अंडरटेकरला उचललं होतं. म्हणजे कॅटरिना अंडरटेकरला पण उचलू शकेल Proud

आईशप्पत... काय डेंजर बाई आहे ही, कतरीना !

त्या टॉम क्रूज आणि कॅमेरुन दियाझ च्या शुटींगच्या वेळी तिने त्याला एवढा जोरदार ठोसा लगावला होता कि कळवळून कोलमडला होता तो. याहू वर क्लीप होती ती.

आता आंखे (जुना) चित्रपटातल्या ह्या सीनबद्दल ऐका.

फकिराच्या ड्रेसमधला धर्मेन्द्र बैरुट्च्या रस्त्यावरून फिरत असतो. आपल्या इथे कसं ते उदाचं भांडं घेऊन फिरतात तसं त्याच्या हातात एक भांडं असतं. व्हिलनचा एक चमचा रस्त्यात उभा असतो तो त्याला अडवतो. धर्मेन्द्र थोडा धूर त्याच्या तोंडावर सोडतो. तो माणूस बेशुध्द पडतो. मग हा धावत धावत धुमाळच्या दुकानात शिरतो. धुमाळ त्याला आत जायला सांगतो. तो व्हिलनचा माणूस आणखी एका चमच्यासोबत आत येतो. त्याने आपण व्हिलन आहोत ते मघाशी प्रेक्षकांच्या लक्षात आलं नसेल म्हणून गॉगल लावलेला असतो आणि तोंडात चिरूट धरलेला असतो. ते धुमाळला फकिराबद्दल विचारतात. तो कानांवर हात घेतो. मग ते त्याला पकडून आत नेतात.

संधी साधून धुमाळ भिंतीत असलेला एक खटका दाबतो. लगेच धर्मेन्द्र आत लपलेला असतो तिथे एक लाल दिवा लागतो. तो कमी म्हणून एक अलार्म पण वाजायला लागतो. धर्मेन्द्र लगेच बाथरुम मध्ये घुसतो. तिथे असलेला एक खटका दाबल्यावर इंडियन पध्दतीचा टॉयलेट सरकतो आणि त्याखालच्या पायर्‍या उतरून तो गायब होतो.

आता मी विचार केला तो असा. समजा एखादा पाहुणा आला. आणि त्याने निसर्गाच्या हाकेला ओ द्यायला (दीर्घ किंवा ह्र्स्व) ह्या टॉयलेटचा वापर केला तर काय होईल. बरं, पाव्हण्याला हवापाणी मानवलं नसलं , डिसेन्ट्री लागलेली असली, आणीबाणीच्या प्रसंगात त्याने टॉयलेटचा वापर केला आणि नेमकं त्याच वेळी कोणाला ते भुयार वापरायचं असेल तर???

ह्याच पिक्चरमध्ये माला सिन्हा आणि नासिर हुसेन एकमेकांशी बोलताना कोडवर्डचा वापर करतात. तो म्हण्तो 'शेर-ए-पंजाब स्पिकिंग' आणि ती म्हणते 'ताजमहाल स्पिकिंग'. मग लगेच तो म्हणतो 'हॅलो मीनाक्षी'. अरे शहाण्या! तिच्या नावानेच हाक मारायची होती तर मग कशाला शेर-ए-पंजाब वगैरे भानगड करायची? हे कोडवर्ड्स ऐकून माझ्या मर्‍हाटी मनाला असंख्य यातना झाल्या. मराठी माणूस असता तर त्याने 'ढाण्या वाघ स्पिकिंग' म्हट्लं नसतं का?

पिक्चरच्या शेवटी शेवटी ललिता पवार (ही शत्रूच्या गोटातली असते आणि नासिर हुसेनच्या घरात वेष बदलून रहात असते) पकडली जाते. ती चोर आहे हे कळताच नासिर हुसेनचा एक जिवलग मित्र आपल्याच मुलाला गोळी घालतो. हा मित्र मुसलमान असतो हे काही सांगायला नको. मी हा पिक्चर पूर्ण पाहिला नसल्याने नक्की संबंध लक्षात आला नाही. पण मजा म्हणजे त्या मुलाला जिन्यावरून पळत असताना पाठीत गोळी लागते आणि तो हात मात्र छातीवर घेतो.

हे सगळं रामायण चालू असताना ललिता पवारला एका सरदारजीने धरून ठेवलेलं असतं. त्याची नजर चुकवून ती कनवटीला साडीत (पूर्वीच्या आज्या खडीसाखर ठेवत तशी) सायनाईड ची गोळी ठेवलेली असते ती काढते आणि लिमलेटची गोळी खावी तशी मटकावते. मग २ सेकंदात ओठाच्या कडेला थोडंसं रक्त ठेवून मान वाकडी करते. आता माझ्या मनात विचार आला तो हा की ह्या आ़जीबाईंनी प्रत्येक साडीत एकेक सायनाईडची गोळी लपवली होती का? मग गडी माणसांनी साडी धुताना ती विरघळ्ली नसेल (साबणाची चुकून राहिलेली वडी विरघळते तशी) का? का इतके दिवस एकच साडी वापरत होत्या?

नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे धर्मेन्द्र आणि माला सिन्हा व्हिलनच्या अड्ड्यावर पोचतात तेव्हा व्हिलन्स म्हणजे जीवन आणि मदन पुरी अड्ड्याच्या वरच्या मजल्यावरून काचेच्या आतून बोलत असतात. तेव्हा त्यांच्यासमोर माईक असा ठेवलेला असतो की आत्ता दोघे ड्युएट म्हणायला सुरुवात करतात की काय असं वाटावं. काय हे? एक पी. ए़. सिस्टिम नाही? हे कसले व्हिलन्स??

आँखे म्हणजे धमालच आहे. मदन पुरी आणि जीवनला धरुन बांधून चीनी बनविले आहे. बारीकशा अड्ड्यावर, ''धिस वे मेजर'' असं म्हणत एकाच जागी ४/५ वेळा फिरुन जागेची पाहणी करतात.

खरेच आंखे लैच धमाल आहे. पण भाबडे पिक्चर असायचे त्या काळात . प्रेक्षकही तसेच .मजा यायची. पुन्हा आणखी इस देशकी सरहदको कोइ छू नही सकता, इस देशकी निगेहबान है आंखे असला काही तरी ब्याक ग्राऊन्डला उदघोषणेसारखा डायलॉग

अजून कोणी 'वो फिर आयेगी' च नाव नाही घेतलं ??

हा सगळा पिक्चरच अ आणि आ आहे.. फराह हिरवीण आणि तिचा हिरो... साक्षात राजेश खन्ना..!!! जोडीला भूत असलेली मूनमून सेन आणि तिचा मानव असलेला बॉयफ्रेंड जावेद जाफ्री..!! ही मूनमून सेन फराहला झपाटते आणि मग खन्नासाहेब चक्क मंत्र-तंत्र शिकून येतात भगवी कफनी घालून आणि ती भूतीण उतरवतात.!!

... आणि हो... यात शेखर सुमनही आहे.!!

>>आणि हो... यात शेखर सुमनही आहे.!!

का? का? मुनमुन भुतांच्या राज्यात परत गेल्यावर तिचा बॉफ्रे असेल बहुधा Happy

अमिताभ ने के बि सी वर सांगितलं...की अमर अकबर अ‍ॅन्थोनी मधे तीन हिरो आपल्या मा ला एकाच वेळेस रक्त दान करतात...तिघांचे रक्त एकाच वेळेला एका बाटलीत जमा करुन आई च्या अंगात सोडले जाते.......हा मुव्ही इतक्या वेळा बघितला तरी हे काही लक्षात आले नव्हते...ती आई उठेगी नही उठजायेगी असा प्रकार खरच कोणी केला तर..

आणि त्याने हेही सांगितले की तिघेही जण गाण्यात कंठशोष करतायत की 'एक जगह जब जमा हो तीनो अमर अकबर अँथनी' तरी समोर व्हीलनला का ही ही समजत नाही. काय हसत होता अमिताभ! मला लगेच त्याला फारेंडाच्या अजरामर लेखाची लिंक द्यावीशी वाटली. Happy

परवा मास्तरजी नावाचा सिनेमा लागलेला टिव्हिवर, त्यात रा.ख.ची पहिली पत्नी मरण पावलेली असते आणि दुसरी बायको श्रीदेवी. आधीपासून एक मूल असल्याने ती त्याचा सांभाळ नीट करेल की नाही ही शंका असते रा.ख्.ला मग त्याचा विश्वास संपादन करावा यासाठी श्रीदेवी एकटीच पास वाले गाँव में फॅमेली प्लॅनिंगका ऑपरेशन करायला निघून जाते.
फॅप्लॅ चे ऑपरेशन कुणितरी एकजण निर्णय घेऊन करू शकतो? Uhoh
आणि तो डॉक्टर तर महाविनोदी बोलतो... इनका कुंवारापन ध्यान मे रखते हुए ऑपरेशन नही किया है, सिर्फ इंजेक्शन देके सुलाया है.. Lol Rofl

इनका कुंवारापन ध्यान मे रखते हुए ऑपरेशन नही किया है, सिर्फ इंजेक्शन देके सुलाया है.. >>> Rofl

तो 'मास्टरजी' म्हणजे अचाट वाया गेलेला सिनेमा होता. Rofl

हाहाहाहाहाहा..... काहीपण.......मी हा मुव्ही बघितलाय....पण मधुनच ..हा सीन मिस केला

इथल्या मातब्बर लोकांनी "मास्तरजी" चित्रपट बघितला नाही ????????? अरे रे रे....बघा रे लव्कर आणि लिहा जरा

काल शेषनाग नावाचा चित्रपट लागला होता.
जितेन्द्र (नाग) त्याची एक नागिण.
रेखा अनुपम खेर (पती पत्नी)
ऋषी कपुर (विदाउट स्वेटर) रेखाचा भाउ आणि अतीव सज्जन.

त्यातलं नाग नागिन गाणं बघुनच हा चित्रपट पाहिलाच पाहिजे कॅटेगरीत आहे हे कळालं.
केबलची लाइट गेल्याने हा आनंद घेण्यास मुकलो. Sad Proud

बा द वे, त्या गाण्यात आपल्याला मानवरुपात जितेन्द्र आणि त्याची प्रेमिका दिसतात.
पण चरायला गेलेल्या गुराना (ऋषी कपुर गुराखी. गुरं अनुपन खेरची) मात्र ते नागरुपातच दिसतात.
हे त्या गाण्यात फार चांगल्या प्रकारे सुचित केलय..

काल त्यागी नावाच्या एका महान अनुबोधपटाचा शेवट पहायला मिळाला..!!!

एका बाजूने खलनायकाने झाडलेली गोळी आणि दुस-या बा़जूने एक महान त्यागमूर्ती नायक स्लो मोशन मधे धावत येत असतात.! अर्थातच नायक त्य गोळीला योग्य वेळी मांजरासारखा आडवा जातोच.

गोळी पेक्षाही वेगात धावणारा अतिमानव रजनीकांत हे सांगायला हवं का ??

का? का? मुनमुन भुतांच्या राज्यात परत गेल्यावर तिचा बॉफ्रे असेल बहुधा >>> नाही स्वप्ना. मूनमून सेन जावेद जाफरी ला टपकवते (तिच्या भाषेत मुक्ती देते आणि आपल्याकडे नेते),

शेखर सुमन बरोबर अर्चना पूरण सिंग आहे...आता बोला.!

अनिश्का. | 24 September, 2013 - 05:57
अमिताभ ने के बि सी वर सांगितलं...की अमर अकबर अ‍ॅन्थोनी मधे तीन हिरो आपल्या मा ला एकाच वेळेस रक्त दान करतात...तिघांचे रक्त एकाच वेळेला एका बाटलीत जमा करुन आई च्या अंगात सोडले जाते.......हा मुव्ही
>>>
अग कणेकरांची माझी फिल्लमबाजी ऐकलीस का? त्यात या प्रसंगाच्या सुंदर चिंध्या केल्या आहेत.

इनका कुंवारापन ध्यान मे रखते हुए ऑपरेशन नही किया है, सिर्फ इंजेक्शन देके सुलाया है.. >>> खरं की काय???? महान आहेत. Biggrin

अग कणेकरांची माझी फिल्लमबाजी ऐकलीस का? त्यात या प्रसंगाच्या सुंदर चिंध्या केल्या आहेत.>>>> नाही लिंक देउ शकतेस का??? मला आवडेल बघायला Happy

Pages